भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|
canva


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|

योजनेचे नाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन,निवासी आणि इतर शैक्षणिक खर्च देणे
लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी.पालकांचे उत्पन्न २,५०.०००-पेक्षा जास्त नसावे
मिळणारा लाभ प्रत्येक वर्षी ६०,००० / ५१,००० हजार रुपये अटी शर्तीनुसार
योजनेचा संपर्क विभाग महाराष्ट्र समाज कल्याण विभाग आणि जिल्ह्यातील विभाग
Dr.Babasaheb ambedkar swadhar yojana 2024

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे.आपल्याला शिक्षणाच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.विद्यार्थी मित्रानो आज आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| योजनेविषयी जाणून घेणार आहोत.शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो या दुधाला पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य होत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच महत्व पटवून दिले.तसेच प्रत्येक विद्यार्थाच शिक्षण हा अधिकार आहे आणि त्याला तो मिळालाच पाहिजे.त्यामध्ये त्याची परिस्थती आड येऊ नये.कोणताही विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहपासून लांब जाऊ नये.वंचित राहू नये ह्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|राज्यसरकार आणि समाजकल्याण विभाग हा योजना राबवत असतो.तर

आपण जर बघितले तर राज्यात किंवा इतर राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तिथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याची संख्या हि मोठ्या प्रमाणात वाढत आहे.राज्यात वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विध्यार्थ्यांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.अश्या परिस्थिमुळे गरीब कुटुंबातील मुल शिक्षणापासून लांब जाताय.खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश फीस हे खाजगी कॉलेज आकारत आहेत.त्यामुळे बाहेर शिक्षणासाठी जाण्यासाठी तिथे विध्यार्थ्यांना रूम,मेस आणि क्लासेस लावावे लागतात हे वाढीव खर्च हि खूप असतो तो पालकांना झेपावत नाही.त्यामुळे पुढील शिक्षणास मर्यादा येतात.शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरु करून तेथे प्रवेश देण्यावर खूप समस्या असतात जसे कि जागेची उपलब्धता आणि बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन.अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहू नये.म्हणून भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्याच्या म्हणजेच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विध्यार्थी यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली.स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी/१२ वी/पदवी/पदविका परीक्षामध्ये ६०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी हि मर्यादा ५०% असेल.असे शासनाच्या जीआर मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.तर विद्यार्थी मित्रानो आज आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship| २०२३-२०२४ ह्या योजनेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.स्वाधार योजनेसाठी पात्रता.शासनाचे निकष आणि लागणारे कागदपत्रे कोणती लागणार आपण हे बघणार आहोत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar form|swadhar yojana form pdf|swadhar yojana document list in marathi|swadhar scolarship|

 लाभार्थ्यांना देण्यात येणार रक्कम खालीलप्रमाणे आहे.हि रक्कम शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबधित विद्यार्थ्याच्या आधार कार्ड किनक असलेल्या बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अ.क्र खर्चाची बाब मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई
,ठाणे,पुणे ,चिंचवड,नागपूर आणि
पिंपरी ह्या ठिकाणी शिकणाऱ्या
विद्यार्थ्यास देण्यात येणार रक्कम
इतर ठिकाणी जसे कि शहातील व उर्वरित
क वर्ग महानगपालिका क्षेत्रातील
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास देण्यात
येणारी रक्कम
उर्वरित ठिकाणी उच्च
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी रक्कम देय असेल
१.भोजन भत्ता ३२,००० २८,००० २५,०००
२.निवास भत्ता २०,००० १५,००० १२,०००
३.निर्वाह भत्ता ८,००० ८,००० ६,०००
एकूण ६०,००० ५१,००० ४३,०००

टिप: वरील रक्कमेव्यतिरिक्त वैदकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्य्साठी प्रतीवर्ष रु-५००० व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु २००० इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.

योजनेचा पात्रता:

  • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच लाभ फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गांना मिळेल.
  • विद्यार्थ्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थ्याचे बँक खाते उघडलेले असेल ते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे,
  • पालकांचे उत्पन्न रु २,५०,००० रु पेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • बिद्यार्थी हा स्थानिक नसावा.म्हणजेच विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली संस्था ज्या ठिकाणी आहे अश्या ठिकाणचा लाभार्थी राहणारा नसावा.
  • विद्यार्थी हा इ.११ वी ,१२ वी आणि त्यानंतरचे शिक्षण हे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • ११ वी व १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी मध्ये कमीत-कमी ६०% गुण असणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थी १२ वी नंतरचा दोन वर्षाकरिता जास्त कालवधी असलेल्या पदविका किना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
  • दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान ६०%गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेड किंवा CGPA चे गुण असणे आवश्यक राहतील.
  • विद्यार्थ्याला १२ वी नंतर पदविका किंवा पदवी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर.अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.आणि पदवीनंतर पदव्युतर पदवी किंवा पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
  • विद्यार्थ्याची निवड हि त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.निवड झालेल्या विधार्थी संबधित अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण करेल तेव्हाच तो स्वाधार योजनेचा लाभास पात्र असेल.
  • स्वाधार योजनेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण असेल.दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणाची पात्रता हि किमान ५०% असेल.
  • विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून प्रत्येक सत्राची परीक्षा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून १५ दिवसाच्या आतमध्ये नेमून दिलेल्या कार्यलयात सादर करणे बंधनकारक रहील.स्वाधार योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे नाहीतर ज्या विद्यार्थ्याला ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळतील असा विद्यार्थी ह्या योजनेस अपात्र ठरेल.
  • स्वाधार योजनेचा लाभ प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमा परेंत देय राहील.
  • स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक कालावधीत जास्तीत-जास्त ७ वर्षापारेंत घेता येईल यांची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी.
  • लाभ घेणारा विद्यार्थी जर खोटी माहिती आणि कागदपत्रे सादर करून किंवा अभ्यासक्रम पूर्ण नाही केला.किंवा नौकरी व व्यवसाय करत असल्यास किना इतर मार्गाने योजनेचा लाभ घेत असेल तर तो ह्या योजनेस अपात्र असेल.आणि त्याच्याकडून दिलेले रक्कम हि १२ टक्के ने वसूल केली जाईल.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|
canva

स्वाधार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:

swadhar yojana document in marathi

स्वाधार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाने आहेत.

सूचना:मुल प्रमाणपत्र स्वाधार योजनेच्या फॉर्म सोबत जोडू नये.

  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी
  • बँक खाते पासबुक(आधार कार्डशी लिंक केलेले असावे)
  • महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा(डोमासाईल व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र)
  • रेशन कार्ड,मतदान कार्ड,जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी उपलब्ध असेल तो पुरावा देऊ शकतात.
  • तहसीलदार यांचा उत्पनाचा दाखला.इ(उत्पन्न मर्यादा २,५०,००० एवढी)
  • प्रवेशित महाविद्यालय,कॉलेज यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • विद्यार्थी दिव्यांग असेल त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे
  • १०वि ,१२वी आणि पदवी परीक्षेचे गुणपत्रक
  • बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असले पाहिजे.
  • विद्यार्थिनी जर विवाहित असेल तर तिच्या पतीचा वार्षिक उत्पनाचा दाखला
  • विद्यार्थी स्थानिक नसल्याबाबत चे प्रमाणपत्र
  • लाभार्थी विद्यार्थाने कोणत्याही शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेतला नसलेले शपथपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
  • विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतोय त्या घर मालक आणि विद्यार्थी करारनाम(१०० स्टॅम्प पेपर वर करारनामा असला पाहिजे)
  • उत्तीर्ण सत्र परीक्षेचे निकाल प्रत सादर करणे
  • महाविद्यालायचे उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे सांगितलेले ऑफिसमध्ये
  • स्वाधार योजनेचा फॉर्म चांगल्या अक्षरात भरून स्वतःच्या स्वाक्षरीसह सांगितलेले सर्व कागदपत्रे जोडून सादर करणे.

स्वाधार योजना स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा.

स्वाधार योजना भाडे करारनामा|swadhar yojana agreement form pdf

स्वाधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा

द्वितीय वर्षासाठी अर्ज रिनीवल करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • बोनाफाईड
  • मागील वर्षाचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • उत्पनाचा दाखला
  • बँक पासबुक
  • भाडे करारनामा(Agreement)
  • हमीपत्र किंवा शपथपत्र
  • मेस किंवा भोजनालयाचे बिल पावती
  • राहत असलेला रूमचा Map लोकेशन फोटो
  • भरलेल्या फॉर्म आपल्या स्वाक्षरीसह आणि नमूद केलेले कागदपत्रे लावीन संबंधित ऑफिस ला जमा करावे.

बालिका समृद्धी योजनेबद्दल जाणून घेण्यसाठी इथे क्लिक करा.

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर swadhar योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी पात्र आहेत.त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २,५०,०००पेक्षा जास्त नसावे.विद्यार्थ्याला कमीत-कमी ६० टक्के असावे.

स्वाधार योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

स्वाधर योजनेचा लाभ मिळण्यासाठी१.विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध असावा.२.विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असावा.३.पालकाचे उत्पन्न २,५०,०००पेक्षा अधिक नसावे.४.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.५.विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतोय त्या ठिकाणचा स्थानिक रहिवासी नको

द्वितीय वर्षासाठी अर्ज रिनीवल करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?

1.बोनाफाईड 2.मागील वर्षाचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र 3.जातीचा दाखला 4.उत्पनाचा दाखला 5.बँक पासबुक 6.भाडे करारनामा(Agreement) 7.हमीपत्र किंवा शपथपत्र 8.मेस किंवा भोजनालयाचे बिल पावती 9.राहत असलेला रूमचा Map लोकेशन फोटो 10.भरलेल्या फॉर्म आपल्या स्वाक्षरीसह आणि नमूद केलेले कागदपत्रे लावीन संबंधित ऑफिस ला जमा करावे.

निष्कर्ष:नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो,आपल्या ओजस्वी सरकारी योजना मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो. भविष्य उज्ज्वल व्हावे आणि आपल्याला अगणित यश मिळावे.आपल्याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छ्या.आपण अनेक पोस्ट मध्ये नव-नवीन योजना आपण बघत असतो त्यामध्ये आज आपण स्वाधारभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar form|swadhar yojana form pdf|swadhar yojana document list in marathi|swadhar scolarship| योजना बघितली.ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्र,पात्रता आणि लाभ कोणाला मिळणार हे सर्व आपण सविस्तर पणे बघितले.प्रिय विद्यार्थी मित्रानो आमचा एकच उद्देश असतो कि प्रत्येक योजना हि आपला वाचकापरेंत पोहचली पाहिजे आणि त्याचा लाभ त्या संबधित लाभार्थ्याला मिळाला पाहिजे.कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहू नये हा आमचा प्रामाणिक प्रयन्त असतो.आपल्याला एक सूचना आहे वाचक मित्रानो आपल्याला कोणताही योजनेसंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण अगोदर अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.अश्या नव-नवीन योजेनाची माहिती हवी असेल तर ओजस्वी सरकारी योजना हा आपला whatsaap ग्रुप जॉईन करा.

व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यसाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२३-२०२४| swadhar yojana|swadhar scolarship|”

Leave a Comment