प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME)

 PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME)

नमस्कार मित्रानो, आपण नेहमी आपल्या वेबसाईटवर विविध योजनाची माहिती हि व लेख प्रकाशित करत असतो. आपण राज्य सरकार आणि केंद्रसरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना ह्या आपल्या वाचकापर्यंत पोहचवण्याचा प्रयन्त हा आमचा आहे. आम्ही प्रत्येक योजनेविषयी माहिती टाकताना अगोदर शहानिशा करून किंवा विविध स्रोताद्वारे माहिती गोळा करून आपल्यापर्यंत खरी व प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयन्त करत असतो. आम्ही वेबसाईट सुरु करण्याचा उद्देश एकच आहे कि आपल्या शेतकरी बांधव, विद्यार्थी मित्र, माता-भगिनी, दिव्यांग बांधव यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना ह्या लाभार्थ्यापर्यत पोहचतच नाही, म्हणून आम्ही ठरवलं कि प्रत्येक योजना हि गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचली पाहिजे व त्या योजनेचा लाभ घेवून दैनदिन जीवनात स्वतःचा व्यवसाय असेल किंवा शेतीसाठी यंत्र, अनुदानावर योजना, महिलांना शिलाई मशीन, अपंग बांधवाना सायकल व विविध साहित्य, विद्यार्थी मित्रानासाठी शिष्यवृत्ती व राज्यसरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या मोफत प्रशिक्षण योजना ह्या पोहचून त्याचा लाभ घेऊन जीवनात बदल होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपले जीवनमान उंचवण्यासाठी मदत होईल हाच आमचा प्रयन्त आहे.

प्रस्तावना

चला तर मित्रानो आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME) योजनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता व उद्दिष्टे आपण सविस्तर ह्या लेखच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचवा हि विनंती !

आपण जर बघितले तर राज्यसरकार व केंद्रसरकार विविध उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करत असतात. त्याच प्रकारे आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME) या योजेनेतून नाशवंत कृषी उत्पादने, तृणधान्य आधारित उत्पादन, मत्स्य, कुक्कट पालन व मध पालन इ. सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग करण्यासाठी आपल्याला 10 लाखापर्यंत कर्ज मिळेल. हे अनुदान वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादन संघ(FPO)/उत्पादकाच्या सहकारी संस्था व स्वयंसहायता गट यांना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना अंतर्गत अनुदान मिळेल.

योजनेचे नावप्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना  
विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्र सरकार
सुरुवातकेंद्रसरकार
योजेनेचे लाभार्थीलघु आणि सूक्ष्म उद्योग व्यावसायिक
उद्देशलघु उद्योग वाढवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
ई-मेल ————
संपर्क क्र011-26406500
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME)

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनाचे स्वरूप:-

  • प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना हि केंद्र पुरुस्कृत योजना आहे.
  • यामध्ये जे अनुदान दिले जाईल त्यामध्ये केंद्राकडून 60% व राज्यकडून 40% अशे अनुदान हे देण्यात येईल.
  • एक जिल्हा एक उत्पादन ठरवणार व त्याचप्रमाणे त्या उद्योगांना लाभ मिळणार.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग-अनुदाना साठी पात्रता खालीलप्रमाणे

वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक पात्रता

  • लाभार्थी अर्जदाराचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असावे
  • अर्जदार हा किमान आठवी इयत्ता पास असणे आवश्यक आहे
  • 10 पेक्षा कमी कामगार असणारा उद्योग हा वैयक्तिक सूक्ष्म प्रक्रिया उद्योग होय
  • प्रकल्पासाठी लागणारे किमान 10 टक्के रक्कम स्वतः भरावी लागेल
  • एका योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच सदस्यास मिळेल

मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेसाठी येथे क्लिक करा !

शेतकरी उत्पादक संघ(FPO) उत्पादकाच्या सहकरी संस्था साठी पात्रता

  • कमीत-कमी रु.1 कोटीचा टर्नओव्हर असावा
  • प्रकल्पाची किमत सद्याच्या टर्न ओव्हरच्या रक्कमेपेक्षा जास्त नसावी
  • सभासदाना संबधित उत्पादनाबाबत पुरेशे ज्ञान असणे तसेच त्या उत्पादनामध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव हा असला पाहिजे
  • प्रकल्पाच्या किमान 10 टक्के रक्कम स्वनिधी म्हणून आवश्यक/अनिवार्य आहे

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनाचे उद्दिष्टे

  • असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लागू खाद्य उत्पद्कांना औपचारिक क्षेत्रात आणणे.
  • ग्रामीण भागात व शहरी भागात मनुष्यबळ निर्माण करून एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
  • खाद्य प्रक्रिया उद्योगांना देशात व बाहेरच्या बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
  • उत्पादनात वाढ करून गुणवत्ता सुधारणे आणि स्वच्छताचे पालन करणे.
  • ह्या उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान उकरणे वापरून आधुनिक पद्धतीने विविध सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • खाद्य प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासास प्रोत्साहन देणे.
  • मालाची होणारी नासाडी ह्या निमित्ताने थांबेल कारण खाद्य प्रक्रिया केल्यावर तर बाजार पेठेमध्ये विकले जाईल व जास्त काळ टिकेल.

सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना मराठी

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME)

सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनाचे फायदे अंतर्गत प्रक्रियेसाठी येणारी उत्पादने खालीलप्रमाणे :-

  • नाशवंत कृषी उत्पादने
  • तृणधान्य आधारित उत्पादने
  • मत्स्य पालन
  • कुक्कट पालन
  • मद्य इ खाद्य प्रक्रियासाठी अनुदान मिळेल
  • लघु उद्योगांनाचे उत्पन वाढेल
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल तर मनुष्यबळ हि निर्माण होईल.
  • शहरी भागात हि रोजगार निर्माण होईल.
  • देशातील खाद्य प्रक्रिया उद्योगाला बळकटी मिळेल.
  • देशातील आयात कमी व आपण बनवलेल्या मालाची निर्यात हि वाढेल.

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जिल्हास्तरीय प्रकल्प अमलबजावणी प्रस्तावाचा कार्याची तपासणी
  • विहित नमुन्यात लाभार्थ्याचा मूळ अर्ज
  • बँकेचे कर्ज मंजुरी पत्र
  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • योजनासंबधी प्रकल्प अहवाल
  • भाडेकरारनामा किमान 10 वर्ष
  • उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र
  • प्रकल्पासाठी लागणारे सयंत्र(Plant Machinary) साहित्याची पुरवठादाराकडील दरपत्रके(Quatation).
  • इमारतीचे ब्लू प्रिंट
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ह्या कागदपत्रामध्ये बद्दल हि होऊ शकतो आपण संबधित संस्था किंवा कार्यलय यांच्याशी संपर्क साधून आप[न कागदपत्राविषयी अधिक माहिती मिळवून घेवू शकता.

सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनासाठी मिळणारे अनुदान

१.सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणारे अनुदान

  • प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत-जास्त रु.१० लाख इतके अनुदान मिळेल. प्रकल्प उभारणीसाठी बँककडून कर्ज घेणे आवश्यक आहे. कर्जाशिवाय प्रकल्पामध्ये लाभार्ठीचा स्वतःचा हिस्सा म्हणून प्रकल्पाच्या किमान १० टक्के रक्कम असणे आवश्यक आहे.
  • .स्वयंसहायता गटाच्या सद्स्यानाही वरीलप्रमाणे ३५ टक्के किंवा जास्तीत-जास्त रु.१० लाख अनुदान मिळेल. त्याच बरोबर जे सदस्य अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतलेले आहेत अश्याच सदस्यांना बीज भांडवल म्हणून प्रत्येक सदस्याला रु.४०,०००/- हे खेळते भांडवल तसेच छोटी उपकरणे खरेदी करण्यासाठी देय आहे. अशा प्रकारे एका गटाला बीज भांडवल हे जास्तीत-जास्त रु,४ लाख मिळेल.
  • सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे साठी मिळणारे अनुदान
  • हे अनुदान शेतकरी उत्पादक संध(FPO) उत्पादकानच्या संस्था/स्वयंसहायता गट/कोणतेही शासकीय यंत्रणा किंवा खाजगी उद्योगांना देण्यात येईल.
  • ३५ टक्के अनुदान हे मिळेल.
  • १० लाखापेक्षा जास्त अनुदानाचा प्रस्ताव असेल तर केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रलयाकडे पाठवावे लागेल.
  • या अंतर्गत येणाऱ्या बाबि संकलन, प्रतवारी, गोदाम, शेतामध्ये असेइंग, शीत गृह, सामायिक प्रक्रिया, सुविधा.
  • शेतकरी उत्पादन संघ(FPO) उत्पादकाच्या सहकारी संस्था/ स्वयंसहायता गट यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक प्रकरणी रु.५०,००० इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.

३.विपणन व  ब्रांडिंग साठी मिळणारे अनुदान

  • शेतकरी उत्पादक संघ (FPO) उत्पादकाच्या सहकारी संस्था/स्वयंसहायता गट किंवा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग एसपीव्ही यांना उत्पादनाचे मार्केटिंग व ब्रांडिंग साठी लागण्रे एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे. सदरचे उत्पादन हे एक जिल्हा एक उत्पादनाशी आहे.
  • अंतिम उत्पादन हे ग्राहकांना किरकोळ विक्री पैक मध्ये विकणे आवश्यक आहे.
  • तसेच उत्पादनाच्या टर्नओव्हर हा किमान रु.५ कोटी असला पाहिजे.

Conclusion

नमस्कार उद्योजक मित्रानो, आपल्याला पुढील वाटचालीस ओजस्वी सरकारी योजनाकडून खूप साऱ्या शुभेछ्या. तर आपण प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME) योजनेबद्द्ल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला, हि माहिती अपूर्ण हि असू शकते, त्यासाठी आपण संबधित अधिकृत संकेतस्थळाशी किंवा कार्यलयाशी संपर्क साधून अधिक व सविस्तर माहिती जाणून घेवू शकतात.हि माहिती इतरांना हि शेअर करा ….

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना | PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme In Marathi 2024 (PMFME) योजना पात्रता काय आहे ?

वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक पात्रता
लाभार्थी अर्जदाराचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असावे
अर्जदार हा किमान आठवी इयत्ता पास असणे आवश्यक आहे
10 पेक्षा कमी कामगार असणारा उद्योग हा वैयक्तिक सूक्ष्म प्रक्रिया उद्योग होय
प्रकल्पासाठी लागणारे किमान 10 टक्के रक्कम स्वतः भरावी लागेल
एका योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच सदस्यास मिळेल

शेतकरी उत्पादक संघ(FPO) उत्पादकाच्या सहकरी संस्था साठी पात्रता
कमीत-कमी रु.1 कोटीचा टर्नओव्हर असावा
प्रकल्पाची किमत सद्याच्या टर्न ओव्हरच्या रक्कमेपेक्षा जास्त नसावी
सभासदाना संबधित उत्पादनाबाबत पुरेशे ज्ञान असणे तसेच त्या उत्पादनामध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव हा असला पाहिजे
प्रकल्पाच्या किमान 10 टक्के रक्कम स्वनिधी म्हणून आवश्यक/अनिवार्य आहे

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनाचे स्वरूप काय ?

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना हि केंद्र पुरुस्कृत योजना आहे.
यामध्ये जे अनुदान दिले जाईल त्यामध्ये केंद्राकडून 60% व राज्यकडून 40% अशे अनुदान हे देण्यात येईल.
एक जिल्हा एक उत्पादन ठरवणार व त्याचप्रमाणे त्या उद्योगांना लाभ मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment