दिव्यांग व्यक्तींना विना अट घरकुल योजना २०२४ | Jilha Parishad Yojana 2024 |दिव्यांग व्यक्तींना मिळणार १०० टक्के अनुदानावर तीनचाकी स्वयंचलित सायकल
दिव्यांग व्यक्तींना विना अट घरकुल योजना २०२४ | Jilha Parishad Yojana 2024 |दिव्यांग व्यक्तींना मिळणार १०० टक्के अनुदानावर तीनचाकी स्वयंचलित सायकल
प्रस्तावना:
दिव्यांग व्यक्तींना मिळणार विना अट घरकुल, अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलीत तीनचाकी सायकल(स्कूटर विथ ऑडाप्शन) डीव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग आणि ज्या लोकांना कोणाचा आधार नाही निराश्रित आहे अश्या दिव्यांग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता इ .जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपकरातून ५ टक्के दिव्यांग योजनेसाठी २०२४-२०२५ आर्थिक प्रस्ताव मागवणे बाबत.
नमस्कार मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपण आज जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग व्यक्तीसाठी विनाट घरकुल.यासाठी कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल?निकष आणि पात्रता काय?याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.
प्रिय वाचक मित्रानो महाराष्ट्र सरकार हे विविध कल्याणकारी योजना ह्या राबवत असते.त्यापैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना घरकुल हे विनाअट मिळेल, घरकुलासाठी अनुदान हे १ लाख २० हजार रुपये मिळणार आहे.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीन मुलभूत गरजा असतात त्या म्हणजे अन्न, वस्र आणि निवारा आहेत.दिव्यांग व्यक्तींना काम करता येत नाही.काहीना काम जमते तर त्यांना व्यक्तींना कोणी कामावर ठेवत नाही.त्यांना राहण्यासाठी घर आणि जेवणासाठी २ वेळेसच जेवण हवे असते.अश्या वेळी महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्य जसे कि श्रवण यंत्र, तीन चाकी सायकल, चालण्यासाठी वाकर अशे साहित्य वाटून दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयन्त हा महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा परिषद चा राहिला आहे.
दिव्यांग व्यक्तीसाठी प्रामुख्याने जिल्हा परिषद हि तीन योजना राबवत आहे त्यापकी २ योजना ह्या विनाअट आहेत यांना कोणतेही अट नाही आपण जर ह्या प्रसिद्ध पत्रक मध्ये बघितले तर दिव्यांग व्यक्तींना कोणतीही अट ठेवता घरकुल योजना आणि निराधार/निराश्रित व्यक्ती म्हणजे अशे दिव्यांग व्यक्ती ज्यांना कोणाचा आधार नाही अश्या व्यक्तींना जिल्हा परिषद निर्वाह भत्ता देईल.या योजनेसाठी ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतच युआयडी प्रमाणपत्र असले पाहिजे.जिल्हा परिषद योजनेंतर्गत ३ आणि महत्वाची योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना स्वयंमचलित तीन चाकी सायकल देण्यात येणार आहे ह्या योजनेसाठी परिवहन परवाना हवा किंवा स्थानिक वाहन परवाना हवा.आपण सविस्तरपणे जिल्हा परिषद च्या दिव्यांग व्यक्तीबद्दल जाणून घेवूया.
योजनेचे नाव | जिल्हा परिषद योजना |
योजनेचा उद्देश | दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे |
अनुदान | १ लाख २० हजार रुपये |
अर्ज प्रर्किया | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ जुलै २०२४ |
संपर्क | पंचायत समिती / जिल्हा परिषद |
मित्रानो हि योजना छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद साठी आहे.
जिल्हा परिषद ५ टक्के उपकरातील दिव्यांगासाठी योजना खालीलप्रमाणे:
अ.क्र | योजनेचे नाव | प्रती लाभार्थी देय रक्कम |
१ | दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल योजना | १,२०,०००/- |
२ | निराधार?निराश्रित अतितीव्र दिव्यांगाना विनाअट निर्वाह भत्ता | १०,०००/- |
३ | अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलीत तीनचाकी सायकल(स्कूटर विथ ऑडाप्शन) डीव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग इ | १,००,०००/- |
जिल्हा परिषद दिव्यांग योजना उद्देश;
१.दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे.
२.दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे.
३.निराधार/निराश्रित व्यक्तींना आधार देणे.
४.दिव्यांग व्यक्तींना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे.
५.दिव्यांग व्यक्तींना सायकल देणे.
जिल्हा परिषद दिव्यांग योजना अटी आणि शर्ती:
१.दिव्यांग हा व्यक्ती ४०% किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे.
२.दिव्यांग व्यक्तीकडे सरकारने प्रमाणित केलेले युआयडी प्रमाणपत्र असले पाहिजे.
३.तहसीलदार यांनी दिलेले अधिवास/रहिवासी प्रमाणपत्र असले पाहिजे.
४.आधार कार्ड
५.अर्जदार हा ग्रामीण भागातील असला पाहिजे.
६.वार्षिक उत्पनाचा दाखला
७.यापूर्वी कोणताही योजनेचा लाभ न घेतला असल्याचे प्रमाणपत्र
८. आठ-अ उतारा(घरकुलासाठी)
९. स्कूटर विथ ऑडाप्शन चालविणेकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना किंवा स्थायी ड्रायव्हिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद दिव्यांग योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स(बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य)
३.जातीचा दाखला(cast Ceritificate)
४.उत्पनाचा दाखला
५.वाहन परवाना
६.४०% किंवा जास्त असल्याचा युआयडी प्रमाणपत्र
७.यापूर्वी कोणताही योजनेचा लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र
८.रहिवासी दाखला
९.८-अ चा उतारा(घरकुलासाठी)
जिल्हा परिषद दिव्यांग योजनेसंबधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या पंचायत समिती ला भेट द्या.
जिल्हा परिषद योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा|
जिल्हा परिषद दिव्यांग योजनेसाठी असा करा अर्ज:
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करता येईल.
१.जिल्हा परिषद योजनेचा अर्ज घेण्यासाठी पंचायत समिती ला भेट द्या.
२.त्या ठिकाणी गेल्यावर अधिक माहिती जाणून घ्या.
३.तिथून योजनेचा अर्ज घ्या.
४.अर्ज शांतपणे एकदा वाचून घ्या.
५.अर्जामध्ये मागितलेली आवश्यक माहिती भराइ(संपूर्ण नाव,आधार कार्ड नंबर, मोबाईल क्रमांक, आणि योजनेसंबधी माहिती भरा.
६.अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडा.
७.स्वताची सही आणि फोटो लावा.
८.एकदा अजून अर्ज वाचून आणि कागदपत्राची पडताळणी करून घ्या.
९.अर्ज हा संबधित कार्यलयात जमा करा आणि अर्ज जमा करण्याची पोच पावती घ्या.
आपला अर्ज यशस्वीरीत्या जमा झाली याची खात्री करा.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण जिल्हा परिषद योजनाबदल जाणून घेतले.आपले जर दिव्यांग योजेनेबदल अजून काही प्रश्न असतील तर आपण आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही लवकरच आपल्या प्रश्नाचे निराकरण करू.धन्यवाद मित्रानो.
मित्रानो आम्ही आपल्याला प्रत्येक पोस्ट च्या शेवटी एक सूचना देत असतो.कि आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा योजनेच्या संबधी असलेली वेबसाईट वर माहिती पडताळूनच निर्णय घ्यावा.आमचा उद्देश हा एक मार्गदर्शन म्हणून आम्ही आपल्यासाठी विविध योजना घेवून येत असतो.कारण प्रत्येक लाभार्थ्यापरेंत योजना पोहचली पाहिजे आणि प्रत्येकाला लाभ हा घेता आला पाहिजे.
जिल्हा परिषद योजनेंतर्गत काय-काय मिळेल?
शिलाई मशीन, संगणक, तिन चाकी स्वयंचलित सायकल आणि घरकुल अजून बरेच अनुदान मिळेल.
जिल्हा परिषद योजना दिव्यांग व्यक्तीसाठी आहे का?
होय,जिल्हा परिषदांतर्गत दिव्यांग व्यक्तींना विनाअट योजनेचा लाभ घेता येईल.यामध्ये घरकुल, निराधार लोकांना निर्वाह भत्ता आणि तीन चाकी सायकल हे साहित्य विनाअट मिलनार आहे.
जिल्हा परिषद योजनेची शेवटची तारीख?
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ आहे.
जिल्हा परिषद दिव्यांग व्यक्तीसाठी कोणती पात्रता आहे.
जिल्हा परिषद योजनेसाठी दिव्यांग व्यक्ती हा ४०% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असला पाहिजे.त्यासाठी युआयडी प्रमाणपत्र अनिवार्य आहे
जिल्हा परिषद दिव्यांग योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील?
१.आधार कार्ड २.जात प्रमाणपत्र ३.युआयडी प्रमाणपत्र,४.८–अ उतारा (घरकुलासाठी), ५.वाहन परवाना(तीनचाकी सायकल साठी)
जिल्हा परिषद दिव्यांग योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करता येईल.आपल्याला पंचायत समिती ला भेट देऊन अर्ज मिळवा आणि अर्जाला आवश्यक कागदपत्रे लावा आणि संबधित कार्यलयात जमा करा आणि अर्ज जमा झाल्याची पोचपावती घ्या.
जिल्हा परिषद दिव्यांग योजनेसाठी घरकुलासाठी किती अनुदान मिळेल?
दिव्यांग व्यक्तीसाठी घरकुल योजना हि विनाअट आहे ह्या योजनेसाठी दिव्यागाना कोणतीच अट नाही.घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान मिळेल.
8 अ चा उतारा आवश्यक आहे का