Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2023-2024 मराठी माहिती | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme |        

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2023-2024 मराठी माहिती | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme |        

प्रस्तावना

 नमस्कार मित्रानो आपल्या मराठी साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.आपण नेहमीप्रमाणे आज | Beti Bachao Beti Padhao Yojana Online Application Form | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना | विषयी जाणून घेणार आहोत.ह्या योजनेसाठी पात्रता काय? उद्दिष्टे आणि लागणारे कागदपत्रे कोणती ते आपण सविस्तर ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्यसरकार मुलींच्या उज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम राबवत असत आणि योजना आपण मागील ब्लॉग मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि बालिका समृद्धी योजना बघितल्या तसेच आपण आज २२ जानेवारी २०१५ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना २०२३-२०२४ योजनेला सुरवात केली. ज्या जिल्हा मध्ये बाल लिंग गुणोत्तर खूप कमी आहे म्हणजेच मुलींचा जन्मदर हा खूप कमी आहे अश्या निवडक १०० जिल्हा मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना केंद्रसरकर पुरस्कृत कार्यक्रम राज्यातील बीड, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, जालना, बुलढाणा, औरंगाबाद ,उस्मानाबाद आणि वाशीम अश्या १० जिल्हा मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme मध्ये खालील पैकी तीन मंत्रालयांनी संयुक्त उपक्रम राबवत आहेत .

  • महिला बालविकास मंत्रालय
  • आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय
  • मानव संसाधन विकास मंत्रालय

 Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2023-2024 मराठी माहिती | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme |   मुलीना सक्षम करणे व स्वताच्या पायावर उभ राहून प्रगती साधने.मुलगी हि परिवाराला ओझ वाटू नाही.मुलीना समाजात दुय्यम स्थान जे दिल जात.मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हणून मुलाला जास्त जपल जात.मुलाच्या शिक्षणावर जास्त खर्च केला जातो आणि मुलगी ला शिकू दिल जात नाही.२०११ च्या जनगणना मध्ये मुलीचे प्रमाण हे मुलांपेक्षा कमी होत.त्याच कारण म्हणजे लिंग निवड चाचणी होती.स्रीभृणहत्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या.आणि लवकर लग्न करून दिल जात म्हणजेच बालविवाह करून देतात,सर्व समाजात एक म्हण प्रसिद्ध आहे मुलगी शिकून कुठे दिवा लावणार अश्या मानसिकता असलेल्या समाजाचा मुली कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार विविध योजना राबवत असत.

बBeti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना २०२३-२०२४ मराठी

बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेचे उद्दिष्टे

  • लिंग निवडीस प्रतिबंध करणे.कारण २०११ च्या जनगणनमध्ये निदर्शनास आले होते कि मुलीचे प्रमाण हे कमी होत त्याच कारण लिंग निवड चाचणी होती.
  • मुलीना उत्तम शिक्षण प्रधान व्हावे.
  • मुलीना शिकवून सक्षम बनवणे आणि शिकून नौकरी करतील याची खात्री देणे.
  • मुलीनंकडे समजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा व मुलगा-मुलगी समान आहेत हे पटवून देणे.
  • मुलींच्या जीवनमानात सुधारणा आणून त्याच जीवन सुरक्षित कराव.
  • मुलीचे बालविवाह हि प्रथा थांबवणे.
  • समाजामध्ये मुलींबद्दल नकारत्मक विचार करण्याचा दृष्टीकोन बदलावा.
  • मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक आणि मुलांबरोबर मुलीना हि  शिकण्याची समान संधी मिळावी.

  Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना २०२३-२०२४ मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलीच्या घटत्या जन्मदराबाबत जनजागृती करणे आणि स्रीभृणहत्या थाबवणे.

योजनेची पात्रता |Beti Bachao Beti Padhao Scheme

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना कागदपत्रे| Beti Bachao Beti Padhao Yojana Document In Marathi 2023-2024

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जाचा नमुना हार्ड कॉपी
  • मुलीचा जन्मदाखला  
  • मुलीचे आधार कार्ड (ज्याच्या नावाने योजनेचा लाभ घ्यायचा)
  • रेशन कार्ड
  • निवासी पत्त्ता(कायमचा)
  • पालकाचे ओळखपत्र(आधारकार्ड,मतदान कार्ड,)
  • संपर्कसाठी मोबाईल नंबर(चालू असला पाहिजे)
  • पासपोर्ट साईजचे छायाचित्रे
  • राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • विहित नमुना अर्ज
  • ह्या सर्व अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे आपण संबधित कार्यलय किंवा अधिकारीशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेवू शकता.अर्ज भरताना माहिती हि वाचून व काळजीपूर्वक भरावी.माहिती भरल्यानंतर खात्री करा व आपला अर्ज जमा करा. अर्ज जमा करण्याची पोच पावती घ्या!

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनाचे फायदे

Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme

  • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व लग्नासाठी आपण पैसे काढू शकतो या साठी आपण जमा केलेले व त्यामध्ये सरकारकडून देण्यात येणारा लाभ अशी रक्कम काढता येईल.
  • ह्या योनेची रक्कम मुलगी १८ वर्षाची झाली कि ५० टक्के रक्कम मुलीचे पालक काढू शकतात.
  • ह्या योजनेमुळे मुलींचे संरक्षण,बालविवाह थांबतील आणि स्रीभृणहत्या हि थांबेल हा मुख्य फायदा होईल.
  • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे मितील व याच्या मुले मुलगा-मुलगी असा भेदभाव कमी होईल.

 बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023-2024  माहिती मराठी महाराष्ट्र|

beti bachao beti padhao yojneche uddishte in marathi

योजनेची रचना आणि वैशिष्टे

  • जनसंचार अभियान मुलीनी देशाचे सक्षम नागरिक बनावे यासाठी मुलीचे जगणे पोषण आहार,शिक्षण सुसज्य करावे व त्यांना संधी द्यावी ह्या साठी जनजागृती करते.यामध्ये राष्ट्रीय ,राज्य जिल्हा आणि तालुका शासन समुदाय यांच्यामध्ये संबंध स्थापित करण्याचा प्रयन्त केला आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनेमध्ये सहभागी असलेले तिन्ही मंत्रालय स्रीभृणहत्या रोखण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.
  • स्रीभृणहत्या प्रतिबंध कायदायची कडक अंमलबजावणी करणे,व जन्माची नोंद ठेवणे,संस्थात्मक प्रसुतीस प्रोत्साहन देणे.हे काम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय करते.
  • बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हि योजना १०० जिल्हामध्ये कार्यरत आहे व तेथील स्थानिक खासदार यांच्या कडे त्याची जबाबदारी देण्यात येईल.
  • गुड्डा-गुड्डी हा बोर्ड प्रत्येक ग्रामपंचायत बाहेर लावणे अनिवार्य आहे.कारण ह्या जन्माची नोंदी कळतील.
  • शाळामध्ये जाण्याचे प्रमाण म्हणजे गळती कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्हामध्ये पाच बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
  • महिलेची गर्भधारणेची नोंद अंगणवाडी मध्ये पहिल्या तीन महिन्यात करण्यात अनिवार्य आहे.
  • ज्या गावाची ग्रामपंचायत मुला-मुलीच लिंगगुणोत्तर समान संतुलित राखण्यास यशस्वी होईल.अश्या ग्रामपंचायात ला महिला व बालविकास मंत्रालयाकडून एक कोटी रुपयाचे पारितोषक मिळेल अशी घोषणा केली आहे.

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना अर्ज करण्याची पद्धत| Beti Bachao Beti Padhao Yojana Online Application Form

 बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ह्या योजनेसाठी आपण ऑफलाईन अर्ज करू शकतात.

  • मुलगी दहा वर्षाची होण्याच्या आतमध्ये आपण बेटी बचाओ बेटी पढ़ाओ चे खात उघडू शकतात.
  • खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक असली पाहिजे व त्या बनके मध्ये योजनेविषयी चौकशी करा.
  • अर्जाची झेरोक्स घेऊन तो  समजेल असा अक्षराने व  मागितली माहिती त्या ठिकाणी भरा वरीलप्रमाणे सांगितलेले कागदपत्रे जोडा.
  • अर्ज भरल्यानंतर तो तुम्ही बँक कर्मचाऱ्याकडे देऊन त्या कडून टोकन पावती घ्या कारण आपल्या कडे त्याच प्रुफ असेल.
  • जर बँक आपल्या गावात नसणार तर आपण पोस्टमध्ये जाऊन सुद्धा . बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या योजनेची माहिती घेऊन.पोस्टमध्ये पण खाते खोलू शकता.

    वरील प्रमाणे तुम्ही अर्ज करून आपल्या मुलींचे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनेचे खात खोलू शकता.

Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2023-2024 मराठी माहिती | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme |  वाचकांना पडणारे काही प्रश्न ?      

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी माहिती?

आपल्या भारतात जर आपण बघितले तर २०११ ची जनगणना नंतर स्री-पुरुष गुणोत्तर १००० पुरुषामांगे ९४० स्रीया इतक कमी होत कारण गर्भलिंग निदान चाचण्यामुळे मुलीचा गर्भ असले,कि पालक ठेवत नव्हते.तर या समस्या वर मत करण्यासाठी भारत सरकार ने बेटी बचाओ बेटी पढाओ योजना २०१५ पासून सुरु करण्यात आली.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची उद्दिष्टे?

स्रीभृणहत्या सारखा भयंकर प्रथा रोखणे आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणे हे मुख्य उद्देश होता.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरु झाली?

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ ला सुरुवात केली.

४. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम ने सुरु करण्यात आली?

१)महिला बालविकास मंत्रालय २)आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय ३)मानव संसाधन विकास मंत्रालय हे उपक्रम सुरु करण्यात आले.

 गुड्डा-गुड्डी बोर्ड म्हणजे काय?

गुड्डा-गुड्डी बोर्ड म्हणजे मुला-मुलींची जन्माविषयी आकडे वारीची नोंद प्रदर्शित  करण्यासाठी गुड्डा-गुड्डी बोर्ड हा प्रत्येक ग्रामपंचायत च्या बाहेर लावणे. जळगाव चे कलेक्टर रुबल अग्रवाल यांनी ह्या बोर्डची निर्मती केली होती. हा उपक्रम खूपच छान व कौतुकास्पद होता.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत कोणत्या १० जिल्ह्याचा समावेश आहे?

बीड,जळगाव,अहमदनगर,कोल्हापूर,सांगली,जालना,बुलढाणा,औरंगाबाद ,उस्मानाबाद आणि वाशीम अश्या १० जिल्हामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.

   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “Beti Bachao Beti Padhao Yojana | बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2023-2024 मराठी माहिती | Beti Bachao, Beti Padhao (BBBP) Scheme |        ”

Leave a Comment