बांधकाम कामगार योजना २०२४ | बांधकाम कामगारांना मिळणार गृहपयोगी वस्तूंचा संच | आजच करा अर्ज
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम करण्याऱ्या कामगारांना राज्य सरकार कडून मिळणार गृहपयोगी साहित्य.
बांधकाम कामगार योजना २०२४
प्रस्तावना:
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सरकार हे नेहमी कल्याणकारी योजना ह्या घेवून येत असतो.आपण त्या योजनेच्या अपडेट आपल्या वेबसाईटवरून पोस्ट च्या माध्यमातून देण्याच्या प्रयन्त करत असतो.आज आपण अश्याच एक महत्वपूर्ण योजनाबद्दल जाणून घेणार आहोत.ती म्हणजे बांधकाम कामगार योजना २०२४ ह्या योजनेचा उद्देश काय?योजनेची पात्रता व अटी काय आणि यासाठी कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टद्वारे घेणार आहोत.
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना |
योजना सुरु करणारा विभाग | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत |
योजनेचा उद्देश | कामगारांना गृहपयोगी वस्तूचा संच पुरवणे |
लाभार्थी | बांधकाम कामगार |
योजनेची अट | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार |
वेबसाईट | https://mahabocw.in/ www.maharashtra.gov.in |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाईन |
आपण जे बघितले कामगार हे वविध ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतात.त्यांना राहण्याची व्यवस्था नसते, जेवणाची व्यवस्था नसते आणि आरोग्य पूर्णपणे ऐरणीवर असते.कधी रस्त्याच्या बाजूला पाल टाकून राहतात.तर कधी इमारतीच्या आडोशाला आपल्या वास्तव्य करताना दिसतात.त्याच ठिकाणी जेवण बवण्याची सोय असते.लहान बालक असतात.खूपच दयनीय अवस्था ह्या कामगार बंधूची असते यासाठी राज्यसरकार आणि केंद्रसरकार हे कामगाराच जीवनमान उंचवण्यासाठी व कामगाराच भविष्य यशस्वी करण्यासाठी.घरकुल योजना, आरोग्य योजना, विमा योजना अश्या अनेक महत्वपूर्ण योजना ह्या सरकार राबवत असतो. बांधकाम कामगार योजना २०२४ योजनामध्ये सरकारचा असाच एक उद्देश आहे.इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात कामा करणाऱ्या बांधकाम कामगार बांधून संबधित काम पूर्ण झाल्यानंतर,पुढील रोजगारासाठी जिथे नवीन बांधकाम सुरु होईल.त्याठिकाणी कामगारांना स्थलांतरीत व्हावे लागते.अश्या स्थलांतरामुळे ठिकाणी नव्या निवास, पाल्याचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत कामगारांना खूप सारे समायोजन करावे लागते.यातूनच सरकारने कामगारांना दैनदिन भोजन तयार करण्यासाठी सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यानि दिनांक.२७.१०.२०२० रोजी बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लाख नोंदीत सक्रीय (जीवित) बांधकाम कामगारांना गुह्पयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबत ठराव पारित केला होता.
बांधकाम कामगार योजनाच्या अटी व शर्ती:
१.अर्जदार यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी केलेली असावी.(ज्याची नोंदी सक्रीय आहे)ते कामगार ह्या योजनेसाठी पात्र असतील.
२.नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी(ज्याची नोंदणी सक्रीय आहे) यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त(जिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकमं) सरकारी कामगार अधिकारी( उपजिल्हा कार्यकारी अधिकारी मइवइबाकमं) यांचेकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तू संच हे देण्यात येतील.
३.जिल्हा स्तरावरील सहाय्यक कमर आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकमं) /सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकमं) योजनेचे समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी)राहतील.
बांधकाम कामगार योजनाच्या पात्रता:
- लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदार ने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलीली असावा.
- कामगारांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
बांधकाम कामगार योजनाच्याअंतर्गत खालील प्रमाणे वस्तूचा संच हा कामगारांना दिला जाईल.
अ.क्र | गृहपयोगी संचातील वस्तू | नग |
१ | ताट | ०४ |
२ | वाट्या | ०८ |
३ | पाण्याचे ग्लास | ०४ |
४ | पातेले झाकणासह | ०१ |
५ | पातेले झाकणासह | ०१ |
६ | मोठा चमचा (भात वाटपाकरिता) | ०१ |
७ | पातेले झाकणासह | ०१ |
८ | मोठा चमचा(वरण वाटपाकरिता) | ०१ |
९ | पाण्याचा जग ( २ लिटर) | ०१ |
१० | मसाला डब्बा (७ भाग) | ०१ |
११ | डब्बा झाकणसह (१४ इंच) | ०१ |
१२ | डब्बा झाकणसह (१६ इंच) | ०१ |
१३ | डब्बा झाकणसह (१८ इंच) | ०१ |
१४ | परात | ०१ |
१५ | प्रेशर कुकर – ०५ लिटर (स्टेनलेस स्टील) | ०१ |
१६ | कढई (स्टील) | ०१ |
१७ | स्टीलची टाकी (मोठी झाकणासह व वगराळासह | ०१ |
एकूण | ३० |
अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट ला भेट देऊन बांधकाम कामगार योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
वेबसाईट: www.maharashtra.gov.in
बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.मतदान कार्ड
३.राशन कार्ड(आवश्यक असल्यास)
४.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
५.बांधकाम कामगार नोंदणीपत्र
६.पासपोर्ट आकाराचा फोटो
रमाई आवास योजनाबदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!
वरील कागदपत्रामध्ये सरकारच्या काही नियमानुसार बदल होऊ शकतो तेव्हा आपण अर्ज करत असताना सरकारच्या किना योजनासंबधी अधिकृत असलेल्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या.
अधिक माहितीसाठी आपण https://mahabocw.in/ ला भेट द्या.
प्रिय वाचक मित्रानो, आज आपण बांधकामगार योजनाबदल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला आहे.तरी आपले काही प्रश्न किंवा समस्या असतील, तर आम्हाला Comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही आपल्या प्रश्न व समस्याचे लवकरच निराकरण करू….धन्यवाद….
तर मित्रानो आम्ही प्रत्येक पोस्टच्या शेवटी आपल्याला एक सूचना देत असतो कि,आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण संबधित योजनेची अधिकृत वेबसाईत वरील माहिती पडताळूनच मग निर्णय घ्यावा.आम्ही योजना फक्त एक मार्दर्शन म्हणून आपल्यासाठी प्रदान करत असतो.आमचा प्रामाणिक एकच उद्देश आहे ली प्रत्येक लाभार्थ्यापरेंत योजना हि पोहचली पाहिजे कोणही आपल्या हक्कापासून वंचित राहता नये.
बांधकाम कामगार योजनेचा उद्देश काय?
आपण जर बघितले तर कामगार जो परेंत काम चालू असते तेवढे दिवस कामगार तिथे वास्तव्यास असतात.काम संपल कि स्थलांतर करावे लागते.अश्या वेळी कामगारांना कीचिध समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि आरोग्य, निवारा आणि मुलाचा शिक्षांनाच प्रश्न अश्या खूप साऱ्या गोष्टीशी समायोजन करावे लागते.बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकारकडून दैनदिन जीवनात आवश्यक असलेल्या गृहपयोगी वस्तूचा संच हा दिला जातो.
बांधकाम कामगार योजनासाठी कागदपत्रे काय?
बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.मतदान कार्ड
३.राशन कार्ड(आवश्यक असल्यास)
४.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
५.बांधकाम कामगार नोंदणीपत्र
६.पासपोर्ट आकाराचा फोटो
वरील कागदपत्रामध्ये सरकारच्या काही नियमानुसार बदल होऊ शकतो तेव्हा आपण अर्ज करत असताना सरकारच्या किना योजनासंबधी अधिकृत असलेल्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या.
बांधकाम कामगार योजनेची पात्रता काय ?
लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदार ने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलीली असावा.
कामगारांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
बांधकाम कामगार योजनेंतर्गत संचामध्ये काय-काय मिळेल?
ताट
वाट्या
पाण्याचे ग्लास
पातेले झाकणासह
पातेले झाकणासह
मोठा चमचा (भात वाटपाकरिता)
पातेले झाकणासह
मोठा चमचा(वरण वाटपाकरिता)
पाण्याचा जग ( २ लिटर)
मसाला डब्बा (७ भाग)
डब्बा झाकणसह (१४ इंच)
डब्बा झाकणसह (१६ इंच)
डब्बा झाकणसह (१८ इंच)
परात
प्रेशर कुकर – ०५ लिटर (स्टेनलेस स्टील)
कढई (स्टील)
स्टीलची टाकी (मोठी झाकणासह व वगराळासह
बांधकाम योजनेंतर्गत हा सर्व संच मिळेल.
Mazhar