Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |OBC विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजार रुपये शिष्यवृत्ती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना | विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजार रुपये शिष्यवृत्ती

Savitribai Phule Adhar Yojana -२०२४

वसतिगृहात प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत निवासी, भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती.

प्रस्तावना:

नमस्कार मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आज आपण सावित्रीबाई फुले आधार योजनाबदल जाणून घेणार आहोत,सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी पात्रता काय? निकष कोणते? आणि कागदपत्रे कोणती लागतील आपण सविस्तरपणे ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.

योजनेचे नावज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
सुरुवातदिनांक-१३- डिसेंबर-२०२३
उद्देशज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अश्या विद्यार्थ्यांना निवासी, भोजना आणि शैक्षणिक खर्च साठी आर्थिक मदत करणे.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४

सावित्रीबाई फुले आधार योजना

 Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हि मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे.ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही.पण त्यांची उच्च शिक्षण घेण्याचा प्रयन्त आहे अश्या विद्यार्थ्यासाठी Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत निवासी, भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी महाराष्ट्र शासनकडून प्रत्येक वर्षी ६०,००० रुपये मिळतील.पण शिष्यवृत्ती हि विभागानुसार कमी जास्त मिळू शकते जसे कि,शहर तालुका ,मुंबई ,मुंबई उपनगर,महानगरपालिका क्षेत्र अश्या ठिकाणी शिष्यवृत्ती हि कमी जास्त मिळू शकते.

वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी ज्याप्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम आणि स्वतंत्र स्वयंम योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्याकरिता योजना सुरु करण्यासाठी मा.मंत्रीमंडळाने दि-१९-१०-२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठीकीस Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी मान्यता मिळाली.

आपण जर बघितले तर राज्य सरकार आणि केंद्रसरकार ह्या विविध कल्याणकारी योजना घेवून येत असते.तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध बदल होताना आपल्याला दिसतात.त्याबदालानुसार विद्यार्थ्यामध्ये कौशल्य हि आत्मसात झाली पाहिजे.त्यांचा शिक्षणात कुठेही आर्थिक परिस्थिती आड येऊ नये.काही पाल्य हे शेतकरी कुटुंबातील असतात, काहीचे आईवडील मजुरी ने काम करतात अश्या पालकांकडून आपल्या पाल्याचा शिक्षणाचा खर्च हा पेलवत नाही.अश्यामुळे गरीब कुटुंबातील पालक आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देवू शकत नाहीत.विद्यार्थ्याची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनहि शहरामध्ये न परवडणारे भाड्याचे घर, भोजन आणि शैक्षणिक खर्च हा खूप अधिक प्रमाणत असतो.पण अश्या वेळी सरकार हे आपल्या विद्यार्थ्यासाठी विविध योजना राबवत असते, ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहमध्ये प्रवेश मिळाला नाही अश्या विद्यार्थ्यांना Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाअंतर्गत निवासी, भोजन, आणि शैक्षणिक साहित्यासाठी वार्षिक ६०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळेल.

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येईल.

खालीलप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाअंतर्गत लाभ देय राहील.

[wptb id=734]

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 |

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अटी आणि शर्ती:

१.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

२.अर्जदार हा मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा.

३.विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असावे.

४.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)

५.आधार कार्ड बँक खातेशी लिंक असणे अनिवार्य आहे.

६.१२वी मध्ये किमान ६०%  गुणासह उत्तीर्ण असावा,

७.ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेतोय,त्या शहरातला विद्यार्थी रहिवासी नसावा.

८.पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५० लाख रुपयापेक्षा अधिक नसावे.

९.अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शैक्षणिक निकष आणि पात्रता:

  • विद्यार्थी हा १२वि नंतरचे शिक्षण घेणारा असावा.
  • हि योजना उच्च शिक्षणसाठी आहे.
  • विद्यार्थ्याला १२ वी मध्ये कमीत-कमी ६० गुण असावे.
  • २ वर्षापेक्षा पेक्षा कमी अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ हा देण्यात येईल.
  • एका शाखेच्या पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेचा पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास सावित्रीबाई फुले आधार योजनेच लाभ देय राहणार नाही.
  • मान्यताप्राप्त संस्थेमध्ये/महाविद्यालय व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
  • सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची ६० % उपस्थिती असणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थ्याची निवड हि गुणवत्तेनुसार केली जाईल.
  • निवड झालेल्या विद्यार्थी हा संबधित अभ्यासक्रम पूर्ण होईपरेंत लाभास पात्र राहील.
  • विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी संबधित अभ्यासक्रमात पास होणे बंधनकारक आहे.

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024 |

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर निकष:

  • एका विद्यार्थ्यास कमाल पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  • सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थ्याचे वय कमाल २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • शिक्षणात जर काही करणावस्तव खंड पडला तरी विद्यार्थी ह्या योजनेसाठी पात्र आहे.अट एकच कि वयोमर्यदा २८ पेक्षा वय जास्त नसावे.
  • विद्यार्थ्याने कोणत्याही सामाजिक न्याय विभागाच्या किंवा आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहामध्ये प्रवेश घेतलेला नसावा.
  • विद्यार्थी कोणताही शासकीय, खाजगी नौकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
  • दिव्यांग विद्यार्थ्याला प्रथम प्राधन्य देण्यात येईल.

स्वतंत्र स्वयंम योजनाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

१.आधार कार्ड

२.जात वैधता प्रमाणपत्र

३.जात प्रमाणपत्र

४.उत्पनाचा दाखला

५.१२ वी मार्कशीट

६.बँकेचे पास बुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)

७.दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असेल तर)

८.पासपोर्ट फोटो

९.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा(डोमासाईल)

१०.प्रवेशित महाविद्यालय आणि कॉलेज याचे बोनाफाईड

११.विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र

१२.लाभार्थीने कोणत्याही शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न घेतल्याबद्दल शपथपत्र

ह्या कागदपत्रा मध्ये काही बदल होऊ शकतो आपण संबधित विभाग किंवा ऑफिस यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्या.

Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाचा फॉर्म असा भरा!

१.सर्वात प्रथम आपण समाज न्याय विभाग आणि आदिवासी विभाग यांच्याशी संपर्क साधा आणि योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

२.संबधित विभागाकडून सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज मिळवा.

३.अर्ज हा एकदा पूर्ण वाचून घ्या मगच आवश्यक ती माहिती भरा.

४.अर्जावर स्वतःची सही आणि पासपोर्ट फोटो लावा.

५.योजनासंबधी कागदपत्रे क्रमानुसार आवश्यक तेच लावा.

६.आपला अर्जामध्ये आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे लावलेली आहेत का याची खात्री करा.

७.खात्री झाल्यानतर आपला अर्ज हा संबधित कार्यलयात जमा करा आणि जमा झाल्याची पोच पावती घ्या.

नमस्कार प्रिय वाचक विद्यार्थी मित्रानो,आज आपण Savitribai Phule Aadhar Yojana Marathi 2024  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाबदल सविस्तर जाणून घेतले.आपले जर अजून काही प्रश्न असतील तर आपण आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्नाच्या निराकरण करू,धन्यवाद मित्रानो.

प्रिय वाचक मित्रहो,ओजस्वी सरकारी योजना या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेशी संबध नाही.ओजस्वी सरकारी योजना ह्या वेबसाईट वर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याद्वारे, अधिकृत वेबसाईट, आणि विविध संबधित योजनाच्या अधिकृत माहिती पत्रकाच्या माध्यमातून आणि इतर स्रोताच्या माध्यामातून गोळा केली जाते.आणि ह्या माहितीच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रामाणिक माहिती आपल्यासाठी घेवून येत असतो .तरी वाचक मित्रानो आम्ही तुम्हाला सुचवितो कि कोणत्याही योजनेचा संबधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाचा अर्ज कसा भरावा?

अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्हाच्या ठिकाणी समाजकल्याण ऑफिस ला भेट द्या.तेथून अर्ज मिळवा आणि अर्ज भरून संबधित कागदपत्रे जोडा.अर्ज हा जमा करा.आणि अर्जाची पोचपावती घ्या.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाच्या अटी काय?

१.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२.अर्जदार हा मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा.
३.विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असावे.
४.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
५.आधार कार्ड बँक खातेशी लिंक असणे अनिवार्य आहे.
६.१२वी मध्ये किमान ६०%  गुणासह उत्तीर्ण असावा,
७.ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेतोय,त्या शहरातला विद्यार्थी रहिवासी नसावा.
८.पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५० लाख रुपयापेक्षा अधिक नसावे.
९.अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी कोणते कागदपत्रे लागतील?

१.आधार कार्ड
२.जात वैधता प्रमाणपत्र
३.जात प्रमाणपत्र
४.उत्पनाचा दाखला
५.१२ वी मार्कशीट
६.बँकेचे पास बुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
७.दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असेल तर)
८.पासपोर्ट फोटो
९.महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा(डोमासाईल)
१०.प्रवेशित महाविद्यालय आणि कॉलेज याचे बोनाफाईड
११.विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र
१२.लाभार्थीने कोणत्याही शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न घेतल्याबद्दल शपथपत्र
ह्या कागदपत्रा मध्ये काही बदल होऊ शकतो आपण संबधित विभाग किंवा ऑफिस यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्या.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाचा उद्देश काय?

महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली.ह्या योजनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही अश्या विद्यार्थ्यासाठी निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करणे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाअंतर्गत किती लाभ मिळेल?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६०,०००/- रुपये निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत केली जाते.पण आर्थिक मदत विभागानुसार बदलते.उदा.मुंबई ,पुणे नागपूर अश्या विविध ठिकाणी रक्कम हि कमी जास्त होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment