Ayushman Bharat Yojana 2024 | आयुष्मान भारत योजना २०२४
आयुष्मान भारत कार्ड असेल तर आपला मोफत होणार उपचार.५ लाखापरेंत मोफत उपचार व शस्रक्रिया करण्यात येईल.
आयुष्मान भारत कार्ड २०२४
प्रस्तावना:
नमस्कार मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपण आपल्या वेबसाईट वर नेहमी राज्यसरकार आणि केंद्रसरकारच्या योजना ह्या घेवून येत असतो.अश्याच प्रकारे आपण आज आयुष्मान भारत हि योजना बघणार आहोत.Ayushman Bharat cardआयुष्मान भारत योजनेची पात्रता,वैशिष्टे ,उद्देश आणि कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून घेणार आहोत.
चला तर मित्रानो आज आपन आज आयुष्मान भारत योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बघणार आहोत.
आयुष्मान भारत योजना ह्या योजनेलाच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे हि म्हणतातAyushman Bharat card(PMJAY).आयुष्मान भारत हि एक सरकारची राष्ट्रीय जन आरोग्य विमा योजना आहे,ह्या योजनेचा उद्देश असा कि देशातील गोर-गरीब ,वयस्कर व्यक्ती ,अपंग आणि वंचित घटकांना मोफत आरोग्य विमा योजना प्रधान करते.म्हणूनच या योजनेला जन आरोग्य योजना असे हि म्हणतात.
आयुष्मान भारत हि योजना केंद्रसरकार ची योजना आहे.आयुष्मान भारत हि योजना २०१८ मध्ये सुरु करण्यात आली.केंद्र शासनामार्फत राज्यात आरोग्य सेवांमधील समस्याचे निराकरण करण्यासाठी आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र.अश्या सर्व आरोग्यवर्धिनि केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकांना वेगवेगळ्या प्रकाच्या प्रतिबंध,प्रसारक,उपचारात्मक ,पुनर्वसनात्मक आणि उपशामक वृध्दापाकालीन काळजी घेणे असे अनेक उपक्रम आयुष्मान भारत कार्ड मधून लाभार्थ्याला मिळणार आहे.आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत जन आरोग्य सेवा देण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावणे आणि आरोग्यावर परिणाम करणारे सामाजिक व पर्यावरणात्मक घटक यांच्यासाठी एकत्रित सामुदायिक कृतीवर लक्ष केंद्रित करणे,सामाजिक व सामुहिक प्रतीसादाच्या प्रक्रियेस सहाय्य करणे असे अपेक्षित उद्दिष्टे हे आयुष्मान भारत कार्ड याचे आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्राथमिक केंद्र व उपकेंद्र यांची आरोग्यवर्धिनी केंद्रात रुपांतर करून.समितीची रचना व कार्यपद्धती मध्ये सुधारणा करणे व उपकेंद्रा स्तरावरील बळकटीकरण समिती ऐवजी जन आरोग्य समिती निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.त्यामुळे Ayushman Bharat cardआयुष्मान भारत कार्ड हि योजना सुरु करण्यात आली.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना(PMJY) उद्दिष्टे:
१.दारिद्य रेषेखालील कुटुंबाना वैदकीय खर्चाची हमी देणे.
२.भारतातील प्रत्येक व्यक्तीला ५ लाखाचा विमा प्रदान करणे.
३.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनामध्ये मोठ्या शस्रक्रिया जसे हृदयरोग,कर्करोग आणि किडनी अश्या आजाराचा समावेश.
४.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना हि महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजना ह्या एकत्रित राबवण्यात येतील.
५.जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ९७१ सेवाव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा या योजनेमध्ये कुटुंबाना मोफत मिळतील.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ:
- आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थीला प्रत्येक वर्ष ५ लाखाचा विमा प्रदान करते.
- लाभार्थी आयुष्मान भारत योजनेचा लाभ हा खाजगी आणि सरकारी ह्या दोन्ही मध्ये घेवू शकतो.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि कॅशलेस आहे.म्हणजेच उपचारादरम्यान खर्च विमा कंपनीद्वारे थेट दिला जातो.
- विमा रक्कम खर्चिक वैदकीय उपचारासाठी,जसे कि हृदयरोग,कर्करोग ,किडनी रोग आणि इतर शस्रक्रिया ह्या योजनेमधून केलाय जातील.
- आयुष्मान भारत योजनेचा उद्देश प्रत्येक भारतीय व्यक्तीला आरोग्य संरक्षण करणे हा आहे.
आयुष्यमान भारत कार्ड:Ayushman Bharat card
- पत्र लाभार्थ्याला आयुष्मान भारत कार्ड दिले जाते.
- हे कार्ड रुग्णलयात उपचार दरम्यान ओळखपत्र म्हणून वापरता येत.व उपचार पूर्ण झाल कि वैदकीय रिपोर्ट सादर करून थेट जन आरोग्य विमा योजनाकडून लाभ हा दिला जातो.
आयुष्मान भारत कार्डसाठी वेबसाईट येथे क्लिक करा !
आयुष्मान भारत योजना पात्रता:
१.अर्जदार हा भारतीय असला पाहिजे.
२.अर्जदाराकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
३.बँक खाते असले पाहिजे(आधार कार्ड लिंक)
४.आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र होण्यासाठी कुटुबांचे उत्पन्न हे १ लाखापेक्षा जास्त असू नये.
५.आयुष्मान भारत हि योजना फक्त विमा प्रधान करते.
आयुष्मान भारत कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे:
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र होण्यासाठी आपल्या कडे खालील प्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
१.आधार कार्ड(आधार कार्ड नसल्यास जन्म प्रमाणपत्र आणि राशन कार्ड हि चालेल)
२.मनरेगा जॉब कार्ड
३.बँक पासबुक
४.उत्पनाचा दाखला(१ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नको)
५.अपंग प्रमाणपत्र(दिव्यांग व्यक्तीसाठी)
६.वरिष्ठ नागरिकासाठी ओळख पुरावा
७.जन्म प्रमाणपत्र(मुलांसाठी)
८.पासपोर्ट फोटो (२)
९.मोबाईल क्रमांक
वरील कागदपत्रे आपण एकदा संबधित कार्यलयात जाऊन चेक करून घ्या.आणि अजून माहिती मिळवून आपला फॉर्म हा भरा.
आयुष्मान भारत कार्ड साठी खालीलप्रमाणे फॉर्म भरा.
आयुष्मान भारत कार्डसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.खालीलप्रमाणे प्रोसेस करा !
ऑनलाईन अर्ज:
१.https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintcard ह्या वेबसाईट ला भेट द्या.
२.आयुष्मान भारत योजना अंतर्गत अर्ज करा बटनावर क्लिक करा.
३.त्यांनतर आपल्यासमोर आयुष्मान भारत योजनेचा फॉर्म चे पेज उघडेल तिथे आवश्यक ती माहिती भरा जसे कि आधार कार्ड नंबर वैयक्तिक माहिती भरा.
४.सत्यापित करा बटनावर क्लिक करा.
५.नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वर OTP येईल.OTP टाका आणि सत्यापित बटनावर क्लिक करा.
६.अर्ज फॉर्म दिसेल त्याठिकाणी आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
७.आपला फॉर्म व्यवस्थित सबमिट झाला का ते चेक करा आणि माहिती एकदा बघून घ्या.
८.त्यानंतर जमा करा ह्या बटनावर वर क्लिक करा.
९.आपला फॉर्म व्यवस्थित सबमिट झाला का ते चेक करा आणि माहिती एकदा बघून घ्या.
९.सर्वात शेवटी तुमच्या नोंदणीकृत नंबर आणि ई-मेलद्वारे वर अर्ज क्रमांक आणि पावती पाठवली जाईल.
ऑफलाईन अर्ज:
१.जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या नाहीतर सरकारी दवाखान्यात जा.
२.आयुष्मान भारत योजनेचा अर्ज घ्या.
३.अर्ज वाचून आवश्यक ती माहिती भरा.
४.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
५.अर्जाला फोटो लावा.
६.अर्ज वर स्वतःची स्वाक्षरी करा आणि अंगठा असेल तर अंगठ्याचा ठसा ठेवा.
७.अर्ज हा CSC कर्मचाऱ्याकडे जमा करा.
८.जमा केल्याची अर्ज पोहच पावती घ्या.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपल्या वेबसाईट वर आपण केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांच्या योजना घेवून येत असतो.आमच्या वेबसाईट चा उद्देश एकच कि प्रामाणिकपणे माहिती हि लाभार्थ्यापरेंत पोहचली पाहिजे.आणि प्रत्येक गोर-गरीब ,वंचित ,दुर्बल आणि अपंग व्यक्तींना ह्या Ayushman Bharat cardयोजनाच्या लाभ मिळाला पाहिजे.
प्रधानमंत्री रोजगार योजेनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा !
आज आपण आयुष्मान भारत योजना बघितली ह्या योजनेलाच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असे हि म्हणतात व महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना म्हणून ओळखतात.महात्मा फुले जनआरोग्य योजनासाठी केंद्रसरकार च्या तत्वानुसार हि योजना महाराष्ट्रामध्ये सुरु आहे.तर मित्रानो आपल्याला जर काही अजून प्रश्न असतील तर आम्हाला comment मध्ये आपण विचारू शकतात.आम्ही आपल्या प्रश्न किंवा समस्याचे लवकरच निराकरण करू.धन्यवाद.
आपल्याला एक छोटी सूचना आहे कि कोणत्याही योजनाचा संदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा संबधित वेबसाईट पडताळून मगच निर्णय घ्यावा.नाहीतर नजीकच्या केंद्राशी संपर्क साधावा.आम्ही फक्त एक मार्गदर्शक म्हणून आपल्यासाठी योजना ह्या घेवून येत असतो.
आयुष्मान भारत योजना पात्रता काय आहे?
गरीब आणि कमी मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांचा सामावेश आहे.आरोग्य योजनेद्वारे प्रती कुटुंब ५ लाख रुपये विमा प्रदान केला जातो. कुटुंबात १६ ते ५९ वर्ष वयोगटातील कमवता प्रौढ सदस्य नाही .१६ ते ५९ वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेल्या महिला सदस्याच्या नेतृत्वाखालील कुटुंबे.
आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी किती दिवस लागतात ?
आपला अर्ज हा पात्र ठरल्यानंतर.आपला अर्ज हा पात्र असेल तर लगेच आपल्याला आयुष्मान कार्ड हे मिळून जाईल.
आयुष्मान कार्ड यादीमध्ये नाव कसे जोडावे ?
CSC वर,तुमचा आयुष्मान भारत कार्ड सूचीमध्ये नवीन सदस्य जोडण्यासाठी अर्जाची विनंती करा.CSC operater कडे आवश्यक कागदपत्रा असलेला अर्ज जमा करा.CSC ऑपरेटर हा सर्व कागदपत्राची पडताळणी व अर्ज चेक करून आपल्याला एक पोचपावती देईल.
आयुष्मान भारत कधी सुरु झाली?
भारत सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २३.०९ वाजून २०१८ मध्ये सुरु करण्यात आली.आयुष्मान भारत हि योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे.
आयुष्मान भारत हेल्थ कार्ड कसे तयार करावे?
आयुष्मान भारत वेबसाईटला भेट द्या,आणि आयुष्मान भारत योजनेवर क्लिक करून,तुमचा आधार क्रमांक टाका आणि क्लागेच तुम्हाला Otp येईल.Otp आल्यावर Verify करा.आणि संपूर्ण माहिती भरा आणि जमा करा बटनावर क्लिक करा.
आयुष्मान कार्डसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत?
१.आधार कार्ड biometric साठी.२.रेशन कार्ड ३.उत्पनाचा दाखला अजून कागदपत्रे जाणून घेण्यासाठी आयुष्मान भारत वेबसाईटला भेट द्या.
आयुष्मान भारत आणि PMJAY एकच आहेत का ?
आयुष्मान भारत अंतर्गत दुसरा घटक म्हणजे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना किंवा (PMJAY) होय.
महाराष्ट्रासाठी आयुष्मान सारखी कोणती योजना आहे/
महात्मा फुले जनआरोग्य हि योजना आयुष्मान भारत योजनेंतर्गत आहे.म्हणजेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना च्या तत्वानुसार हि योजना चालते