स्वतंत्र स्वयंम योजना २०२४ |Swatantra Swayam Yojana Marathi | विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार ६० हजार शिष्यवृत्ती!
स्वतंत्र स्वयंम योजना धनगर समाजातील उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयन्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून स्वतंत्र स्वयंम योजनाच लाभ घेता येईल.
खालील प्रकारचा क्षेत्रनिहाय शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येईल.
[wptb id=719]स्वतंत्र स्वयंम योजना २०२४
प्रस्तावना:
मा.मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनाच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविणेबाबत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास अनुलक्षून संपन्न झालेल्या मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासीच्या धर्तीवर १३ योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र स्वयंम योजना सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकार नि घेतला.
नमस्कार मित्रानो आज आपण स्वतंत्र स्वयंम योजनाबदल जाणून घेणार आहोत.यासठी पात्रता काय? कोणाला ह्या योजनेचा लाभ मिळेल ?कागदपत्रे काय?याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून घेणार आहोत.चला तर आपल स्वतंत्र स्वयंम योजनाबदल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थिना निवासी,शैक्षणिक सुविधापासून वंचित राहू नये या करिता उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे.
स्वतंत्र स्वयंम योजना हि योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यासाठी आहे.ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा प्रयन्त करतात पण बाहेर गावी जाऊन शहरामध्ये भाडेने घर,मेस आणि शैक्षणिक खर्च हा आवाक्याच्या बाहेर Swatantra Swayam Yojana Marathiअसतो.परिस्थिती गरिबीची असल्यामुळे वडील सुद्धा हा एवढा खर्च करू शिकत नाही त्यामुळे विद्यार्थी हा उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असून हि त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही.वसतिगृहाला नंबर लागत नाही अश्या वेळी स्वतंत्र स्वयंम योजनाअंतर्गत विद्यार्थ्यांना ६०,००० निवासी,भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट महाराष्ट्र सरकारडून थेट हा लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वितरीत केला जाईल. स्वतंत्र स्वयंम योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक अटी आणि शर्ती आहेत आणि पात्रता आहे.तरच विद्यार्थी हा स्वतंत्र स्वयंम योजनाचा Swatantra Swayam Yojana Marathi लाभ घेवू शकेल.
आपण जर बघितले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि पंडित दीनदयाल स्वयंम योजनेच्या माध्यामातून जसे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातील ज्या विद्यार्थ्याच्या वसतिगृहास नंबर नाही लागला तर .ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे.अश्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट महाराष्ट्र सरकारडून लाभार्थ्याच्या खात्यावर थेट हा लाभ वितरत केला जातो.त्याच प्रकारे स्वतंत्र स्वयंम योजना हि धनगर समाजील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करेल.
राज्य सरकारकडून धनगर समाजातील विद्यार्थ्यासाठी प्रथमच Swatantra Swayam Yojana Marathi हि योजना लागू करण्यात आली आहे.त्यामुळे १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई,पुणे ,पिंपरी चिंचवड ,ठाणे ,नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ६० हजार तर क वर्ग महापालिकेतील क्षेत्रात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार आणि इतर जील्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ४३ हजार हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येईल.ह्या योजनेत अट अशी कि जे विद्यार्थ्यांना वसतीगृहा मध्ये प्रवेश नाही मिळाला अश्या विद्यार्थ्यांना Swatantra Swayam Yojana Marathi २०२४ ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
स्वतंत्र स्वयंम योजनाची अटी आणि शर्ती;
१.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२.अर्जदार हा धनगर समाजातील असावा.
३.विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
४.विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असणे अआव्श्यक आहे.
५.आधार कार्ड हे बँक खातेशी लिंक असावे.
६.ज्या शहरामध्ये विद्यार्थी हा प्रवेश घेतोय अश्या ठिकाणचा राविवासी नसावा.
७.बारावी परीक्षेत कमीत-कमी ६०% गुणासह उत्तीर्ण असावा.
८.विद्यार्थी ज्या पदवी किवा पदव्युतर ला प्रवेश घेतो,अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.
९.विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा अधिक नसावा.Swatantra Swayam Yojana Marathi
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनासाठी येथे क्लिक करा!
स्वतंत्र स्वयंम योजना शैक्षणिक निकष आणि पात्रता:
१.अर्जदार हा १२ वी नंतरचा शिक्षण घेणारा असावा.
२.इयत्ता १२ वी मध्ये किमान ६०% गुण असतील तरच स्वतंत्र स्वयंम योजनास पत्र राहील.
३.दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.
४.केंद्र शासनाच्या पोस्ट matric शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वयंम योजनाचा लाभ देण्यात येईल.
५.एका शाखेच्या पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेचा पदवी किंवा पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ देय राहणार नाही.
६.मान्यताप्राप्त महाविद्यालय/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
७.योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
८.योजनेचा लाभ मिळवण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती हि ६०% असणे बंधनकारक राहील.
९.एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाली तर संबधित महाविद्यालयाशी संपर्क साधून शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
१०.विद्यार्थ्याची निवड हि त्याच्या गुणवत्तेनुसार केली जाईल.
११.निवड करण्यात आलेला विद्यार्थीला संबधित अभ्यासक्रम पूर्ण होईपरेंत लाभास पात्र राहील.
१२.विद्यार्थ्यास प्रत्येक वर्ष त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
स्वतंत्र स्वयंम योजना इतर निकष:
- एका विद्यार्थ्यास जास्तीत-जास्त ५ वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.
- शिक्षणात खंड पडला असला त्तरी विद्यार्थी हा सदर योजनेसाठी पात्र आहे.अट एकच आहे कि अर्जदार हा २८ वर्षापेक्षा अधिक वयाचा नसला पाहिजे.
- सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास,अनुतीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही.उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील.तथापि उपरोक्त ७ वर्षात कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुतीर्ण अश्या दोन्ही कालावधीसाठी गणना करण्यात येईल.
- विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या,सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
- विद्यार्थी हा कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
- धनगर समजातील दिव्यांग विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
स्वतंत्र स्वयंम योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
Swatantra Swayam Yojana Document List
१.आधार कार्ड
२.शाळेचा दाखला
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.१२ वी मार्कशीट
५.पालकाचा उत्पनाचा दाखला(तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
६.बँक पासबुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले असावे)’
७.दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असल्यास)
८.पासपोर्ट आकाराचा फोटो
९.अर्जामध्ये स्वताचा मोबाईल क्रमाकाची नोंद करावी.
१०.सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असावा.
टीप: १.सर्व कागदपत्रे अर्जाला जोडून योग्यरीतीने सत्यापित केलेली असावी.
२.स्वतंत्र स्वयंम योजेनेचा अर्ज हा ऑनलाईन हि करू शकता.
३.जवळच्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यलयात जाऊन ऑफलाईन अर्ज जमा करू शकता.
अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा!
नमस्कार मित्रानो आज आपण स्वतंत्र स्वयंम योजना बद्दल सविस्तर जाणून घेतले.आपल्याला जर स्वतंत्र स्वयंम योजनाबदल अजून माहिती हवी असेल किंवा आपले काही प्रश्न असतील तर आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही लवकरच आपल्या प्रश्नाचे निराकरण करू धन्यवाद.
कोणताही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबधित वेबसाईट वर माहिती पडताळणी करूनच निर्णय घ्यावा किंवा संबधित नजीकच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिक माहिती जाणून घ्यावी.आमचा उद्देश प्रामाणिक आहे कि सरकारी योजना ह्य अप्रतेक घटकापरेत पोहचल्या पाहिजे,कोणाही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.
स्वतंत्र स्वयंम योजना हि कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
स्वतंत्र स्वयंम हि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आहे,हि धनगर समाजातील विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेवू शकतो.
स्वतंत्र स्वयंम योजेनेमध्ये किती आर्थिक सहाय्य मिळते?
यासाठी शासनाने जिल्हा ,तालुका आणि महानगरपालिका ह्या हिशाबाने हि रक्कम दिली जाते.यामध्ये प्रती विद्यार्थी ६०,००० हजार रुपये दिले जातात.
स्वतंत्र स्वयंम योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत/
१.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२.अर्जदार हा धनगर समाजातील असावा.
३.विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
४.विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असणे अआव्श्यक आहे.
५.आधार कार्ड हे बँक खातेशी लिंक असावे.
६.ज्या शहरामध्ये विद्यार्थी हा प्रवेश घेतोय अश्या ठिकाणचा राविवासी नसावा.
७.बारावी परीक्षेत कमीत-कमी ६०% गुणासह उत्तीर्ण असावा.
८.विद्यार्थी ज्या पदवी किवा पदव्युतर ला प्रवेश घेतो,अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.
९.विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा अधिक नसावा.Swatantra Swayam Yojana Marathi
स्वतंत्र स्वयंम योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील?
Swatantra Swayam Yojana Document List
१.आधार कार्ड
२.शाळेचा दाखला
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.१२ वी मार्कशीट
५.पालकाचा उत्पनाचा दाखला(तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
६.बँक पासबुक झेरॉक्स(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले असावे)’
७.दिव्यांग प्रमाणपत्र(विद्यार्थी दिव्यांग असल्यास)
८.पासपोर्ट आकाराचा फोटो
९.अर्जामध्ये स्वताचा मोबाईल क्रमाकाची नोंद करावी.
१०.सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असावा.
स्वतंत्र स्वयंम योजनेचा उद्देश काय/
ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहा मध्ये प्रवेश मिळाला नाही अश्या विद्यार्थ्यांना स्वतंत स्वयंम योजनेंतर्गत निवासी , भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट लाभार्थ्याचा खात्यामध्ये लाभ हा वितरीत केला जातो.
Yojne sathi apply kase kare v konti website portal available ahe te sanga
अधिकृत संकेतस्थळला भेट द्या!