भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Scheme 2024 Maharashtra
नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो, आपण नेहमी आपल्या मराठी वेबसाईटवर वविध योजना ह्या घेवून येत असतो. त्यामध्ये शैक्षणिक योजना, कृषी योजना व सरकारी योजना असतात. आमचा प्रामाणिक आणि मुख्य उद्देश एकच कि प्रत्येक योजना हि वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहचला पाहिजे. आणि त्या योजनेचा लाभ घेवून आपल्या पारंपारिक शेती करण्याचा पद्धतीमध्येबद्दल करून आधुनिक तंत्रज्ञान चा उपयोग करून आपल्या शेतीचे उत्पन्न अधिका-अधिक कशे वाढवता येईल यावर भर दिला पाहिजे. म्हणून केंद्र सरकार आणि राज्यसरकार हे शेतकरी बांधवांसाठी विविध योजना हे घेवून येत असते. पण काही योजना ह्या ज्या लाभार्थ्याला खर्च गरज आहे अश्या लाभार्थ्यापर्यंत लाभ हा पोहचत नाही. म्हणून आम्ही चंग बांधलाय कि प्रत्येक शासकीय योजना हि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत त्या योजेनेची माहिती व लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा ह्यासंबधी संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयन्त प्रत्येक लेखात करत असतो. आज आपण अश्याच एक महत्वपूर्ण योजेनेपैकी एक योजना बघणार आहोत ती योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Scheme 2024 Maharashtra होय. सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामधून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.
प्रस्तावना
आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे. वडिलोपार्जित शेती वर अवलंबून असणारे शेतकरी हे आपण जर बघितले तर ७०% ते ७५% टक्के शेती हा व्यवसाय करतात. अचानक येणारे संकटे जसे कि गारपीट, वारा-वादळ, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळ यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होते व बळीराजा हा पूर्णपणे हतबल होतो. यामुळे पशुपालन, शेती व फळबाग करता यावी यासाठी राज्यसरकार ने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Scheme 2024 Maharashtra योजना आणली आहे. राज्यामध्ये सन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबवण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्या-टप्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूनित जाती-जमाती शेतकरी” फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टर क्षेत्र मयादेपयंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉब कार्ड नसल्याने ते सदर योजनचा लाभास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पपट करण्याचे निश्चित केले आहे. ही योजना शेतकऱयांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजनेच्या माध्यमातून शेती व पशुधन याबरोबरि फळबागेच्या रुपाने शेतकऱयांना शाश्वत उत्पनाचा स्त्त्रोत उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करुन काही प्रमाणात हवामान बदल व ऋतु बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे.
योजनेचे नाव | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | शेती व पशुपालनसोबत फळबाग लागवड करणे |
लाभार्थी | शेतकरी वर्ग |
लाभ | फळ बागसाठी अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ |
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पात्रता
- लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन बसविणे अनिवार्य आहे.
- लाभ हा वैयक्तिक शेतकऱ्यांना दिला जाईल.
- संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.
- शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे(७/१२)
- शेतजमीन जर सामाईक क्षेत्र असेल तर इतर खातेदाराची संमितीने शेतकऱ्याच्या स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेत येईल.
- ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुलाची संमिती आवश्यक आहे.
- सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्याना कुटुंबाची उपजीविका केवळ शेतावर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल.
- नंतर बाकीच्या शेतकऱ्यांच्या विचार करण्यात येईल.
- कुटुंबाची व्याख्या:पती, पत्नी, व अज्ञात मुले अशी आहे.
- परंपरागत वन निवासी ( वन अधिकार्री मान्यता) अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
- इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असेल ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Scheme 2024 Document In Marathi
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आवश्यक कागदपत्रे
- सात\बारा उतारा (७/१२)
- ८-अ उतारा
- आधार कार्ड
- हमीपत्र
- सामाईक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमितीपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (अनु जाती/अनु.जमाती शेतकऱ्यासाठी (SC/ST)
- पासपोर्ट फोटो ‘
- विहित अर्ज नमुना
- चालू मोबाईल क्रमांक
- हे सर्ववरील कागदपत्रे आवश्यक आहे. यामध्ये सरकारच्या GR नुसार बद्दल हि होऊ शकतो. त्यामुळे आपण कागदाची पडताळणी व माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या कृषी कार्यलयास संपर्क साधा.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगसाठी येथे क्लिक करा !
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Benefits in Marathi
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना फायदे खालीलप्रमाणे
आंबा, काजू, पेरू, सपोटा, सफरचंद, डाळिंब, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, जामुन, संत्रा, मोसंबी या 16 बारमाही फळ पिकांच्या लागवडीसाठी डीबीटीद्वारे अनुदान दिले जाते.
- 1. खड्डा खोदणे
- 2. कलमे/रोपे लावणे
- 3. रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर.
- 4. पीक संरक्षण
- 5. अंतर भरणे म्हणजे आपण लागवड केलेल्या फळबागमध्ये आपण पिक हि घेवू शकतो. यामुळे आपली फळबाग हि वाढेल व अन्नधान्य असे अनेक पिके आपल्याला फळबागमध्ये घेता येतील.
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Application Process in Marathi
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा असा करा अर्ज
- आपल्याला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे हे अपलोड करावे लागतील. खालीलप्रमाणे अर्ज करण्यासाठी प्रोसेस करा.
- सर्वात प्रथम आपले सरकार महाडीबीटी पोर्टल वर जा https://mahadbt.maharashtra.gov.in/.
- त्यानंतर शेतकरी योजनावर क्लिक करा !
- “नवीन अर्जदार नोंदणी” बटणावर क्लिक करा.
- तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल पत्त्यासह तुमची मूलभूत वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा.
- वापरकर्तानाव आणि पासवर्ड तयार करा.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि प्रोफाइल 100% पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक तपशील, पत्ता तपशील आणि जमिनीची माहिती तपशील प्रविष्ट करून फॉर्म पूर्ण करा.
- प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, अवजारांसाठी अर्ज करा, अंमलबजावणीचे तपशील इ. आणि अर्ज भरण्यासाठी शुल्क भरा.
मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगसाठी येथे क्लिक करा !
Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana in Marathi
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे
- तीन वर्षांत देय असलेल्या एकूण रकमेच्या या योजनेतील मदतीचा नमुना.
- शेतकऱ्याला अनुदानाची रक्कम दरवर्षी थेट आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाईल.
- लाभार्थ्याने फळझाडाच्या जगण्याची टक्केवारी पहिल्या वर्षासाठी किमान 80% आणि दुसऱ्या वर्षी 90% राखली पाहिजे.
- या योजनेमध्ये आंबा, काजू, पेरू, सपोटा, कस्टर्ड सफरचंद, डाळिंब, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, जॅकफ्रूट, जामुन, संत्री, मोसंबी या 16 बारमाही फळ पिकांचा समावेश आहे. कोकण विभागातील शेतकरी 0.10 हेक्टर ते 10.00 हेक्टर आणि उर्वरित महाराष्ट्रातील 0.20 हेक्टर लाभ घेऊ शकतात. ते 6.00 हे. शेर सी अंतर्गत लागवड योजना असेल.
Conclusion
नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Scheme 2024 Maharashtra योजेनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. हि माहिती अपूर्ण हि असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपण संबधित कृषी कार्यलय किंवा आपण संबधित अधिकृत संकेतस्थळ द्वारे जाणून घेवू शकतात. आपण ह्या लेखामध्ये योजनेची पात्रता, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा व अनुदान कश्यापद्धतीने मिळणार याची संपूर्ण माहिती टप्प्या-टप्याने जाणून घेतली. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपला अभिप्राय आम्हाला कळवा. कारण आपल्या अभिप्रायमुळे आम्हाला अजून प्रेरणा व नव-नवीन योजना घेवून येण्यासाठी उत्साह वाढतो. हि माहिती इतर शेतकरी बांधवाना हि शेअर करा. आपल्यामुळे एखाद्या शेतकरी बांधवाला योजनेचा लाभ मिळेल. आपल्याला योजनासंबधी काही समस्या किंवा अडचण असेल तर आम्हाला Comment च्या माध्यमाने विचारू शकतात.धन्यवाद मित्रानो…..
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad योजना अर्ज प्रक्रिया कशी आहे?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्वात प्रथम आपले सरकार महाडीबीटी पोर्टल वर जा https://mahadbt.maharashtra.gov.in/. जाऊन या ठिकाणी शेतकरी योजना ह्या पर्याय वर क्लिक करून आपण आपला अर्ज हा भरू शकतात !
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad योजनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad योजनासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे !
१.आधार कार्ड २.७/१२ उतारा ३.८-अ उतारा ४.सामाईक क्षेत्र असेल इतर खातेदारांच्या संमतीपत्र ५. हमीपत्र ६.पासपोर्ट फोटो हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत!
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad योजनाची पात्रता काय आहे ?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad योजनासाठी १.अर्जदर महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे २. अर्जदाराकडे शेतजमीन असले पाहिजे ३.वैयक्तिक लाभार्थ्याला लाभ मिळेल ४.संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही ४.७/१२ व ८-अ उतारा असला पाहिजे ५लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन बसविणे अनिवार्य आहे. ६.७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुलाची संमिती आवश्यक आहे..७.सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्याना कुटुंबाची उपजीविका केवळ शेतावर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल. हे सर्व पात्रतानुसार लाभार्थ्याची निवड हि करण्यात येईल!
-
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती | Central Bank Of India Bharti 2024
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती … Read more
-
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये 75 जागांसाठी भरती | MSC Bank Bharti 2024
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये 75 जागांसाठी भरती | … Read more
-
भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्कीम (जुलै 2025) | Indian Navy Bharti 2024
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्कीम (जुलै … Read more