शेळी पालन योजना मराठीत |Sheli Palan Yojana In marathi 2024 |महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३

Sheli Palan Yojana २०२४

७५% अनुदान मिळणार Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 |

[wptb id=674]

महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे |

महाराष्ट्र शेळी पालन योजना २०२३

:-शासनाचा GR

:-लाभार्थी पात्रता

:-आवश्यक कागदपत्रे

:-ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र शेळी पालन योजना २०२३

नमस्कार मित्रानो,आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईट मध्ये.आम्ही राज्यसरकार आणि केंद्रसरकार च्या योजना घेवून येत असतो.आमचा उद्देश एकच आहे कि आपल्या शेतकरी बांधवाना ह्या योजनेचा फायदा झाला पाहिजे.त्यामुळे प्रत्येक योजना हि आम्ही आपल्यासाठी घेवून येत असतो.कारण कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.हा आमचा प्रामाणिक उद्देश असो.प्रत्येक योजना हि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवली जाते जेणेकरून त्यातून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारून.त्याच जीवनमान उंचवण्याचा प्रयन्त हा सरकारचा योजनेच्या माध्यमातून असतो.आपण आज शेळी पालन योजना बघणार आहोत.

चला तर प्रिय वाचक मित्रानो आज आपण शेली पालन योजना महाराष्ट्र या याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.शेळी पालन योजनेसाठी पात्रता काय?सरकारचे निकष काय?योजनेसाठी कोणती-कोणती कागदपत्रे लागतील हि संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.आपल्याला एक विनंती आहे कि आपण हि पोस्ट शेवट परेंत वाचावी जेणेकरून आपली समस्या किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच ह्या पोस्ट च्या माध्यमातून निराकरण होईल हीच आशा व्यक्त करतो.

शेतकरी मित्रानो,सर्वात अगोदर नमस्कार आणि आपले आभार.कारण आपण आहात म्हणून आम्हाला किवा सर्वाना चांगल्या प्रकारचे अन्न-धान्य,कडधान्य,भाजीपाला आणि फळे आपण अहोरात्र कष्ट करत असतात.म्हणून आम्हाला हे सर्व आयत मिळत असत.पण शोकांतिका एकच वाटते कि आपण भारत देशाला कृषिप्रधान म्हणून घेतो पण आज शेतकरी इतके कष्ट करतो तरी त्याच्या मालाला हमीभाव नाही.शेतकरी चा माल घेवून व्यापारी श्रीमंत होतंय पण आज शेतकरी बाप मात्र फाटक्या कपड्यातच दिसतोय.व्यापारी हा महागड्या गाडीमधून फिरतो पण आपला शेतकरी मात्र अजून हि पायी आणि सायकल दिसतो तर कधी आपल्या सर्जा आणि राजासोबत दिसतो.म्हणजे जे पिकवतो तो फाशी घेऊन त्याच पूर्ण कुटुंब उघड्यावर येत मात्र मज्जा व्यापारी वर्ग मारतो.

  शेतकरी हा शेतीसोबत पूरक व्यवसाय किवा जोडधंदा म्हणून शेळी पालनाकडे हा उत्तम पर्याय म्हणून शेतकरी हा बघत असतो. त्यामुळे राज्यसरकार नि ७५% अनुदानाची सूट देऊन शेतकऱ्याला एक मदतीचा हात दिला आहे.आपल्याला माहित आहे कि भारत हा कृषिप्रधान देश आहे आणी भारतात खूप कुटुंबांचा उदरनिर्वाह हा केवळ शेती आणि पशुपालनावर आहे किंवा त्याच संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून असत.पशुपालन करून शेतकरीला चांगला लाभ होतो.आणि शेळी पालन हि योजना खूप प्रसिद्ध आहे.महारष्ट्रात शेळी पालन योजनेसाठी (Maharashtra Sheli Palan Yojana 2023) ऑनलाईन अर्ज कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहोत.

sheli palan yojana २०२४

महाराष्ट्र शेळी पालन योजना २०२३

महाराष्ट्रामध्ये शेळीपालन हे हे खुप छान प्रकारे केले जाते.पण तेच शेळीपालन अजून जर प्रशिक्षण घेऊन जर केले तर खूप फायद्याचे ठरेल.कारण आपण जे महाराष्ट्र मध्ये जर बघितले तर गावरान शेळी पाळली जाते.पण आपण ह्या कडे व्यासायिक दृष्टीने बघितले पाहिजे.महाराष्ट्रामध्ये शेळीपालन करण्यासाठी हवामान अतिशय अनुकूल आहे.पात्रता असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र राज्य National बँकेचे कृषी व ग्रामीण विकास संस्था देखील सहकार्य करीत आहे.लोकांना शेळीपालन करण्यास प्रवूत्त करणे Sheli Anudan Yojana 2024 चे मुख्य उद्दिष्ट आहे.खादी ग्रामोद्योग व संबधित संस्थाकडून शेली पालन संबधित सर्व माहिती जसे कि बकरीच्या जाती अनेक आहेत पण कोणती जातीची निवड करावी,त्यांची वैशिष्ट ,त्यांचा उत्तम आहार,त्यांना राहण्यासाठी शेड त्यांच्यावर येणारे आजार त्यांची काळजी कशी घ्यावी.लसीकरण किती कालावधीत करावे असे अनेक उपचाराविषयी अचूक माहिती तुम्हाला सांगतील जेणेकरून तुम्ही उत्तम यशस्वी व्हाल हा त्यांचा हेतू आहे.शेली पालन २०२३ या योजनेसाठी सरकार कडून अनुदान देखील मिळत असते.परंतु अर्जदारास त्यासाठी पात्र असावे लागते.शेळीपालन योजना २०२३-२०२४ साठी पात्रता काय लागते त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत.

sheli palan yojana २०२४

शेळी पालन योजना २०२३ साठी पात्रता आणि निकष:

  1. लाभार्थ्याकडे प्रोजेक्ट अहवाल असावा- त्यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची किमत,घर खर्च आणि लाभांश दर्शविला जाने आवश्यक आहे.
  2. जमीन- १०० बकऱ्यासाठी ९००० चौ.मी. असावी अर्ज करतांना,जमीन भाडयाची असेल तर त्याची पावती किवा stamp/जागेचा नकाशा हवा.भाडेतत्तावर असेल तर त्याबद्दलचा उल्लेख
  3. रक्कम- लाभार्थ्याला त्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतील.जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे १ लाख रुपयाचा चेक/पासबुक/एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर पुरावे किंवा तारण असायला हवे.

शेळी पालन योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. जात प्रमाणपत्र /दाखला
  4. रहिवाशी दाखला(सरपंच,ग्रामसेवक,तलाठी)
  5. अर्जदाराचे नवीन काढलेले छायाचित्र (पासपोर्ट आकाराचा)
  6. जागेचा उतारा
  7. बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य)
  8. प्रकल्प अहवाल
  9. ७/१२ उतारा
  10. मोबाईल क्रमांक
  11. अर्ज फॉर्म

सर्वात प्रथम फॉर्म घ्या,फॉर्म व्यवस्थित वाचून आवश्यक ती माहिती भरा आणि वरील सर्व कागदपत्राची झेरोक्स त्या फॉर्म ला जोडा आणि आपला फॉर्म संबधित अधिकाऱ्याकडून एकदा चेक करून घ्या आणि फॉर्म हा सांगितलेल्या विभागाकडे जमा करा.

अद्यायावत माहितीसाठी ,आपण आपल्या जवळच्या पशुधन विभागाशी संपर्क साधावा आणि अधिक ची माहिती मिळवून घ्यावी.

शेळीपालन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

शेळी पालन अर्ज प्रक्रिया:

शेळी पालन योजना २०२३ साठी ऑनलाईन अर्ज अजून हि सुरु करण्यात आला नाही.तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल.आपण ह्या योजनेबाबत ग्रामपंचायत,पंचायत समिती ,जिल्हा परिषद आणि जिल्हा उद्योग केंद्र या ठिकाणी तपास करावा.ह्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल.आणि योजनेचा फॉर्म हि मिळेल.

  • गुगल वर जाऊन dbt पोर्टल किंवा महाराष्ट्र सरकारचा आपले सरकार पोर्टल वर जावे लागेल आणि तिथून सर्व माहिती मिळवावी लागेल.
  • तुम्ही आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये जावून ग्रामसेवक आणि सरपंच यांना संपर्क साधा.
  • शेळी पालन योजना पीडीएफ फॉर्म पंचायत समिती,जिल्हा परिषद ,ग्रामपंचायत जिल्हा उद्योग ह्या ठिकाणी मिळून जाईल.
  • आम्ही तुम्हाला शेळी योजना फॉर्म (Shelipalan yojna form pdf in marathi | sheli palan pdf in marathi | sheli palan pdf in marathi) याची लिंक खाली दिलेले आहे तिथून तुम्ही सुद्धा शेळीपालन योजना २०२३ पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करू शकता.
  • शेळी पालन योजना फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून तुम्हाला स्वच्छ अक्षराने भरून घाव लागेल व त्या अर्जाला संबधित कागदपत्रे जोडावे लागतील.आणि संबधित विभागाकडे जमा करून वारंवार लिस्ट तपास करावा लागेल.आणि फॉर्म वर नंबर देताना चालू क्रमांक द्या आणि आपल्या स्वताकडे असलेला नंबर दिला तर उत्तम असेल.कारण निवड झाली कि कळेल .

रेशन कार्ड ई-केवाईसी बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

:- Krushiyojana

Sheli Palan Yojana २०२४

शेळी पालन अनुदान किती आहे ?

शेळीपालन ला अनुदान हे१. अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी ७५% अनुदान.
२.सर्वसाधारन प्रवर्गातील आणि मागासवर्गीय व ओपन यांना ५०% अनुदान देण्यात येते.

शेळीपालन हा व्यवसाय चांगला आहे का?

शेळीपालन हा व्यवसाय खूपच फादेशीर व्यवसाय आहे.कारण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेलीपालानाकडे बघितले जाते.शेळी पासून मांस ,दुध आणि मेंडी पासून लोकर हि मिळते.मांसची मागणी वाढल्यामुळे शेळी पालन हा व्यवसाय खूपच परवडेबल झाला आहे.

शेळी पालनासाठी मला किती कर्ज मिळू शकेल?

शेळी पालन हि योजना राज्यसरकार आणि केंद्रसरकार राबवत असते व अनुदानावर शेतकऱ्यांना किंवा शेळी पालकांना कर्ज दिल झाला जात.जर तुम्हाला बँककडून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही खाजगी किंवा सरकारी बँक शी संपर्क साधून माहिती मिळवू शकता.आणि लोन कसे मिळेल याबद्दल माहिती जाणून घ्यावि.किमान ५०,००० आणि कमाल १५,००,००० लाख.

शेळ्या किती दुध देतात?

शेळ्या ह्या दररोज ६ ते ८ पाउंड दुध देतात,(३ ते ५ क्वार्ट)दुध देऊ शकतात.शेळीचे दुध हे शेळीचे जातीनुसार बदलते,उदा.काठवाडी शेळी हि एका वेळी ३-४ लिटर दुध देते.

शेळी करडाला किती दिवसात जन्म देते ?

आपण जर बघितले तर गावरान शेली हि साधरणपणे १५ महिन्यात २ वेळा करडाला जन्म दते.शेळीच्या जातीनुसार आणि त्यांच्या खान-पानानुसार हे बदलत असत.

शेळी पालन बंदिस्त करावे कि अर्धबंधिस्त करावे?

प्रिय शेळीपालक मित्रानो आपल्याकडे जर चाराचे नियोजन चांगले असेल.तर आपण विविध प्रकारचे गवत लावून आपण शेळ्यांना बंधिस्त करून पालन करू शकतात.पण मोकळे रानात फिरवून जर आपण आणले तर शेळाचे पाय हि मोकळे होतात आणी शेळ्या ह्या विविध वनस्पतीचा चारा खातात म्हणून त्यांना कमी प्रमाणत आजार हे होत असतात.बंदिस्त करावे कि अर्ध बंधिस्त करावे हा निर्णय सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.

शेळ्या न लसीकरण कसे करावे?

शेळ्या जर आपण वेळेवर लसीकरण केले तर होणारे आजार टाळता येतात.म्हणून शेळीना वेळी-वेळो लसीकरण करणे फायदेच ठरत.

एका शेळीला किती जागा लागते?

आपण जर बघितले तर शेली ला खूप कमी प्रमाणात जागा लागते.एका शेळीला कमीत-कमी २० चौरस फुट जागा लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

6 thoughts on “शेळी पालन योजना मराठीत |Sheli Palan Yojana In marathi 2024 |महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे |”

Leave a Comment