सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 | Scholarship Savitribai Phule For V.J.N.T And S.B.C Girls Students Studying In 8th To 10 Std
Savitribai Phule Scolarship How Apply
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये. आम्ही तुमच्यासाठी नेहमी खरी व प्रामाणिक माहिती घेवून येत असतो. आमचा उद्देश एकच कि प्रत्येक आपल्या वाचकापर्यंत योजना ह्या पोहचल्या पाहिजे. आपण आमच्याशी जोडले गेले याचा आम्हाला खूप आनंदच तर आहे. पण प्रत्येक सरकारी GR असेल, शैक्षणिक योजना, सरकारी योजना, कृषी योजनाची माहिती दररोज प्रत्येक लेखातून माहिती आपल्यासाठी घेवून येण्यात आम्हाला खूपच आनंद वाटतो. आज आपण अश्याच महत्वपूर्ण योजनेपैकी एक महत्वाची योजना बघणार आहोत तीच म्हणजे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 | Savitribai Phule Scholarship For V.J.N.T And S.B.C Girls Students Studying In 8th To 10 Std योजना होय.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 | Savitribai Phule Scholarship योजेसाठी आवश्यक सर्व बारीक-सारीक व महत्वाच्या बाबी आपण ह्या लेखातून जाणून घेणार आहोत. योजनेसाठी पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे कोणते? अर्ज कसा करायचा? अर्ज कुठे करायचा? योजनेसाठी पात्र कोण? ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखातुन जाणून घेणार आहोत. हा लेख आपण शेवटपर्यंत वाचवा जेणेकरून आपले काही प्रश्न किंवा समस्या असतील तर त्याचे नक्कीच निराकरण होईल. तरीही आपल्या काही समस्या/प्रश्न असतील तर comment च्या माध्यामतून विचारू शकता. आम्ही लवकरच आपल्या प्रश्न आणि शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू !
चला प्रिय वाचक मित्रानो, आपण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेविषयी जाणून घेवूया !
प्रस्तावना
राज्यसरकार व केंद्रसरकार हे विविध योजना राबवत असते, प्रत्येक योजनेचा काहीना-काही उद्देश असतो. अजून हि काही घटकांना शिक्षण घेता येत नाही, घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, काही वेळा घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुली ह्या स्वतःहून शाळेत जात नाही. व आपल्या आईला घरकामामध्ये मदत करणे, शेतीकाम किंवा मजुरी असेल तर आईसोबत जाणे यामुळे मुलीचे शैक्षणिक नुकसान होते. प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे. शिकून स्वतःच्या पायावर उभे राहणे हे खरच अभिमानाची बाबा हि प्रत्येकासाठी व परिवारासाठी असते. मुलगी शिकली तर नक्कीच प्रगती होते. कारण जसा एक शिक्षक हा अनेक पिढ्या घडवतो तसेच प्रत्येक साक्षर स्री हि आपल्या मुलांना व परिवाराला घडवत असते. सावित्रीबाई फुल शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश आहे कि इयत्ता 8 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलीच्या शाळेच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि सुरु करण्यात आली. ह्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विमुक्त जाती/भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलीना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेविषयी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत शिष्यवृत्ती योजना हि राबवण्यात येते.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश नावनोंदणीला प्रोत्साहन देणे, मुलीचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील मुलींचे महाराष्ट्रातील शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करणे हा आहे, जे 8 वी ते 10 वी इयत्तेत शिकत आहेत. ही योजना शैक्षणिक वर्ष 2003-04 पासून सुरु करण्यात आली आहे.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थ्याने 10 महिन्यांसाठी दरमहा ₹100 म्हणजेच 10 महिन्यांसाठी ₹1000 स्कॉलरशिप दिली जाते.
योजनेचे नाव | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |
सुरुवात | ऑक्टोबर 2017 |
विभाग | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करणे. |
लाभार्थी | विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनी |
लाभ | 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीना दरमहा 100 रुपये असे 10 महिन्यासाठी 1000 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेस्थळ | येथे क्लिक करा |
Scholarship Savitribai Phule Benefits
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लाभ
- लाभार्थी विद्यार्थीनीना 10 महिन्यांसाठी दरमहा ₹100 म्हणजेच 10 महिन्यांसाठी ₹1000 शिष्यवृत्ती देण्यात येईल.
सावित्रीबाई फुले योजनेच्या अटी
- लाभार्थी विद्यार्थिनीने शासनमान्य माध्यमिक शाळेत प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थिनी हि इ. ८ वी ते १० वी पर्यंत वर्गात नियमित शिकत असावी.
- सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पनाची अट नाही.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ५ वी ते ७ वी साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
Savitribai Phule Scholarship Eligibility In Marathi
सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनाची पात्रता
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी आहे.
- विद्यार्थिनी हि 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असावी.
- विद्यार्थिनी V.J.N.T./ S.B.C प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही आणि गुणांची मर्यादा असणार नाही.
बांधकाम कामगारांच्या मुलांना MSCIT कोर्से मोफत योजनेसाठी येथे क्लिक करा !
Savitribai Phule Scholarship Document in Marathi
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- जन्म दाखला (वयाचा पुराव्यासाठी)
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- मागील वर्षी उत्तीर्ण झालेले मार्कशीट
- प्रवेश घेतलेले पावती
- बँक पासबुक
- 2 पासपोर्ट फोटो
- चालू मोबाईल क्रमांक
- वरील कागदपत्रामध्ये आवश्यक बद्दल हि होऊ शकतो, आपण अर्ज करतांना किंवा संबधित कार्यलयाशी संपर्क साधून आपण अधिक माहिती जाणून घेवू शकतो. अर्ज भरत असतात. सर्व आवश्यक माहिती हि अचूक भरावी. व कागदपत्रे हि अपलोड करावी!
सक्षम शिष्यवृत्ती योजनेसाठी क्लिक करा !
Savitribai Phule Scholarship Online Application Process 2024
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी असा करा अर्ज !
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खाली दिल्याप्रमाणे आपला अर्जाची प्रोसेस करायची आहे.
- पायरी 1: https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट वर जा.
- पायरी 2: “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा. एक वापरकर्तानाव आणि पासवर्ड तयार करा. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी OTP द्वारे सत्यापित केला जाईल.
- टीप: वापरकर्तानावामध्ये फक्त अक्षरे आणि संख्या असाव्यात. वापरकर्तानाव 4 वर्णांपेक्षा मोठे आणि 15 वर्णांपेक्षा कमी असावे.
- टीप: पासवर्डची लांबी किमान 8 वर्ण आणि कमाल 20 वर्णांची असावी. पासवर्डमध्ये किमान 1 अप्परकेस वर्णमाला, 1 लोअरकेस वर्णमाला, 1 संख्या आणि 1 विशेष वर्ण असणे आवश्यक आहे.
- पायरी 3: आता लॉगिन पेजला भेट द्या आणि तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- तुम्हाला मुख्यपृष्ठावर निर्देशित केले जाईल. डाव्या उपखंडात, तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करण्यासाठी “आधार बँक लिंक” वर क्लिक करा.
- पायरी 4: डाव्या उपखंडात, “प्रोफाइल” वर क्लिक करा. सर्व अनिवार्य तपशील भरा आणि अनिवार्य कागदपत्रे अपलोड करा (वैयक्तिक तपशील, पत्त्याची माहिती, इतर माहिती, चालू अभ्यासक्रम, मागील पात्रता आणि वसतिगृह तपशील). “जतन करा” वर क्लिक करा.
- पायरी 5: डाव्या उपखंडात, “सर्व योजना” वर क्लिक करा. योजनांची यादी दिसेल. “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती” वर क्लिक करा.
- पायरी 6: सर्व अतिरिक्त माहिती भरा आणि अनिवार्य कागदपत्रे अपलोड करा. तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी “सबमिट बटनावर” वर क्लिक करा. तुमचा ऍप्लिकेशन आयडी प्रदर्शित करून एक पॉप-अप दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी ऍप्लिकेशन आयडी जतन करा. “ओके” वर क्लिक करा.
- अश्याप्रकारे आपल्याला अर्जाची प्रक्रिया करायची आहे. अर्ज भरत असताना अर्ज वाचून संपूर्ण व आवश्यक माहिती हि अचूक भरावी. अर्जामध्ये अपलोड करायचे कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे. सर्व माहिती बरोवर असल्याची खात्री करून आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2024 | Scholarship Savitribai Phule For V.J.N.T And S.B.C Girls Students Studying In 8th To 10 Std शिष्यवृत्ती योजनाबद्दल जाणून घेतले. हि योजना 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी साठी आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थिनीना शिक्षणाच्या प्रवाहमध्ये आणणे आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे हा आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची शिष्यवृत्ती हि प्रतिमाह 100 रु असे 10 महिन्यासाठी 1000 रु मिळणार आहेत. सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी वर दिल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आपल्याला अर्ज भरत असताना अपलोड करावे लागतील. वरील योजनेमध्ये किंवा कागदपत्रामध्ये काही बदल होऊ शकतो, किंवा हि माहिती अपूर्ण असू शकते आपण अर्ज करण्यापूर्वी संबधित अधिकारी किंवा कार्यालयाशी संपर्क साधून अधिकची माहिती जाणून घ्या. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची माहिती इतर विद्यार्थी व पालकांना पाठवा. जेणेकरून आपल्या एका शेअर ने गरजू व्यक्तीला मदत होईल.धन्यवाद ….
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कोणत्या लाभार्थीसाठी आहे?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि V.J.N.T व S.B.C प्रवर्गातील विद्यार्थिनीसाठी आहे ज्या 8 वी ते १० वी च्या वर्गात नियमित शिकत आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ किती मिळणार ?
लाभार्थी विद्यार्थीनीना 10 महिन्यांसाठी दरमहा ₹100 म्हणजेच 10 महिन्यांसाठी ₹1000 शिष्यवृत्ती देण्यात येईल. विद्यार्थिनी हे नियमित शाळेत जाणारी असावी व 8 वी १० वी पर्यंत शिक्षण घेत असावी अश्या विद्यार्थिनीना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या अटी काय आहेत ?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या अटी हि खालीलप्रमाणे !
१.लाभार्थी विद्यार्थिनीने शासनमान्य माध्यमिक शाळेत प्रवेश घेतलेला असावा. २.विद्यार्थिनी हि इ. ८ वी ते १० वी पर्यंत वर्गात नियमित शिकत असावी. ३.सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पनाची अट नाही.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या पात्रता काय आहेत ?
१.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी आहे. २.विद्यार्थिनी हि 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असावी. ३.विद्यार्थिनी V.J.N.T./ S.B.C प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे. ४.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही आणि गुणांची मर्यादा असणार नाही. ह्या सर्व पात्रता आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
१. आधार कार्ड २. जन्म दाखला ३. जात प्रमाणपत्र (Cast Certificate) ४. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ५. चालू वर्षात प्रवेश घेतलेले प्रवेश पावती ६. मागील वर्ष उत्तीर्ण झालेले मार्कशीट ७. बँक पासबुक (बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे) ८. 2 पासपोर्ट फोटो ९ . संपर्कासाठी चाली मोबाईल क्रमांक हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. शासनानुसार कागदपत्रामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे आपण संबधित कार्यलयाशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्या.