Mahajyoti JEE/NEET | महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना
Mahajyoti JEE/NEET Free Book Set
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०२४-२०२५ मध्ये JEE/NEET परीक्षापूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत पुस्तकांचा संच वाटप करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
नमस्कार प्रिय वाचक विद्यार्थी मित्रानो, आज आपण महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनाबदल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त आपण ह्या पोस्ट्द्वारे करणार आहोत.
Table of Contents
प्रस्तावना
मित्रानो असे अनेक विद्यार्थी असतात, त्यांना शिकण्याची व अभ्यासाची खूप आवड असते आणि त्यांचे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी तयारीहि असते . त्यामध्ये परिस्थिती आड येते. त्यामुळे मुलांना योग्य संधी मिळत नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मार्फत असे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्या संस्था मुलांना परीक्षापूर्व प्रशिक्षण हि देतात. आणि राहण्याचा खर्च व पुस्तकांचा खर्च हि देतात. तर आपण आज JEE/NEET परीक्षापूर्व तयारासाठी महाज्योती मार्फत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा संच त्यासाठी पात्रता ? कोणते कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आपण पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०२४-२०२५ मध्ये JEE/NEET परीक्षापूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत पुस्तकांचा संच वाटप करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण १०वी पास असाल आणि JEE/NEET परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येईल. जे आपण इच्छुक असाल तर लवकरात-लवकर अर्ज करा आणि ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. इतर हि गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ह्या योजनेबद्दल सांगा.
योजनेचे नाव | महाज्योती मार्फत JEE/NEET चा पुस्तकांचा संच वाटप |
सुरुवात | महाराष्ट सरकार |
विभाग | इतर मागास बहुजन समाज कल्याण विभाग, मुंबई |
लाभार्थी | JEE/NEET परीक्षापूर्व तयारी करणारे विद्यार्थी |
लाभ | पुस्तकांचा संच वाटप |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15-09-2024 |
संपर्क क्र | 0712-2959381 |
ई-मेल | mahajyotingp@gmail.com |
योजनेचे पात्रता:
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
- लाभार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी
- अर्जदार हा नॉन-क्रिमिलेअर उत्त्पन्न गटातील असावा/असावी.
- वर्ष 2024 मध्ये 10वी पास झालेले विद्यार्थी ह्या योजनेस पात्र आहेत
- अर्जदाराने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.(प्रवेश घेतल्यासंबधी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे)
- विद्यार्थ्याची ह्या योजनेसाठी निवड 10वी मध्ये प्राप्त झालेल्या गुणानुसार व समांतर आरक्षनानुसार करण्यात येईल)
- इ.10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्याकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त असावे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी हा शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे याची ओळख आधार कार्ड वर नमूद केलेल्या पत्तावून ठरवण्यात येणार आहे.
Mahajyoti JEE/NEET Free Book Set | महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (दोन्ही बाजुसाहित)
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)
- जातीचे दाखला(Cast Certificate)
- वैद्य नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- 10 वी चे मार्कशीट
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (Bonafide Certificate)
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
समांतर आरक्षण खालीलप्रमाणे राहील:
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित
- दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे
- अनाथासाठी 1% जागा आरक्षित आहे.
mahajyoti Free Book Set Scheme 2024
महत्वाच्या लिंक:-
अर्जाची लिंक | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
जाहिरात (Pdf) | क्लिक करा |
टेलिग्राम जॉईन करण्यासाठी | क्लिक करा |
असा करा अर्ज:-
- महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जा.
- Notice Board मधील JEE/NEET परीक्षाकरिता तयारी करणाऱ्या पुस्तक संच वाटप योजना यावर क्लिक करा.
- अर्ज हा काळजीपूर्वक व वाचून भरावा.
- अर्जासोबत सांगितलेले सर्व कागदपत्रे स्वक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे,
- आपल्याला अर्ज यशस्वी झाला असा sms येईल.
Cisf भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
अटी आणि शर्ती:-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/०९/२०२४ आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेल चा अर्ज स्वक्रला जाणार नाही किंवा अश्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- कोणत्याही माध्यामतून व अंतिम निवड प्रक्रीयाच्या दरम्यान उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड करण्यात येणार नाही किंवा अश्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची शंक किंवा अडचण येत असेल तर महाज्योतीच्या संपर्क क्र व ई-मेल च्या माध्यामतून संपर्क करावा.
संपर्क क्रमांक:- 0712-187012/21
Email id:- mahajyotingp@gmail.com
निष्कर्ष:-
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण JEE/NEET पूर्व परीक्षा अभ्यासासाठी महाज्योती मार्फत अगदी मोफत वाटप करण्यात येणाऱ्या पुस्तकांचा संच याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्त केला.या लेखात काही माहिती हि अपूर्ण हि असू शकते तर आपण अधिकृत माहिती पत्रकातून जाणून घेवून मगच योजनेसंबधी अंतिम निर्णय घ्यावा.
जर आपल्याला ह्या योजनेविषयी काही शंका किंवा समस्या असल्या तर आपण महाज्योतीच्या संपर्क क्रमांक किंवा ई-मेल वर संपर्क साधू शकता आपल्या शंकाचे नक्कीच निराकरण होईल.
उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रानो
महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनाची शेवटची तारीख काय आहे?
महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनानाची अंतिम तारीख १५/०९/२०२४ आहे .
महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET मोफत बुक संचासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET मोफत बुक संचासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.त्याची शेवटची तारीख १५/०९/२०२४ आहे.
महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET फ्री बुक संचासाठी कोणते कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड (दोन्ही बाजुसाहित)
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)
जातीचे दाखला(Cast Certificate)
वैद्य नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
10 वी चे मार्कशीट
विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (Bonafide Certificate)
दिव्यांग असल्यास दाखला
अनाथ असल्यास दाखला
महाज्योती संस्थामार्फत JEE/NEET फ्री बुक संचासाठी पात्रता काय आहे?
विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
लाभार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी
अर्जदार हा नॉन-क्रिमिलेअर उत्त्पन्न गटातील असावा/असावी.
वर्ष 2024 मध्ये 10वी पास झालेले विद्यार्थी ह्या योजनेस पात्र आहेत
अर्जदाराने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.(प्रवेश घेतल्यासंबधी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे)
विद्यार्थ्याची ह्या योजनेसाठी निवड 10वी मध्ये प्राप्त झालेल्या गुणानुसार व समांतर आरक्षनानुसार करण्यात येईल)
इ.10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्याकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त असावे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.