Maharashtra Senior Citizen scheme 2024 | जेष्ठ नागरिक योजना मराठी
प्रस्तावना
भारतीय संस्कृतीमध्ये जेष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, जेष्ठाना लागणारे अर्थसहाय्य असो किंवा वृद्धापकाळाने आलेले आजार यासाठी श्रवण यंत्र,चष्मा, चालण्यासाठी काठी, सायकल, कंबर पट्टा आणि कमोड खुर्ची असे विविध साहित्य हे वयोश्री योजनेतून राज्यसरकार हे देत असत.अश्या Maharashtra Senior Citizen scheme 2024 | जेष्ठ नागरिक योजना मराठी सर्व अर्थसहाय्य करणे किंवा मदत करणे अशे विविध योजनेतून राज्यसरकार करत असते. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना व महिलांना जेष्ठ नागरिक असे म्हणतात. अश्या जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार कडून विविध उपक्रम व योजना राबवल्या जातात ज्यातून जेष्ठ नागरिकांना जगण्यास प्रेरणा मिळेल व ते आपले उरलेले आयुष्य आनदाने जगतील.
वयोश्री योजनेसाठी येथे क्लिक करा |
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, Maharashtra Senior Citizen scheme 2024 | जेष्ठ नागरिक योजना मराठी आज आपण राज्यसरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून राबिण्यात येणाऱ्या निवृत्ती पेन्शन योजना असेल किंवा वृद्धाश्रम असेल अश्या खालीलप्रमाणे सर्व योजना आपण या पोस्टद्वारे बघणार आहोत. यासाठी कोणते कागदपत्रे ? अर्ज कसा करायचा? अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यामतून बघणार आहोत.
चला तर मित्रानो आज आपण खालीलप्रमाणे सर्व योजना आपण बघणार आहोत.
- ‘वृद्धाश्रम’ योजना
- ‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
Vruddhasharam Yojana In Marathi 2024
वृद्धाश्रम योजना
वृद्धाश्रम ह्या योजनेमध्ये जेष्ठ नागरिक पुरुषांचे वय 60 वर्ष आणि महिलांचे वय 55 वर्ष वय असलेल्या स्रियांना आणि पुरुषांना वृद्धाश्रम मध्ये प्रवेश दिला जातो. जेष्ठ नागरिकांना आपले उर्वरित आयुष्य आनंदाने घालवता यावे, त्यासाठी त्यांना राहण्यासाठी उत्तम सोय, जेवण आणि विविध आवश्यक साहित्य मिळते यासाठी वृद्धाश्रम हि योजना वर्ष 1963 पासून स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे. वृद्धाश्रम योजनेचा फायदा निराधार आणि जेष्ठ नागरिकांना होताना दिसतोय हा उपक्रम आणि योजना खूपच कौतुकास्पद आहे.
जेष्ठ नागरिकांना Maharashtra Senior Citizen scheme 2024 | जेष्ठ नागरिक योजना मराठी वृद्धाश्रम मध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणजेच बाग-बगीचा, टेलीव्हिजन वरचे कार्यक्रम बघता यावे यासाठी टीव्ही रूम, वाचनालय, आणि चालण्या-फिरण्यासाठी ग्राउंड असे सुविधा ह्या मातोश्री वृद्धाश्रम हि योजना शासनाच्या सामाजिक ज्ञाय व विशेष विभाग मार्फत शासनाने 17 नोव्हेंबर 1995 मध्ये हि स्वयंसेवी संस्थामार्फत सुरु करण्यात आली आहे.ह्या योजनांतर्गत राज्यात सध्या 24 मातोश्री वृद्धाश्रम विना अनुदान तत्वावर सुरु आहेत.मातोश्री वृद्धाश्रम योजना शासनाने 31 जिल्हामध्ये सुरु केले आहेत.
‘वृद्धाश्रम’ योजनेचे स्वरूप:
- प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमात मान्य संख्या 100 इतकी आहे.
- वार्षिक उत्त्पन्न रु.12,000/- पेक्षा जास्त आहे अश्या जेष्ठ नागरिकांना प्रतिमाह रु,500/- शुल्क आकारला जाईल.
- रु.12,000/- पेक्षा कमी आहे अश्या जेष्ठ नागरिकांना निःशुल्क प्रवेश दिला जाईल.
- 50 जागा ह्या सशुल्क असतील जेष्ठ नागरिकांसाठी असतील.
- 50 जागा ह्या निःशुल्क जेष्ठ नागरिकांसाठी असतील.
सूचना:- वृद्धाश्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या गरजू जेष्ठ नागरिक यांनी संबधित जिल्ह्याचे आयुक्त, समाज कल्याण/ जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यलयाकडे संपर्क साधावा.त्यातून संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल.
vruddhashram Yojana Document In Marathi
वृद्धाश्रम योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- उत्पन्न दाखला(12,000/-)
- वयाचा पुरावासाठी(दाखला)
- अर्ज
- मोबाईल क्रमांक
- 2 पासपोर्ट फोटो
- अधिक माहिती साठी आपण कार्यलय नंबर किंवा संबधित कार्यलयाचा नंबर वर संपर्क करावा.
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | समाजातील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य करणे |
लाभार्थी | जेष्ठ नागरिक |
लाभ | प्रतीमहा रु.1,500/- |
अधिकुत संकेतस्थळ | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login |
संजय गांधी निराधार अनुदान योजना
उद्दिष्टे:-
- समाजातील दुर्बल व गरीब घटकांना दरमहा आर्थिक सहाय्य करणे.
- ह्या अर्थ सहाय्यातून ते आपली उपजीविका भागवू शकतील.
- ह्या योजनेच्या माध्यामातून दुर्बल घटकांना प्रतिमाह रु.1,500/- अर्थ सहाय्य दिले जाईल.
योजनेचे लाभार्थी खालीलप्रमाणे.
- विधवा महिला, देवदासी, अत्याचारित महिला, 35 वर्ष वरील अविवाहित निराधार स्री, दिव्यांग , अनाथ परित्यक्ता, दुर्धर आजारग्रस्त आणि ज्या कुटुंबाचा प्रमुख तुरुंगात शिक्षा भोगत असेल कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस अश्या प्रकारे वरील सर्व घटक संजय निराधार योजनेसाठी पात्र आहेत.
Sanjay Niradhar Yojana Document In Marathi 2024
संजय निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- अर्ज
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- वयाचा दाखला
- उत्पनाचा दाखला
- दिव्यांग व्यक्तींना(कमाल उत्पन्न मर्यादा रु.50,000/-)
- बाकी सर्व लाभार्थ्यांना (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 21,000/-)
- कमीत-कमी 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- पतीचा मृत्यू दाखला(विधवा महिला अर्जदाराकरिता)
- दिव्यांग प्रमाणपत्र(किमान 40% असावा)
- अनाथ असल्यास(अनाथ दाखला)
- दुर्धर आजार असल्यास(आजाराचे प्रमाणपत्र)
- बँक पासबुक(पहिल्या पानाची झेरॉक्स)
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो (2)
संजय गांधी निराधार योजना असा करा अर्ज
- अर्ज हा आपण तहसील कार्यलय मध्ये जाऊन करू शकता.
- आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्येहि अर्ज करू शकता.
- आपल्याला स्वतः अर्ज करता येत असेल, तर आपण खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
Shravan Bal Yojana Document In Marathi 2024
श्रावण बाळ सेवा राज्य निवृतीवेतन योजना:-
योजनेचे नाव | श्रावण बाळ सेवा राज्य निवृतीवेतन योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | निराधार जेष्ठ नागरिकाना अर्थसहाय्य करणे |
लाभार्थी | 65 वर्षावरील निराधार वृद्ध |
लाभ | दरमहा रु.1,5000/- |
अधिकृत वेबसाईट | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login |
लाभार्थी:-
- महाराष्ट्रात 15 वर्षापासून राहत असलेले जेष्ठ नागरिक म्हणजे ज्याचं वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे असे निराधार वृद्ध व्यक्ती ह्या योजनेस पात्र ठरतील.
Shravan Bal Yojana Document In Marathi 2024
श्रावण बाल सेवा राज्य निवृतीवेतन योजणासाठी आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुन्यातील अर्ज
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पनाचा दाखला(कमाल वार्षिक उत्पन्न मर्यदा रु.21,000/-)
- वयाचा दाखला(किमान 65 वर्ष असले पाहिजे,
- अर्जदार हा कमीत-कमी 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे
- बँक पासबुक ची पहिल्या पानाची झेरॉक्स(बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
श्रावण बळ सेवा राज्य निवृतीवेतन योजनेचा अर्ज असा करा.
- आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज तहसील कार्यलयात हि करू शकता.
- आपल्या जवळच्या सेतू केंद्र किंवा सायबर कॅफे वर आपण आपला अर्ज भरू शकता.
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना:-
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना:-
योजनेचे नाव | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना प्रतिमाह अर्थसहाय्य करणे |
लाभार्थी | 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले निराधार वृध्द |
लाभ | प्रतिमाह रु.1,500/- |
अधिकृत संकेतस्थळ | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login |
लाभार्थी:-
- जे जेष्ठ नागरिक निराधार आहेत. त्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्र राज्यात 15 वर्षापासून वास्तव्यास आहेत अश्या जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकार प्रतीमहा रु.1,500/- अर्थ सहाय्य करणार आहे.त्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Indira Gandhi Rashtriy Vruddhapkal Nivruttivetan Yojana Marathi 2024
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुना अर्ज
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- वयाचा दाखला(वय 65 वर्षाच्या वरती असले पाहिजे)
- उत्पनाचा दाखला
- दारिद्य रेषेचा दाखला(कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे)
- अर्जदार 15 वर्षापासून महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- बँक पासबुक झेरॉक्स( बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)
- अर्जदाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनाचा अर्ज कुठे करावा
- आपण तहसील कार्यलय मध्ये हि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनाचा अर्ज करू शकतात.
- आपल्या नजीकच्या सेतू केंद्रामध्ये हि आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
निष्कर्ष:-
- नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण सर्व प्रकारच्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या निवृतीवेतन योजना, निराधार योजना, वृद्धाश्रम योजना, बस च्या भाड्यामध्ये सूट आणि जेष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र ह्या सर्व योजनाच्या लाभार्थी ,कागदपत्रे आणि अर्ज करायचा कसा आणि कुठे करायचा याचे आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.मित्रानो दिलेल्या कागदपत्रामध्ये बदल हि होऊ शकतो त्यामुळे आवश्यक व लागणारे कागदपत्रे जोडावी.समक्ष आपण योजनेच्या कार्यलय किंवा संबधित अधिकारी यांच्याकडून अधिक माहिती मिळूवून आपण अर्ज करू शकतात. ह्या पोस्ट मध्ये काही माहिती हि अपूर्ण हि असे शकते त्यामुळे आपण अधिकृत संकेतस्थळ किंवा माहिती पत्रकातून आपण माहिती जाणून मगच अर्ज करावा.हि माहिती जास्तीत-जास्त शेअर करा.आपल्यामुळे एखाद्या जेष्ठ नागरिकांचा फायदा व त्यांना अर्थसहाय्य मिळेल.धन्यवाद मित्रानो…….
जेष्ठ नागरिक म्हणजे कोण?
जेष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले पुरुष आणि महिलांना जेष्ठ नागरिक असे म्हणतात. जेष्ठ नागरिकांना अर्थ सहाय व्हावे व त्यांचे उर्वरित आयुष्य आनदाने जावे यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे विविध योजना जेष्ठ नागरिकांसाठी राबवत असते.
जेष्ठ नागरिकांसाठी कोणत्या योजना आहेत?
जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना ह्या राबवल्या जातात त्यापैकी खालील काही महत्वाच्या योजना.
‘वृद्धाश्रम’ योजना
‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
जेष्ठ नागरिकांना बस साठी ओळख पत्र.
जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
जेष्ठ नागरिक योजनेसाठी योजनानुसार कागदपत्रे लागतात खालील कागदपत्रामध्ये काही अशंतः बदल होऊ शकतो.तो आपण संबधित योजनेविषयी माहिती जाणून त्या योजेसाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी.
१.आधार कार्ड २.बँक पासबुक ३.वयाचा पुरावा(दाखला) ३.पासपोर्ट आकाराचा फोटो ४.रहिवासी दाखला ५.रेशन कार्ड ६.उत्पनाचा दाखला ७.चालू मोबाईल क्रमांक ८.योजनेचा अर्ज हे सर्व कागदपत्रे जेष्ठ नागरिक योजनेसाठी आवश्यक आहेत.
जेष्ठ नागरिक योजनेची अधिकृत संकेतस्थळ कोणता आहे?
जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अधिकृत संकेतस्थळ दिलेल्या आहे.त्या मध्ये सर्व योजना आपल्याला दिसतील ज्या योजनेसाठी आपण पात्र असाल किंवा त्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्या योजनेवर क्लिक करून आपण अर्ज करू शकतात.
जेष्ठ नागरिक अधिकृत संकेतस्थळ: https://www.maharashtra.gov.in/Site/1567/Senior%20Citizens