बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | आजच करा अर्ज | Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | आजच करा अर्ज | Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024

 Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवन उंचावण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना| Birsa Munda Krushi Kranti Scheme हि योजना शासनाने १९९२-९३ राबविण्यात येत आहे.

प्रस्तावना

नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटवर आपण आपल्या साईट वर विविध योजना जसे कि शैक्षणिक, कृषी व सरकारी योजनेची प्रामाणिक व खरी माहिती आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी घेऊन येत असतो. आमचा एकच उद्देश आहे कि प्रत्येक शेतकरी बांधव, शालेय विद्यार्थी, महिला वर्ग, बाधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना ह्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचल्या पाहिजेत व सदर योजनेचा लाभ ह्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे. कारण राज्यसरकार आणि केंद्र-सरकार हे विविध योजना हे घेवून येत असत. प्रत्येक योजना हि काही भागापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे आम्ही एक चंग बांधलाय कि राज्यसरकार व केंद्रसरकार ची  प्रत्येक योजना हि आपल्या बांधव पर्यंत पोचली पाहिजे व त्या योजनेचा लाभ घेवून लाभार्थीला हातभार लागेल व तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.

शेतकरी मित्रानो, आज आपण राज्य सरकार ची एक महत्वपूर्ण योजनांपैकी एक महत्वाची योजना बघणार आहोत ती म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना| Birsa Munda Krushi Kranti Scheme योजना होय. ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? पात्रता काय? अटी व शर्ती व अर्ज कसा करायचा याबद्दल आपण ह्या लेखामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. आपण हा लेख शेवटपर्यंत वाचवा हि विनंती.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | आजच करा अर्ज | Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024
योजनेचे नावबिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
सुरुमहाराष्ट्र शासन
उद्देशअनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचवणे
लाभार्थीअनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी
लाभनवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, परसबाग, सूक्ष्म सिचन ई.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
संपर्क क्र ———————————————————————
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | आजच करा अर्ज | Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा !

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा उद्देश

  • शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवने.
  • शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे
  • पिकांच्या उत्पनात वाढ करणे
  • जमिनीतील पाण्याचा ओलावा ठीकून राहावा

 Birsa Munda Krushi Kranti Scheme Eligibility

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता

  • अर्जदार हा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याकडे जातीचा वैद्य दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.(आधार कार्डशी बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे)
  • अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न रु१,५०,०००/- जास्त नसावे.
  • जमिनीच्या ७/१२ उतारा व ८-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची जमीनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराने जर सदर योजनेचा पूर्ण लाभ घेतला असेल तर पुढील ५ वर्ष त्याच लाभार्थ्याला किंवा कुटुंबास योजनेचा लाभ देय राहणार नाही.

Birsa Munda Krushi Kranti Scheme Document In Marathi

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

नवीन विहीर योजनेसाठी

  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • ७/१२ व ८-अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र(अपंग असल्यास)
  • लाभार्थीचे प्रतीज्ञापत्र (100/500 रु च्या स्टम्प पेपरवर)
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला
  • तलाठी यांच्याकडील दाखला-सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत) विहीर नसल्याचाबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तिवात असेलेल्या विहिरीपासून 500 फुटाच्या अंतरावर असलेला दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे न. नकाशा व चतुःसीमा.
  • कृषी अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र.
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
  • ज्या जागेवर विहीर घायची आहे त्या जागेचा फोटो
  • ग्रामसभेचा ठराव

महामेष योजनाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ! शेळी पालन, कोंबडी व मेंढी पालनासाठी ७५% अनुदान !

जुनी विहीर/दुरुस्ती/इनवेल बोअरिंग साठी आवश्यक कागदपत्रे

  • अनुसूचित जमातीचे असल्याचा जात प्रमाणपत्र/जात वैद्यता प्रमाणपत्र
  • उत्पनाचा दाखला(तहसीलदार यांचा)
  • उत्पनाची मर्यादा रु.१,५०,०००/- पर्यंत असावे.
  • दारिद्र्य रेषेखाली असाल तर त्याबाबत प्रमाणपत्र/BPL कार्ड (लागू असल्यास)
  • ७/१२ उतारा
  • ८-अ उतारा
  • ग्रामसभेचा ठराव
  • तलाठी यांच्याकडील दाखला-एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला (०.२० ते  ६ हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबतचे प्रमाणपत्र: प्रस्तावित विहीर सर्व्हे नं.नकाशा व चतुःसीमा.
  • लाभार्थ्याचे बंधपत्र (१०० ते ५०० रु च्या स्टंप पेपरवर)
  • कृषी अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र
  • गात विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • ज्या विहीर वरती दुरुस्ती किंवा इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहीरीचा काम सुरु होण्यापूर्वीचा फोटो ‘
  • इनवेल बोअरिंगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील Feasibility report

शेततळ्यास अस्तरीकरण/वीज जोडणी आकार/सूक्ष्म सिंचनसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/जात वैद्यता प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्याकडचा)
  • उत्त्पन्न हे रु.१,५०,०००/- पर्यंत असावे.
  • ७/१२ उतारा
  • ८-अ उतारा
  • तलाठी यांच्याकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत)
  • ग्रामसभेची शिफारस/मंजुरी
  • शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबत हमीपत्र(१०० ते ५०० रु च्या स्टंप पेपरवर)
  • काम सुरु करण्यापूर्वी त्या जागेचा फोटो
  • विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
  • मा.प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) अ घटनेच्या कलम २७५ (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
  • प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकित प्रत व मापन पुस्तकातील मोजमाप प्रमाणे संबधित मंडळ कृषी अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रती स्वाक्षरी करून घ्यावे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये मिळणारे अनुदान खालीलप्रमाणे

अ.क्रयोजनाअनुदान
1नवीन विहिर2,50,000/-
2जुनी विहीर दुरुस्ती50,000/-
3इनवेल बोअरिंग20,000/-
4वीज जोडणी आकार10,000/-
5शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण1,00,000/-
6सूक्ष्म सिचन संच अ.ठिबक सिंचन ब.तुषार सिचन  50,000/- 25,000/-
7परसबाग500/-
8पंप संच (डीझेल/विद्युत)20,000/-
9पीव्हीसी पाईप30,000/-
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | आजच करा अर्ज | Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024

 Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024 Online Application

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असा करा अर्ज

  • सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • शेतकरी योजना ह्या पर्यावर क्लिक करा
  • आपल्यासमोर योजनाची यादी येईल
  • त्यामध्ये आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यावर क्लिक करा
  • योजनेसंबधी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या.
  • अर्ज कसा करायचा कोणते-कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती वाचा.
  • आपण जर यापूर्वी अर्ज केला असेल तर “अर्जदार लॉग इन” ह्या बटनावर क्लिक करा
  • आपण नवीन असाल तर “नवीन अर्जदार नोंदणी” ह्या बटनावर क्लिक करा!
  • अर्जदाराचे नाव
  • पासवर्ड टाका
  • परत पासवर्ड ची पुष्टी करा
  • मोबाईल व इमेल वर आलेल्या OTP हा टाका
  • प्रतिमेत दर्शवलेले शब्द प्रविष्ट करा
  • आपल्याला आपला लॉग इन आयडी व पासवर्ड परत टाकून लॉग इन करायचे आहे.
  • परत आपली संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत एक प्रोसेस म्हणून दिली आहे.आपण अर्ज हा सविस्तर व एकदा वाचून मगच अर्ज हा सबमिट करायचा

Conclusion

  • नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो, आज आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | Birsa Munda Krushi Kranti Scheme बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. ह्या लेखामध्ये आपण योजनेसाठी आवश्यक पात्रता, लागणारे कागदपत्रे व  योजनेचा उद्देश याबद्दल आपण जाणून घेतले हि माहिती अपूर्ण हि असू शकते. आपण त्यासाठी संबधित कार्यलय किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आवश्यक माहिती जाणून घेऊ शकतात. हि माहिती इतरांना हि शेअर करा. आपल्याला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | Birsa Munda Krushi Kranti Scheme 2024 योजनासंबधी काही शंका किंवा अडचण असतील तर आपण आम्हला comment च्या माध्यमाने विचारू शकतात. आम्ही लवकरच आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयन्त करू !धन्यवाद मित्रानो ….

बिरसा मुंडा कृषी क्रांती साठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे हे प्रत्येक बाबीनुसार थोडेफार बद्दल आहेत पण सर्व साधारण कागदपत्रे पुढीलप्रमाणे !
आधार कार्ड २.७/१२ व ८-अ उतारा ३.उत्पन्नाचा दाखला ४.दिव्यांग प्रमाणपत्र(अपंग असल्यास) ५.लाभार्थीचे प्रतीज्ञापत्र (100/500 रु च्या स्टम्प पेपरवर) ६.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला ७.तलाठी यांच्याकडील दाखला-सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत) विहीर नसल्याचाबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तिवात असेलेल्या विहिरीपासून 500 फुटाच्या अंतरावर असलेला दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे न. नकाशा व चतुःसीमा. ८.कृषी अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र. ९.गटविकास अधिकारी यांचे शिफारसपत्र. १०.ज्या जागेवर विहीर घायची आहे त्या जागेचा फोटो ११.ग्रामसभेचा ठराव

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा उद्देश काय ?

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. ह्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवने व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,जमिनीतील ओलवा टिकून ठेवणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करणे हे महत्वाचे उद्देश आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment