जिल्हा परिषद योजना | Jilha parishad yojana Marathi 2024 | आजच अर्ज कर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

Jilha parishad yojana 2024 | जिल्हा परिषद योजना मराठी २०२४

Jilha Parishad Yojana २०२४

जिल्हा परिषद योजना २०२४

प्रस्तावना:

१००% अनुदानावर मिळणार संगणक,शिलाई मशीन,झेरॉक्स मशीन आणि दिव्यांग व्यक्तीसाठी मिळणार ३ चाकी स्वयंचलीत सायकल आजच करा असा अर्ज!

समाजकल्याण मार्फत राबवण्यात येणारी हि योजना आहे.स्वतच्या उत्पनातून किमान २० % रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धसाठी आणि दिव्यांगसाठी ५ % खर्च करणे आवश्यक आहे.उर्वरित रक्कम हि समाजकल्याण आणि जिल्हापरिषद उपकरातून खर्च केला जाईल असे पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

योजनामध्ये दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल आणि निराश्रित/निराधार व्यक्तींना निर्वाह भत्ता हा जिल्हा परिषद देणार आहे.हि योजना फक्र जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर च्या उपकरातून हि योजना राबवली जात आहे.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण जिल्हा परिषद आणि समाज कल्याण जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणारी योजना बद्दल जाणून घेणार आहोत.जिल्हा परिषद उपकरातून मागासवर्गीय,विशेष प्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तीसाठी जिल्हा परिषद हि योजना राबवत आहे.आपण ह्या योजनेची पात्रता काय आहे?जिल्हा परिषद योजनेसाठी कोण-कोणते कागदपत्रे लागतील? याची संपूर्ण माहिती आपण ह्या ब्लॉगमधून घेणार आहोत.

जिल्हा परिषद उपकरातून २०२४-२०२५ आर्थिक वर्षात मागासवर्गीय,महिला,विशेष प्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तींना हि योजना देय आहे.जिल्हा परिषद योजना अंतर्गत राबवण्यात येणारी हि योजना १०० टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी ० टक्के या तत्त्वावर राबवण्यात येत आहे.यासाठी पात्र लाभार्थींनी आपला अर्ज हा १५ जुलै २०२४ या अंतिम तारखेचा आत संबधित पंचायत समिती कार्यालय मध्ये सादर करावा.१५ जुलै २०२४ नंतर आलेल्या अर्ज हा स्वीकारला जाणार नाही याची प्रत्येक लाभार्थ्याने नोंद घ्यावी.

जिल्हा परिषद हि विविध योजना राबवत असते ह्या योजनेचा उद्देश असा कि मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाह मध्ये आणणे.जिल्हा परिषद योजना राबवून १००% अनुदानावर ह्या योजना राबवून संबधित व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी, मागास प्रवर्ग यांचा कल्याणासाठी ह्या योजना घेऊन येत असते.कारण ह्या व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय करून आपला उधरनिर्वाह करावा.

जिल्हा परिषद २०% उपकरातून येणाऱ्या योजना खालीलप्रमाणे:

[wptb id=706]

जिल्हा परिषद ५ % उपकरातील दिव्यांगासाठी योजना खालील प्रमाणे:

[wptb id=707]

Jilha parishad yojana 2024 | जिल्हा परिषद योजना मराठी २०२४

जिल्हा परिषद योजनेचे उद्देश:

१.मागासवर्गीय प्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे.

२.दिव्यांग व्यक्तींना स्वतच्या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

३.जिल्हा परिषद हि योजना १००% अनुदानावर राबवत आहे.

४.महिलांना सक्षम बनवणे.

जिल्हा परिषद योजनेची अटी आणि शर्ती:

  • अर्जदार हा अनुसूचित जाती (S.C), अनुसूचित जमाती (S.T), विमुक्त जाती व भटक्या जमाती(V.J.N.T), विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.) व नवबौद्ध या प्रवर्गातील असावा.
  • संगणक योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा १२ वी पास व त्याने एम.एस.सी.आय टी (MSCIT) पास असून सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
  • शिलाई मशीनसाठी अर्ज करणाऱ्या महिलाकडे शिवणकाम प्रमाणपत्र किंवा शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र (Cast Cartificate) आणि उत्पनाचा दाखला(Income Cerifticate) असणे अनिवार्य आहेत.
  • उत्पनाचा दाखला हा तहसील कार्यालयाकडचा असावा.
  • यातील काही योजनाकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे.त्यासाठी आपले वीज कनेक्शन असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.
  • दिव्यांग व्यक्तीसाठी ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे युआयडी प्रमाणपत्र.
  • तहसीलदार यांनी दिलेले अधिवास/रहिवासी प्रमाणपत्र.
  • यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • घरकुलासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना ८ अ चा उतारा सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  • तहसीलदार यांनी दिलेल्या वार्षिक उत्पनाचा दाखला असावा.
  • स्कुटर चालविणेकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना किंवा स्थायी ड्रायव्हिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद योजनेसाठी पात्रता:

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील राविवासी असावा.
  • अर्जदाराकडे आधारकार्ड आणि जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • दिव्यांग अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे(दिव्यांग हा ४०% टक्के/४०% च्या वरती)
  • शिवण मशीन योजनेसाठी शिवण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • घर कुलासाठी दिव्यांग व्यक्तींना कोणतीच अट नाही.

१ रुपयात पिक विमा बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

जिल्हा परिषद योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे:

१.आधार कार्ड

२.जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate)

३.रहिवासी दाखला

४.घरकुलासाठी जागेचा ८-अ उतारा

५.दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र(दिव्यांग व्यक्तीसाठी)

६.बँक पासबुक

७.उत्पनाचा दाखला

८.एम.एस.सी.आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र(संगणकासाठी अर्जासाठी)

९.१२ उत्तीर्ण प्रमाणपत्र(संगणक साठी)

१०.लाईट बिल

११.वाहन चालक परवाना

१२.पासपोर्ट आकाराचा फोटो

13.मोबाईल क्रमांक (चालू वाला नंबर अर्जामध्ये नोंद करा)

प्रत्येक योजनेनुसार कागदपत्रे कमी-जास्त होतात, आपण ज्या वेळेस अर्ज भरायला जाणार तेव्हा पंचायत समिती मध्ये संबधित अधिकाऱ्याकडून एकदा आपला अर्ज पडताळून घ्यावा.

जिल्हा परिषद योजनेसाठी अर्ज कसा करावा;

  • सर्वात प्रथम आपण पंचायत समिती ला भेट द्या.
  • जिल्हा परिषद योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्या.
  • योजनेचा अर्ज घ्या.
  • जिल्हा परिषद योजनेचा अर्ज घेतल्या नंतर सर्व माहिती वाचून व्यवस्थित भर जेणेकरून आपला अर्ज हा नाकारला जाणार नाही.
  • अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडा(सर्वब कागदपत्रे हे स्वतचे स्वाक्षरीने साक्षांकित करा)
  • अर्जावर आपला चालू काढलेला पासपोर्ट फोटो लावा.
  • अर्जावर आपली सही केली आहे का याची खात्री करा.
  • अर्ज एकदा तपासून संबधित अधिकाऱ्याकडे जमा करा.
  • अर्ज जमा झाल्याची पोचपावती घ्या.
  • आपला अर्ज हा यशस्वी जमा झाला याची खात्री होते.

टीप:अर्ज भरत असताना एकदा अर्ज वाचून घ्या.मगच अर्ज भरायला सुरुवात करा.अर्जाला आवश्यक ते कागदपत्रे लावा.जेणेकरून मित्रानो आपला अर्ज हा रिजेक्ट होणार नाही.

नमस्कार प्रिया वाचक मित्रानो आज आपण जिल्हा परिषद योजनेविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं.आपली जर काही समस्या असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर आम्हला Comment ने कळवा.आम्ही लवकरच आपले प्रश्नाचे निराकरण करू.धन्यवाद…..

कोणताही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा संबधित वेबसाईट वरून माहिती पडताळून घ्यावी.तरच निर्णय घ्यावा.

प्रश्न:जिल्हा परिषद योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

उत्तर-जिल्हा परिषद योजनेसाठी मागासवर्गीय प्रवर्ग ,अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,भटक्या जमाती ,विमुक्त जाती आणि दिव्यांग व्यक्तीसाठी आहे.

प्रश्न:जिल्हा परिषद योजनेची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर:१५ जुलै हि अर्ज करण्याची अंतिम तारीख आह .

प्रश्न:जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या-कोणत्या योजना येतात?

उत्तर-जिल्हा परिषद अंतर्गत,महिलांना शिलाई मशीन,झेरॉक्स मशीन ,संगणक ,कडबा कुटी यंत्र दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी स्वयंचकित सायकल,दिव्यांगाना विनाअट घरकुल आणि निराधार/निराश्रित व्यक्तींना निर्वाह भत्ता या सर्व योजना जिल्हा परिषद अंतर्गत येतात.

प्रश्न:जिल्हा परिषद अंतर्गत योजनेसाठी किती अनुदान मिळते?

उत्तर-जिल्हा परिषद योजनासाठी मागासवर्गीय प्रवर्ग आणि दिव्यांग व्यक्तींना अनुक्रमे २०%,५% स्वतःह खर्च करावा लागतो आणि उर्वरित खर्च हे जिल्हा परिषद उपकरातून केला जातो.

प्रश्न:शिलाई मशीन योजेसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे का ?

उत्तर-शिलाई मशीनसाठी शिवण प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र हि चालते.

प्रश्न:जिल्हा परिषद योजना हि १००% अनुदान देते का?

उत्तर-होय,जिल्हा परिषद ह्या योजना हि योजना उपकरातून राबवून अर्जदारांना २०% स्वखर्च करावा लागतो.

प्रश्न:जिल्हा परिषद योजनेसाठी कोणते-कोणते कागदपत्रे लागतात?

उत्तर-१.आधार कार्ड
२.जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate)
३.रहिवासी दाखला
४.घरकुलासाठी जागेचा ८-अ उतारा
५.दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र(दिव्यांग व्यक्तीसाठी)
६.बँक पासबुक
७.उत्पनाचा दाखला
८.एम.एस.सी.आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र(संगणकासाठी अर्जासाठी)
९.१२ उत्तीर्ण प्रमाणपत्र(संगणक साठी)
१०.लाईट बिल
११.वाहन चालक परवाना
१२.पासपोर्ट आकाराचा फोटो
13.मोबाईल क्रमांक (चालू वाला नंबर अर्जामध्ये नोंद करा)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

3 thoughts on “जिल्हा परिषद योजना | Jilha parishad yojana Marathi 2024 | आजच अर्ज कर !”

    • आपण जिल्हा परिषद/पंचायत समिती येथे संपर्क साधून आपण तेथून योजनेची माहिती जाणून घ्या!व अर्ज हि आपल्याला तेथून मिळून जाईल !

      Reply

Leave a Comment