राजे यशवंत होळकर महामेष योजना 2024 | लवकर अर्ज करा व 75% अनुदानावर शेळी-मेढी व कोंबडी व्यवसाय सुरु करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

राजे यशवंत होळकर महामेष योजना 2024 | लवकर अर्ज करा व 75% अनुदानावर शेळी-मेढी व कोंबडी व्यवसाय सुरु करा

Raje Yashvantrao Holkar Mahamesh Yojana 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मार्फत राबवण्यात येणारी योजना हि भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता आहे. राजे यशवंत होळकर महामेष योजना 2024 हि योजना एकूण 34 जिल्हामध्ये राबवण्यात येत आहे. भटक्या- या प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील लाभार्थी करिता राजे यशवंत होळकर योजनेसाठी अर्ज करणे सुरु झाले आहे. अर्ज करण्याची दि-१२ सप्टेंबर २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ आहे. तरीही आपण आपला अर्ज लवकर ऑनलाइन भरून राजे यशवंत होळकर महामेश योजना 2024 चा लाभ घ्या.

नमस्कार प्रिय शेतकरी बांधवानो, आज आपण राजे यशवंत होळकर महामेष योजना 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत. योजनेचे उद्दिष्टे, योजनेचा अर्ज कसा करायचा, योजनासाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण हा लेख शेवट पर्यंत वाचवा आपले योजनासंबधी काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्कीच निराकरण होईल.

योजनेचे नावराजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विभाग/मंडळपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
लाभार्थीभटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता
लाभमेंढ्यासाठी चराई अनुदान मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुक्कट पक्ष्याच्या खरेदी व संगोपन अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
संपर्क क्र 
अधिकृत संकेतस्थळwww.mahamesh.org
अर्ज करण्याची अंतिम तारीख26 सप्टेंबर 2024
Kukkat Palan Yojana In Marathi

प्रस्तावना

महाराष्ट्र राज्यमध्ये मेंढी पालन व्यवसायला प्रोत्साहन देण्यासाठी 2017 पासून “राजे यशवंतराव होळकर हि योजना” राबवण्यात येत आहेत. मित्रानो आपण जर बघितले राज्यातील धनगर समाज व तत्सम जमातीतील सुमारे १ लाख पेक्षा अधिक लोक हा मेंढी पालन हा व्यवसाय करत आहेत. धनगर व तत्सम जमातीमधील समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्या मुळे विविध योजना राबवून ह्या प्रवर्गातील लोकांना आर्थिक सहाय्य देऊन  त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे व त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी राज्यात योजना आणि उपक्रम राबवले जातात.

सध्या आपल्या राज्यातील मेंढपाळ बांधव ऋतूनुसार आपल्या मेंढी व बकऱ्याच्या पालन पोषणासाठी ज्या ठिकाणी चारा उपलब्ध होईल अश्या ठिकाणी स्थलांतर हे करत असतात. मित्रानो आज जर आपण बघितले तर राज्यातील मेंढ्यांच्या संख्येत होणारी घट व घटीचे कारणे, मेंढ्यापासून मिळणारे मांस व दुधाचा उच्च दर्जा, तसेच दुध व लोकर उत्पादनापासून निर्माण होणारी रोजगाराची संधी या पार्श्भूमीवर राज्यातील भटक्या जमाती(भज-क) या मेंढपाळ समाजास सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थेर्य मिळवून देण्यासाठी मेंढीपालन या पारंपारिक व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार व कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग व “राजे यशवंतराव होळकर” ह्या योजेनेअंतर्गत देण्यात येत आहे.

महामेष योजनेअंतर्गत खालील योजना ह्या राबवण्यात येणार आहेत व अनुदान हि दिले जाणार आहे|

मेंढ्यासाठी चराई अनुदान योजना

  • ज्या मेंढपाळ बांधवाकडे किंवा कुटुंबाकडे कमीत –कमी 20 मेंढ्या व 1 मेंढ्यानर असेल तर अश्या कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी प्रतिमाह रु.६,०००/- असे एकूण चार महिन्यासाठी रु.२४,०००/- चराई अनुदान दिले जाईल.

कुक्कट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान

  • लाभार्थी कुटुंबाला चार आठवड्या वयाचे सुधारित प्रजातीच्या १००% कुक्कट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल रु. ९०००/- च्या मर्यादेत ७५% अनुदान देण्यात येईल.

मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना

  • राज्यातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंधिस्त , बंधिस्त मेंढी-शेळी पालनाकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या ७५% आठव किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाचा रक्कमेवर ७५% रक्कम एकवेळेने एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान हे महामेष योजनेंतर्गत दिले जाईल.

Mahamesh Yojana In Marathi 2024

महत्वाच्या लिंक

अर्ज करण्यासाठीक्लिक करा
टेलिग्राम ग्रुप Join Now
 बंधपत्र नमुना पत्र क्लिक करा
मित्रानो आपल्याला योजनेनुसार बंधपत्र नमुना हा सादर करायचा आहे. ह्या बंधपत्र (PDF) मध्ये अपत्य स्वयंघोषणापत्र (बंधपत्र नमुना क्र.2 नुसार) ,स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र.) आणि योजनेसंबधी बंधपत्र आहेत आपण ते डाउनलोड करू शकतात.

Raje Yashvantrao Holkar Mahamesh Scheme In Marathi

Mahamesh Scheme Objective

महामेष योजनाचा उद्देश

  • राज्यामध्ये अर्धबंधिस्त व बंदिस्त मेंढीपालन व्यवसायास चालना देणे.
  • मेंढी पालन हा पारंपारिक व्यवसायामधून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील भटकंती करणारे मेंढपाळ पारंपारिक पद्धतीने करीत असलेल्या मेंढीपालन या व्यवसायपासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे.
  • भटक्या जमाती व धनगर समाज बांधवांच्या जीवनमान उंचवने व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
  • मेंढ्या व शेळीच्या संख्येमध्ये वाढ करणे.
  • प्रती वर्ष प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये आवश्यक असणारे मांसाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करणे.
  • मेंढीच्या जातीमध्ये उच्च प्रतीच्या नर निर्माण करून पारंपारिक मेंढ्याच्या जातीमध्ये सुधारणा करणे व उच्च प्रतीचे ब्रीड तयार करणे.
  • राज्यामध्ये जास्तीत-जास्त सुधारित प्रजातीच्या मेंढ्याच्या प्रसार करण्यावर भर देणे.
  • उन्हाळात व टंचाईच्या काळात चारा अंत्यत कमी प्रमाणत उपलब्ध असतो त्यामुळे मेंढ्यांच्या वजनात घात होते.
  • मेंढपाळ बांधवांची भटकंती वाढते यामुळे अर्ध-बंदिस्त व बंधिस्त पालणासाठी प्रोत्साहन देणे.

महामेष योजना अटी व शर्ती

  • महामेष हि योजना फक्त भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी आहे.
  • लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावे.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • कुटुंबातील एकाच सदस्यास सद योजनेचा लाभ घेता येईल.
  • महामेष योजनेसाठी महिलांना 30% आरक्षण असेल.
  • अपंगाकरिता 3% आरक्षण देण्यात येईल.
  • कुक्कुटपालन योजना निवडलेल्या लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असावी.
  • निवड करण्यात आलेल्या लाभार्थीची यादी महामंडळाच्या संबधित मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रावर पाठविण्यात यावी आणि महामंडळाच्या प्रक्षेत्रामार्फात मेंढी गट, सुधारित प्रजातीचे नर मेंढे, पायाभूत सोयी-सुविधांसाठी साहित्य आणि पशुखाद्य इ. वाटपाची कार्यवाही करण्यात यावी.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड सोबत सलग्न करण्यात यावे.
  • मेंढ्यांची जाती व निवड हि लाभार्थ्याला सोबत घेवून करण्यात येईल.

Mahamesh Scheme Document In Marathi

Mendhipalan Document In Marathi

मेंढ्यासाठी चराई अनुदान योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला(Cast Certificate)
  • अर्जदार हा दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
  • मेंढी पालन करण्याच्या पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत संबधित पशुवैद्कीय  दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी अधिकारी यांचे प्रमाणपत्र(बंधपत्र नमुना क्र.1 नुसार)
  • अपत्य स्वयंघोषणापत्र (बंधपत्र नमुना क्र.2 नुसार)
  • स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. 5)

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी येथे क्लिक करा |

Mahamesh Scheme Document IN Marathi

मेंढी-शेळी पालानासाठी जागा खरेदी अनुदान वाटप जागा आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर जमीन नसल्याबाबत सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र(भूमिहीन प्रमाणपत्र(
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला(cast certificate)
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • दिव्यांग प्रमाणपत्र(दिव्यांग अर्जदार असल्यास)
  • मेंढी पालन करण्याच्या पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत संबधित पशुवैद्कीय  दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी अधिकारी यांचे प्रमाणपत्र(बंधपत्र नमुना क्र.1 नुसार)
  • अपत्य स्वयंघोषणापत्र (बंधपत्र नमुना क्र.2 नुसार)
  • स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. 5)

Raje Yashvantrao Holkar Scheme Document IN Marathi

Kukkat Palan Yojana Document In Marathi / Kombadi Palan Scheme In Marathi

Poultry Document In Marathi

कुक्कट पक्षांच्या खरेदी व संगोपानासाठी अनुदान वाटप आवश्यक कागदपत्रे

  • जातीचा दाखला (Cast Certificate)
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • दिव्यांग सर्टिफिकेट(दिव्यांगसाठी)
  • बँक पासबुक ( बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)
  • पासपोर्ट फोटो
  • कुक्कुटपालनासाठी लाभार्थ्याकडे स्वताशी जागा असल्याबाबत संबधित पशुवैद्कीय दवाखानाचे पशुधन विकास विभाग अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंध नमुना क्र.6 नुसार)
  • अपत्य स्वयंघोषणापत्र (बंधपत्र नमुना क्र.2 नुसार)
  • स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. 5)

Mahamesh Online Application 2024

महामेष योजनेचा असा करा अर्ज

  • आपण अर्ज हा आपल्या मोबाईल मध्ये aap डाउनलोड करून हि करू शकतात.
  • सर्वात प्रथम आपण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अर्जासाठी नोंदणी करा ह्या पर्याय वर क्लिक करा |
  • नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करा
  • आपल्या समोर अर्ज भरण्याचे पेज ओपन होईल.
  • आपल्या 3 पर्याय दिसतील १.वैयक्तिक २.बचत गट ३.FPO
  • आपण वैयक्तिक अर्ज भरत असाल तर “वैयक्तिक पर्याय” वर क्लिक करा.
  • आपली संपूर्ण माहिती भरा
  • आधार क्रमांक
  • बँकेचे संपूर्ण माहिती भरा
  • मोबाईल क्रमांक बरोबर आहे एकदा खात्री करून घ्या
  • * असलेली माहिती आवश्यक भरायची आहे.
  • सर्व माहिती बरोबर भरली आहे का याची एकदा खात्री करून घ्या
  • नियम व अति मान्य आहेत त्यावर क्लिक करा
  • सबमिट बटनावर क्लिक करा
  • नोंदणीकृत मोबाईलवर sms येईल
  • आपला अर्ज यशस्वी झाला.’
  • त्यानंतर अर्जाची प्रिंट किंवा पावती प्रिंट मारून घ्या.
  • सूचना:- आपण भरलेली माहिती हि खात्री करून भर चुकीची भरू नका नाहीतर आपला अर्ज हा रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Conclusion

  • नमस्कार प्रिय शेतकरी बांधव व मेंढपाळ बांधव आपण आज राजे यशवंतराव होळकर महामेष योजनाबदल सविस्तर माहिती जाणून घेतली.ह्या लेखामध्ये आवश्यक कागदपत्रे, उद्देश, पात्रता व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेतली. अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे आपण त्यावर क्लिक करून आपला अर्ज सादर करू शकतो. बंधपत्र नमुना पत्र हे आपण योजनेनुसार भरायचे आहे. तेही आपल्यला ह्याच लेखामध्ये मिळतील ते आपण डाउनलोड करू शकता. मित्रानो हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण अजून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेस्थळ किंवा अधिकृत माहिती (GR) आपण जाणून घेवू शकता. आपल्याला महामेष योजनाबद्दल काही प्रश्न किंवा अर्ज करण्यास काही समस्या/अडचण येत असेल तर आपण आम्हाला comment च्या माध्यमाने विचारू शकतात. हि माहिती इतरांना हि शेअर करा…धन्यवाद मित्रानो…..

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना स्वरूप काय?

राजे यशवंतराव होळकर महामेष हि योजना भटक्या जाती भज-क प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे. ह्या योजेनेमध्ये मेढी-शेळी पालनणासाठी जागा खरेदी अनुदान हे भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील लाभार्थ्याला मिळणार आहे. कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंधिस्त, बंधिस्त मेंढीपालन करण्यासाठी जागा खरेदी करिता जागेच्या ७५ टक्के अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा .मेंढी चराई योजनेसाठी 4 महिन्यासाठी प्रत्येकी महिना ६०००/- असे दिले जातील. व कुक्कट पालन संगोपन अश्या विविध योजना ह्या महामेष योजनाअंतर्गत राबवण्यात येत आहे.

मेंढीपालन चराई अनुदान योजना काय आहे?

मेंढी चराई अनुदान योजना हि भटक्या जाती भज- क प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी आहे.
ज्या मेंढपाळ बांधवाकडे किंवा कुटुंबाकडे कमीत –कमी 20 मेंढ्या व 1 मेंढ्यानर असेल तर अश्या कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी प्रतिमाह रु.६,०००/- असे एकूण चार महिन्यासाठी रु.२४,०००/- चराई अनुदान दिले जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment