गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२३-२०२४|Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana marathi
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२३-२०२४|Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana marathi
प्रस्तावना
जंतुनाशक हाताळताना झालेला अपघात,विजेचा धक्का,वीज पडून झालेला अपघात,पाण्यात बुडून झालेला अपघात,सर्पदंश,रस्ता आणि रेल्वे मध्ये झालेला अपघात अश्या शेतकऱ्यांना २,००,००० लाख रुपये सरकार देणार.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईट मध्ये.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.शेतकरी मित्रानो आपण नेहमी नव-नवीन योजना ह्या आपल्या वेबसाईट वर घेऊन येत असतो.कारण प्रत्येक शेतकरी बांधवाना लाभ घेता आला पाहिजे कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये हा आमचा प्राथमिक उद्देश आहे.राज्यसरकार आणि केंद्रसरकार नेहमी शेतकरी बांधवांसाठी विविध योजना ह्या राबवत असतो.पण आपण जर बघितल्या ह्या योजना दुर्गम भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल तिथे प्रसार माध्यम कमी प्रमाणत असतात.अश्या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवाना योजनेची माहिती मिळत नाही.पण आपण जर ह्या आधुनिक काळात बघितले तर दुर्गम भाग असो कि ग्रामीण भाग असो स्मार्ट फोन आता प्रत्येकाकढे असतात.त्यामुळे ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या परेंत माहिती पोहचवण्याच्या प्रामाणिक प्रयन्त आम्ही करत असतो.आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे,पाण्यात बुडून मृत्यू होणे,सर्पदंश,विजेचा धक्का बसणे आणि रस्त्यावरील अपघात यामुळे अनेक कारणामुळे मृत्यू ओढ्वितो किंवा अपंगत्व येते.घरातील करता व्यक्ती गेल्यास कुटुंबावर आर्थिक ताण पडतो.कुटुंबाचे उत्पनाचे साधन बंद होते व अडचणीची परिस्थिती ओढवते अशा वेळेस केंद्रसरकार आणि राज्य सरकार मद्दत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हि योजना राबवत आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा अर्थव्यवस्था चा कणा आहे.आपण जर बघितले तर भारतात शेतीवर ९०% लोक हे अवलंबून आहेत.शेतीव्यवसायाकडे पारंपारिक व्यवसाय म्हणून बघितले जाते.उपजीविकेचा साधन म्हणून शेतीकडे बघितले जाते.शेतीवर लाखो कुटुंब हे अवलंबून आहेत.शेती हा व्यवसाय जीव गहाण ठेवून केले जाणारा व्यवसाय आहे.विविध प्रकारच्या संकट हे आपल्या बळीराजावर येत असतात.त्यामध्ये अवकाळी पाऊस,गार,वादळी वारा ,दुष्काळ,अतिवृष्टी ,वीज पडणे ह्या सारख्या अनेक संकटाना सामोरे जाताना शेतकरी राजा हा पूर्णपणे हतबल होत असतो.अश्या अचानक संकटामुळे क्षणात होत्याच न होत यामुळे शेतकरी राजा पूर्णपणे कर्जबाजारी होतो.आत्महत्या करण्याकडे वळतो अश्या वेळी आपला शेतकरी टिकेल तरच आपला देश टिकेल म्हणून केंद्रसरकार आणि राज्यसरकार विविध योजना राबवून त्यातून शेतकऱ्यांना मदत करत असतात.ह्यामध्ये सरकारचा एकच उद्देश असतो कि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत.त्यांना आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याचे हेतू असतो.अश्याच प्रकारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हि शेतकऱ्यांना आकस्मित प-ने उद्भवणारे संकट जसे कि विजेचा धक्का ,पाण्यात बुडून मृत्यू होणे,जंतनाशक हाताळताना झालेला अपघात,रस्ता आणि रेल्वे अपघात,सर्पदंश,नक्षलवाद्याकढून झालेली हत्या आणि दंगल इ अपघात झाल्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून २,००,००० लाख देणार.
चला तर प्रिय वाचक मित्रानो आज आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना साठी पात्रता,निकष आणि कागदपत्रे कोणती लागतील हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
योजनेचे नाव | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |
सुरुवात | २४ नोव्हेंबर २०१५ |
विमा कंपनी | National Insurance Company |
लाभार्थी | शेतकरी |
लाभ घेणारे वारसदार | पत्नी,पती,अविवाहित मुलगी,आई नातवंडे आणि विवाहित मुलगा |
अगोदरची शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नाव होत.तेच नाव बदलवून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हे करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभाचे स्वरूप:
- शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर २,००,००० लाख रुपये मिळतील.
- शेतकऱ्याचा अपघातामुळे २ डोळे किंवा २ अवयव काम करत नसेल तर २,००,००० लाख रुपये मिळतील.
- शेतकऱ्याचा अपघात झाला आणि एक डोळा व एक अवयव निकामी झाले तर २,००,००० देण्यात येतील.
- शेतकऱ्याचा अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाले तर १,००,००० ल्कः रुपये मिळतील.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभार्थी:
१.लाभार्थी च्या नावे शेतजमीन असावी.
२.लाभार्थीचे वय १० ते ७५ वयोगटातील असावे.
३.२०११-१२ च्या नोंदीनुसार शासन शेतकऱ्यांचा १ कोटी ३७ लाख विमा हफ्ता भरते.
४.शेतकरी अपघातात मृत्यू झाला तर त्याचा वारसांना हि रक्कम प्रधान करण्यात येईल.(पत्नी,पती,अविवाहित मुलगी,आई नातवंडे आणि विवाहित मुलगा)
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मध्ये समाविष्ठ अपघात:
- शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून झालेला अपघात.
- सर्पदंश
- शेतात जंतुनाशक हाताळताना झालेला अपघात
- रस्ता आणि रेल्वे मध्ये झालेला अपघात
- विजेचा धक्का लागून झालेला अपघात
- वीज पडून झालेला अपघात
- दंगल इ अपघात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनामध्ये समाविष्ट नसलेले अपघात:
- नैसर्गिक मृत्यू
- स्वतःहून जखमी करून घेणे किना आत्महत्या चा प्रयन्त करणे
- विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व
- अमली पदार्थ सेवन केला असताना झालेला अपघात
- मोटार शर्यतील झालेला अपघात
- युद्ध ,सैन्यातील नौकरी
- जवळच्या लाभधारकाकढून झालेला खून
लाभ घेणारे वारसदार:
शेतकऱ्याची पत्नी/पती,अविवाहित मुलगी,आई ,नातवंडे आणि विवाहित मुलगा यांना हा विमा प्रधान करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी प्रस्तावासोबत(क्लेम फॉर्म,भाग १)
खालील सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायची आहेत,
- सात बारा उतारा
- शेतकऱ्याचा मृत्यू दाखला
- शेतकऱ्याची वारस म्हणून गावकामगार तलाठी कडील गाव नमुना नं,६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
- अपघात झालेल्या शेतकऱ्याचा वयाचा दाखला यामध्ये(जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ग्रामपंचायत चे प्रमाणपत्र/आधार कार्ड/निवडणूक ओळखपत्र/Pancard/वाहन चालविण्याचा परवाना असेल तर तो हि चालेल इ,
- शेतकऱ्याचा वारसाचे ओळखपत्र(आधार कार्ड,बँक पासबुक,मतदान कार्ड आणि Pancard)
- अपघात झाल्याच्या ठिकाणचा प्रथम माहिती अहवाल/घटनास्थळ चा पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल
- अपघात स्वरूपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सदर करायचे कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
अ.क्र | अपघाताचे स्वरूप | आवश्यक कागदपत्रे |
१ | रस्ता आणि रेल्वे अपघात | पंचनामा,पोस्त मोर्टेम अहवाल,विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास वैध मोटार वाहन परवाना |
२ | पाण्यात बुडून मृत्यू | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल,बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपुर्ती बंधपत्र आवश्यक |
३ | जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल,रासायनिक विश्लेषण अहवाल |
४ | विजेचा धक्का अपघात | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल |
५ | वीज पडून मृत्यू | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल |
६ | खून | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल,रासायनिक विश्लेषण अहवाल,दोषारोप पत्र |
७ | उंचावरून पडून झालेला मृत्यू | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल,पोलीस अंतिम अहवाल |
८ | सर्पदंश/विंचू दंश | पोस्ट मोर्टेम अहवाल,वैदकीय उपचारा पूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मोर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सुत मात्र वैदकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतीस्वाक्षरीत असणे आवश्यक |
९ | नक्षलवाद्याकढून झालेल्या हत्या | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल,नक्षलवादी हत्यासंदर्भात कार्यालयीन कागदपत्र |
१० | वन्य प्राणी किंवा पाळीव हल्ल्यामुळे जखमी/ मृत्यू | १.औषधउपचाराची कागदपत्रे .पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल |
११ | दंगल | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल |
१२ | अन्य कोणताही अपघात | पंचनामा,पोस्ट मोर्टेम अहवाल आणि आणतील अहवाल |
सूचना:
१.वरील सर्व कागदपत्रे मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षकीतकेलेले अथवा स्वयंसंक्षाकित असल्यास.ग्राह्य धरण्यात येईल.२.मृत्यूचा नोंद सक्षम प्रधिकार्याकडे स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल या कागदपत्राची आवश्यकता राहणार नाही.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कधी सुरु करण्यात आली?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २४ नोव्हेंबर २०१५ रोजी सुरु करण्यात आली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासाठी लाभार्थ्याचे वय काय आहे?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासाठी लाभार्थ्याचे वय १० ते ७५ वयोगटातील शेतकरी.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा संरक्षणासाठी कोणत्या बाबी समाविष्ठ करण्यात आल्या आहे?
विजेचा धक्का लागून,पाण्यात बुडून झालेला अपघात ,सर्पदंश ,जंतुनाशक हाताळताना झालेला अपघात,विजेचा धक्का,वीज पडून झालेला अपघात रस्ता ,रेल्वे ,दंगली आणि नक्षलवाद्याकडून हत्या ह्या सर्वे अपघात विमासाठी पात्र आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनामध्ये लाभाचे स्वरूप काय आहे?
१.शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यू जर झाला तर २,००,००० लाख.
२.अपघातामुळे दोन डोळे व दोन अवयव निकामी होणे २,००,००० लाख.
३.अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे २,००,००० लाख.
४.अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी होणे १,००,००० लाख. हे सर्व लाभ देय राहतील.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाचा लाभ कोणाला मिळणार?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाचा लाभ हा शेतकऱ्याचा पत्नी/पती,अविवाहित मुलगी ,आई,नातवंडे आणि विवाहित मुलगा यांना हा लाभ मिळेल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाचे अगोदरचे नाव काय होते?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनानेचे पूर्वीचे नाव शेतकरी जनता अपघात विमा योजना हे नाव बदलवून आताचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हे करण्यात आले.