१ रुपयात पिक विमा योजना २०२४ महाराष्ट्र | असा करा अर्ज आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती
महाराष्ट्रात १ रुपयात पिक विमा योजना घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.लवकरात लवकर असा करा अर्ज!
पिक विमा संदर्भात माहिती
१ रुपयात विमा आपण ऐकल असेल हे खर आहे!शेतकरी मित्रानो प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीब हंगाम २०२३-२०२४ साठी महाराष्ट्रातील शेतकर्यांना केवळ १ रुपया मध्ये पिक विमा 1-rupyat-pik-vima-yojana–2024 संरक्षण मिळणार आहे.
आपण जर बघितले मित्रानो,बळीराजा हा वर्षभरात विविध संकटापासून आपले पिक वाचवत-वाचवत शेवटी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होत्याच-नव्हत होत जसे कि गारपीट,अतिवृष्टी ,वारावादळ ,रोग आणि किडापासून पिक पूर्ण नाहीस होत.यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नसतो.शेतकरी शेतीसाठी सावकाराच कर्ज किंवा आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून शेती करतो.पण अश्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी राजा हा पूर्णपणे हतबल होऊन जातो.अश्यावेळी केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून विविध योजना घेवून येत असतो कारण शेतकऱ्याचे कल्याण व्हावे,शेतकऱ्याची परिस्थिती सुधारावी व त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयन्त हा सरकारचा असतो.तर 1-rupyat-pik-vima-yojana–2024 अश्याच महत्वपूर्ण योजनापैकी १ रुपयात पिक विमा योजना हि खूप महत्वाची योजना आहे.
चला शेतकरी मित्रानो आज आपण १ रुपयात पिक विमाबद्दल जाणून घेवूया.१ रुपयात पिक विमासाठी कोणते कागदपत्रे लागतील,योजनेसाठी पात्रता काय?यांची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.
एक रुपयात पिक विमा योजना काय आहे समजून घेवूया:
१.हि योजना नैसर्गिक आपत्ती ,रोग आणि किडीमुळे होणाऱ्या पिकाचे संरक्षण प्रदान करते.
२.सर्व झालेल्या पिकाचे नुकसान हे विमाद्वारे भरून दिले जाईल.
एक रुपयात पिक विमा योजनेचे फायदे:
१.कमी खर्च मध्ये आपले झालेले नुकसान भरपाई भरून दिली जाते.
२.नैसर्गिक आपत्ती किंवा रोग आणि किडीपासून होणाऱ्या नुकसानीचे संरक्षण प्रदान करते.
३.शेतकऱ्यांना एक प्रकारची पिक विमाबद्दल आर्थिक मदत केली जाते.
४.पिक नुकसान झाल्यास आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना धीर दिला जातो.
एक रुपयामध्ये विमा साठी पात्रता:
- महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत.
- ज्या शेतकरी बांधवानी PM जिसन सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेलं असेल,असे शेतकरी १ रुपया विमामध्ये स्वयंचलितपणे पात्र आहेत.
- बाकीच्या शेतकऱ्यांना विमा कंपनिकडे नोंदणी करावी लागेल.
विमा योजनेसाठी कागदपत्रे:
१ रुपयात पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँकेचे पासबुक
- आधार लिंक केलेलं खाते
- पेरणीची तारीख
- पिकाचे क्षेत्रफळ
- लागवडीचा प्रकार
- शेती जर आपण कसबटाई वरती करत असणार तर मालकाची संमिती पत्र
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अधिक माहितीसाठी पिक विमा योजनेच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा!
पिक विमा योजनेसाठी करा असा अर्ज !
पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण अर्ज करू शकतात.
- ऑनलाईन अर्जासाठी https://www.pmfby.gov.in या वेबसाईट वर जा.
- या वेबसाईट वरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया:
अश्या पद्धतीने करा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आणि १ रुपयात विमा योजनेचा लाभ घ्या !
- ऑफलाईन अर्ज घ्या.
- निवडलेल्या पिक विमा कंपनीच्या शाखेशी संपर्क साधून आणि संपूर्ण माहिती मिळवा.
- अर्ज हा पूर्णपणे योग्य ती माहिती व आवश्यक माहिती भरा.
- अर्जाला आवश्यक कागदपत्रे लावा.
- स्वतच्या स्वाक्षरीने व पासपोर्ट फोटो लावून हा अर्ज संबधित अर्ज कंपनी ला द्या.
- शेवटीची प्रोसेस म्हणजे पिक विमा हफ्ता भरा.
अश्याप्रकारे आपला ऑफलाईन हा अर्ज हा भरला जाईल.1-rupyat-pik-vima-yojana–2024
टीप:पिक विमा कंपनी निवडताना तुमच्या जिल्यातील विमा कंपनीची यादी हि विभागाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.यादी बघून आपण विमा कंपनी ची निवड करू शकतात.
एक रुपयात पिक विमा योजनेची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी येथे क्लिक करा !
प्रिय वाचक मित्रानो आज आपण १ रुपयात विमा योजेनेविषयी जाणून घेतले.आपले जर १ रुपयात विमा योजनाबदल काही प्रश्न असतील तर आम्हाला Comment ने विचारू शकतात.आम्ही तुमच्या प्रश्न आणि समस्याचे लवकरच निराकरण करू,1-rupyat-pik-vima-yojana–2024
मित्रानो कोणताही योजनेचा अंतिम निर्णयापूर्वी आपण संबधित वेबसाईट पडताळूनच योजनेसंबधी अंतिम निर्णय घ्यावा.किंवा नजीकच्या ऑफिस ला भेट देऊन पूर्ण माहिती जाणून घ्यावी.
प्रश्न:पिक विमा हेक्टरी किती?
उत्तर:पिक विमा हा शासनाने ठरवून दिलेल्या रक्क्मेनुसार मिळेल.प्रती हेक्टर रु २०,००० रुपये मिळतील.
प्रश्न:पिक विमा योजना म्हणजे काय?
उत्तर:आपण जर बघितले तर नैसर्गिक संकट हे खूप मोठ्या प्रमाणत यायला लागले जसे कि गारपीट,अतिवृष्टी ,वारावादळ आणि पिकावर येणारे रोग यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते,त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी विमा योजना हि प्रदान केली जाते.
प्रश्न:पिक विमासाठी कोण पात्र आहे?
उत्तर;पिक विमासाठी सर्व शेतकरी पात्र आहेत.ज्यांनी PM सन्मान निधी योजनासाठी नोंदणी केली आहे अश्या शेतकऱ्याचा स्वयंचलीत हा अर्ज भरला जातो.पिक विमासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
प्रश्न:पिक विमाचे प्रमुख दोन प्रकार कोणते?
उत्तर;पिक विम्याचे २ प्रकार आहेत .१ उत्पनावर आधारित पिक विमा पॉलीसी आणि महसूल विमा पॉलिसि हहे दोन प्रकारच्या विमा योजना आहेत,.
प्रश्न:१ रुपयात पिक विमासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
उत्तर:१.आधार कार्ड २.सातबारा उतारा ३.बँक पासबुक ४.पीकपेरा स्वयं-घोषणापत्र अजून बाकीचे कागदपत्रे आपण संबधित वेबसाईट ला भेट देऊन जाणून घेऊ शकता.
प्रश्न:पिक विमाचे महत्व काय ?
उत्तर;ज्या वेळेस अचानक नैसर्गिक संकट येते अश्या वेळी पिक विमा हे संरक्षण कवच म्हणून शेतकऱ्यासाठी उपयोगी पडते.शेतकऱ्यांना पिकाचे नुकसानभरपाई करून दिली जाते.म्हणून पिक विमा हा शेतकऱ्यासाठी खूपच महत्वाचा आहे.
प्रश्न:भारतात पिक विमा अनिवार्य आहे का?
उत्तर:जर आपण पिकासाठी जर कर्ज घेतले असेल तर तुम्हाला पिक विमा हा अनिवार्य आहे.कर्ज नसलेल्या शेतकर्याना ऐच्छिक आहे.
प्रश्न:रब्बी पिक विम्याचा हफ्ता किती आहे/
उत्तर:सर्व खरीप पिकांसाठी फक्त २ % आणि रब्बी पिकांसाठी १.५ % इतका एकसमान शेतकऱ्यांना हफ्ता भरावा लागेल.
प्रश्न:पिक विमा योजनेचा उद्देश काय?
उत्तर:शेतकऱ्याचे होणारे नुकसानीपासून बचाव व्हावा.शेतकर्याना नुकसानभरपाई हि पिक विमा योजनेतून भरून दिली जाते.