बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000 ते 1,00,000/- शिष्यवृत्ती | Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000 ते 1,00,000/- शिष्यवृत्ती | Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2024

Bandhkam kamgar scholarship yojana 2024

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपण नेहमी आपल्या वेबसाईट वर विविध योजना आणि नोकरी संदर्भात जाहिरात किंवा माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतून जाणून घेण्याचा प्रयन्त करत असतो.तशीच आज आपण राज्यसरकार ची महत्वाची योजना बघणार आहोत.त्या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार च्या पाल्यांना मिळणार 5,000 ते 1,00,000/- शिष्यवृत्ती आणि विविध कोर्से हे नोंदीत बांधकाम कामगारांनाच्या पाल्यांना मोफत करता येईल.

तर चला मित्रानो आज आपण बांधकाम कामगार योजना आणि बांधकाम कामगारांनाच्या पाल्यांना/मुलांना मिळणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती आपण ह्या पोस्टमधून जाणून घेवू. त्यासाठी पात्रता काय | कोणते कोणते कागदपत्रे लागतील | अर्ज कसा करायचा याबद्दल आपण जाऊन घेणार आहोत.

मित्रानो आपण जर बघितले तर बांधकाम कामगार आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला काम करतांना दिसतात. पण हे काम अस्थायी स्वरूपाचे असते  म्हणजेच आज इथे तर पुढच्या महिन्यात बांधकाम कामगारांना कामा करण्यासाठी जावे लागते. यासाठी तात्पुरता स्वरूपात राहण्याची केलेली सोय आणि खाण्या-पिण्यासाठी लागण्रे भांडे हि मोजकेच असतात.तर त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या बांधकाम बांधवासाठी विविध योजना घेवून येत असते, जसे कि भांडे वाटप, साहित्य वाटप पेटी अश्या अनेक अर्थ सहाय्य करणाऱ्या योजना सरकार हे राबवत असते. पण आता बाधकाम कामगाराच्या मुलांसाठी/पाल्यांना शिकता यावे त्यांच्या हाती मालाची पाटी नाहीतर शाळेची पाटी असली पाहिजे. अर्थात जे वडील काम करतो ते आपल्या पाल्याने केले नाही पाहिजे. त्यांनी खूप शिकावे आणि चांगली नोकरी करावी. पण यामध्ये आड येते ती आर्थिक परिस्थिती आणि जन्मापासून लाभलेली गरिबी.ना निवारा आहे, ना शिकण्यासाठी काही साधन आहे.यासाठी आपल्या राज्य सरकार ने महत्वाची योजना आणली ती म्हणजे नोंदीत बांधकाम कामगारच्या मुलांना/पाल्यांना शिकता यावे, यासाठी त्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि कौशल्य वाढेल असे कोर्से(उदा.MSCIT) अश्या ह्या योजनेतून लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.तर लवकरात-लवकर अर्ज करा आणि आपल्या पाल्यांचे आयुष्य आणि भविष्य सुधरण्याकडे पाहुल उचला.

योजनेचे नावबांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती
विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
लाभार्थीनोंदीत बांधकाम कामगारांचे पाल्य/मुल
लाभशिष्यवृत्ती मिळेल
उद्देशपाल्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख—————————–
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000 ते 1,00,000/- शिष्यवृत्ती | Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2024

उद्देश:-

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे व मुलांच्या हाती मालाची पाटी नाहीतर शिक्षणाची पाटी हाती आली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र सरकार नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना/मुलांना शिष्यवृत्ती देणार आहेत.

स्वरूप:-

  • नोंदीत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक योजनाचे स्वरूप खालीलप्रमाणे.
  • बांधकाम कामगारांच्या 2 मुलांना 1 ते 7 वी साठी प्रत्येक वर्षी रु.25,00/- शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • 8वी आणि 10वी साठी प्रतिवर्ष रु.5,000/- शिष्यवृत्ती राज्यसरकार देणार.
  • नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इ.10वी आणि 12वी च्या परीक्षेमध्ये कमीत-कमी 50% किंवा जास्त गुण मिळाले तर राज्य रु.10,000/- शिष्यवृत्ती मिळेल.
  • बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यास किंवा पुरुष कामगाराच्या पत्नीला पदवीसाठी शैक्षणिक पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रत्येक वर्षाला रु.20,000/- रुपये मिळतील.
  • वैदकीय पदवी अभ्यासक्रमासाठी 2 पाल्यांना/मुलांना व कामगाराच्या पत्नीला प्रत्येक वर्ष रु.1,00,000/- शिष्यवृत्ती मिळेल.
  • अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर प्रत्येक वर्षी रु.60,000/- शिष्यवृत्ती मिळेल.
  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना संगणकाचे शिक्षण(MSCIT) करत असेल तर त्याला शुल्काची प्रतिपूर्ती केली जाईल.
  • बांधकाम कामगारांनाच्या 2 पाल्यांना/मुलांना शासनमान्य पदवीसाठी प्रत्येक वर्षी रु.20,000/- आणि पदव्युतर पदविकेसाठी रु.25,000/- मिळतील.
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
अर्ज (Pdf) साठीक्लिक करा
टेलिग्राम लिंकक्लिक करा
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000 ते 1,00,000/- शिष्यवृत्ती | Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2024
 
अ.क्रशिष्यवृत्ती योजना व वर्गशिष्यवृत्ती लाभ कागदपत्रे
11ली ते 7वी ८वि ते 10वीरु.2,500/- रु.5,000/-75% हजेरी बाबत शाळेचा दाखला  
2इ.10वी व 12वीरु.10,000/-किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त मार्कशीट
3इ.11वी व १२वी च्य शिक्षणासाठीरु.10,000/-10वी मार्कशीट 11वी मार्कशीट
4पदवीसाठीरु.20,000/-मागील शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मार्कशीट चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड
5वैदकीय पदवी अभियांत्रिकी पदवीरु.1,00,000 /-रु.60,000/-
6पद्विकेकरितापदव्युतर पदविका  रु.20,000/-रु.25,000/-
7एम.एस.सी.आय.टी(MSCIT)शुल्क परत केला जाईलMSCIT उत्तीर्ण झाल्याचे मार्कशीट फी भरल्याची पावती
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Document 2024

बांधकाम क

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स(बँक खातेशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे)
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • प्रवेश पावती
  • बोनाफाईड  
  • शैक्षणिक प्रमाणपत्र(मार्कशीट)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • चालू मोबाईल क्रमांक
  • सर्व कागदपत्राची स्वयंसाक्षाकीत करून अर्जासोबत जोडायची आहेत.

शिष्यवृत्ती योजनेचा असा भरा अर्ज :-

  • सर्वात प्रथम आपण अर्ज डाउनलोड करा किंवा आपल्याला जवळच्या झेरॉक्स दुकानावर व सेतू केंद्रावर हि मिळून जाईल.
  • अर्ज व्यवस्थित वाचून घ्या काय काय माहिती भरायची आहे त्यासाठी ती कागदपत्रे जवळ ठेवा.
  • अर्जावर कार्यलयीन उपयोगाकरिता आहे तिथे काहीच भरू नका.
  • अर्जदाराची माहिती च्या ठिकाणी
  • अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा (पहिले नाव म्हणजे अर्जदाराचे नाव) (वडील/पतीचे नाव) (आडनाव टाका Surname)
  • आपल्याला मिळालेल्या बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.
  • आधार क्रमांक
  • आपला वैद्य मोबाईल क्रमांक द्या(आपल्याशी संपर्क करण्यासाठी)
  • जन्म तारीख टाका (DDMMYYYY)(जन्म तारीख,महिना आणि शेवट वर्ष)
  • आपल्या पासबुक वरील बँक खात्याची माहिती भरा(अचूक भरा)
  • पाल्याचा तपशील भरा
  • पाल्याचे/मुलाचे नाव
  • प्रवेश घेतलेला वर्ग टाका(उदा.जर 5 वी ला शिकत असेल तर 5वी टाका)
  • प्रवेश घेतलेल्या शाळेचे/महाविद्यालयाचे नाव टाका.
  • अर्जाला आवश्यक असलेल सर्व कागदपत्रे जोडा आणि आपला अर्ज हा संबधित अधिकाऱ्याकडून एकदा तपासून घ्या अर्जावर संबधित अधिकाऱ्याची सही व कार्यलयीन शिक्का घ्या, अर्ज जमा करा आणि अर्जाची पोचपावती घ्या.

बांधकाम कामगार मोफत गृहपयोगी साहित्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |

Conclusion

प्रिय वाचक मित्रानो , आज आपण बांधकाम कामगार पाल्यांच्या शिष्यवृत्ती बदल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. महाराष्ट्र सरकार हे विविध योजना हे जनतेच्या कल्याणासाठी घेऊन येत असते. त्यापैकी हि एक कामगारांच्या भविष्याला दिशा दाखवणारी योजना आहे. कारण बांधकाम कामगार जेथे कामा करतात तिथेच त्याचं तात्पुरता स्वरुपाची राहण्याची व्यवस्था असते. पाण्याचा, आरोग्याचा आणि मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आणि समस्या असताना सुद्धा काम करतात. आर्थिक समस्यामुळे मुलांना हि लवकर त्यांच्यासोबत कामा करायला घेवून जातात. हे दृश्य खरच खूप विचलित करणार आहे. कारण प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणात कोणाचीहि आर्थिक परिस्थिती आड येऊ नये म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार अश्या मुलांना शिकण्यासाठी त्यांनी प्रेरित व्हावे व नेहमी शाळेत जाऊन आपले भविष्य उज्वल करावे यासाठी विविध योजना आणि उपक्रम हे राबवत असतात.तर मित्रानो हि माहिती जास्तीत-जास्त शेअर करा. आपल्या एका शेअर ने बांधकाम कामगारांचा मुलांचा फायदा होईल.

धन्यवाद मित्रानो…..

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे?

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना हि नोंदीत बांधकाम कामगारांनाच्या पाल्यांसाठी आहे.ह्या शिष्यवृत्ती योजनामध्ये प्रत्येक वर्षी वेगळ्या-वेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी रु.२,५००/- पासून ते रु.१,००,०००/- लाख पर्यंत शिष्यवृत्ती राज्यसरकार देईल.

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

मित्रानो, बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अर्ज हा सेतू केंद्र किंवा कामगार कल्याण योजनेच्या अधिकृत साईट वरून आपण अर्ज डाउनलोड करू शकता आणि आपला अर्ज भरून संबधित कार्यलयात जमा करू शकतात.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत.

शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे.
१.आधार कार्ड २.बोनाफाईड ३.प्रवेश पावती ४.बाधकाम कामगार नोंदणी ओळखपत्र ५.रेशन कार्ड ६.पासपोर्ट आकाराचा फोटो ७. शैक्षणिक मार्कशीट चालू आणि मागील वर्षाचे ८.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स ९.मोबाईल नंबर १० . संपूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि त्या अर्जाला अर्जदाराचा फोटो आणि सर्व कागदपत्रे स्वताच्या सहीने जोडायचे आहेत. आपला अर्ज हा कार्यलयात जमा करून जमा करण्याची पोचपावती घ्यायची आहे.

बांधकाम कामगारांसाठी अजून कोणत्या योजना आहेत?

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी ,कामगारचे कामासाठी इकडून तिकडे स्थलांतर होते तत्यामुळे प्रत्येक नोंदीत कामगारांना गृहपयोगी साहित्य(सर्व भांड्यांचा संच) बांधकाम कामगारांना कामाविषयी आवश्यक असणारे साहित्य(कामगार पेटी).विद्यार्थ्यान शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते ,बांधकाम कामगारांचा विमा दिला जातो असे अनेक योजना बांधकाम कामगारांसाठी आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment