Pradhanmantri Awas Yojana In Marathi 2023-2023 | प्रधानमंत्री आवास योजना |
प्रधानमंत्री आवास योजना हि भारत सरकारची योजना आहे.ह्या योजनेचा उद्देश प्रत्येक भारतातील घटकाला स्वतःची घरे बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान देण.
प्रधामंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी सपाट प्रदेशात १.२ लाख तर डोंगराळ व दुर्गम भागामध्ये १.३ लाख मदत हि केंद्रासरकार करेल.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आपले आपल्या मराठी वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे.आपण आपल्या वेबसाईट वर विविध योजना ह्या घेवून येत असतो,जसे शैक्षणिक योजना, कृषी योजना ,सरकारी योजना ,विधार्थी साठी शिष्यवृत्ती योजना आणि मुलींसाठी असलेल्या योजना आपण घेवून येत असतो.आमचा एकच उद्देश असतो कि ज्या घटकासाठी ह्या योजना बनवल्या जातात त्या घटकापरेंत ह्या योजना पोहचल्या पाहिजे.प्रत्येक व्यक्ती हा आपल्या हक्कापासून वंचित न राहता.त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे.यासाठी आम्ही आपल्या वाचकासाठी सरकारी GR ,काही योजानामधे बदल झाल्यास किंवा सरकारी अनुदान केव्हा येईल.उदा-प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान योजनेचा निधी कधी येईल?अश्या सर्व महत्त्वाच्या माहिती आम्ही आपल्या परेंत पोहचवण्याच काम करत असतो.तर आज आपण प्रधानमंत्री आवास योजना बद्दल जाणून घेणार आहोत.
समाजातील प्रत्येक घटकाच्या तीन मुलभूत गरजा असतात.अन्न ,वस्र आणि निवारा हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज बघितले अनेक दुर्गम भाग असतील,काही शहरांच्या ठिकाणी रोडला लागून असलेल्या पाल लावून राहणारे लोक आणि इतर मागासवर्गीय घटक आहेत कि त्यांना अजुनहि दोन वेळच्या जेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.हाताला काम मिळत नाही.आरोग्य,शिक्षण याच्या अनेक समस्या ह्या घटकाला भेडसावत असतात.अश्यात राहण्याचा प्रश्न निर्माण होतो.राहण्यासाठी स्वतःच घर नाही,मुलांचे शिक्षणाचा प्रश्न मुलांच्या हातात पुस्तक हवे त्या वयात त्याच्या हातात सिमेंट च्या टोपल्या असतात.मुल जर शिकली नाहीत तर त्यांच्या हि आयुष्यात बाप सारखेच कष्ट.भारतातील प्रत्येक घटक जसे अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,इतर मागासवर्गीय ,अपंग आणि महिला ह्या सर्व घटकांना हक्कच घर असावे.यासाठी पंतप्रधान आवास योजना मधून प्रत्येकाला आपल्या हक्काच्या घरात राहाण्याच स्वप्न पूर्ण होईल. प्रधामंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी सपाट प्रदेशात १.२ लाख तर डोंगराळ व दुर्गम भागामध्ये १.३ लाख मदत हि केंद्रासरकार करेल.
चला तर प्रिय वाचक मित्रानो,आज Pradhanmantri Awas Yojana In Marathi 2023-2023 | प्रधानमंत्री आवास योजना बद्दल जाणून घेणार आहोत.ह्या योजनेची वैशिष्टे,पात्रता ,अटी आणि शर्ती आणि योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील हि संपूर्ण माहिती हि आपण आजच्या पोस्ट मध्ये बघणार आहोत.
Pradhanmantri Awas Yojana In Marathi 2023-20२४ | प्रधानमंत्री आवास योजना|
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना |
योजनेची सुरुवात | १ एप्रिल २०१६ |
सुरु कोणी केली | केंद्रसरकार |
योजनेचा उद्देश | भारतातील प्रत्येकासाठी घर |
योजना कोणत्या भागासाठी आहेत | ग्रामीण आणि शहरी भाग |
प्रधानमंत्री आवास योजनाचा उद्देश:
- भारतातील प्रत्येक व्यक्तीला घर मिळवून देणे.
- ग्रामीण भागातील दारिद्यरेषेखालील असलेल कुटंब,बेघर लोकांना,अपंग ,महिला आणि ज्यांना घर नाहीत अश्या व्यक्तींना घर बांधण्यासाठी अनुदान देणे.
- २०१६ ते २०२१९ या तीन वर्ष काळात ग्रामीण भागात १ कोटी बांधण्यासाठी अर्थ सहाय्य करणे हा महत्वाचा उद्देश आहे.
- ग्रामीण भागातील लाभार्थ्याची निवड ग्रामपंचायतमार्फत केली जाते.सर्व पात्रता आणि निकष यावरून लाभार्थ्याची निवड करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायत ला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनाची वैशिष्टे:
- २०१६ ते २०१९ परेंत ग्रामीण भागात एक कोटी घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे.
- लाभार्थ्याच्या घराचे क्षेत्रफळ २५ चौ मीटर इतके असायला हवे.
- लाभार्थीची निवड हि सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जणगनेनुसार ग्रामसभामार्फत केली जाईल(ज्यावेळी ग्रामसभा होते त्यावेळी ठराव हा केला जातो त्यामध्ये आपले नाव असणे बंधनकारक आहे.
- घरे बांधण्यासाठी वेग-वेगळे प्रकारचे अनुदान आहे जसे कि सपाट प्रदेशात १.२ लख तर डोंगराळ व दुर्गम भागात १.३ लाख मदतीची तरतूद करणे.
- केंद्रसरकार आणि राज्यसरकार कडून प्रधानमंत्री आवास योजनासाठी अनुदान दिले जाईल,केंद्र सरकार ६०% तर राज्यसरकार ४०% असे अनुदान हे लाभार्थ्याला दिले जाईल.
- लाभार्थ्याला ९० दिवसाचे मनरेग अंतर्गत काम भेटेल.
- लाभार्थ्याची जर इच्छा असेल तर ७०.०००/- रुपये कर्ज मिळू शकेल.हे संपूर्ण लाभार्थ्याच्या इच्छा नुसार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी येथे क्लिक करा !
प्रधानमंत्री आवास योजनाची पात्रता:
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र होण्यासाठी,अर्जदाराने पत्रकामध्ये नमूद केल्याला बाबीचा आणि कागदपत्राची निकष खालीलप्रमाणे पूर्ण करणे आवश्यक आहे तरच प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्जदार हा पात्र असेल याची नोंद घ्यावी.
१.अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
२.लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
३.स्वताच्या नावावर किंवा कुटुंबाच्या नावावर घर नसणे .
४.अर्जदार हा दुसऱ्या कोणताही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेले नसावा.
प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज प्रक्रिया:
पप्रधानमंत्री आवास योज्नेचेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहे त्या खालीलप्रमाणे.
१.ऑनलाईन – लाभार्थी हा अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वर जाऊन आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो.योजनेचा लाभ घेवू शकतो.
२.ऑफलाईन-लाभार्थी हा आपल्या जवळच्या ग्रामपंचायत,ग्रामविकास कार्यालय किंवा नगरपालिका शी संपर्क साधून त्याठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनाची संपूर्ण माहिती प्राप्त करून.तिथूनच तुम्हाला एक अर्ज घेऊन त्याला कागदपत्रे लावयाची आहेत.फॉर्म हा अचूक भरून सर्व कागदपत्रे त्यातला जोडून फोरम हा जमा करायचा आहे.
प्रधानमंत्री आवास योजनासाठी लागणारे कागदपत्रे:
१.आधार कार्ड (आधार कार्डची स्वयं-सांक्षाकीत प्रत)
२.अर्जदार हा जर निरक्षर असेल तर अर्जदाराच्या अंगठ्याच्या ठशासह समिती पत्र देणे बंधनकारक राहील.
३.बँक खाते पासबुक(आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक असले पाहिजे.
४.जॉब कार्ड असेल पण त्याची मनरेगामध्ये रीतसर नोंदणी असली पाहिजे.
५.स्वच्छ भारत मिशन(SBM)क्रमांक
६.अर्ज करणारी व्यक्ती म्हणजेच लाभार्थी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर स्वताचे मालकीचे घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
७.उत्पनाचा दाखला
८.मोबाईल नंबर
९.दोन रंगीत पासपोर्ट फोटो
प्रधानमंत्री आवास योजनाबदल आपल्याला काही अडचण किंवा समस्या येत असतील अथवा फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात.
१.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ह्या येथे क्लिक करा!
२.ग्राम विकास आणि पंचायतराज विभाग ,महाराष्ट्र सरकार ला भेट देण्यसाठी येथे क्लिक करा !
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आपले सहर्ष स्वागत आहे.आज आपण प्रधानमंत्री आवास योजनाबदल संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघितली.आपल्याला योजनाची माहिती आवडली असे तर आपला अभिप्राय नक्की आम्हाला कळवा.आपल्या अजून काही समस्या असतील जसे कि अर्ज भरता येत नाही किंवा आपल्याला दुसऱ्या कोणत्या योजनेविषयी माहिती हवी असल्यास आम्हाला comment मध्ये कळवा.आम्हला तुमची comment मिळाली कि लगेच आम्ही त्या योजनेविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त करू.जर आपल्याला आमच्या Whatsaap ग्रुप ला जॉईन होयाच असेल तर नक्की लिंक वर जाऊन क्लिक करा डायरेक्ट आपल्या ग्रुप ला जॉईन होणार.अश्याच नव-नवीन माहिती साठी आम्हला असाच साथ द्या हीच विनंती.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.
प्रधानमंत्री आवास योजनासाठी लागणारे कागदपत्रे?
१ .आधार कार्ड (आधार कार्डची स्वयं-सांक्षाकीत प्रत)
२.अर्जदार हा जर निरक्षर असेल तर अर्जदाराच्या अंगठ्याच्या ठशासह समिती पत्र देणे बंधनकारक राहील.
३.बँक खाते पासबुक(आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक असले पाहिजे.
४.जॉब कार्ड असेल पण त्याची मनरेगामध्ये रीतसर नोंदणी असली पाहिजे.
५.स्वच्छ भारत मिशन(SBM)क्रमांक
६.अर्ज करणारी व्यक्ती म्हणजेच लाभार्थी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर स्वताचे मालकीचे घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
७.उत्पनाचा दाखला
८.मोबाईल नंबर
९.दोन रंगीत पासपोर्ट फोटो
प्रधानमंत्री आवास योजना कधी सुरु करण्यात आली ?
प्रधानमंत्री आवास योजना १ एप्रिल २०२६ मध्ये सुरु करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजनेचा उद्देश काय आहे?
भारतातील गरीब,दुर्बल घटक ,अपंग आणि महिला यांना हक्काचा घर मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजना हि राबवाली जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजनाची वैशिष्टे?
२०१६ ते २०१९ परेंत ग्रामीण भागात एक कोटी घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे.
लाभार्थ्याच्या घराचे क्षेत्रफळ २५ चौ मीटर इतके असायला हवे.
लाभार्थीची निवड हि सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जणगनेनुसार ग्रामसभामार्फत केली जाईल(ज्यावेळी ग्रामसभा होते त्यावेळी ठराव हा केला जातो त्यामध्ये आपले नाव असणे बंधनकारक आहे.
घरे बांधण्यासाठी वेग-वेगळे प्रकारचे अनुदान आहे जसे कि सपाट प्रदेशात १.२ लख तर डोंगराळ व दुर्गम भागात १.३ लाख मदतीची तरतूद करणे.
घरकुल योजनेसाठी किती पैसे मिळतात?
घरकुल योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी कमी-जास्त प्रमाणत पैसे मिळतात जसे ग्रामीण १.२ लाख आणि दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये १.३ लाख असे पैसे मिळतात.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी उपलब्ध आहे का/
हो,लाभार्थी किंवा अर्जदार त्याच्या घरातील सदस्य हा कोणताही पक्क्या घराचा पालक नसला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेवू शकतात.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किती चौरस फुट आवश्यक आहे?
EWS अर्जदार ३२२ चौरस आणि अल्प उत्पन्न असलेल्यांसाठी ६४५ चौरस आणि ग्रामीण भागातील घरे कमीत-कमी १६९ चौरस मध्ये असली पाहिजे.
PMAY अजूनही वैद्य आहे का ?
केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठीकीस योजनासाठी ३१ डिसेंबर २०२४ परेंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
घरकुल योजनेमध्ये किती पैसे मिळतात ?
लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी रु -९५,००० /- एवढे अर्थसहाय्य दिले जाते.