प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार रु.75,000 ते 1,25,000 हजार शिष्यवृत्ती | PM Yasasvi Scholarship Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार रु.75,000 ते 1,25,000 हजार शिष्यवृत्ती | PM Yasasvi Scholarship Yojana 2024

 PM Yasasvi Scholarship Yojana 2024

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना हि OBC, EBC आणि DNT विद्यार्थ्यासाठी शिक्षण घेण्यासाठी रु.75,000 ते 1,25,000 हजार आर्थिक सहाय्य दिले जाते.

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईटवर सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या वेबसाईटवर विविध योजनाची माहिती प्रदान करत असतो. शैक्षणिक योजना, कृषी योजना व महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनाची माहिती आपण जाणून घेत असतो. आमचा प्रामाणिक उद्देश एकच आहे कि प्रत्येक घटका पर्यंत शासकीय योजनेची माहिती हि पोहचली पाहिजे. व त्या योजनाचा लाभ घेवून लाभार्थ्याचे जीवमान उंचवण्यास मद्दत होईल व आर्थिक सहाय्य मिळाल्यावर त्याच्या स्वप्नांना एक प्रकारची उंच भरारी मिळेल. आम्ही नेहमी खरी व खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहचतो. आज आपण अश्याच एक शैक्षणिक योजनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

प्रस्तावना

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार रु.75,000 ते 1,25,000 हजार शिष्यवृत्ती | PM Yasasvi Yojana हि केंद्रपुरस्कृत योजना आहे. आपण ह्या योजनेचे फायदे, पात्रता व आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. लेख हा महत्वपूर्ण आहे आपण शेवटपर्यंत वाचवा हि विनंती.कारण आपले योजनासंबधी काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यांचे नक्कीच निराकरण होईल.

प्रधानमंत्री यशस्वी योजना म्हणजे काय? प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनालाच PM Young Achivers Scholarship Award Scheme For Vibrant India For OBCs and Other (PM YASASVI) असे म्हणतो.हि योजना इतर मागासवर्गीय (OBC) आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC) आणि विमुक्त, भटक्या जमाती (DNT) मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक ज्ञाय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हि योजना सुरु केळू आहे. ह्या योजनेला 100% आधारावर सामाजिक ज्ञाय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून निधी दिला जातो. कारण विद्यार्थ्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हि नाजूक असते. ते मुलांचा शिक्षांचा खर्च उचलू शकत नाही. मुलांनी खूप शिकावे असे प्रत्येक पालकांना वाटते. पण परिस्थितीमुळे पालक हे हतबल होतात, आणि मुलांना चांगल्या व उत्तम दर्जाचे उच्च शिक्षण देऊ शकत नाही. यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकार हे विविध शैक्षणिक योजना घेवून येत असते. कारण शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तप प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आर्थिक परिस्थिती हि शिक्षणाला आड येऊ नये. विद्यार्थी हा शिष्यवृत्तीचा लाभ घेवून त्याने उच्च शिखर गाठावे. नौकरीला लागून, आपले व आपल्या परिवाराची आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करावे हाच उद्देश पप्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा आहे. चला आपण जाणून घेऊया !

योजनेचे नावप्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना
सुरुकेंद्र सरकार
विभागभारत सरकार सामाजिक ज्ञाय आणि सक्षमीकरण मंत्रालय
योजनेचा उद्देशOBC, EBC आणि DNT प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी 9वी पासून ते 12वी पूर्ण होईपर्यंत प्चांगले शिक्षण प्रदान करणे
योजनेचे लाभार्थीOBC, EBC आणि DNT प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी
लाभ9 वी ते 12 वी पर्यंत शिष्यवृत्ती
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
ई –मेल—————-
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PM Yasasvi Scholarship Yojana 2024 Marathi
 PM Yasasvi Scholarship Yojana 2024

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना उद्देश:-

  • OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तम व उच्च शिक्षण घेता यावे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे .
  • विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी 9वी पासून ते 12वी पूर्ण होईपर्यंत प्रीमियम शिक्षण प्रदान करणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे.

PM Yasasvi Scholarship Scheme Benefits In Marathi

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनाचे फायदे

  • शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क आणि शाळेला आवश्यक असलेल्या इतर शुल्कांसाठी शिष्यवृत्ती दिले जाईल.
  •  इयत्ता 9वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी कमाल ₹75,000/- शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • इ.11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 1,25,000/- शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • टिप: प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा थेट  DBT द्वारे लाभार्थ्याच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये वितरीत केला जाईल,

PM Yasasvi Scholarship Scheme Eligibility In Marathi

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनाची पात्रता

  •  कुटुंबांचे ₹2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र असतील.
  • विद्यार्थी हा OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील असावा.
  • इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी शिक्षण घेणारे गुणवंत विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM Yasasvi Scholarship Scheme Other Condition In Marathi

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनाची अटी व शर्ती

  • विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे ते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थी प्रधानमंत्री यशस्वी योजनेंतर्गत अर्ज करताना सर्व आवश्यक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या शाळेमध्ये आधार-आधारित उपस्थिती प्रणाली असावी जी आवश्यक असल्यास केंद्रीय पोर्टलमध्ये समाकलित केली जाऊ शकते.
  • प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत सहाय्यित शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मदतीसाठी पात्र नसतील.

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती ही योजना खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे.

  • 10वी 12वीच्या वर्गात सातत्याने 100% उत्तीर्ण असलेल्या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शाळांची निवड संयुक्त सचिव (BC) यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षण विभाग आणि NITI आयोग यांच्या प्रतिनिधित्वासह स्थापन केलेल्या निवड समितीद्वारे केली जाईल. या योजनेच्या उद्देशाने या शाळांना ‘टॉप क्लास स्कूल (TCS)’ असे संबोधण्यात येईल.
  • TCS सार्वजनिक (केंद्रीय/राज्य/स्थानिक संस्था) किंवा अनुदानित शाळा किंवा खाजगी असू शकतात.
  •  प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक वर्गासाठी योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या स्लॉटची संख्या दरवर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केली जाईल.
  • प्रधानमंत्री यशस्वी योजनेंतर्गत किमान 30% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहेत.
  • आधीच TCS मध्ये शिकत असलेले OBC/EBC/DNT विद्यार्थी मागील वर्गाच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांसह शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करू शकतात.
  •  या अर्जांची शाळेच्या नोडल अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन पडताळणी करावी लागेल, आणि राज्य सरकारने ऑनलाइन पुष्टी केली.
  •  मागील वर्गाच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रत्येक वर्गासाठी मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे तयार केलेली राज्यवार गुणवत्ता यादी असेल आणि शिष्यवृत्तीचे वाटप गुणवत्तेनुसार आपोआप केले जाईल.

MSCIT शुल्कपूर्ती(MSCIT) मोफत योजनेच्या अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !

PM Yasasvi Scholarship Scheme Document In Marathi

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक मार्कशीट/सर्टिफिकेट
  • उत्पनाचा दाखला (Income Certificate)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खाते (बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
  • दिव्यांग प्रमाणपत्र(लागू असल्यास)
  • पासपोर्ट फोटो
  • अजून आवश्यक असलेले कागदपत्रे आपण संबधित कार्यलय शी संपर्क साधून जाणून घेवू शकता. ह्या कागदपत्रामध्ये बदल हि होऊ शकतो.

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा असा करा अर्ज

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा असा करा अर्ज

  • प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनाचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे खालीलप्रमाणे प्रोसेस करा !
  • OBC/EBC/DNT विद्यार्थी आधीच उच्च श्रेणीच्या शाळांमध्ये (TCSs) शिकत आहेत ते मागील वर्गाच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांसह योजनेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करू शकतात.
  • https://scholarships.gov.in/
  • नवीन अर्जदारासाठी नोंदणी:
  • पायरी 01: अधिकृत NSP वेबसाइट उघडा आणि अर्जदार कॉर्नर अंतर्गत ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करा.
  • पायरी 02: सूचना/मार्गदर्शक तत्त्वे वाचा, चेक बॉक्सवर क्लिक करून हमीपत्र प्रदान करा आणि पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  • पायरी 03: आवश्यक तपशील प्रदान करून नोंदणी सुरू करा.
  • Registered Applicant
  • पायरी 01: अधिकृत NSP वेबसाइट उघडा आणि अर्जदार कॉर्नर अंतर्गत ‘फ्रेश ॲप्लिकेशन’ वर क्लिक करा.
  • पायरी 02: तुमचा ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा.
  • पायरी 03: शिष्यवृत्ती निवडा.
  • पायरी 04: अर्जदाराचा फॉर्म भरा.(अर्जामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून भरा !
  • पायरी 05: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
  • आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर sms येईल. आपला अर्ज यशस्वी झाला.

PM Yasasvi Scholarship Scheme Selection Process Marathi

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना निवड प्रक्रिया:

  • अर्जांची ऑनलाइन पडताळणी शाळेच्या नोडल अधिका-यांनी केली पाहिजे आणि राज्य सरकारद्वारे ऑनलाइन पुष्टी करावी लागेल.
  • मागील वर्गाच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रत्येक वर्गासाठी मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे तयार केलेली राज्यनिहाय गुणवत्ता यादी असेल आणि शिष्यवृत्तीचे वाटप आपोआप गुणवत्तेनुसार केले जाईल.

Conclusion

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार रु.75,000 ते 1,25,000 हजार शिष्यवृत्ती | PM Yasasvi Scholarship Yojana बद्दल जाणून घेतले. हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण संबधित कार्यलय किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊन. मगच अर्ज करावा. आपण आजच्या लेखामध्ये प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना PM Yasasvi Scholarship Scheme ची पात्रता, लागणारे कागदपत्रे, अर्ज कसा करायचा, निवड कश्याप्रकारे होते याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आपण दिलेल्या लिंकवर क्लिक करून PM Yashsvi Scholarship Scheme चा अर्ज करू शकतात. मित्रानो माहिती महत्वपूर्ण व फायदेशीर वाटली असेल तर आम्हाला नक्कीच आपल्या अभिप्राय कळवा. जर आपल्याला प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला Comment च्या माध्यमातून विचारू शकता. आम्ही लवकरच आपल्या प्रश्न व शंकाचे लवकर निराकरण करण्याचा प्रयन्त करू. हि माहिती इतर मित्रांना हि शेअर करा…

तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेछ्या…………

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

१.आधार कार्ड २.शैक्षणिक मार्कशीट/सर्टिफिकेट ३.उत्पनाचा दाखला (Income Certificate) ४.अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ५.जातीचे प्रमाणपत्र ६.बँक खाते (बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे) ७.दिव्यांग प्रमाणपत्र(लागू असल्यास) ८.पासपोर्ट फोटो
अजून आवश्यक असलेले कागदपत्रे आपण संबधित कार्यलय शी संपर्क साधून जाणून घेवू शकता. ह्या कागदपत्रामध्ये बदल हि होऊ शकतो.

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनाची पात्रता काय आहे?

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनाची पात्रता खालीलप्रमाणे
१. कुटुंबांचे ₹2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र असतील. २.विद्यार्थी हा OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील असावा. ३.इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी शिक्षण घेणारे गुणवंत विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी आहे?

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना हि हि योजना इतर मागासवर्गीय (OBC) आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC) आणि विमुक्त, भटक्या जमाती (DNT) मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक ज्ञाय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हि योजना सुरु केळू आहे. ह्या योजनेला 100% आधारावर सामाजिक ज्ञाय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून निधी दिला जातो.

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे ?

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. आपण ह्या “https://scholarships.gov.in/” अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आपल अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment