Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

Gramin Rojgar Hami Yojana २०२४

देशातील ग्रामीण भागातील कुटुबियांना कमीत-कमी १०० दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्र शासनाने ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली.

प्रस्तावना

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो ,आपले आपल्या मराठी वेबसाईट वर सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.तर प्रिय मित्रानो आपण ओजस्वी सरकारी योजना ह्या वेबसाईट वर कृषी योजना,शैक्षणिक योजना ,रोजगार योजना आणि सरकारी योजना ह्या आपण आपल्या वेबसाईट वर घेऊन येत असतो.आपण जर ह्या आधुनिक युगात बघितले तर विविध शोध आणि नव-नवीन तंत्रज्ञान ये येत आहे.त्यामुळे प्रत्येक गोष्टी ह्या सहजासह उपलब्ध होताना आपल्याला दिसते.पण आपण आज हि बघितले तर केंद्रसरकार आणि राज्यसरकारच्या योजना ह्या ग्रामीण भाग ,दुर्गम भाग आणि दुर्बल घटकापरेंत पोहचत नाही.ज्याला खरच ह्या योजनाची आवश्यकता आहे त्याला तो लाभ मिळत नाही.अशे घटक वंचित राहतात,प्रत्येक योजनेचा अनेक उद्देश असतात त्यापैकी प्रत्येक घटक जसे कि शेतकरी,गरीब ,दुर्बल घटक ,अपंग आणि महिला यांना मुख्य प्रवाह मध्ये आणण्यासाठी ह्या योजना खास करून राबवल्या जातात.आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत.म्हणून आमचा एकच उद्देश आहे कि सरकारी आणि निमसरकारी योजना ह्या प्रत्येक घटकापरेंत पोहचवण्याचा आम्ही चंग बांधलाय.कोणीही हि आपल्या हक्कापासून वंचित राहू नये.तर आज आपण Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना बघणार आहोत.

Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

Mahatma Gandhi Gramin Rojgar Hami Yojana २०२३

ग्रामीण भागातील व्यक्ती हा शहराकडे का जातोय.याच मुख्य कारण म्हणजे शेतीवर येणारे नैसर्गिक संकट त्यामुळे शेती हि परवडत नाही.आज हि ग्रामीण भागात मुबलक रोजगार नाही शिक्षणाच्या सोयी-सुविधा नाहीत.म्हणून प्रत्येक व्यक्ती हा शहराकडे जाताना आपल्याला दिसतो.रोजच्या-रोज शेकडो ट्रेन भरून शहराकडे लोक जातात.मिळेल ते काम करतात.गावाकडून जाणारा व्यक्ती जाऊन राहणार कुठे हा पहिला प्रश्न निर्माण होतो.तर हे सर्व रोजगारासाठी गेलेले व्यक्ती मिळेल तिथे जागा झोपडी बनवतात,रस्याला लागून पाल टाकून राहतात.यातून निर्माण होते ती झोपडपट्टी.झोपडपट्टी म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहते.माणसाला हि निघता येणार नाही एवढे जवळ-जवळ घरे असतात.यातून निर्माण होणारे प्रश्न म्हणजे पाण्याची कमतरता,अस्वच्छ वस्ती यामुळे अनेक समस्या ह्या भेडसावत असतात.यावर उपाय म्हणून केंद्रसरकार नि Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्याच ठरवले.यातून ज्याला रोजगाराची गरज आहे अश्या कामगारांना १०० दिवसाच्या रोजगार  मिळऊन देणे अर्थात कामाची हमी देणे.ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण करणे अश्या अनेक उद्देश आहेत. आपल्या भागात काम मिळेल तर ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर थाबेल अशे अनेक उद्देश Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे आहे.

चला तर प्रिय वाचक मित्रानो,आज आपण Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या अटी आणि शर्ती,योजनाचा उद्देश,लाभार्थी लागणारे कागदपत्रे हे आपण सर्व सविस्तर ह्या पोस्ट मध्ये बघणार आहेत.आपल्याला एक छोटी विनंती आहे कि आपण हि पोस्ट पूर्ण वाचावी यामुळे आपल्या असेल्या समस्याचे पूर्णपणे निराकरण होईल.हीच अशा व्यक्त करतो!

योजनेचे नावमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
सुरु कोणी केलीकेंद्रसरकार
योजनेची सुरुवात२ फेब्रुवारी २००६
योजनेचा उद्देशग्रामीण भागातील कुटुंबातील किमान एका सदस्याला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देणे
योजनेंतर्गत येणारी कामेतलावाचे नुतनीकरण,दगडी बांध,भूमिगत बंधारा,तलावाचे गाल काढणे,सिमेंट नाला ,वनीकरण समपातळी बंधारा,नाल्याची खोली वाढवणे,शेततळे आणि ग्रामीण भागातील रस्ते
Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचा उद्देश;

१.ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करणे.

२.ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे कामगाराचे स्थलांतर थांबवणे.

३.कुटुंबातील किमान एकातरी व्यक्तीला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देणे.

४.कामगारांना उदरनिर्वाह साठी रोजगार उपलब्ध करून देणे.

५.महिलांचे सबलीकरण करणे.

६.पर्यावरणाचे संरक्षण व्हावे हा हि एक महत्वाचा उद्देश आहे.

७.इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १०० दिवसाच्या रोजगाराची हमी देणे.

८.अर्जदाराने अर्ज केल्यापासून १५ दिवसाच्या आत व त्याच्या घरापासून ५ किमी च्या अंतरावर त्याला रोजगार देणे बंधनकारक राहिल.

९.१५ दिवसाच्या आतमध्ये जर रोजगार नाही पुरवला तर रोजगार भत्ता देण्याची जबाबदारी हि राज्यसरकार ची असेल.

Gramin Rojgar Hami Yojana In Marathi २०२४ | मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

Mahatma Gandhi rashtriy Gramin Rojgar Hami Yojana २०२४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे वैशिष्टे:

१.कुटुंबातील प्रोढ व्यक्ती जो अकुशल काम करण्यास इच्छुक आहे,अशी व्यक्ती ग्रामपंचायत कडे नोंदणीची मागणी करू शकेल.

२.कायदाने सज्ञान व्यक्तीच या योजनेसाठी पात्र आहे.

३.काम करणाऱ्या कामगारांच्या एकूण (३३%) महिला कामगार असल्या पाहिजे.

४.काम करणाऱ्या महिला असतील त्यांना लहान-लहान बालके असतील तर त्याच्यासाठी छावण्या किंवा बालसंगोपन गृह सोयी उपलब्ध असायला हव्या.

5. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत दिली जाणारी मजुरी हि रोख स्वरुपात दिली जाते.

६.गावातील काम कोणत्या क्रमाने करावे किंवा सर्वात प्रथम कोणते काम सुरु करावे याचे संपूर्ण अधिकार हे ग्रामसभेला असणार.

केंद्रसरकार च्या योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

Gramin Rojgar Hami Yojana २०२४

योजनेंतर्गत येणारी कामे:

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत येणाऱ्या कामाची वर्गवारी सूची खालील प्रमाणे.

१.जलसंधारण व जलसंवर्धन कामे

२.दुष्काळ प्रतिबंधक कामे

३.जलसिंचन कालव्याची कामे

४.अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती नवीन भूधारक किंवा इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थीच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करणे.

५.पारंपारिक पाणीसाठ्याचे नुतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे.

६.भू विकासाची कामे करणे.

७.पूरनियत्रण,पूरसंरक्षणाची कामे,पाणथळ क्षेत्रात चाऱ्याची कामे

८.ग्रामीण भागात बारमाही जोडरस्त्याची कामे

९.केंद्रशासनाची चर्चा करून राज्यशासनाने ठरवलेली कामे.

अ)कृषी स्वरुपाची कामे:

१.मातीनाला बांधणे

२.मातीबांध बांधणे

३.सिमेंट नालाबांध

४.दगडी बांध

५.ढाळीचे बांध

६.वनराई बंधारे

७.जैविक बांध

८.सलग सतल चर

९.तूटक समतल चर

१०.ट्रेच काम माउंट

११.खर जमीन विकास बंधारा

१२.शेततळी

१३.बोडी सरळीकरण

१४.नाला सरळीकरण

१५.जलद बंधारा

ब) पाटबंधारे

१.मातीचे धरण

२.मातीचे कालवे

३.साठवण तलाव

४.पाझर तलाव

५.पाझर कालवा

६.गांव तलाव

७.भूमिगत बंधारे

८.कालव्याचे नुतनीकरण

९.तलावातील गाळ काढणे

१.जुन्या तलावाचे नुतनीकरण

क) सामाजिक वनीकरण

१.पडीक (गायरान)जमिनीवरील वृक्ष लागवड व वैरण योजना

२.रोपवाटिका

३.रस्त्याच्या बाजूस वृक्ष लागवड करणे

ड) वनीकरण

१.वनतलाव

२.स.स.चर/भू.स.चर.(C.C.T & under Ground C.C.T)

३.ट्रेच कम माउंट

४.वृक्ष लागवड

५.रोपवाटिका

६.फायर लाईन वर्क्स

७.जुन्या वनतलावाचे नुतनीकरण

८.बांबू रांझ्याभोवती वर्तुळाकार चर

९.रायमुनिया /लेंटीन निर्मलन करणे

इ) सार्वजनिक बांधकाम:

१.इतर जिल्हे रस्ते

२.गाव रस्ते

३.गावातील अंतर्गत रस्ते

४.जोड रस्ते

५.स्मशानभूमी,पाणीपुरवठा योजनासाठीचे रस्ते

६.रस्त्याचे मजबुतीकरण ? नुतनीकरण

७.रस्त्याचे रुंदीकरण

या व्यतिरिक्त राज्याच्या रोहयो अंतर्गत खालील वैयक्तिक लाभाच्या योजना वेगळ्या खात्याकडून राबविण्यात येतात.

१.कृषी विभाग

१.फळबाग योजन

२.शेततळी

३.खाजगी बोडीची कामे

४.मजगी(भातशेती)

५.तुतिची लागवड

६.बोडी नुतनीकरण

२.जिल्हा परिषद

१.जवाहर विहिरीची कामे

३.सामाजिक वनीकरण

१.खाजगी जमिनीवरील वृक्ष लागवड करणे

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आज आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली.अश्याच नव-नवीन योजनासाठी आपल्या वेबसाईट ला भेट द्या आणि योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्या.आपल्याला आमच्या वेबसाईट वरील माहिती महत्वपूर्ण वाटली किंवा आवडली तर आपला अभिप्राय नक्की आम्हाला कळवा.आपल्याला अजून काही नवीन योजनेविषयी माहिती हवी असेल तर आम्हला comment मधून सुचवा.आम्ही नक्कीच ती योजना आपल्या वेबसाईट वर घेवून येऊ.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कधी सुरु करण्यात आली ?

२ फेब्रुवारी २००६

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच उद्देश ?

१.ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करणे.
२.ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे कामगाराचे स्थलांतर थांबवणे.
३.कुटुंबातील किमान एकातरी व्यक्तीला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देणे.
४.कामगारांना उदरनिर्वाह साठी रोजगार उपलब्ध करून देणे.
५.महिलांचे सबलीकरण करणे.
६.पर्यावरणाचे संरक्षण व्हावे हा हि एक महत्वाचा उद्देश आहे.
७.इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १०० दिवसाच्या रोजगाराची हमी देणे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अगोदरचे नाव काय होते ?

अगोदर ह्या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण योज्गर हमी योजना होते.२ ऑक्टोंबर २००९ मध्ये बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना करण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारी कामे?

तलावाचे नुतनीकरण,तलावातील गाळ काढणे ,दगडी बांध,सिमेंट नाला ,शेततळे ,नाल्याची खोली वाढवणे,ग्रामीण भागातील बारमाही रस्ते,भूमिगत बंधारा इ कामे येतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment