महिला व बाल विकास विभाग भरती 2024 | अर्ज प्रकिया सुरु Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! महिला व बाल विकास विभागात विविध पदासाठी एकूण 236 जागांसाठी भरती. अर्ज करण्यास सुरुवात !
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,आज आपण महिला व बाल विकास विभाग भरती 2024 | अर्ज प्रकिया सुरु Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 भरतीबदल जाणून घेणार आहोत. अर्ज प्रक्रिया कशी, अर्ज करण्याची अंतिम तारीख, पदानुसार शैक्षणिक पात्रता याची संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या लेखामधून घेणार आहोत. आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट- ब (अराजपत्रित)- २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमुद सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता धारण केलेला उमेदवार हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावरून आपला अर्ज हा भरू शकतो. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्याने अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मग अर्ज करावा. अर्ज हा आणि परीक्षा शुल्क हा ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 03 नोव्हेंबर 2024 आहे. तरीही इच्छुक व शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार दिलेल्या तारखेच्या आतमध्ये अर्ज करू शकतात !
- विभाग :- महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग
- पदे :- विविध पदासाठी भरती (अधिक माहितीसाठी जाहिरात pdf बघावी)
- एकूण जागा :- 236 जागांसाठी भरती होणार आहे
- परीक्षा फी :- खुला प्रवर्ग- रु.1000/- (मागास प्रवर्ग रु.900/-)
- नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र
- वयाची अट:- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्ष असावे
- अर्ज प्रक्रिया :- ऑनलाइन
- परीक्षा :- ऑनलाइन CBT
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2024
महत्वाचे संकेतस्थळ
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
जाहिरात pdf | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | Join Now |
ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप
- परीक्षा हि ऑनलाइन CBT पद्धतीने घेण्यात येईल.
- घेण्यात येणाऱ्या परीक्षाची भाषा हि मराठी व इंग्रजीमध्ये असेल, प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
- ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही. अश्या पदाकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित CBT घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा 200 गुणांची घेण्यात येईल.
- परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक 50 गुणांची या प्रमाणे 200 गुणांची परीक्षा हि घेण्यात येईल.
- गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे,
- लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क, लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क, स्वयंपाकी, गट-क या पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- त्यानंतर व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.
- १२० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ३० गुणांची या प्रमाणे एकूण १२० गुणांची संगणक आधारीत परीक्षा घेण्यात येईल.
- जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायीक चाचणी साठी पात्र राहतील.
- लेखी परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्तीकरीता शिफारस करण्यात येईल. व्यावसायीक चाचणी करीता निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
- परीक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुणदान पद्धत नाही.
- उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी/संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
Conclussion
नमस्कार स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या मित्रानो, आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या. तुमच्या प्रयत्नांना लवकर यश मिळू दे हिच सदीच्छा ! तर मित्रांनो आम्ही नोकरी संदर्भात माहिती आपल्यासाठी घेवून येत असतो. कारण आम्हाला माहिती आहे विद्यार्थी हा अभ्यासाच्या प्रवाहमध्ये असल्या कारणाने जाहिरात कधी निघते व शेवटची तारीख काय यामध्येच अर्ज करण्याची मुदत हि संपून जाते. म्हणून आम्ही एक निर्धार केला कि आपल्या मित्राना , नोकरी संदर्भात माहिती हि त्यांच्या Whatsapp & Teligram वर सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा आमचा छोटासा प्रयन्त आहे. आम्ही वारंवार परीक्षा संदर्भात माहितीची अपडेट आपल्या ग्रुप देत असतो. कोणत्याही जॉब चा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण एकदा अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत जाहिरात पहावी मगच अर्ज करावा…..आपल्याला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या !!
महिला व बाल विकास विभाग भरती | Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
महिला व बाल विकास विभाग भरती 2024 अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 03 नोव्हेंबर 2024 आहे तरीही इच्छुक उमेदवार व शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेलं उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.
महिला व बाल विकास विभाग भरती Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 एकूण किती पदांसाठी हि भरती होत आहे ?
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट- ब (अराजपत्रित)- २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमुद सरळसेवा अश्या एकूण 236 कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता धारण केलेला उमेदवार हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज !
महिला व बाल विकास विभाग भरती Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 ची स्थापना कधी करण्यात आली ?
महिला व बालकांचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढी प्रेरणा देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयचा एक भाग म्हणून इ.स १९९५ साली महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना करण्यात आली. ३० जानेवारी पासून २००६ पासून महिला व बाल विकास विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला.