Bandhkam Kamgar Nondani Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना नोंदणी करा व विविध योजनेचा लाभ घ्या ! असा करा अर्ज
नमस्कार बांधकाम कामगार मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटवर. आपण आतापर्यंत महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना बघितल्या. बांधकाम कामगारांसाठी आपण भांड्याचा मोफत संच, बांधकाम कामगार मुलांना शिष्यवृत्ती योजना, मुलीच्या विवाहासाठी रु.५१,०००/- चे आर्थीक सहाय्य व पेन्शन योजना बघितल्या, आपल्याला बांधकाम कामगार योजनाविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपल्या वेबसाईटवर सर्व योजना ह्या उपलब्ध आहेत. पण बऱ्याच बांधवांचे प्रश्न होते कि Bandhkam Kamgar Yojana Nondani 2024 | बांधकाम कामगार योजना नोंदणी करा व विविध योजनेचा लाभ घ्या अर्ज कसा करायचा. आपण बांधकाम कामगार योजनेचा अर्ज हा आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतात ! बांधकाम कामगार नोंदणीसाठी पात्रता, अटी व शर्ती आणि कागदपत्रे कोणती लागतील याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
प्रस्तावना
मित्रानो आपण आज हि बघितले तर गावांकडे रोजगार हवा तसा उपलब्ध होत नाही. म्हणून कामासाठी बांधकाम मजूर, शेती मजूर, कंपनी मध्ये काम करणारे लेबर असतील. हे कामासाठी एका ठिकाणावरून काम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. स्थलांतर करत असताना अनेक समस्यांना मजुरांना सामोरे जावे लागते त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आरोग्य, अन्न, निवारा व मुलांचा शिक्षणाच्या संबधी असेल. अश्या अनेक समस्यावर राज्यसरकारने महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळातर्फे विविध फायदाच्या योजना ह्या बांधकाम कामगारांसाठी घेऊन येत असते. कारण बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचवावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना चांगले शिक्षण घेता यावे. यासाठी राज्य सरकार हे आर्थिक मदत करत असते. Bandhkam Kamgar Nondani Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना नोंदणी करा व विविध योजनेचा लाभ लाभ घ्या. बांधकाम कामगार योजनेची नोंदणी हि ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. त्यासाठी सर्व प्रोसेस हि खाली दिलेली आहे. चला तर मित्रानो आपण योजनाविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त करू !
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना नोंदणी |
विभाग | महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळ |
लाभार्थी | बांधकाम कामगार |
लाभ | बांधकाम कामगारांना विविध योजनाचा लाभ |
उद्देश | बाधकाम कामगारांचे जीवनमान उंचवावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे |
नोंदणी प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Construction Worker Registration Eligibility Criteria In Marathi
बांधकाम कामगार नोंदणी निकष व पात्रता
- अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील १२ महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं कामगार बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र ठरतील.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार गृहउपयोगी साहित्य अधिक माहितीसाठी क्लिक करा !
Construction Worker Document Required For Registration
बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- मंडळात नोंदणी करण्याकरिता फार्म – V भरून खालीलप्रमाणे कागदपत्रेसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- वयाचा पुरावा (जन्म दाखला/शाळेचा दाखला)
- रहिवासी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 छायाचित्र
- मोबाईल क्र
- नोंदणी फी-रु.1/- व वार्षिक वर्गणी रु.1/-
Construction Worker Registration
Bandhkam Kamgar Nondani In Marathi
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | Join Now |
बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत MS-CIT प्रशिक्षण अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
Bandhkam Kamgar Yojana Nondani 2024 | बांधकाम कामगार योजना नोंदणी करा व विविध योजनेचा लाभ घ्या ! असा करा अर्ज
बांधकाम कामगार नोंदणी खालीलप्रमाणे करा
- सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ (Maharashtra Building And Other Construction Workers Welfare Board) अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- आपल्या समोर अशे पेज उघडेल
- बांधकाम नोंदणी (workers Registration) वर क्लिक करा !
- त्याठिकाणी सर्वात प्रथम खात्री करा कि तुमच्याकडे हे सर्व कागदपत्रे आहेत का? असतील तर आपण तर खालीलप्रमाणे माहितीच्या सामोर चौकनी बॉक्समध्ये टिक करा
- १.कृपया आपली जन्म तारीख प्रविष्ट करा
- २.तुम्ही 90 दिवसांहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का?
- ३.आपल्याकडे निवासी पत्याचा पुरावा आहे का ?
- आपल्याकडे आधार कार्ड आहे का ?
- तुमची पात्रता तपासा/Chek Your Eligibility वर क्लिक करा आणि आपण पात्र आहोत का चेक करा !
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शहराची निवड करायची आहे.
- नंतर आपला आधारकार्ड क्रमांक टाकायचा आहे व आपला चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आणि Proceed to form ह्या बटनावर क्लिक करा !
- आता तुमच्यासमोर बांधकाम कामगार योजनेचा नोंदणी अर्ज ओपन झाला असेल, अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
- वैयक्तिक माहिती (Personal Details) भरा !
- आधारकार्ड वर असलेला संपूर्ण पत्ता टाका (Address As Per Aadhar Card)
- कौटूबिक माहिती भरा (Family Details)
- सूचना:- आपल्या कुटुंबातील माहितीत फक्त आई, वडील, पत्नी, आणि पहिल्या 2 पाल्यांनची माहिती भरावी !
Bandhkam Kamgar Nondani Yojana 2024
- नियोक्ता तपशील (Employer Details) यामध्ये आपण 90 दिवसांच्या कामकाजाचा दाखल्याची तपशील भरावी लागेल.
- समर्थन दस्तऐवज (Supporting Document)
- यामध्ये तुम्हाला स्वतःचे (अर्जदाराचा फोटो)२.अर्जदाराचा अंगठा प्रिंट ३.आधार कार्ड ४.90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत.
- सूचना:-कागदपत्रे हे Jpeg,jpg,png आणि pdf मध्ये असावेत.
- अश्याप्रकारे संपूर्ण माहिती हि भरा व सर्वात शेवटी आपण सबमिट करण्याच्या अगोदर एकदा खात्री करा कि आपण भरलेली माहिती हि बरोबर आहे का !
- चौकटी बॉक्स मध्ये टिक करा व Save बटनावर क्लिक करा !
Conclusion
नमस्कार प्रिय बांधकाम कामगार मित्रानो, आज आपण बांधकाम कामगार योजनाची नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आपण अर्ज भरण्यापूर्वी आपल्याकडे आधार कार्ड, रहिवासी पुरावा व आपण 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असेल तरच आपल्याला bandhkam kamgar nondani चा अर्ज करता येईल. Bandhkam Kamgar Yojana Nondani 2024 | बांधकाम कामगार योजना नोंदणी करण्यासाठी आपल्याला हे सर्व कागदपत्रे हे अपलोड करायचे आहेत. आपण अर्ज केल्यानंतर खाली दिलेल्या योजनासाठी आपण अर्ज करू शकतात.
Bandhkam Kamgar Yojana Maharastra (Construction Worker Scheme 2024)
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !
बांधकाम कामगारांसाठी विविध योजना ह्या खालीलप्रमाणे :
कल्याणकारी योजना
१.सामाजिक सुरक्षा
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतीपुर्तीसाठी रु.३०,०००/-
- मध्यान्ह भोजन योजना
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
अर्ज pdf | डाउनलोड करा |
२.शैक्षणिक योजना
- बांधकाम कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
- नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मस_CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
अर्ज pdf | डाउनलोड करा |
३.आरोग्यविषयी योजना
- नैसर्गिक प्रसूतीसाठी रु.१५,०००/-
- शस्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु.२०,०००/-(दोन जीवित अपत्यासाठी)
- गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु.१,००,०००/-(लाभार्थी कामगार त्यांच्या व तिच्या कुंटूबियांना)
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजांच्या शस्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नवे १८ वर्षापर्यंत- रु.१,००,०००/- मुदत बंध ठेव
- अपंगत्व आल्यास रु.२,००,०००/- लाख
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी योजना
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
अर्ज pdf | डाऊनलोड करा |
४.आर्थिक योजना
- कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास- रु.५,००,०००/- (कायदेशीर वारसास)
- कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु.२,००,०००/-(कायदेशीर वारसास)
- अटल बांधकाम कामगार आवास योजना(शहरी) अर्थसहाय्य रु.२,००,०००\-
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्थसहाय्य रु.२,००,०००/-
- कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रु.१०,०००/- (वय ५० ते ६०)
- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्री कामगाराच्या विधुर पतीस- रु.२४,०००/-(५ वर्षाकरिता)
- गृह कर्जावरील रु.६,००,०००/- पर्यत व्याजाची रक्कम किंवा रु.२,००,०००/-
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
अर्ज pdf | क्लिक करा |
बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते ?
मंडळात नोंदणी करण्याकरिता फार्म – V भरून खालीलप्रमाणे कागदपत्रेसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे
१.वयाचा पुरावा (जन्म दाखला/शाळेचा दाखला) २.रहिवासी दाखला ३.90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ४.ओळखपत्र पुरावा ५.पासपोर्ट आकाराचे 3 छायाचित्र ६.मोबाईल क्र
नोंदणी फी-रु.1/- व वार्षिक वर्गणी रु.1/ हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत तरच आपण बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी करू शकता.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी पात्रता आणि निकष काय ?
बांधकाम कामगारांसाठी १.अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. २.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. ३.मागील १२ महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं कामगार बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र ठरतील. ४.अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.हे सर्व पात्रता आणि निकष आहेत.
बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया हि ऑनलाईन/ऑफलाईन करायची आहे ?
बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी हि ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.