E-Shram Card Online Registration | ई-श्रम कार्ड मुळे कामगारांना मिळणार अनेक सुविधा |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

E-Shram Card Online Registration | ई-श्रम कार्ड मुळे कामगारांना मिळणार अनेक सुविधा |

E-Shram Card Online Registration

देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आणि मजुरांना एकत्र आणण्यासाठी ई-श्रम कार्ड हि योजना सुरु करण्यात आली|

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण ई-श्रम कार्ड योजनेबद्दल जाणून घेणार ई-श्रम कार्ड कोणाला काढता येईल.पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागतील हे आपण सविस्तरपणे ह्या पोस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

ई-श्रम कार्ड हे देशातील असंघटीत कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिले जाते.श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम कार्ड हे सुरु केले.आधारसह सर्वसमावेश “असंघटित कामगाराचा राष्ट्रीय डेटाबेस” तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आता पर्यंत 30 कोटीच्या वरती असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केली आहे.ह्या कार्ड धारकाला/नोंदणीकर्त्याला अपघाती विमा किंवा जोखीम कव्हरेज जाहीर केले जाईल.यामुळे ई-श्रम कार्डचे अनेक फायदे हे कामगारांना होतील त्यामुळे प्रत्येक कामगारांनी हे कार्ड काढणे गरजेचे आहे.

योजनेचे नाव ई-श्रम कार्ड योजना
सुरुवात 26 ऑगस्ट 2021
विभाग श्रम आणि रोजगार मंत्रालयान
योजनेचा उद्देश असंघटित कामगाराचा राष्ट्रीय डेटाबेस” तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु करणे
लाभार्थी असंघटित कामगार
लाभ अपघात/मृत्यू झाल्यास सुरक्षा व आर्थिक सहाय्य प्रदान करणे
संपर्क क्र —————-
अधिकृत संकेतस्थळ https://eshram.gov.in/
महत्वाच्या लिंक
ई-श्रम काढण्यासाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक क्लिक करा
E-Shram Card

ई-श्रम कार्डचे फायदे कोणाला मिळणार

  • असंघटित कामगार
  • रस्त्यावर विक्रेते म्हणून काम करणारे (उदा.भाजीपाला )
  • बांधकाम साईटवर काम करणारे
  • रिक्षा चालक (ओला,उबेर)
  • सुतार
  • मच्छिमार
  • मध्यान्ह भोजन सुविधा देणारे
  • चिंध्या पिकवणारे
  • शेतीचे संबधित काम करणारे
  • अशे कामगार ज्याचे मासिक उत्पन्न हे रु.१५,०००/- पेक्षा कमी आहे अशे कामगार ह्या योजनेस पात्र आहेत.

Benefits Of Scheme

योजनेचे फायदे :-

  • ई-श्रम हि योजना पोर्टलवर नोंदणीकृत असंघटीत कामगारांनाच अपघाती मृत्यू/अपंगत्वावर लाभ दिला जातो.
  • ई-श्रम कार्डमुळे विमा प्रदान केला जातो.
  • ई-श्रम कार्ड दुर्दैवी झालेली घटना/अपघात अश्या आकस्मित झालेल्या घटनांना ई-श्रम कार्ड सुरक्षा व विमा प्रदान करते.

ई-श्रम कार्ड हे असंघटित कामगारांचा अपघात झाल्यावर मिळणारा लाभ हा खालीलप्रमाणे

अ.क्रमृत्यू/अपंगत्वविम्याची रक्कम
१.अपघातामुळे मृत्यूरु.2 लाख
२.दोन्ही डोळ्यांचे झालेले व न भरून निघणारे नुकसानअपघातामुळे दोन्ही हात-पाय गमावलेले  अपघातामुळे एक हात-पाय निकामी होणे व न भरून निघणारे नुकसान अपघातामुळे एका डोळ्याची दृष्टी कमी होणे आणि एक हात व पाय निकामी होणेरु.2 लाख
३.अपघातामुळे एक डोळा कायमचा निकामी होणेएक हात किंवा एक पाय काम निकामी होणेरु.1 लाख
E-Shram Card Online Registration | ई-श्रम कार्ड मुळे कामगारांना मिळणार अनेक सुविधा |

बांधकाम कामगारांनाच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |

ई-श्रम कार्ड वरील मिळणारे आर्थिक सहाय्यसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

मृत्यू झाल्यावर आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (अपघात झालेल्या कामगाराच)
  • UAN Card/Number
  • मृत्यू सर्टिफिकेट
  • मेडिकल सर्टिफिकेट
  • FIR/पंचनामा (अपघात झाल्याच्या ठिकाणचा)
  • पोस्ट मोर्टेम रिपोर्ट

अपघात झाल्यानतर आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • UAN कार्ड नंबर(ई-श्रम कार्ड नंबर)
  • दवाखाना रिपोर्ट व सर्व कागदपत्रे
  • अपंगत्व सर्टिफिकेट
  • युनिक डीसाबिलीटी ओळख पत्र

अजून आवश्यक कागदपत्रे व लागणारे कागदपत्रे आपण ह्या संबधित कार्यलय येथून अधिक माहिती जाणून घ्या.

अश्या प्रकारे करा ई-श्रम कार्ड नोंदणी

वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला समोर से पेज दिसेल |

E-Shram Card

आपल्याला Register On eshram वर क्लिक करा |

E-shram Card

त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक टाका |

e-shram Card Registration

आधार कार्ड नंबर

आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक जवळ ठेवा कारण त्यावर 2 वेळेस Otp येतो.आपल्याला तो otp वेळेत टाकायचा असतो.

  • ई-श्रम पोर्टल ला भेट द्या
  • Self Registration असे दिसेल
  • पोर्टल वर आपला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका
  • तुम्हाला नंबर वरती OTP येईल
  • OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा
  • आपला आधार क्रमांक टाका
  • परत आपल्याला OTP येईल
  • OTP टाकल्यानंतर परत सबमिट करा
  • सर्व आवश्यक माहिती भरा आपले ,नाव व पत्ता
  • ई-श्रम कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड
  • एकदा आपण भरलेला संपूर्ण अर्ज्ज तपासून घ्या माहिती बरोबर असल्याची खात्री करा
  • सबमिट बटनावर क्लिक करा|
  • आपले ई-श्रम कार्ड आपल्या समोर बनवून येईल.
  • डाउनलोड बटनावर क्लिक करा
  • आपले ई-श्रम कार्ड प्रिंट करून आपले जवळ ठेवा.
  • अश्या प्रकारे संपूर्ण प्रोसेस करून आपण फक्त 5 मिनिटामध्ये आपले ई-श्रम कार्ड बनवू शकता.अशीच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला whatsapp ग्रुप जॉईन करा आणि हि माहिती इतरांना हि शेअर करा.

Conclusion

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, शेतकरी व कामगार बांधवानो आज आपण ई-श्रम E-Shram Card Online Registration बद्दल जाणून घेतले ह्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतील? अपघात किंवा मृत्यू झाल्यास कोणते कागदपत्रे हे संबधित अपघात किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला सादर करावे लागतील याची संपूर्ण माहिती आपण बघितली. ह्यामध्ये काही माहिती हि अपूर्ण हि असू शकते यामुळे आपण अधिक माहिती हि अधिकृत वेबसाईटद्वारे जाणून घेवू शकता. हि माहिती इतर कामगारांना हि शेअर करा कारण आपल्या मुळे एखाद्या कामगारांचा हि फायदा होईल.धन्यवाद मित्रानो….

ई-श्रम कार्ड नेमक आहे काय ?

ई-श्रम कार्ड हे देशातील असंघटीत कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिले जाते.श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम कार्ड हे सुरु केले.आधारसह सर्वसमावेश “असंघटित कामगाराचा राष्ट्रीय डेटाबेस” तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आता पर्यंत 30 कोटीच्या वरती असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केली आहे.

ई-श्रम चा फायदा काय ?

कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला किंवा अपघाती अपंगत्व आले तर श्रम व कामगार मंत्रालयातर्फे कामगारांना विमा प्रदान केला जाता त्यासाठी आपल्याला क्लेम करावा लागतो आणि आपला मृत्यू किंवा अपंगत्वानुसार रु.१ लाख ते रु.२लाख दरम्यान केले जाते.

असंघटित कामगारांचा मृत्यू झाला असल्यास कोणते कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड (अपघात झालेल्या कामगाराच)
UAN Card/Number
मृत्यू सर्टिफिकेट
मेडिकल सर्टिफिकेट
FIR/पंचनामा (अपघात झाल्याच्या ठिकाणचा)
पोस्ट मोर्टेम रिपोर्ट अशे सर्व कागदपत्रे सादर करावे लागतात.

कामगारांचा अपघात झाला असेल तर ई-श्रम कार्ड आर्थिक सहाय्य साठी कोणते कागदपत्रे लागतात?

आपल्याला खालीलप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागता.
आधार कार्ड
UAN कार्ड नंबर(ई-श्रम कार्ड नंबर)
दवाखाना रिपोर्ट व सर्व कागदपत्रे
अपंगत्व सर्टिफिकेट
युनिक डीसाबिलीटी ओळख पत्र

ई-श्रम कार्डचे फायदे कोणाला मिळू शकतात?

ई-श्रम कार्डचे फायदे रस्त्यावर विक्रेते म्हणून काम करणारे त्यात भाजीपाला किंवा रोडवर बसणारे छोटे-मोठे विक्रते, शेतीशी संबधित काम करणारे ,मध्यान्ह भोजन, रिक्षा/ओटो व्हीलर, चिंद्या चीपकवनारे, बाधकाम साईटवर काम करणारे सुतार काम करणारे , मच्छीमारांना ज्यांचे उत्पन्न रु.१५,०००/- पेक्षा कमी आहे अश्या कामगारांना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment