रमाई आवास घरकुल योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi | अनुसूचित जाती व नवबौद्धना मिळणार घरकुल योजना!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

रमाई आवास योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi | अनुसूचित जाती व नवबौद्धना मिळणार घरकुल योजना!

Ramai Aawas Yojana 2024

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील कुटंबाना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून रमाई आवास योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi अंतर्गत मिळणार अनुदान.

रमाई आवास घरकुल योजना २०२४

प्रस्तावना:

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.आपण आपल्या वेबसाईट वर विविध योजना घेवून येत असतो.जसे कि शैक्षणिक, कृषी, सरकारी योजना आमचा प्रामाणिक एकच उद्देश आहे कि, सरकारच्या कल्याणकारी योजना ह्या ग्रामीण, दुर्गम भागामध्ये राहणारे गरीब कुटुंब, दुर्बल घटक, अपंग अश्या लाभार्थ्या परेंत ह्या योजना पोहचल्या पाहिजे.कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.

योजनेचे नावरमाई आवास योजना
उद्देशअनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील कुटुंबाना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देणे
लाभार्थीअनुसूचित जाती व नवबौद्ध
मिळणारे अनुदान१ लाख ते २.५० लाख
पात्रतामहाराष्ट्र राज्यातील वास्तव किमान १५ वर्ष असावे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
संपर्कस्थानिक स्वराज्य संस्था
रमाई आवास योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi

चला तर आज आपण रमाई आवास योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi योजनाबद्दल जाणून घेणार आहोत? रमाई आवास योजना साठी कोणते कागदपत्रे लागतील? पात्रता काय? कोणते निकष हे आपण सविस्तर ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.

मित्रानो केंद्रसरकार आणि राज्य सरकार हे विविध योजना घेवून येत असते.त्यातली महत्वाची योजना म्हणजे रमाई आवास योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi होय.प्रत्येक योजनाचा काहीना-काही उद्देश असतो.असाच रमाई आवास योजनेचा उद्देश आहे कि अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील कुटुंबाचे जीवनमान उंचवावे व त्यांचा राहण्याचा प्रश्न सुटावा व स्वताच व हक्काच् पक्क घर व्हाव. लोकांना राहण्यासाठी पक्के घर निर्माण करून देणे.प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणणे. रमाई आवास योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi या योजनेच्या माध्यमातून कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौ. फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना सन-२००९-१० पासून सुरु करण्यात आली.घराच्या बांधकामासाठी खर्चाची कमाल मर्यादा हि प्रत्येक भागानुसार वेगळी आहे.म्हणजे सरकारकडून मिळणारे अनुदान हे जसे ग्रामीण क्षेत्रासाठी रु-१ लाख, नगरपालिका क्षेत्रासाठी रु.१.५० लाख व महानगरपालिका क्षेत्रासाठी रु.२ लाख देण्यात येणार आहे.

Ramai Aawas Yojana In Marathi

रमाई आवास योजनाचे स्वरूप:

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषदा, व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील व गरजू व्यक्तींना पक्के घर तसेच कच्च्या घराचे पक्के बांधकाम करिता व तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यास शासन निर्णयद्वारे विहित किमत मर्यादेत अनुदान हे  रमाई आवास योजना २०२४ घरकुल योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल.

Ramai Aawas Yojana In Marathi

रमाई आवास योजनाची पात्रता:

  • अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
  • लाभार्थी का कमीत-कमी १५ वर्षपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असला पाहिजे.
  • अर्जदाराच्या कुटुंबांची वर्षी उत्पन खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
ग्रामीण क्षेत्रनगरपरिषद क्षेत्रमहानगरपालिका क्षेत्रमुंबई महानगर प्रदेश क्षेत्र
रु.१.२०  लाखरु.१.५० लाखरु.२.००० लाखरु.३.०० लाख
Ramai Aawas Yojana In Marathi
  • लाभार्थीने याअगोदर शासनाच्या अन्य गृह योजना जसे कि म्हाडामार्फत, मा.मुख्यमंत्री स्वेच्छा निर्णय नुसार वितरीत झालेली सदनिका, आणि वाल्कीकी आंबेडकर आवास योजना लोक आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • नागरी कमाल जमीन धारणा अधिनीयामांतर्गत शासनाच्या प्राप्त होणार्या ५% सदनीकामधून कोणत्याही नागरी समूहात सदनिका वितरीत झाल्यास व असा लाभार्थी योजनेंतर्गत पात्रतेच्या अटी पूर्ण करीत असल्यास त्यास या योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र राहील.

प्रधानमंत्री आवास योजनाबदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

   Ramai Aawas Yojana Document In Marathi

 रमाई आवास घरकुल योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंद्पत्र आणि ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारापैकी एक उतारा असणे आवश्यक आहे.
  • घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या पैकी एक पावती असणे आवश्यक आहे.
  • जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
  • उत्पनाचा दाखला(Income Certificate)
  • निवडणूक मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • सरपंच/तलाठ्याचा दाखला
  • महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर भरल्याची पावतीची प्रत

रमाई आवास योजनेसाठी आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपण https://sjsa.maharashtra.gov.in/en/ramai-awas-gharkul-scheme-sc-nav-buddha-urban-and-rural ह्या वेबसाईट ला भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या.

ऑफलाईन अर्ज असा करा.

ऑफलाईन अर्ज असा करा.

१.सर्वात प्रथम आपण स्थानिक स्वराज्य संस्थाना किंवा सामाजिक कल्याण कार्यलयातून अर्ज घ्या.

२.अर्ज एकदा वाचून घ्या आपल्या समस्या असतील तर संबधित अधिकाऱ्याकडून आपण माहिती किंवा आपले प्रश्न विचारून जाणून घ्या.

३.अर्ज भरून अर्जाला आवश्यक असलेल्या कागदपत्राची झेरॉक्स प्रत लावा आणि

आणि अर्ज हा संबधित कार्यलयात जमा करा.

४.जमा करण्याची पोचपावती घ्या म्हणजे आपला अर्ज यशस्वीपणे जमा झाला.

वरील कागदपत्रामध्ये शासनाच्या नियमानुसार काही बदल होऊ शकतो,आपण अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना भेट देऊन जाणून घ्या.

घराच्या बांधकामासाठी खालीलप्रमाणे क्षेत्रनिहाय खर्चाची मर्यदा पुढीलप्रमाणे:

ग्रामीण भागडोंगराळ/नक्षलवादी भागशहरी भागात
रु.१.३२ लाख  रु.१.४२ लाखरु.२.५० लाख
रमाई आवास घरकुल योजना २०२४

घराचे क्षेत्रफळ:

घराच्या बांधकामाच्या चटई क्षेत्र ३६९ चौ.फुट.तेवढ्याच क्षेत्रापुरते अनुदान देय राहील.त्यानंतर लाभार्थी हा स्वतःची मालकीची जागा स्वतच्या स्व:खर्चाने व मर्जीनुसार जास्त क्षेत्राचे बांधकाम करू शकतो.

Ramai Aawas Yojana In Marathi

रमाई आवास योजनाची घरे बांधताना खालीलप्रमाणे प्राधन्यक्रम देण्यात येईल:

  • जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान (आगीमुळे व इतर तोडफोड)झालेली व्यक्तींना अगोदर प्राधन्य देण्यात येईल.
  • Atrocity ॲक्टनुसार पिडीत झालेल्या अनुसूचित जातीची पत्र व्यक्ती
  • पूरग्रस्त क्षेत्र(सतत पूर येणारे)
  • घरात कोणीही कमवता नाही अश्या विधवा महिला
  • उर्वरित सर्व क्षेत्र

लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.

जिल्यात असलेली गांवे, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांच्यातून लॉटरी पद्धतीने गावे, नगरपरिषद आणि महानगरपलिका यांची निवड करण्यात येईल.हि लॉटरी समाज कल्याण अधिकारी यांचेस्तरावर संगनकीय पद्धतीने काढली जाईल.त्यानुसार पात्र लाभार्थ्याची यादी तयार करून ती ठळक पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येईल.अशी निवड झाल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या उदिष्ट अंतर्गत घरे बांधण्यास परवानगी देण्यात येईल.लाभार्थ्याची निवड करताना खालीलप्रमाणे अति बंधनकारक असतील.

१.ह्या व्यक्तीकडे स्वतःची जमीन/जागा आहे अश्या व्यक्तींना प्रथम टप्यात माभ देण्यात येईल.

२.ज्या व्यक्तीकडे स्वतःची जागा नाही अश्या ग्रामीण भागातील व्यक्तीसाठी ग्रामपंचायत यांनी उपलब्ध करून द्यावी आणि उपलब्ध झाल्यानंतर घर बांधण्याची परवानगी देण्यात येते.

३.नगरपरिषद/महानगर पालिका क्षेत्रातील आरक्षित जागेवर वसलेल्या झोपडपट्टीतील व्यक्तीची नावे दि.१.१.१९९५ च्या मतदार यादीत असतील तर अश्या व्यक्तींना संरक्षण पात्र समजून आहे त्याच जागेवर घर बांधण्यासाठी मानुरी द्यावी

प्रिय वाचक मित्रानो,आज आपण Ramai Aawas Gharkul Yojana In Marathi रमाई आवास योजनाबदल सविस्तर माहिती आपण जाणून घेतली.आपले जर काही प्रश्न असतील तर आपण आम्हला Comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्न आणि समस्याचे निराकरण करू.धन्यवाद.

मित्रानो कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एकदा योजनासंबधी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यावी.आम्ही फक्त मार्गदर्शन आणि माहितीसाठी विविध स्रोतकडून हि माहिती जमा करून आपल्यासाठी प्रदान करत असतो.आमचा उद्देश एकच आहे कि प्रत्येक लाभार्थीपरेंत योजना पोहचल्या पाहिजे आणि प्रत्येकाला लाभ घेता आला पाहिजे.कोनही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये हाच आमचा छोटासा प्रयन्त आहे.

रमाई आवास योजनासाठी कोणाला लाभ मिळेल?

रमाई आवास योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील कुटुंबाना लाभ मिळेल.

रमाई आवास योजनाच्या पात्रता काय आहेत?

१.लाभार्थी हा महाराष्ट्रात किमान १५ वर्ष वास्तव्यास असला पाहिजे.
२.अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असला पाहिजे.
३.उत्पन हे गाव, नगरपरिषद, महानगरपालिका यानुसार आहे.

रमाई आवास योजना कागदपत्रे ?

७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंद्पत्र आणि ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारापैकी एक उतारा असणे आवश्यक आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या पैकी एक पावती असणे आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
उत्पनाचा दाखला(Income Certificate)
निवडणूक मतदार ओळखपत्र
रेशन कार्ड
सरपंच/तलाठ्याचा दाखला
महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर भरल्याची पावतीची प्रत

रमाई आवास घरकुल योजना अर्ज?

रमाई आवास योजनेचा अर्ज आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जवळच्या ग्रामपंचायत मध्ये मिळून जाईल.

घरकुल योजनेमध्ये किती पैसे मिळतात ?

घरकुल योजनामध्ये रु. १ लाख ते रु. २.५० लाख परेंत अनुदान हे महाराष्ट्र सरकार देत असत.

रमाई आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?

१.अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा राविवासी पाहिजे किंवा १५ वर्षापासून महाराष्ट्र मध्ये वास्तव्यास असला पाहिजे.
२.लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असला पाहिजे.

रमाई आवास घरकुल योजनेसाठी किती चौरस फुट जागा आवश्यक आहे?

२६९ चौरस फुट जागा बांधण्यासाठी अनुदान किंवा आर्थिक सहाय्य हे महाराष्ट्र सरकार करेल.पण आपल्याला आपल्या मर्जीनुसार बांधकाम करायचे असेल तर तो खर्च आपल्याला स्वतः करावा लागेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “रमाई आवास घरकुल योजना २०२४ | Ramai Aawas Yojana In Marathi | अनुसूचित जाती व नवबौद्धना मिळणार घरकुल योजना!”

  1. रमाई आवास योजनेचा लाभ घेणे करिता रीतसर अर्ज दिल्या नन्तर घरकुल मिळणे करिता किती कालावधी लागतो.
    आणी त्याचे प्रयोजन काय आहे.

    Reply

Leave a Comment