पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना | Pandit Dindayal Upadhay Swayam Yojana | उच्च शिक्षणासाठी सरकारकडून मिळणार ६०,००० रुपये
१२ वी नंतर प्रवेश घेणाऱ्या व शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या ‘अनुसूचित जमाती’ विद्यार्थ्यासाठी निवास,भोजन ,शैक्षणिक साहित्यासाठी थेट मदत राज्य सरकार करणार आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना २०२४
प्रस्तावना:
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना Pandit Dindayal Upadhay Swayam Yojana हि योजना ज्या मुला-मुलीना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अश्या विधार्थ्याना निवास,भजन आणि शैक्षणिक साहित्य थेट हे राज्य सरकारकडून देण्यात येईल. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना Pandit Dindayal Upadhay Swayam Yojana हि योजना आदिवासी विकास विभागाच्या मार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरिता राज्यात एकूण ४९५ वसतिगृह आहे.आणि ह्या ४९५ वसतिगृहाची क्षमता ६१,०७० एवढी आहे.त्यापैकी ४९१ शासकीय वसतिगृह कार्यरत असून त्यापैकी २८३ वसतिगृह हि मुलांची व २०८ वसतिगृह हि मुलींची आहेत,या दोन्ही वसतिगृहाची क्षमता ५८,४९५ इतकी आहे.राज्यात विविध ठिकाणी महाविद्यालय,उच्च महाविद्यालय,तंत्रनिकेतन,वैदकीय महाविद्यालये,अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आय.ती.आय ,अल्प मुदतीचे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम इत्यादीची सोय झाली आहे.आपण जर सद्य स्थिती जर बघितली तर उच्च अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याची हि प्रवेश संख्या हि मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे.
सदर विद्यार्थी हा ग्रामीण तसेच दुर्गम भागातून तालुका,जिल्हा च्या ठिकाणी असलेल्या शिक्षणासाठी येतात.मात्र त्याच्या आर्थिक परिस्थितीमुले त्यांना या शहरी भागात निवास,भोजन तसेच इतर शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने त्यांना सरकार कडून अश्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी विभागांतर्गत शासकीय वसतीगृहा मध्ये प्रवेश देण्यात येतो.मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ,पदवी व पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यची संख्या हि वाढत असल्याने.शासकीय गृहात प्रवेश क्षमता कमी असल्याने व प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या हि वाढत आहे.सद्यस्थितीत ज्या विद्यार्थिनी अर्ज करूनही प्रवेश मिळाला नाही.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना Pandit Dindayal Upadhay Swayam Yojana अंतर्गत उच्च शिक्षणासाठी भोजन,निवास व शैक्षणिक साहित्याचा खर्च हा केला जाईल.
आपण आज हि बघितली ग्रामीण भाग किंवा दुर्गम भाग असेल अश्या ठिकाणी प्रत्येक योजना हि पोहचत नाही.अश्या मुलांना शिकायचे असते पण आर्थिक परीस्थित तेवढी चांगली नसते म्हणून उच्च शिक्षण घेता येत नाही.अश्या विद्यार्थ्यासाठी हि सुवर्ण संधी आहे,होस्टेल ला नंबर लागला नाही तरी ,पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनातून विद्यार्थ्याला निवास,भोजना आणि शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत केली जाते,
Source-महाराष्ट्र शासन-आदिवासी विकास विभाग-शासन निर्णय क्र.आवग्रू-२०१६/प्र.क्र.८७/का-१२ मंत्रालय मुंबई-३२ दि-१५ ऑक्टोंबर २०१६
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे निकष आहेत:
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना पात्रता:
Pandit Dindayal Upadhay Swayam Yojana In Marathi |
- अर्ज करणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.
- विद्यार्थ्याने अर्जासोबत जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- पालकाचे उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थाचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.(आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे.सदर विद्यार्थ्याचे पालक हे रहिवासी नसावेत.
- सदर योजनेचा लाभ मिळालास विद्यार्थ्याने ज्याठिकाणी प्रवेश घेतला आहे अश्या शहरामध्ये राहाण आवश्यक आहे.
जिल्हा परिषद योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना शैक्षणिक निकष:
१.अर्जदार हा १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
२.केंद्रशासनाच्या पोस्ट matric शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाअंतर्गत लाभ देण्यात येईल
३.तथापि दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
४.एका शाखेची पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ देय राहणार नाही.
५.प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळ्यालास सुद्धा लाभ घेता येणार नाही.
६.मान्यताप्राप्त महाविद्यालय/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
७.विद्यार्थ्याची कॉलेज/महाविद्यालय किंवा संस्थेमध्ये उपस्थिती हि ८०% पेक्षा अधिक असणे आवश्यक राहील.
८. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनासाठी निवड हि गुणवत्तेनुसार करण्यास येईल.
९.निवड झालेल्या विद्यार्थी संबधित अभ्यासक्रम पूर्ण होईपरेंत लाभास पात्र राहील.
१०.विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी संबधित अभ्यासक्रमाच्या परीक्षेस उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनासंबधी इतर निकष:
- योजनेचा लाभ हा १२ वी नंतरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल.
- एका विद्यार्थ्यास जास्तीत-जास्त ७ वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा ७ वर्ष लाभ घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही.
- योजनेचा लाभस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही.
- पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा लाभ घेणारा विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
- विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या,सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.
- लाभ घेणार विद्यार्थी कोणत्याही प्रकारची खाजगी/सरकारी नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
- आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सादर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.शाळेचा दाखला
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.१२ वी मार्कशीट
५.पालकाचा उत्पनाचा दाखला(तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
६.बँक पासबुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले असावे)’
७.दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असल्यास)
८.पासपोर्ट आकाराचा फोटो
९.अर्जामध्ये स्वताचा मोबाईल क्रमाकाची नोंद करावी.
१०.सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असावा.
टीप: १.सर्व कागदपत्रे अर्जाला जोडून योग्यरीतीने सत्यापित केलेली असावी.
२.तुम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा अर्ज हा ऑनलाईन हि करू शकता.
३.जवळच्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यलयात जाऊन ऑफलाईन अर्ज जमा करू शकता.
वसतिगृह,पंडित दीनदयाल स्वयंम योजनासंबधी चौकशी साठी खाली दिलेल्या क्रमांक वर संपर्क करा.
नंबर:1800 267 0007
पंडित दीनदयाल स्वयंम योजना वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा !
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाबद्दल सविस्तर जाणून घेतले.आपली काही समस्या किंवा प्रश्न असतील तर आपण आमच्याशी comment च्या माध्यमातून विचारू शकता.आंम्ही लवकरच आपल्या प्रश्न आणि समस्याचे निराकरण करू. धन्यवाद….. वाचक मित्रानो कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सदर योजनेच्या वेबसाईट किंवा नजीकच्या ऑफिस ला भेट देऊन अधिक माहिती जाणून अर्ज करावा.आम्ही फक्त एक मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर विविध योजना घेऊन येत असतो.आमचा उद्देश एकच असतो कि प्रत्येक घटकापरेंत
पंडित दीनदयाल योजना काय आहे?
पंडित दीनदयाल हि योजना ज्या विद्यार्थ्याना वसतिगृह मिळाल नाही अश्या विद्यार्थ्यांना निवास,भोजन आणि शैक्षणिक साहित्यसाठी वार्षिक ६०,००० रु दिले जातात.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कागदपत्रे?
१.आधार कार्ड
२.शाळेचा दाखला
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.१२ वी मार्कशीट
५.पालकाचा उत्पनाचा दाखला(तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
६.बँक पासबुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले असावे)’
७.दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असल्यास)
८.पासपोर्ट आकाराचा फोटो
९.अर्जामध्ये स्वताचा मोबाईल क्रमाकाची नोंद करावी.
१०.सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असावा.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनासाठी पात्रता काय ?
विद्यार्थी हा १० वी उत्तीर्ण असाव आणि उच्च शिक्षण घेणारा असावा तरच हा लाभ मिळतो,
विद्यार्थी हा चागल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.विद्यार्थी हा फक्त ७ वर्ष पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा लाभ घेवू शकतो.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना हि कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना हि अनुसूचित जमाती विद्यार्थी साठी आहे.ज्यांना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही अशे विद्यार्थी ह्या योजनेसाठी पात्र ठरतात.