माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी|Mazhi kanya bhagyashree yojana in Marathi

माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी|
Mazhi kanya bhagyashree yojana in Marathi
माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी
नमस्कार मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.तर आपण नेहमी केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांच्या अंमलबजावणी किंवा राबवण्यात आलेल्या योजना आपल्या परेंत त्याची माहिती मिळावी हाच मुख्य उद्देश आमच्या मराठी वेबसाईट ओजस्वी सरकारी योजनेचा आहे.जेणेकरून कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहू नये.आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल जाणून घेणार आहोत. माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी|
Mazhi kanya bhagyashree yojana in Marathi या योजनेसाठी पात्रता काय?निकष आणि कागदपत्रे कोणती लागतील हे आपण ह्या पोस्त मधून जाणून घेणार आहोत.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.
प्रस्तावना
प्रिय वाचक मित्रानो आपण जर आजही बघितलं तर ग्रामीण भाग असो कि शहरी भाग असो.आपण शहरामध्ये गेला असाल तर तिथली परिथिती आपण बघितली असेल.मोठ्या-मोठ्या बिल्डींग आपल्याला दिसतात पण ह्या आपल्याला बाहेरून सजवलेल्या मुखवट्या प्रमाणे दिसतात.आपण जर आत मध्ये जाऊन बघितले तर आपल्याला दुर्गम भाग सारखे चित्र आपल्याला दिसेल म्हणजेच झोपडपट्टी भाग दिसेल.छोट्या-छोट्या झोपड्यामध्ये लोक वास्तव्यास राहतात.त्याच्या मुलभूत गरजा हि पूर्ण होत नाही जश्या कि अन्न,वस्र आणि निवारा हे त्यांना मिळत नाही,तर तर मुलीना कुठे शिक्षण व चांगले आरोग्य देऊ शकतील?त्यात त्यांना अनेक समस्या भेडसावतात त्या म्हणजे जागे अभावी.कचरा व्यवस्थापन असेल ,पाणी ची कमतरता,विजेची कमतरता अश्या समस्या मध्ये कुटुंब प्रमुख हा पूर्णपणे स्वत हिम्मत हरून बसतो. माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी|
Mazhi kanya bhagyashree yojana in Marathi अश्या गरीब,वंचित घटक आणि दुर्बल घटकासाठी केंद्रसरकार व राज्यशासन विविध योजना राबत असत त्यातली मुलीच्या फायद्यासाठी व मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून माझी कन्या भाग्यश्री योजना राबवत आहे.पण ह्या योजना राबवून ज्यांचा हक्क आहे त्यांना मिळत नाही.त्याच्यापरेंत योजनेची माहिती पोहचत नाही म्हणून आम्ही आमच्या वाचकापरेंत माहिती पोहचवण्याच काम करत असतो.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी येथे क्लिक करा !
माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी|
Mazhi kanya bhagyashree yojana in Marathi हि योजना महाराष्ट्र शासनाने,माझी कन्या भाग्यश्री योजनेची २६ फेब्रुवारी २०१६ रोजी घोषणा केली.व अमलात १ एप्रिल २०१६ रोजी आणली म्हणजेच योजनेची सुरुवात केली.केंद्रसरकारची घोषणा व योजना “बेटी बचाओ ,बेटी पाढाओ “या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याने महिला व बालविकास मंत्रालय यांनी हि योजना अमलात आणली.”बेटी बचाओ-बेटी पढाओ”हि योजना केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केली आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील १०० जिल्ह्याची निवड केली होती.ज्या जिल्हामध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे.अश्या जिल्ह्यामध्ये सदर योजना लागू केली होती.आपण जर बघितलं २०११ च्या जनगणनेनुसार मुलीचे प्रमाण हे मुलांपेक्षा कमी होते त्याच कारण म्हणजे स्रीभृणहत्या हे होत.लिंग तपासून मुलगी असेल तर होऊ देत नी त्या नंतर मग कायदाने प्रतिबंध आणला व मुलीच्या फायद्याच्या योजना,सुकन्या समृद्धी योजना,माझी कन्या भाग्यश्री योजना ,बेटी बचाओ-बेटी पढाओ आणि बालिका समृद्धी योजना अश्या विविध योजना राबवून केद्र व राज्यसरकार ने महिलांना प्रोत्साहित केल त्यामुळे जर आपण आता हा प्रमाण जर बघितले तर १००० पुरुषांमागे स्रीयाचे प्रमाण आता १०२८ आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनाचे योजनेची उद्दिष्टे:
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीना शिक्षण घेता यावे कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित न राहता आपली प्रगती साधून स्वताच्या पायावर उभी राहील.पैसे अभावी कधी –कधी आईवडील शिकू देत नाही लवकर लग्न लावून देतात तर ह्या मुले बालविवाह प्रतिबंध लागेल.स्रीभृणहत्या वाढत होत्या.कुठतरी स्री भृणहत्या थांबेल.मुलीना चांगले आरोग्य मिळेल व मुलींकडे समजाचा बघण्याचा दृष्टीकोन हि बदलेल हाच मुख्य उद्देश हा माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी| Mazhi kanya bhagyashree yojana in Marathi चा आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना लाभाचे स्वरूप
- एकच मुलगी झाल्यानंतर म्हणजेच एकच मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजनाची शास्रक्रिया केली आहे.(प्रकार-
- दोन मुलीना जन्म दिल्यानंतर जर मातेने कुटुंब नियोजनाची शास्राक्रिया केली आहे.(प्रकार-२)
- अगोदर एक मुलगी झालीय व दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर २ मुली झाल्यात तर तिन्ही मुली योजनेच्या लाभ साठी पात्र असतील.
- जर एक मुलगा असेल अश्या मातेच्या मुली ह्या योजनेच पात्र नसणार.(फक्त हि योजना मुलींसाठी आहे) यामुळे ह्या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळेल.
- ह्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब( below poverty line ) व दारिद्र्य रेषेवरील कुटुंब म्हणजेच(above poverty line ) ह्या दोघी कुटुंबाना वेगळ्या मर्यादा आहेत लाभाच्या.
- माझी कन्या भाग्यश्री हि योजना महाराष्ट्र मध्ये राबवण्यात येत आहे.जे कुटुंब ह्या योजनेसाठी पात्र असेल तर लाभ घेऊ शकत.
योजनेचे टप्पे | योजनेचा हेतू | अटी | प्रकार १ | प्रकार २ | ||
जन्माच्या वेळी | मुलीचा जन्म झाला कि साजरा करणे | जन्म झाला कि जन्म नोंद करणे आवश्यक आहे | ५००० रु | पहिली मुलगी दुसरी मुलगी | ||
निरंक २५०० रु | ||||||
१.मुलीचा जन्म झाल्यावर आम आदमी योजनेचा लाभ मिळेल . २.प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत मुलीच्या व आईच्या नावाने वेगळे खाते काढून त्याद्वारे अतिरिक्त एक लाखाचा विमा व पाच हजार ची ओवरड्राफ्ट सुविधा देण्यात येईल ३.जन्म झालेल्या मुलीला सुकन्या योजनेचे लाभ मिळतील. ४.एल.आए.सी कडे २१००० रु चा विमा उतरवून मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १ लाख रुपये मिळतील | ||||||
मुलगी ५ वर्षाची होईपरेंत प्रत्येकवर्षी | एक अंडे किंवा २०० मिली दुध प्रतिदिन मिळावे | अंगणवाडी मधून लसीकरण करून प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे | २००० रुपये प्रतिवर्ष प्रमाणे १०००० रु पाच वर्षासाठी | दोन्ही मुलीना प्रत्येकी १००० प्रती वर्ष प्रमाणे १०००० रुपये ५ वर्षासाठी | ||
प्राथमिक शाळा प्रवेश १ ते ५ वी | पोषण आहार इत्यादी खर्चाकरिता | उपस्थिती बाबत शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक | २५०० प्रतिवर्ष प्रमाणे १२५०० पाच वर्षासाठी | दोन्ही मुलीना प्रत्येकी १५०० प्रतिवर्ष प्रमाणे १५००० पाच वर्षासाठी | ||
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश ६ वी ते १२ वी | गुणवत्तापूर्वक पोषण आहाराकरिता आवश्यक | शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक आहे | ३००० प्रतिवर्ष प्रमाणे २१००० रुपये ७ वर्षासाठी | दोन्ही मुलीना प्रत्येकी २००० रुपये प्रतिवर्ष प्रमाणे एकूण २२००० रुपये ७ वर्षासाठी |
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभाचे स्वरूप
वयाच्या १८ व्या वर्षापरेंत | उच्च शिक्षण व रोजगारासाठी | १८ वर्ष पूर्ण व अविवाहित असल्याचे पालकांचे शपथपत्र | विम्याचे एक लाख रुपये मिळतील त्यापैकी मुलीच्या कौशल्य विकासासाठी १०००० रुपये खर्च करणे आवश्यक आहे | ||
मुलीच्या जन्मानंतर | आजी आजोबाला भेट देणे | मातेने पहिल्या मुलीनंतर कुटुंबनियोजन करणे आवश्यक आहे | सोन्याचे नाणे कमाल मूल्य ५००० रुपये व प्रमाणपत्र | लागू नाही |

माझी कन्या भाग्यश्री योजना उद्दिष्टे मराठी|
Mazhi kanya bhagyashree yojana uddishte in Marathi
- बालिकेचा जन्मामध्ये वाढ करणे .
- मुलीचे बालविवाह रोखणे आणि प्रतिबंध लावणे.
- मुलीना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे .
- मुलीच्या आरोग्याकडे लक्ष देणे.
- मुलींचे जीवनमान उंचवने व एक नवीन दिशा देणे.
- समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा आणि मुली आणि मुलांना समान वागणूक व स्थान देणे.
- गर्भ लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Mazhi kanya bhagyashree yojana kagadpatre in Marathi
- अर्जदाराचे आधारकार्ड (योजनेसाठी पात्र मुलीचे आधारकार्ड)
- उत्पनाचा दाखला (Income Certificate)
- वास्तव्यास असलेला पत्ता(नियमित किंवा कायम स्वरूपी पत्ता)
- रहिवासी दाखला(तलाठी,सरपंच)
- रहिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे तरच ह्या योजनेसाठी पात्र असू शकणार आहेत.
- अर्जदाराचे पासपोर्ट साईझ फोटो(छायाचित्र)
- मुलीचे नावाने किंवा आई च्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे.त्या अकाऊंट नंबर च पासबुक हव.
- अर्जाची हार्ड कॉपी आणि योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अर्जासोबत जोडायची.
टिप:- अर्ज भरत असताना चुका होऊ देऊ नका,अर्ज समजेल अशे लेखन करा.(जेणेकरून अर्ज बाद नाही होणार)
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारे कागदपत्रे?
१.अर्जदाराचे आधारकार्ड२.उत्पनाचा दाखला ३.राहतात तो पत्ता ४.रहिवास प्रमाणपत्र(domicile certificate) ५.रहिवासी दाखला ६.पासपोर्ट फोटो ७.बँक पासबुक हे सर्व कागदपत्रे अर्ज भरताना आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरु झाली?
एप्रिल २०१६ रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना हि महाराष्ट्र सरकार कडून राबवण्यात आलेली योजना आहे.या योजनेचा लाभ फक्त मुलीना मिळणार आहे.
महाराष्ट्र कन्या योजना काय आहे?
महाराष्ट्रात मुलींसाठी विविध योजना सुरु करण्याचा उद्देश म्हणजे.मुलीना चांगले शिक्षण घेता यावे.स्री भृणहत्या थांबावी,मुलीना चांगले आरोग्य मिळावे आणि बालविवाह थांबावे या साठी महाराष्ट्र सरकार ह्या योजना राबवत असते.
कर्नाटक भाग्यश्री योजना काय आहे?
कर्नाटक भाग्यश्री योजना हि एक अपघात संरक्षण प्रधान करते.ज्या मुली ह्या योजनेसाठी पात्र आहेत.त्यांच्या पालकांना १,००,००० रु- मुलीचा मृत्यू किंवा आकस्मित निधन झाल्यास या योजनेत पालकांना ४२,५०० दिले जातात.
भाग्यलक्ष्मी योजना कशी लागू करावी?
अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यलयातून भाग्यलक्ष्मी योजनेचा अर्ज चांगल्या प्रकारे भरून जमा करा.आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत कार्यलयात जमा करा.संबधित अधिकार्याकडून अर्जाची पडताळणी होईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना उद्दिष्टे काय आहे ?
१.बालिकेचा जन्मामध्ये वाढ करणे २.मुलीचे बालविवाह रोखणे आणि प्रतिबंध लावणे ३.मुलीना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे ४. मुलीच्या आरोग्याकडे लक्ष देणे ५.मुलींचे जीवनमान उंचवने व एक नवीन दिशा देणे ६.समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा आणि मुली आणि मुलांना समान वागणूक व स्थान देणे ७.गर्भ लिंग निवडीस प्रतिबंध करणे. हे सर्व प्रामुख्याने महत्वाचे उद्दिष्टे आहेत.
Geeta Sankara yadav
मला माझ्या मुलगी साठी लागत आहे