PM Mudra Yojana Online Application | प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी | PM Mudra Yojana Online Application

 PM Mudra Yojana Online Application

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपण केंद्रसरकार व राज्यसरकार यांच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाची माहिती घेत असतो. आज आपण अश्याच एक महत्वपूर्ण योजनांपैकी महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी | PM Mudra Yojana Online Application योजना होय. ह्या लेखामध्ये आपण मुद्रा लोन म्हणजे काय? योजनेचा उदेश? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखातून घेणार आहोत.त्यामुळे आपल्याला एक छोटी विनंती आहे. कि हा लेख संपूर्ण वाचवा. व हि माहिती इतर आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा! Small Business Loan without Collateral

 Prime Minister’s Mudra Loan Scheme

प्रस्तावना

नमस्कार उद्योजक मित्रानो, सद्या जर आपण बघितले तर प्रत्येक तरुण हा व्यवसायाकडे वळतोय हि एक चांगली गोष्ट आहे. पण स्टार्टअप असो किंवा छोटा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल असणे तितकेच आवश्यक आहे. बँका ह्या कर्ज देत नाहीत, मग व्यवसाय करायचा तर कसा  हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. काही तरुण स्वतः व्यवसाय सुरु करतात, तर काही आपल्या वडिलोपार्जित व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयन्त करतात. पण  लोन कडे काढायचे? लोन मिळेल का ? भारताच्या आर्थिक विकासात लघु, छोटे आणि मध्यम उद्योगांचा (MSME) महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे उद्योग प्रोत्साहन मिळावे, त्यांना भांडवलाची कमतरता भासू नये, यासाठी भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. या योजनेतून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे अनेक उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.

 Prime Minister’s Mudra Loan Scheme

चला तर मित्रानो आपण आजच्या लेखातून प्रधामंत्री मुद्रा लोन योजनेबद्दल सविस्तर जाणून घेवू.

प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय?

मुद्रा (Micro Units Development and Refinance Agency) योजना अंतर्गत, लघु आणि छोटे उद्योजक गहाण न ठेवता भांडवलासाठी लोन घेऊ शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे व त्यांना स्वावलंबी बनवणे आहे.

योजनेचे नाव                           प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
सुरुवात8 एप्रिल 2015
विभागवित्त मंत्रालय
उद्देशनवउद्योजकांना प्रोत्साहन देणे व त्यांना स्वावलंबी बनवणे आहे.  
वैशिष्टेवार्षिक 7% दराने 10 लाखापर्यंत कर्जपुरवठा करणे
लाभार्थीस्वतःच व्यवसाय सुरु करू इच्छिणारे किंवा आपल्या उद्योग वाढवायचा आहे अशे लाभार्थी.
लाभव्यवसायासाठी ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे  
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
Mudra Loan in Marathi | Mudra Yojana Details |
 Prime Minister’s Mudra Loan Scheme

Mudra Loan Eligibility

मुद्रा लोनसाठी पात्रता आणि अटी

  • मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी काही ठराविक पात्रता निकष आहेत. हे निकष व्यवसायाच्या प्रकारावर आणि लोनच्या उद्देशावर आधारित आहेत. खाली या पात्रतेविषयी तपशील दिला आहे:
Prime Minister’s Mudra Loan Scheme
Prime Minister’s Mudra Loan Scheme

व्यवसायाचा प्रकार

  • लघु, छोटे आणि मध्यम उद्योग (MSME)
  • उत्पादन उद्योग (Manufacturing Units)
  • सेवा उद्योग (Service Enterprises)
  • व्यापार (Trading Businesses)
  • शेतीशी संबंधित उपक्रम (जसे की दुग्धव्यवसाय, पशुपालन, मत्स्य व्यवसाय)

अर्जदाराचे वय

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 65 वर्षे

कर्ज मर्यादा

  • ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज केलेल्या योजनेनुसार कर्जाचे वर्गीकरण (शिशु, किशोर, तरुण) केले जाते.

क्रेडिट इतिहास (Credit History)

  • बँक किंवा वित्तीय संस्था अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासते.
  • चांगला आर्थिक व्यवहार असणे गरजेचे आहे.

विशेष प्राधान्य गट

  • महिला उद्योजक
  • ग्रामीण उद्योजक
  • SC/ST आणि ओबीसी गटातील व्यावसायिक
  • कुटुंबातील उत्पन्न कमी असणारे अर्जदार
  • मुद्रा लोनसाठी पात्रता निकष साधे आणि पारदर्शक आहेत. जर तुम्ही नवउद्योजक किंवा चालू व्यवसाय वाढवू इच्छित असाल, तर ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास लोन सहज मंजूर होऊ शकते.

मुद्रा लोनचे तीन प्रकार

शिशु, किशोर, तरुण योजनांमध्ये फरक

मुद्रा लोन विविध व्यवसायांच्या गरजेनुसार तीन स्तरांमध्ये दिले जाते:

1.शिशु योजना:

  • नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी.
  • ₹50,000 पर्यंतचे लोन उपलब्ध.

2.किशोर योजना:

Mudra Loan for Small Businesses

  • चालू व्यवसाय वाढवण्यासाठी.
  • ₹50,000 ते ₹5 लाखांपर्यंतचे लोन उपलब्ध.

3.तरुण योजना:

  • मोठ्या प्रमाणावर व्यवसाय विस्तारासाठी.
  • ₹5 लाख ते ₹10 लाखांपर्यंतचे लोन उपलब्ध.

मुद्रा लोन 2024 अपडेट्स

मुद्रा लोनसाठी कोण अर्ज करू शकतो?

महिला उद्योजकांसाठी मुद्रा लोन

  • मुद्रा लोनसाठी खालील प्रकारचे व्यावसायिक पात्र आहेत:
  • लघु, छोटे उद्योग (कृषी, उत्पादन, व्यापार)
  • सेवा उद्योग
  • महिला उद्योजक
  • स्टार्टअप्स
Prime Minister’s Mudra Loan Scheme

मुद्रा लोनसाठी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • विहित नमुना अर्ज
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • बँकेचे पासबुक(बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य)
  • व्यवसायाचा पुरावा (GST नंबर, व्यवसाय परवाना)
  • बँक खाते तपशील
  • 2 पासपोर्ट फोटो
  • प्रकल्प अहवाल (लोन कसा वापरणार याचा आराखडा)

मुद्रा लोनचे फायदे

  • गहाण न ठेवण्याची सुविधा: लघु उद्योगांना कोणतीही संपत्ती गहाण ठेवण्याची गरज नाही.
  • कमी व्याजदर: बँका आणि वित्तीय संस्थांकडून कमी व्याजदराने लोन मिळते.
  • सुलभ प्रक्रिया: अर्ज करणे सोपे आणि पारदर्शक आहे.
  • महिला उद्योजकांना प्रोत्साहन: महिलांसाठी विशेष सवलती.
  • नोकरी निर्मिती: ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
 Prime Minister’s Mudra Loan Scheme

मुद्रा लोन अर्ज प्रक्रिया

Online Mudra Loan Application Marathi | Mudra Loan Process

  • ऑफलाइन प्रक्रिया:
  • जवळच्या सरकारी बँकेत जाऊन अर्ज सादर करावा.
  • कागदपत्रांची पूर्तता करून लोन मंजुरी मिळवता येते.
  • ऑनलाइन प्रक्रिया:
  • मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येतो.
  • डिजिटल कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येते.

खालील योजनेचा लाभ घेतलाय का ?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग अनुदान योजना

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना

मुद्रा लोनमुळे मिळालेले फायदे

  • अनेक लघु उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायाला नवी ओळख मिळवली आहे.
  • ग्रामीण भागातील महिला व युवकांना आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा आधार मिळाला.
  • भारताच्या GDP मध्ये MSME क्षेत्राचा वाटा वाढला आहे.

निष्कर्ष

  • नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण मुद्रा लोनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. ह्या लेखामध्ये आपण मुद्रा लोन म्हणजे काय, उद्देश, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती बघितली. हि माहित अपूर्ण हि असू शकते, त्यामुळे आपण संबधित कार्यलय व अधिकाऱ्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी.मुद्रा लोन ही एक क्रांतिकारी योजना आहे, जी भारतातील उद्योजकतेला चालना देते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले व्यवसाय यशस्वी करावे. मुद्रा लोन फक्त आर्थिक मदतच नव्हे, तर आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल आहे. मुद्रा लोनमुले आपल्या उद्योग धंद्याला नक्कीच हातभार लागेल.
 Prime Minister’s Mudra Loan Scheme

गहाण नसलेले कर्ज योजनांचे फायदे?

गहाण न ठेवण्याची सुविधा: लघु उद्योगांना कोणतीही संपत्ती गहाण ठेवण्याची गरज नाही.
कमी व्याजदर: बँका आणि वित्तीय संस्थांकडून कमी व्याजदराने लोन मिळते.
सुलभ प्रक्रिया: अर्ज करणे सोपे आणि पारदर्शक आहे.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन: महिलांसाठी विशेष सवलती.
नोकरी निर्मिती: ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होते.

मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रे?

आधार कार्ड
विहित नमुना अर्ज
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड)
बँकेचे पासबुक(बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य)
व्यवसायाचा पुरावा (GST नंबर, व्यवसाय परवाना)
बँक खाते तपशील
2 पासपोर्ट फोटो
प्रकल्प अहवाल (लोन कसा वापरणार याचा आराखडा)
किसान मुद्रा लोन

मुद्रा योजनेतून व्यवसाय वाढवण्याचे फायदे?

अनेक लघु उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायाला नवी ओळख मिळवली आहे.
ग्रामीण भागातील महिला व युवकांना आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा आधार मिळाला.
भारताच्या GDP मध्ये MSME क्षेत्राचा वाटा वाढला आहे.

व्यवसायासाठी मुद्रा लोन कसे मिळवावे?

मुद्रा (Micro Units Development and Refinance Agency) कर्ज योजना ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक योजना आहे. या अंतर्गत विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध होते, विशेषतः नवीन उद्योग, लघु उद्योग, शेती आधारित व्यवसाय आणि स्टार्टअप्ससाठी.
व्यवसायासाठी योग्य योजना तयार करा:
व्यवसायाची सविस्तर माहिती तयार करा (उदाहरणार्थ: उद्दिष्ट, खर्चाचा अंदाज, व्यवसायाचे स्वरूप).
यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी आवश्यक खर्चाचे तपशील, महसूल अंदाज, आणि परतफेडीची योजना समाविष्ट करा.
योग्य प्रकारच्या मुद्रा कर्जाची निवड करा:
शिशु: ₹50,000 पर्यंत
किशोर: ₹50,001 ते ₹5 लाखांपर्यंत
तरुण: ₹5 लाखांपासून ₹10 लाखांपर्यंत
बँकेशी संपर्क साधा:
आवश्यक कागदपत्रे जमा करा:
बँकेत जाऊन मुद्रा कर्जाचा अर्ज भरा आणि संबंधित कागदपत्रे सादर करा. बँक अधिकाऱ्यांशी आपल्या व्यवसायाबद्दल चर्चा करा.
प्रक्रिया आणि मंजुरी:
बँक कागदपत्रांची पडताळणी करते.
तुमच्या व्यवसायाच्या योजनेचा अभ्यास करून, कर्ज मंजूर किंवा नाकारले जाते.
महत्वाच्या टिप:
कर्जासाठी कोणत्याही एजंटची आवश्यकता नाही.
मुद्रा कर्जावर कोणतेही हमी (Collateral) आवश्यक नसते.
व्याजदर बँकेवर अवलंबून असतो, पण तो सामान्यतः कमी असतो.
अधिक माहिती:
Start-up Mudra Loan
मुद्रा योजना अधिकृत वेबसाईट: https://www.mudra.org.in
याठिकाणी तुम्ही योजनांबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment