समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांसाठी भरती |Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024
नमस्कार मित्रानो, समाज कल्याण विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
- विभाग :- समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र
- पदे :- विविध पदांसाठी (अधिक माहितीसाठी जाहिरात Pdf पहावी)
- एकूण जागा :- 219 जागांसाठी हि भरती होणार आहे.
- शैक्षणिक पात्रता :- पदानुसार (अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी)
- अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/-फी
मागासवर्गीय : रु.900/- फी
- वयाची अट :- 31 ऑक्टोबर रोजी, 18 ते 38 वर्ष
- SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट आहे.
- नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र
- अर्ज :- ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 नोव्हेंबर 2024
पदाचा तपशील खालीलप्रमाणे
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
3 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निन्मश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
एकूण | 219 |
महत्वाचे संकेतस्थळ
निवड प्रक्रिया
- खालील पध्दतीचा अवलंब करुन ऑनलाईन गुण ठरविले जातात.
- वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतले जातील.
- परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रामध्ये गुण समायोजित करुन समतुल्य करण्यात येतील.
- गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- संगणक आधारित (Computer Based Online Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशिल खालील प्रमाणे राहील.
- प्रश्नपत्रिकामध्ये एकूण 4 विषय असतील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येक विषय चे 25 प्रश्न प्रत्येकी 50 गुणांना असतील, म्हणजेच 100 प्रश्न 200 गुणांना असे.खालीलप्रमाणे विषय, प्रश्न व गुणाची विभागणी केली आहे.
अ.क्र | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1 | मराठी | 25 | 50 |
2 | इंग्रजी | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
समाज कल्याण विभागामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
समाज कल्याण विभागमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ज्याचे अर्ज करायचे राहिले असतील त्यांनी 30 नोव्हेंबर 2024 च्या आतमध्ये भरून घ्या.
समाज कल्याण विभागामध्ये |Samaj Kalyan Vibhag Vacancy किती जागांसाठी भरती निघाली आहे ?
समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांसाठी भरती |Samaj Kalyan Vibhag Vacancy भारती निघाली आहे.