Pradhanmantri Jivan Jyoti Vima Yojana (PMJJBY) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhanmantri Jivan Jyoti Vima Yojana (PMJJBY) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, कसे आहात? आशा करतो सर्वजण मज्जेत असणार! आपण आज प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) Pradhanmantri Jivan Jyoti Vima Yojana (PMJJBY) योजनाबदल माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जीवन खूपच अनिश्चित झाले आहे. कोणाच्या जीवावर कधी संकट ओढावेल आणि कधी मृत्यू होईल हे सांगता येत नाही आणि दुर्दैवाने जर तुमच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला तर कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. प्रत्येक कुटुंबाची महागडा जीवन विमा घेण्याची ऐपत नसते. अशा परिस्थितीत शासनाची ही योजना तुमच्या अत्यंत कामाची आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही 09 मे 2015 मध्ये सुरू केली होती. ही योजना आपल्याला एकदम स्वस्त दरात जीवन विमा प्रदान करते. या योजनेची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे याचा महिन्याचा प्रीमियम फक्त तुमच्या मोबाईलच्या रिचार्ज इतकाच आहे.

Pradhanmantri Jivan Jyoti Vima Yojana (PMJJBY)

चला तर मित्रानो आज आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाबद्दल (PMJJBY) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती , अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखाद्वारे घेणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचवा हि विनंती जेणेकरून आपले काही प्रश्न व शंका असतील तर नक्कीच त्यांचे निराकरण होईल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत तुम्हाला दोन लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. या योजनेचा प्रीमियम प्रति वर्ष फक्त 436 रुपये आहे आणि दर महिन्याला रक्कम भरायची झाल्यास फक्त 40 रुपयांच्या आसपास तुम्हाला रक्कम भरावी लागते.

जर अर्जदार कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास सदर योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम पाठवली जाते. जास्तीत जास्त गरीब लोकांना या योजनेपासून लाभ मिळावा हा केंद्र शासनाचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची तपशीलवार माहिती  

योजनेचे नाव: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
योजनेची श्रेणीकेंद्र सरकारी योजना
योजना कधी सुरू झाली09 मे 2025 ला  
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार मार्फत  
योजनेचा लाभार्थीभारत देशामधील नागरिक
लाभाची रक्कमदोन लाख रुपये  
योजनेचा उद्देशभारत देशातील गरीब लोकांना मदत करणे.
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळhttps://jansuraksha.gov.in/

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पात्रता काय आहे हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून अर्जदार स्वतःची पात्रता तपासून अर्ज करू शकतात.

  • सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराच्या खात्यामध्ये आर्थिक मदत घेण्यासाठी उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे किंवा उमेदवाराचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये असणे आवश्यक आहे.
  • बँक खात्याला स्वतःचे आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने स्वतःच्या बँक खात्याला स्वयंचलित प्रीमियम कपातीसाठी संमती देणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी नोंदणी कशी करावी

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी केंद्र सरकारकडून ऑनलाइन नोंदणी चालू ठेवण्यात आलेली नाही. परंतु जर तुम्हाला या योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुम्ही ही योजना उपलब्ध असलेल्या बँकेच्या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन फॉर्म देखील भरू शकता.

Pradhanmantri Jivan Jyoti Vima Yojana (PMJJBY)

अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा

  • स्टेप 1: सर्वप्रथम तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • स्टेप 2: आता तुम्हाला होम पेज दिसेल. होम पेजच्या वरच्या बाजूला Form चे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करावे.
  • स्टेप 3: आता तुम्हाला तीन पर्याय दिसतील. त्यापैकी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना या पर्यायावर क्लिक करावे.
  • स्टेप 4: येथे तुम्हाला या योजनेचे फॉर्म वेगवेगळ्या भाषेत मिळतील.
  • स्टेप 5: मराठी भाषेमध्ये पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी.
  • स्टेप 6: डाउनलोड केलेला फॉर्म प्रिंट करून घ्यावा. ‌
  • स्टेप 7: फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी.
  • स्टेप 8: फॉर्म भरल्यानंतर लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावीत.
  • स्टेप 9: भरलेला फॉर्म कागदपत्रा सहित बँकेमध्ये जाऊन जमा करावा.
  • स्टेप 10: तुमचा फॉर्म तपासला जाईल. तुम्ही जर सदर योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
  • स्टेप 11: तुमच्या खात्यातून एका वर्षासाठी लागणारी रक्कम वजा केली जाईल.

याप्रकारे तुम्ही सदर योजनेसाठी अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा मुख्य उद्देश

कोणत्याही कारणास्तव कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दोन लाख रुपये देण्यात येतात. ही योजना एक वर्षापर्यंत जोखीम कव्हरेज प्रदान करते.

प्रधानमंत्री विमा योजनेचे फायदे

  • कुटुंबातील मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ प्राप्त होते.
  • ही तुमच्यासाठी एक मोठी आर्थिक मदत आहे.
  • आर्थिक अडचणी पासून तुमच्या कुटुंबातील सुटका होते.
  • ही एक परवडणारी जीवन विमा योजना आहे.
  • तुम्हाला वार्षिक फक्त 436 रुपये भरायचे आहेत हे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे.
  • लाभार्थी व्यक्ती या योजनेतून कधीही बाहेर पडू शकतो आणि भविष्यात गरजेनुसार पुन्हा अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • 18 ते 50 सर्व वयोगटातील सर्व उमेदवारांना सारखाच प्रीमियम भरायचा आहे.

प्रधानमंत्री जीवन विमा योजनेच्या अटी व शर्ती

  • या योजनेमध्ये लाभार्थी 50 वर्षांपर्यंत लाभ घेऊ शकतो.
  • अर्जदाराचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर त्या उमेदवाराला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • उमेदवाराकडे एकापेक्षा अधिक बँक खाते असतील तर फक्त एका खात्यासाठी उमेदवार सदर योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • योजनेअंतर्गत उमेदवाराने फसवणूक केली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो.
  • अर्जदाराने जर दोन ठिकाणाहून विम्याची रक्कम घेण्याचा प्रयत्न केला तर दिलेली रक्कम जप्त केली जाईल.
  • उमेदवाराने बँक खाते बंद केल्यास त्याला विम्याची रक्कम मिळणार नाही.
  • तुम्हाला जर विमा सुरक्षित व सुरळीत चालू ठेवायचा असेल तर 30 जूनच्या आत विम्याचा प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराच्या खात्यामध्ये प्रीमियम ची रक्कम नसल्यास सदर उमेदवारासाठी ही योजना बंद केली जाईल व त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • उमेदवाराला जर हा विमा रद्द करायचा असल्यास 01 जूनच्या अगोदर बंद करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून कपात होत राहील.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खाली दिलेली कागदपत्रे तुमच्यासाठी आवश्यक आहे. या योजनेसाठी ही कागदपत्रे गरजेची आहेत.

खाली दिलेले सर्व कागदपत्रे स्वतः अर्जदाराचे असावेत

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वयाचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • ओळखपत्र

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) योजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. हि योजना देशातील गरीब लोकांना सहकार्य व आर्थिक पाठबळ देण्यासाठी अमलात आणली गेली आहे. हि केंद्र सरकारची अत्यंत फायदेमंद योजना आहे. सर्व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त केला आहे. तरीही आपण योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण संबधित संकेतस्थळ किंवा कार्यलयाला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या मगच अर्ज करा. योजनासंबधी आपल्याला काही अडचण असेल तर आम्हाला comment च्या मध्यमाने संप[संपर्क साधा आम्ही नक्कीच आपल्या प्रश्नाचे व शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हि अत्यंत फायदेमंद योजना असून तुम्ही आम्ही दिलेली हि माहिती तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून ते सदर योजनेचा लाभ घेतील.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी येथे क्लिक करा !

अशाच महत्वपूर्ण योजना व भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आमचा टेलीग्राम व व्हाट्सऐप ग्रुप नक्की ज्वाइन करा. ojaswisarkariyojana.com सोबत राहा आणि योजना आणि भरतीसंदर्भात अपडेट्स मिळवत राहा.

योजनेचे स्वरूप काय आहे?

ही योजना एक वर्षाची मुदत जीवन विमा योजना आहे, जी वर्षानुवर्षे नूतनीकरण करता येते, जी कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी जीवन विमा संरक्षण देते.

योजनेअंतर्गत कोणते फायदे असतील आणि प्रीमियम भरावा लागेल?

कोणत्याही कारणाने ग्राहकाचा मृत्यू झाल्यास २ लाख रुपये देय आहेत.
प्रत्येक ग्राहकाला दरवर्षी ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागेल.
पॉलिसी कालावधीच्या मध्यभागी पहिल्यांदाच PMJJBY अंतर्गत नोंदणी करणाऱ्यांसाठी, प्रो-रेटा प्रीमियम खालीलप्रमाणे भरण्याची परवानगी आहे;
अ) जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये नोंदणीसाठी – रु.४३६/- चा संपूर्ण वार्षिक प्रीमियम देय आहे.
ब) सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नोंदणीसाठी – ३४२/- रुपये प्रो-रेटा प्रीमियम देय आहे.
क) डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये नोंदणीसाठी – २२८/- रुपये प्रमाणित प्रीमियम देय आहे.
ड) मार्च, एप्रिल आणि मे मध्ये नोंदणीसाठी – ११४/- रुपये प्रमाणित प्रीमियम देय आहे.
तथापि, योजनेअंतर्गत नूतनीकरणाच्या वेळी संपूर्ण वर्षाचा प्रीमियम रु. ४३६/- दराने देय आहे.
पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या सदस्यांसाठी, प्रीमियम ऑटो-डेबिटच्या तारखेपासून जोखीम सुरू होते. तथापि, योजनेत नोंदणीच्या तारखेपासून पहिल्या 30 दिवसांत (अनुदान कालावधी) झालेल्या मृत्यूसाठी (अपघातामुळे वगळता) विमा संरक्षण उपलब्ध नसेल आणि जर कर्ज घेण्याच्या कालावधीत मृत्यू झाला (अपघातामुळे वगळता) तर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

प्रीमियम कसा भरला जाईल?

नोंदणीच्या वेळी ग्राहकाने दिलेल्या संमतीनुसार, प्रीमियम खातेधारकाच्या बँक/पोस्ट ऑफिस खात्यातून ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे एकाच हप्त्यात कापला जाईल.

सदस्यता घेण्यास कोण पात्र असेल?

सहभागी बँका/पोस्ट ऑफिसमधील १८ ते ५० वयोगटातील सर्व वैयक्तिक (एकल किंवा संयुक्त) खातेधारकांना या योजनेत सामील होण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीने एकाच किंवा वेगवेगळ्या बँका/पोस्ट ऑफिसमध्ये अनेक खाती ठेवली असतील तर ती व्यक्ती फक्त एकाच बँक/पोस्ट ऑफिस खात्याद्वारे या योजनेत सामील होण्यास पात्र आहे.

कोणत्या बँक खात्यांमधून PMJJBY चे सदस्यत्व घेता येते?

संस्थात्मक खातेधारकांव्यतिरिक्त सर्व बँक खातेधारक PMJJBY योजनेचे सदस्यत्व घेण्यास पात्र आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे?

आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
वयाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक
ओळखपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment