
ईअर टॅगिंग |Cattle Ear Tagging |राज्यातील पशूधनांना ईअर टॅगिंग बंधनकारक का करण्यात येतंय,ईअर टॅगिंग विषयी जाणून घ्या|
नमस्कार मित्रानो आपले आपल्या मराठी वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे.आज आपण ईअर टॅगिंग म्हणजे काय?आणि ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे का? ईअर टॅगिंग चे फायदे काय आपण ह्या पोस्ट मध्ये सविस्तर बघणार आहोत.भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे.शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.सध्या जर आपण बघितले तर शेतकरी राज्यावर विविध संकट येत असतात.गारपीट ,अवकाळी पाऊस काही मानवनिर्मित संकट,अतिवृष्टी आणि दुष्काळ अश्या विविध समस्यांना शेतकरी हा सामोरे जात असतो.म्हणून शेतकरी हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन,कोंबडी पालन आणि गाय म्हशी असे प्राणी यांच्यापासून मिळणारे उत्पन्न त्यावर आपल्या कुटुंबाचा गरजा ह्या पूर्ण करत असतो.तर आपण ह्या पोस्ट मध्ये आपण ईअर टॅगिंग विषयी जाणून घेणार आहोत.
ईअर टॅगिंग म्हणजे आपण गुरांना पिवळा कलर चा जो बिल्ला मारलेला असतो त्याला आपण कानटोचून त्यामध्ये आपण तो पिवळा कलर चा बिल्ला लावत असतो त्यालाच आपण ईअर टॅगिंग असे म्हणतो.मित्रानो हो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि ईअर टॅगिंग चा फायदा काय?तर मित्रानो आपण जर बघितले तर जनावरे चोरी करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ईअर टॅगिंग असेल तरच पशूची विक्री होईल.यामुळे काय होईल चोरी गेलेली आपले पशू असतील ते आपल्याला परत मिळू शकतात.कारण ईअर टॅगिंग हा नोंदणीकृत असेल त्यामुळे पशूची माहिती तत्काळ मिळेल आणि यामुळे पशु चोरीला जाने थांबेल.ह्या मध्ये जर आपण बघितले जेव्हा पशुवर साथीचे आजार येतात तेव्हा लसीकरण करण्यासाठी फायदा होईल.जेणेकरून आजारावर मात करता येईल. ईअर टॅगिंगशिवाय पशूची खरेदी विक्री करता येणार नाहि. तसेच पशुधनास पशु -वैद्यकीय दवाखान्यामधून उपचाराची सेवाही दिली जाणार नाही.
इअर टॅगिंग केल्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचे आदेश हे राज्यसरकार नि दिले आहेत.त्यासाठी काही दिवसाची मुदत दिली आहे.जर आपण इअर टॅगिंग केले नसल्यास पशूची खरेदी-विक्री करता येणार नसल्याचे शासनाने आदेशात स्पष्ट सांगितले आहे.याबाबत आदेश पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी काढले आहे.
इअर टॅगिंग काय आहे?
- इअर टॅगिंग करून १२ अंकी बारकोड नंबर मिळेल
- इअर टॅगिंगमुळे पशूंच्या सर्व नोंदी ह्या सहज उपलब्ध होईल
- जन्म-मृत्यू ची नोंदणी
- लसीकरण केल्याची नोंदणी जाणून घेता येईल
- इअर टॅगिंगमुळे मालकी हस्तारांचा समावेश होईल
- साथीचे आजार आणि संसर्ग होता यामुळे जनावराची नोंद राहिल यामुळे इअर टॅगिंग हे राज्यसरकार ने बंधनकारक केले आहे
इअर टॅगिंग चे महत्व:-
पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी.कारण साथीचे रोगाचे अंदाज व त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी इअर टॅगिंगइर(पशूंचा कानात बिल्ला)लावणे सरकार ने बंधनकारक केले आहे.
1.जर आपल्या पशूना इअर टॅगिंग केलेलं नसेल आणि आपण जर वाहतूक करत असाल तर संबधित वाहतूकदर आणि जनावरच्या मालकावर कारवाई होईल.
२. इअर टॅगिंग नसेल तर आपल्याला सरकारी पशुवैद्कीय सेवा मिळणार नाही.
३. इअर टॅगिंग नसेल तर जनावरांची खरेदी-विक्री होणार नाही.
४.जर एखाद्या वेळेस नैसर्गिक संकट आले जसे कि वीज पडणे,गारपीट होणे,वारा-वादळ ह्या मुले जर जनावर मरण पावले आणि त्याला आपण इअर टॅगिंग
केलेले नसेल तर संबधित मालकाला नुकसान भरपाई मिळणार नाही.
महाराष्ट्र सरकारी योजनेची अधिक माहिती जाणून घ्या|
इअर टॅगिंग चे फायदे:-
- इअर टॅगिंगमुळे जेव्हा पशु चोरीला जाते तेव्हा इअर टॅगिंग मुले पशु सापडण्यात मदत होईल.
- इअर टॅगिंग जर आपण जे केलेली असेल तर आपल्याला पशुवैद्कीय सेवा मिळेल व आपल्या पशुचा उपचार हि होईल.
- नैसर्गिक आपत्ती जसे कि वीज कोसळणे,प्राण्याच्या हल्ल्यामुळे आणि गारपीट यामुळे जर पशु मरण पावले तर आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकेल.
- इअर टॅगिंगमुळे खरेदी-विक्री यांची नोदणी करायला हि सोप जाईल व आपल्या बिल्ला क्रमांक वर आपल्या पशु ची नोंद असेल.तर ह्या सर्व गोष्टी सोप्या जातील.
इअर टॅगिंग करण्यासाठी जवळच्या पशुवैद्कीय दवाखान्यात संपर्क करावा.
- दिव्यांगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | Divyang Yojana In Marathi 2024 | असा करा अर्ज
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना |Ahilyabai Holkar Scheme In Marathi 2025
- अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension Yojana In Marathi
- PM Mudra Yojana Online Application | प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी
- IDBI बँकमध्ये 600 जागांसाठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु |IDBI Bank Bharti 2024