Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra Marathi | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबाना मिळणार वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण (Refill ) मोफत मिळणार आहे.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाबद्दल ह्या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेची वैशिष्टे काय? यासाठी पात्रता काय असेल ? कागदपत्रे कोणती लागतील? अर्ज ऑनलाईन कि ऑफलाईन? अर्ज कसा करायचा याबद्दल; सविस्तर माहिती आपण ह्या ब्लॉग च्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण हि पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.आपल्या शंका नक्कीच दूर होतील.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
उद्दिष्टे | महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्री सक्षमीकरण करणे |
पात्रता | प्रधानमंत्री उज्वला योजनामध्ये पात्र असलेले व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे |
लाभ/अनुदान | दर वर्षी ३ गॅस सिलेंडर Rifill मोफत |
अधिकृत संकेतस्थळ | ———————– |
चला आपण योजनेबद्दल जाणून घेवू मित्रानो |
प्रस्तावना
नमस्कार मित्रानो, तुम्हाला तर माहितच आहे पावसाळी अधिवेशन मध्ये विविध योजनाची घोषणा केली. त्यापैकी महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय.या योजनेतून पात्र कुटुंबाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडर अगदी मोफत देण्यात येणार आहेत.मित्रानो आपण जर सर्व साधारण कुटुंबातील किंवा शेतकरी कुटुंबातील असणार तर तुम्हाला चांगलच माहिती असेल कि आपली आई, बहिण आणि पत्नी चुल्यावर स्वयंपाक करते त्या धुरामुळे महिलांना खूप त्रास होत असतो.उज्वला योजना मध्ये प्रत्येक कुटुंबाला मोफत किवा अल्प दरात गॅस देण्यात आला पण आपल्या भारत देशात अनेक असे कुटुंब आहेत कि ते गॅस सिलेंडर भरू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी महिलांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेसाठी यथे क्लिक करा|
Annapurna Yojana Maharashtra Marathi | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 उद्देश म्हणजे देशातील स्रियांना धुरमुक्त वातावरण जगता यावे, देशातील गरीब कुटुंबाना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांचे आरोग्यमानात सुधारणा करून स्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजना सन- २०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती, आपण जे बघितले सध्या बाजार भावात सिलेंडर खूपच महाग आहे अश्यात सर्वसाधारण कुटुंबाना न परवडणारे आहे.त्यामुळे हि योजना प्रधानमंत्री उज्वला गॅस मोफत जोडणी आणि ज्या कुटुंबाना आर्थिक दृष्ट्या त्याची परिस्थिती नाही म्हणून ते सिलेंडर भरू शकत नाहीत अश्या गरीब प्रवर्गातील कुटुंबासाठी असतील,कारण एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकासाठी दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे. यामुळे वृक्षतोड हि वाढतेय व यामुळे पर्यावरणाची हानी आणि नुकसान होत आहे.म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
Annapurna Yojana Maharashtra Marathi | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
शासन निर्णय
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण ( Refil) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” या नावाने राबविण्यात येणार आहे तर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
Annapurna Yojana Maharashtra Marathi | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
लाभार्थ्याची पात्रता
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी हि अर्जदार महिलेच्या नावाने असणे अनिवार्य आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभ घेतलेले लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिंण योजनेस पात्र आहेत अश्या महिला लाभार्थीच्या कुटुंब योजनेस पात्र असेल.
- एका कुटुंबात ( रेशन कार्डनुसार ) केवळ ह्या योजनेच एकच लाभार्थी पात्र राहील.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ केवळ १४,२ K.G गॅस सिलेंडर जोडणी असलेल्याना हा लाभ देय राहील.
- या शासन निर्णयाप्रमाणे दि.०१ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेच्या लाभ मिळेल.
- दिनांक: ०१ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेले रेशनकार्ड धारक ह्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती:
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ३ मोफत गॅस सिलेंडर हे तेल कंपनीकढून वितरीत करण्यात येईल.
- ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनासाठी खालीलप्रमाणे अनुसरावयाची कार्यपद्धती:
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते.
- आताच्या घडीला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गतची बाजारभावाची सिलेंडर रक्कम (सरासरी रु.८३०/-) ग्राहकाकडून घेतली जाते.त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येर्णारी (रु.३००/-) सबससडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- त्याच धतीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाककडे द्यावयाची अंदाजे रू.530/- प्रती सिलेंडर, इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी.
- तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सीलेंडरसाठी सबसीडी देण्यात येर्णर नाही.
शेतीविषयी योजनेसाठी येथे क्लिक करा|
Annapurna Yojana Maharashtra Marathi | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कागदपत्रे खालीलप्रमाणे
- आधार कार्ड
- बँक खाते (आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला पुरावा(रिफील बुक)
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्याची पोचपावती
- रेशन कार्ड
- 2 पासपोर्ट फोटो
- चालू मोबाईल क्रमांक
महत्वाची सूचना:
- मित्रानो आम्ही आपल्याला प्रदान करत असेलेली माहिती विविध स्रोताद्वारे देत असतो.त्यामुळे आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबधित वेबसाईट किंवा माहिती पत्रकातून काही गोष्टी पडताळूनच निर्णय घ्यावा.
- योजनेची पात्रता: प्रत्येक सरकारी योजनेसाठी सरकारने काही पात्रता आणि निकष ठरवलेले असतात.त्यामुळे ते संपूर्ण सरकारच्या माहिती पत्रकानुसार असते.
- नियम आणि अटी: प्रत्येक योजनेचे नियम व अअति काळजीपूर्वक वाचून मग निर्णय घ्यावा.
- योजनेच्या अर्ज: योजनेच्या अर्ज आपण संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता किंवा संबधित कार्यलयात ह्या योजनासंबधी अधिक माहिती मिळवू शकता.
निष्कर्ष:-
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाबदल सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्त केला तरीही आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हला comment च्या माध्यमाने विचारू शकतात.आम्ही लवकरात-लवकर आपल्या शंका किंवा प्रश्नाचे लवकरच निराकरण करण्याचा प्रयन्त करू.आपल्याला एक छोटीशी विनंती आहे कि योजनाची माहिती जास्तीत-जास्त शेअर करा कारण आपल्यामुळे एखाद्या गरजू आपल्यामुळे एखाद्या गरजू लाभार्थ्याला फायदा होईल.धन्यवाद….
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हि शासनाद्वारे राबवण्यात येणारी महत्वाची योजना आहे.ह्या योजनेमध्ये लाभार्थी कुटुंबाला दर वर्ष ३ सिलेंडर(रिफील) अगदी मोफत मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय आहे?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश महिला चुल्यावर स्वयंपाक करत असताना धुराचा त्रास होतो.तो कमी करून महिलांचे आरोग्य सुधारणे व महिला सक्षमीकरण करणे हाच प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ह्या सदर योजनेसाठी पात्र आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा कोणाला घेता येईल?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ ज्या महिला सदस्याचा नावाने गॅस कनेक्शन आहे त्याच कुटुंबातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती सदस्यांना मिळेल?
प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सदर योजनेचा लाभ मिळेल.जर १ जुलै २०२४ च्या अगोदर रेशन कार्ड विभक्त केलेले असेल तर अश्या वेल्ग्या झालेल्या पर्विवातील महिला स्वतंत्रलाभ घेवू शकता.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र आहे?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ केवळ १४,२ K.G गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या हा लाभ देय राहील.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय आहे?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी हि अर्जदार महिलेच्या नावाने असणे अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभ घेतलेले लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिंण योजनेस पात्र आहेत अश्या योजनेस ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाना योजनेस पात्र असेल.
एका कुटुंबात ( रेशन कार्डनुसार ) केवळ ह्या योजनेच एकच लाभार्थी पात्र राहील.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ केवळ १४,२ K.G गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या हा लाभ देय राहील.
या शासन निर्णयाप्रमाणे दि.०१ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेच्या लाभ मिळेल.
दिनांक: ०१ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेले रेशनकार्ड धारक ह्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
आधार कार्ड
बँक खाते (आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला पुरावा(रिफील बुक)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्याची पोचपावती
रेशन कार्ड
2 पासपोर्ट फोटो
चालू मोबाईल क्रमांक
Mukhyamantri aanpurna yojana