रेशीम उद्योग महाराष्ट्र | Reshim Udyog Maharashtra In Marathi 2023-2024|नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग साठी सामान्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५% व अनुसूचित जाती/अनु.जमाती करिता ९०% अर्थसहाय्य देय आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

रेशीम उद्योग महाराष्ट्र | Reshim Udyog Maharashtra In Marathi 2023-2024|

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग साठी सामान्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५% व अनुसूचित जाती/अनु.जमाती करिता ९०% अर्थसहाय्य देय आहे.

रेशीम उद्योग महाराष्ट्र | Reshim Udyog Maharashtra In Marathi 2023-2024|f Contents

Reshim Udyog Maharashtra २०२३-२०२४

प्रस्तावना

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.आपण नेहमी आपला वेबसाईट वर राज्यसरकार आणि केंद्रसरकार च्या नव-नवीन योजना घेऊन येत असतो.यात आमचा एकच उद्देश असतो कि आपल्या शेतकरी बांधवान परेंत प्रत्येक योजना हि पोहचली पाहिजे.त्याचा लाभ घेवून एक अर्थसहाय्य होईल.आणि जीवनमान उंचवण्यासाठी मदत होईल.कोणीही आपला हक्कापासून वंचित राहू नये.आज आपण रेशीम उद्योग महाराष्ट्र हि योजना बघणार आहोत.

आपण जर बघितले तर विविध नैसर्गिक संकट हे येताना दिसतात.त्यामध्ये गारपीट असो,अतिवृष्टी ,दुष्काळ यासारख्या अनेक समस्यांना शेतकरीना सामोरे जावे लागते.त्यामध्ये महत्वाचे कारण म्हणजे हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम आपल्याला दिसून येताना दिसतो.भविष्यात देखील सदर परिणामाची व्याप्ती वाढणार असल्याने राज्याच्या हवामान बदला विषयी कृती आराखडामध्ये नमूद केले आहे.मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत आहे.भू-गर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे.तसेच पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भू-भाग हा निसर्गतच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहे.

दुष्काळासारख्या मोठ्या संकटावर मात करण्यासाठी,कारण पाण्याची कमतरता कमी असेल तर शेती करणे हे खूप अवघड जाते त्यामुळे त्यावर पर्याय म्हणून  रेशीम उद्योग महाराष्ट्र हा नक्कीच फायदेशीर ठरेल.रेशीम हा उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग आहे.यामध्ये खूप रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.ज्या ठिकाणी पोषक वातावरण असेल अश्या ठिकाणी या रेशीम उद्योग महाराष्ट्र याला खूप मोठ्या प्रमाणत वाव राहिल.रेशीम उद्योग याचा महत्वाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य होईल व त्याच जीवनमान उंचवण्यासाठी मदत करणारा हा उद्योग आहे.

चला मग प्रिय वाचकानो आज आपण रेशीम उद्योग योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.रेशीम उद्योग साठी पात्रता,अट ,निकष आणि महत्वाची कागदपत्रे हे आपण ह्या पोस्ट मध्ये सविस्तर बघणार आहोत.

Reshim Udyog Maharashtra २०२३-२०२४

रेशीम उद्योग महाराष्ट्र चे उद्दिष्टे:

१.रेशीम उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत समाविष्ठ असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करून उत्पनात वाढ करणे.

२.रेशीम उद्योगावर आधारित समूहाचा सर्वागीण विकास करणे.

३.रेशीम उद्योगामध्ये महिलांचा समावेश वाढवणे.

४.नाविन्यपूर्ण रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपरेंत पोहचवणे.

५.रेशीम योजनेची फलश्रुती व यशस्वीता याबाबत व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना या उद्योगासाठी प्रोत्साहित करणे.

६.यातून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.

७.शेतकऱ्यांना सक्षम बनवणे.

रेशीम उद्योग योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा !

Reshim Udyog Maharashtra २०२४

अर्थसहाय्य:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग या घटकासाठी दिलेल्या मापदंडानुसार सामान्य प्रवर्गातील लाभार्थींना ७५% व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता ९०% अर्थसहाय्य देय आहे.

अ.क्रतपशीलएककमंजूर मापदंडानुसार खर्च(UNIT COST)प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण
१.तुती रोपे तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्यप्रती एकर१,५०,०००/-सर्वसाधारण अ.जाती/जमाती    ७५%        ९०% १,१२,५००/-     १,३५,०००/-
२.तुती लागवड विकास कार्यक्रमांकरिता सहाय्यप्रती एकर५०,०००/-३७,५००/-       ४५,०००/-
३.दर्जेदार कोष उत्पदानासाठी कीटकसंगोपन साहित्य/शेती अवजारे साहित्य पुरवठा सहाय्य आधुनिक माउंटेजप्रती लाभार्थी७५,०००/-५६,२५०/-       ६७,५००/-
४.कीटकसंगोपन गृह बांधणी साठी सहाय्य प्रती लाभार्थीमॉडेल १  (१००० चौ फुट)   मॉडेल २ (६०० चौ फुट)१,६८,६३९/-         ९५,१९७/-१,२६,४७९/-         ७१,३९७/-१,५१,७७५/-         ८५,६७७/-
Reshim Udyog Maharashtra २०२३-२०२४

रेशीम उद्योग महाराष्ट्र लाभार्थी निवडीचे निकष:

  • अर्जदाराकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
  • लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनासाठी पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • रेशीम उद्योगासाठी कुटुंबातील किमान एक व्यक्ती तुती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असणे अल्प भूधारक शेतकरी ,अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,महिला ,दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने घटकासाठी पात्र आहेत.

रेशीम उद्योग महाराष्ट्र योजनेचा लाभ कसा घ्यावा:

  • या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी,शेतकरी आणि उद्योजकांनी संबधित विभागाकडे अर्ज करावा.
  • सर्वात प्रथम ह्या योजनासाठी लागणारे पात्रता,निकष आणि कागदपत्रे हे संबधित वेबसाईट वर जाऊन चेक करावे.
  • आपल्याला काही माहिती  हवी असेल तर संबधित कार्यालय किंवा विभागाकडे भेट द्यावी.

स्व.गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

लाभार्थी:

१.अर्जदाराने रेशीम योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाच्या https:dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

२.पूर्वसमंती मिलयालापासून तुती लागवड.प्रकल्प उभारणी पूर्ण करून ६० दिवसात ऑनलाईन अनुदान मागणी करावी.

३.रेशीम उद्योग ह्या घटकासाठी मागणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मागणी करावी.सोबत खरेदी देयकाची मूळप्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्वतःसाक्षांकित करून ऑनलाईन अपलोड करावी.

४.लाभार्थ्याने सदर व्यवसाय हा कमीत-कमी ३ वर्ष केला पाहिजे.

रेशीम उद्योगाचे फायदे:

१.रेशीम हा उद्योग ग्रामीण भागात एक रोजगार निर्मितीला मोठा हातभार लावेल.या योजनेमुळे अनेकांना काम मिळेल व एक रोजगाराच साधन निर्माण होईल.

२.रेशीम हे एक मौल्यवान उत्पादन आहे आणि त्याची चांगली किमत मिळते.शेतकरी आणि रेशीम उद्योजकांना चांगला फायदा हा होताना दिसतो.

३.तुतीच्या शेतीमुळे मातीचे संरक्षण होते पाण्याचा वापर कमी होतो.

४.तुतीचे झाडे अनेक पक्ष आणि प्राण्यांना अन्न आणि निवारा पुरवतात,त्याचा फायदा म्हणून जैवविविधता टिकून राहते.

५.रेशीम उद्योगामुळे महिला,युवा आणि अल्पसंख्यांना सक्षम बनवण्यास मदत करेल व आर्थिक हातभार लागेल.

  • जगातील भारत हा दुसरा क्रमांकाचा देश आहे रेशीम उत्पादनामध्ये
  • रेशीम उद्योगामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान आहे.
  • लाखो लोकांना रोजगार आणि ग्रामीण भागाला चालना मिळते.

रेशीम उद्योग हा भारतासाठी आर्थिक,पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या फायदेशीर आहे.रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देऊन आणि त्याचा विकास करून आपण ग्रामीण भागामध्ये समृद्धी आणि रोजगार निर्मिती करू शकतो.

Reshim Udyog Maharashtra २०२३-२०२४

रेशीम उद्योग्साठी लागणारे महत्वाची कागदपत्रे:

  • आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य)
  • सातबारा उतारा
  • जात प्रमाणपत्र(जातीचा दाखला)
  • बँक पासबुक
  • २ पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बिल च्या मूळकागदपत्रे   
  • अजून आवश्यक असणारे कागदपत्रे संबधित विभागाशी संपर्क करून त्याबद्दल अधिक ची माहिती जाणून घ्यावी.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,कसे आहात मज्जेत ना?आशा करतो मज्जेतच असणार.आपण आपला मराठी वेबसाईट ओजस्वी सरकारी योजना ह्या मराठी साईट वर आपण शैक्षणिक योजना,कृषी योजना आणि सरकारी योजना आपण घेऊन येत असतो.यामागे आमचा प्रामाणिक उद्देश एकाच आहे कि प्रत्येक घटकाला लाभ घेता आला पाहिजे कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.हाच आमचा प्राथमिक निर्धार आहे.आपण आज हि बघितले ग्रामीण भाग असो कि दुर्गम भाग असो त्या ठिकाणी अजून हि सरकारी योजना ह्या पोचत नाही आणि ते घटक अजून हि मुख्य प्रवाह मध्ये येत नाही.याच मुख्य कारण हेच आहे.त्यामुळे आम्ही ब्लॉग च्या माध्यमातून योजना हि प्रत्येक घटकापरेंत पोहचवावी हाच आमचा उद्देश आहे.

प्रिय वाचक मित्रानो आम्ही आपल्याला काही सूचना प्रत्येक पोस्ट मध्ये देत असतो.आम्ही ज्या योजनाविषयी माहिती आपल्याला देत असतो ती विविध स्रोतद्वारे जमा पोहचवत असतो.तर आम्ही आपल्याला एक विनंती करतो कि कोणताही योजनेसंबधी निर्णय घेण्यापूर्वी आपण संबधित योजनेची माहिती पडताळून घ्यावी.

भारतात सर्वात जास्त रेशीम उद्योग उत्पन्न कुठे आहे?

कर्नाटक हा भारतात सर्वात जास्त कच्चा रेशीम उत्पादनात पुढे आहे.

भारतात सर्वात प्रसिद्ध रेशीम कोणते आहे?

भारतात सर्वात प्रसिद्ध रेशम हे तुती रेशीम आहे.तुती रेशीम हे सर्वात जास्त तामिळनाडू,कर्नाटक ,आंधप्रदेश,पश्चिम बंगाल आणि जम्मू काशिमीर हि राज्य जास्त उत्पादन घेतात.

रेशीम उद्योग हा नेमका कसा केला जातो ?

रेशीम अळ्याची अंडीपुंज सवलतीच्या दराने अनुदानात शासनाकडून सावलीती पुरवले जाते.रेशीम आळीचे आयुष एकूण २८ दिवसाचे असते.त्यातील त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो.२४ दिवसापैकी सुरवातीचे १० दिवस शासनामार्फत वाजवी दराने रेशीम कीटक जोपासून दिले जाते.

रेशीम उद्योग चा उद्देश काय?

रेशीम उद्योगाचे महत्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना सक्षम करणे.ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे.कारण रेशीम उद्योग साठी कमी पाणी लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment