Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024 | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज सुरु | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024  | Solar Pump Online Application

  Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024   Solar Pump Online Application

प्रस्तावना

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईटवर सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या साईटवर विविध योजनाची माहिती हि देत असतो. प्रत्येक योजना हि आपल्या शेतकरी बांधवपर्यंत पोहचली पाहिजे. आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाची संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त करत असतो. अश्याच राज्य सरकारच्या महत्वपूर्ण योजनेपैकी महत्वाची योजना बघणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज सुरु | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024  | Solar Pump Online Application  होय. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पत्रात काय, योजनेचा उद्देश काय, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या साईटवरून करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचवा.

मित्रानो ह्या वेळेस चा अर्थसंकल्प आपण जर बघितला तर अनेक महत्वपूर्ण योजना ह्या राबवण्यात आल्या, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण हि योजना हि एक महत्वाची योजना सुरु करण्यात आली, शाळेतील व कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना असेल, जेष्ठ नागरिकांसाठी व आपल्या शेतकरी बांधवांसाठी हि अनेक योजना राबवण्यात आल्या. आपण जर बघितले तर शेतकऱ्यांना शेतीविषयक काही काम करायचे असेल जसे कि विहीर खोदणे, बी-बियाणे, शेतीसाठी आवश्यक अवजारे खरेदी करणे यासाठी एकत्र सावकाराच्या घरी फेऱ्या मारून, काही वस्तू गहन ठेवून किंवा आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. यामुळे आपला शेतकरी बांधव कर्जाच्या विळख्यात अडकून राहत होता. पण आज जर बघितले तर केंद्रसरकार आणि राज्य सरकार हे आपल्या शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचवावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होतील याच्यासाठी विविध योजना ह्या राबवल्या जातात. त्यातील महत्वाची योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज सुरु | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024  | Solar Pump Online Application योजना होय. शेतकरी बांधव हा रात्र-दिवस आपल्या शेतात राबत असतो. सर्वात मोठी समस्या किंव आपण अडचण हि म्हणू शकतो ती म्हणजे शेतीला रात्रीची लाईट असल्यामुळे रात्री आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. शेतकरी बांधवाना हि परिवार असतो. अश्यावेळी रात्रीची लाईट असल्यामुळे साप असेल किंवा वन्यप्राणी यांच्यापासून हिंसक हल्ला होण्याची दाट शकता असते. त्यामुळे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज सुरु | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024  | Solar Pump Online Application योजनामुळे हवे तेव्हा आपल्या पिकांना पाणी शेतकरी राजा हा देऊ शकतो. यासाठी कृषी पंप योजनेचे अर्ज सुरु झाले आहेत. मागेल त्याला कृषी सौर पंप देण्यात येणार आहेत. चला तर प्रिय वाचक मित्रानो आपण सविस्तर माहिती जाणून घेवूया !

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
योजनेचे नावमागेल त्याला सौर कृषी पंप योजना
विभागमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा
योजनेचे लोभार्थीसर्व शेतकरी
लाभसर्वसाधारण गटाच्या शेतकरी बांधवासाठी केवळ १०% रक्कम भरून सौर प्लेट व कृषी पंपाचा संच
पात्रताजमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ HP पंप
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Eligibility in Marathi

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता व निवडीचे निकष :-

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता व निवडीचे निकष :-

  • शेतकरी हा महाराष्ट्रचा रहिवासी असला पाहिजे.
  • आधार कार्ड असणे आवश्यक असणे अनिवार्य आहे.
  • शेतकऱ्याकचे बँकमध्ये बचत खाते असले पाहिजे.
  • लाभार्थीकडे जर २.५ एकर शेती असेल तर अश्या शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती(3Hp) क्षमतेचे सौर कृषी पंपासाठी अनुदेय देय राहील.
  • शेतकऱ्याकडे जर अडीच एकर ते पाच एकर शेती असेल तर 5 अश्वशक्ती(5HP) क्षमतेचा सौर कृषी पंप मिळेल.
  • शेतकऱ्याकडे पाच एकरच्या वर शेतजमीन आहे अश्या शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील.
  • जर शेतकऱ्याला पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी मागणी केली तर ती मागणी देय राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुद्धा सौर कृषी पंप योजनेसाठी पात्र राहतील.
  • अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.

बांधकाम कामगारांच्या मुलांना करता येणार मोफत MSCIT कोर्स!

 Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi

Magel TYala Saur Krushi Pump YOjana

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना वैशिष्टे

  • शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज पुरवठा उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर व कृषी पंपाचा पूर्ण संच देय राहील.
  • अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनासाठी 5% लाभार्थी हिस्सा असेल.
  • शेतकऱ्यांना गृहीत रक्कम दिल्यावर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान देय राहील.
  • शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपिचे पंप हे देण्यात येतील,
  • शेतकऱ्यांना पंप वितरीत केल्यानंतर पाच वर्ष दुरुस्तीची हमी व इन्शुरन्स हा दिला जाईल.
  • शेतकऱ्यांना वीजबिल व लोडशेडिंगची चिता राहणार नाही.
अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
Magel Tyala saur Krushi Pump Yojana in Marathi
Mangel Tyala Saur Krushi Pump Yojana Document In Marathi

 Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Document In Marathi

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक(बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
  • 7/12 उतारा
  • 8-अ उतारा
  • जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
  • 2 पासपोर्ट फोटो

इतर कागदपत्रे(लागू असल्यास)

  • पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याचा न हरकत दाखला
  • शेत/जमीन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती/जमातीचा दाखला

महामेष योजना 75 % अनुदानावर मिळणार मेंढी,शेळी व कोंबडी पालन योजना ! अर्ज करण्यासाठी क्लिक करा

 Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Apply/Application

Magel Tyala Saur Krushi Pump YOjana Online Application

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी असा करा अर्ज !

  • सर्वात प्रथम आपण अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.
  • उजव्या बाजूला वरती ‘भाषा” बदला/जर आपल्याला आवश्यकता असेल तर!
  • “योजनेची माहिती” वर क्लिक करा योजेनेसंबधी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
  • “लाभार्थी सुविधा” यावर क्लिक करा.
  • तुम्हाला त्याठिकाणी तीन पर्याय दिसतील “अर्ज करा/ अर्जाची सद्यस्थिती/ देयकाची रक्कम भरणा करा”
  • तुम्ही “अर्ज करा” ह्या पर्यायवर क्लिक करा.
  • आपल्यासमोर अर्ज भरण्याचे पेज उघडेल.
  • तुम्हाला अगोदर सर्व अर्ज व्यवस्थित वाचूक घ्यायचा आहे
  • अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील या ठिकाणी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरा.(उदा- आधार कार्ड नंबर/गाव/जिल्हा/तालुका)
  • शेतीचा आपण गट क्रमांक टाकला का बाकीची संपूर्ण माहिती हि भरली जाईल!
  • खाली अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण त्या खाली संपूर्ण माहित भरा
  • जलस्रोत आणि सिंचन माहिती भरा
  • कृषी तपशील मध्ये पिकाचा प्रकार, पिकाची संख्या हि माहित भरा
  • विद्यमान पंप तपशील भर
  • त्यानंतर खाली आवश्यक पंप तपशील हि माहिती भरा
  • त्याखाली बँकेची तपशील संपूर्ण माहिती अचूक भरा. (उदा-बँक खाते नंबर, आयएफएससी कोड(IFSC कोड) बँकेची नाव व शाखेचे नाव टाका)
  • घोषणापत्र वर चौकट असलेल ठिकाणी टिक करा.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यामध्ये
  • 7/12 उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक
  • व इतर कागदपत्रे लागू असल्यास
  • पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याचा न हरकत दाखला
  • शेत/जमीन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती/जमातीचा दाखला
  • अश्या प्रकारे संपूर्ण माहित भरून कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर करण्यापूर्वी आपण एकदा भरलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या.
  • सर्वात शेवटी आपल्याला “अर्ज सादर करा” ह्या बटनावर क्लिक करा.
  • आपला अर्ज यशस्वीपणे सादर झाला असा आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर संदेश येईल.

मित्रानो आपल्याला जर अर्ज भरता येत असेल तर आपण आपल्या मोबाईल वरूनहि अर्ज करू शकतात. नाहीत आपल्या जवळ असेलेल CSC सेंटर किंबा सायबर कॅफेवरून हि आपण अर्ज करू शकतात.

Conclusion

  • नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Marathi 2024  | Solar Pump Online Application याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्याला जर योजेनेसंबधी माहिती आवडली असेल तर आम्हला नक्की आपला अभिप्राय कळवा. कारण आपण दिलेला अभिप्राय आम्हाला प्रेरणा देत असतो. व अश्याच महत्वपूर्ण योजना व कृषी संबधी माहिती आम्ही आपल्यासाठी घेवून येत जाऊ. तर आपण वरती मागेल त्याला सौर कृषी पंप योजेनेचा अर्ज भरण्यासाठी लिंक दिली आहे आपण त्या ठिकाणी क्लिक करून अओन अर्ज करू शकता. व ह्या लेखात आपण आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज कसा करायचा याची माहिती जाणून घेतली. आपल्याला योजनासंबधी काही शंक किंवा अर्ज करण्यासाठी समस्या येत असतील तर आम्हला Comment च्या माध्यमाने विचारु शकता. आम्ही लवकरच आपल्या प्रश्न व शंकेचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाची माहिती हि आपले नातेवाईक व मित्रांना हि शेअर करा |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हि सर्व प्रवर्गातील शेतकरी बांधवासाठी आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर व कृषी पंपाचा पूर्ण संच देय राहील.लाभार्थीकडे जर २.५ एकर शेती असेल तर अश्या शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती(3Hp) क्षमतेचे सौर कृषी पंपासाठी अनुदेय देय राहील.
शेतकऱ्याकडे जर अडीच एकर ते पाच एकर शेती असेल तर 5 अश्वशक्ती(5HP) क्षमतेचा सौर कृषी पंप मिळेल.
शेतकऱ्याकडे पाच एकरच्या वर शेतजमीन आहे अश्या शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. अश्या प्रकारे संपूर्ण योजनेचे स्वरूप आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनासाठी आवश्यक कागदपत्रे ?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनासाठी आवश्यक कागदपत्रे १.आधार कार्ड २.बँक पासबुक ३.7/12 उतारा ४.२ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
कागदपत्रे लागू असल्यास खालीलप्रमाणे
पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबधित खात्याचा न हरकत दाखला
शेत/जमीन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र
अनुसूचित जाती/जमातीचा दाखला
हि सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचा अर्ज कसा भरायचा आहे?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.यासाठी आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्यायची आहे. व तेथून संपूर्ण माहिती वाचूक आपला अर्ज सादर करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment