महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2024-2025
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2024-2025
प्रस्तावना:
UGC-NET/CSIR –NET/MH-SET-2024-2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्ष २०२४-२०२५ करिता UGC-NET/CSIR –NET/MH-SET परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे महाज्योती संस्थेकडून मागवले जात आहेत.
योजनेचे नाव | महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2024-2025 |
उद्देश | विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण देणे |
सुरुवात | महाज्योती महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय |
लाभ | 6 महिने मोफत प्रशिक्षण व १०,०००/- विद्यावेतन |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
संपर्क क्रमांक | 0712-2870120/21 |
ई-मेल आयडी | mahajyotihelpdesk@gmail.com |
संकेतस्थळ | www.mahajyoti.org.in |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | १० जुलै २०२४ |
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आपले आपल्या मराठी वेबसाईटमध्ये सहर्ष स्वागत आहे.आपले भविष्य उज्वल व्हावे हीच मनोकामना.तर विद्यार्थी मित्रानो आपण नेहमी आपल्या वेबसाईट वर विविध शैक्षणिक योजना घेवून येत असतो.त्याप्रकारे आज आपण महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनाबद्दल जाणून घेणात आहोत.ह्या योजनेसाठी पात्रता काय?कोणते कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आपण आपल्या ह्या पोस्टद्वारे ज्नौन घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.
महाज्योती मार्फत मिळणार मोफत Tablet व प्रतिदिवस 6 GB इंटरनेट आजच अर्ज करा!येथे क्लिक करा !
सरकार हे वविध शैक्षणिक योजना राबवत असतात.कारण गरीब, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना हि शिकण्याची संधी मिळाली पाहिजे.त्यांनी स्वतः च्या पायावर उभे राहून आपले भविष्य हे सुधारावे.यामध्ये कोणाची हि आर्थिक परिस्थिती आड येवू नये.म्हणून अश्या अनेक घटकासाठी शासन हे उपक्रम राबवत असतात.त्याचपैकी महत्वाची योजना म्हणजे महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2024-2025 होय.ज्या मुलांचे पदव्युतर शिक्षण झाले(PG) अश्या मुलांना Net आणि set च्या परीक्षाचे पूर्व प्रशिक्षण देऊन त्यांची मोफत ६ महिने तयारी करून घेतली जाईल आणि प्रतीमाह विद्यावेतन हे रु.१०,०००/- दिले जाणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी हि महाज्योती ह्या संस्थे मार्गात करून देण्यात आली आहे.तरीही ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.चला तर आपण सविस्तर माहिती ह्या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.
- प्रशिक्षनाचा कालावधी – 6 महिने
- विद्यावेतन – १०,०००/- प्रतिमाह (७५% उपस्थिती असल्यास)
- एकरकमी आकस्मित निधी- रु.१२,०००/-
मोफत lablet आणि प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा!
Mahajyoti Free Training 2024-2025
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनासाठी पात्रता:
१.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
२.विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
३.विद्यार्थी हा पदव्युतर पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा/असावी.
४.यापूर्वी महाज्योती योजनाचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेला असेल तर अश्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करू नये.अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
५.प्रशिक्षणाकरिता लाभार्थीची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाईल.
६.चाळणी परीक्षेत प्राप्त गुणाकनुसार मेरिटच्या आधार व आरक्षित जागांच्या प्रमाणत विद्यार्थ्याची यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Mahajyoti Free Training 2024-2025
प्रशिक्षणाचे स्वरूप:
१.प्रशिक्षणाचा कालावधी हा ६ महिन्याचा असेल.
२.विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
३.प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
4.प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपात असेल.
mahajyoti
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनासाठी आरक्षण:
सामाजिक प्रवर्गातील व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:
अ.क्र | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
1 | इतर मागास वर्ग(OBC) | 59% |
2 | निरधीसूचित जमाती-अ(VJ-A) | 10% |
3 | भटक्या जमाती-ब(NT-B) | 8% |
4 | भटक्या जमाती-क(NT-C) | 11% |
5 | भटक्या जमाती-ड(NT-D) | 6% |
6 | विशेष मागास प्रवर्ग(SBC) | 6% |
एकूण | 100% |
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे राहील:
१.प्रवर्गनिहाय महिलांसाठी ३०% जागा आरक्षित आहे.
२.दिव्यांगाकरिता ४% जागा आरक्षित आहे.
३.अनाथासाठी १% जागा आरक्षित आहे.
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate)
३.रहिवासी दाखला(Domicile Certificate)
४.वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र(Non-Creamy Layer Certificate)
५.पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक
६.पदव्युतर पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक
७.दिव्यांग दाखला(दिव्यांग असल्यास)
८.अनाथ दाखला(अनाथ असल्यास)
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2024-2025
असा करा अर्ज:
१.महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील
“Application for UGC-NET/CSIR-NET/MH-SET -२०२४-२०२५ Training”
यावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
२.अर्जासोबत तपशीलवार नमूद सर्व कागदपत्रे स्वक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनासाठीअति व शर्ती:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.१०/०७/२०२४ राहील.
- पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे पाठवलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- विद्यार्थ्याने अर्जामध्ये भरून दिलेली माहित अन्तीन मानली जाईल.
- चाळणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जगाच्या प्रमाणत पात्र विद्यार्थ्याची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- प्रशिक्षांनाकारिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरिता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू करण्यात येईल.
- विद्यार्थ्याची उपस्थिती ७५% राहील त्यालाच विद्यावेतन देय राहील.
- यापूर्वी महाज्योतीचा लाभ घेतला असेल असे आढळून आल्यास महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्र अर्जासोबत सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यचा अर्ज बाद करण्यात येईल.
- विद्यार्थ्याचे बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक असणे अनिवार्य आहे.य
- अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक-0712-2870120/21
E-mail Id : mahajyotihelpdesk@gmail.com
प्रिय विद्यार्थी मित्रानो ,आज आपण महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनासंबधी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त केला तरी आपला काही प्रश्न किंवा समस्या असतील तर आम्हाला Comment च्या माध्यामतून विचारू शकतात.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा पर्यंत करू.धन्यवाद….
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजणासाठी कोण पात्र आहे?
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2024-2025 साठी इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्गातून येणारे(SBC) हे विद्यार्थी पात्र आहेत.
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे ?
१.आधार कार्ड २.बँक खाते(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)३.जातीचा दाखला ४.उत्पनाचा दाखला ५.पदवी गुणपत्रक ६.पदव्युतर गुणपत्रक ७.दिव्यांग प्रमाणपत्र(दिव्यांग असल्यास)७.अनाथ प्रमाणपत्र(अनाथ असल्यास) हि सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे.जेणेकरून आपला अर्ज हा बाद होणार नाही याची काळजी घ्या.
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनाचे स्वरूप काय?
महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे प्रशिक्षण मोफत व त्यासोबत रु.१०,००० हजार विद्यावेतन मिळेल.
महाज्योती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजणासाठी अर्ज कसा करावा?
१.महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील
“Application for UGC-NET/CSIR-NET/MH-SET -२०२४-२०२५ Training”
यावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
२.अर्जासोबत तपशीलवार नमूद सर्व कागदपत्रे स्वक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.