Pradhanmanri krushi sinchai yojana in Marathi 2024 | प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

ब्रीदवाक्य-हर खेत को पाणी(प्रत्येक शेतापरेंत पाणी)
कालावधी- पाच वर्ष
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – प्रती थेंब अधिक पिक (Per Drop More Crop) हे महत्वाच उद्देश हा केंद्र सरकार चा आहे.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,कसे आहात मज्जेत ना?आशा करतो आनंदी असणार!शेतकरी मित्र आणि वाचक मित्रानो आपण नेहमी विवीध योजना ह्या आपला मराठी वेबसाईट वर घेऊन येत असतो.याचा आमचा प्रामाणिक उद्देश एकच असतो कि शेतकऱ्यांना केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा चा योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती मिळाली पाहिजे.ज्या वेळेस शेतकरी राजा हा संकटात असतो तेव्हा त्याला कोणाची तरी मदतीची गरज असते.अश्यावेळी केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे आर्थीक सहाय्य म्हणून विविध योजना ह्या घेवून येत असतो.कारण शेतकरी हा संकटातून बाहेर निघाला पाहिजे आणि त्याच जीवनमान सुधारू शकेल हाच प्रत्येक योजनेचा उद्देश असतो.केंद्रसरकार हे खूप साऱ्या योजनेवर अनुदान हे प्रदान करत असते.त्याच प्रकारे आज आपण Pradhanmanri krushi sinchai yojana in Marathi 2024 | प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना बदल माहिती जाणून घेणार आहोत.
आपला देश कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात ८०% लोक हे आपला पारंपारिक व्यवसाय म्हणजे शेती हा व्यवसाय करत असतात.शेती हा व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे.आपण जर बघितले तर शेतीवर वर आधारित खूप मोठा वर्ग आहे.शेती हि पारंपारिक पद्धतीने न करता त्यामध्ये आधुनिकता,विज्ञान आणि तंत्रज्ञान चा उपयोग करून उत्पनात वाढ होईल यासाठी प्रयन्त करावे.यासाठी राज्यसरकार आणि केंद्रसरकार हे विविध योजना राबवत असतात.ह्या योजनेचा स्पष्ट उद्देश एकच असतो कि शेती करताना आधुनिक पद्धतीने केली पाहिजे.नवीन तंत्रज्ञान च्या सहाय्याने आपल्या उत्पनात वाढ केली पाहिजे.नैसर्गिक संकटे जेव्हा येतात तेव्हा बळीराजा हा पूर्णपणे हतबल होतो.जसे कि दुष्काळ आणि कमी प्रमाणत पाणी पडणे म्हणजे कोरडा दुष्काळ पडतो त्यावेळी विहीर असेल किंवा बोरवेल याचे पाणी पूर्णपणे आटून जाते.पिकला पुरेशे पाणी मिळत नाही त्यामुळे पिक हे सुखावून जाते.ज्यावेळेस शेतकरी राजा हा पिकांना फटी ने पाणी देतो त्यावेळेस ते वाहत पाणी असते पाहिजे तेवढ पिकला मिळत नाही.आणि पिक हि वाया जाते .जर शेतकरी ने तुषार सिचन,फोगर किंवा ठिबक सिंचन चा उपयोग जर केला तर पाणी एक थेंब-थेंब पिकाच्या मुळाशी जाते आणि पिकाची हवीतशी वाढ हि होते.पाणी ची बचत होते.यासाठी केंद्रसरकार नि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – प्रती थेंब अधिक पिक (Per Drop More Crop) हि योजना शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात आली आहे.या योजनेचा उद्देश म्हणजे कमी पाण्यात हि जास्त उत्पादन घेणे.यासाठी केंद्रसरकार अनुदान प्रदान करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून.उत्पनात वाढ करून त्याचे जीवनमान उंचवण्यास मदत करणे हाच उद्देश प्रेक योजनेचा असतो.
चला तर शेतकरी मित्रानो आज आपण Pradhanmanri krushi sinchai yojana in Marathi 2024 | प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ची उद्देश पात्रता,निकष,कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया ह्या सर्व गोष्टी आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत-प्रती थेंब अधिक पिक ह्या घटकासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणी हि कमी लागेल आणि उत्पादन हि वाढेल.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – २०२४

योजनेचा उद्देश:
- शेतकऱ्याच्या उत्पादनात मध्ये वाढ करणे.
- कृषी क्षेत्रामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लक्ष्य ५ लाख हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन योजना करणे.
- उर्वरित जमीन हि सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणे.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाचा मुख्य उद्देश कमीत कमी पाण्यात जास्त उत्पादन काढणे.पाण्याची बचत करणे.
- ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन मध्ये वाढ करणे.
- पाण्याचा योग्य उपयोग व पाण्याचे नियोजन करणे.
- सिंचनाची क्षमता आणि वापरातील तफावत भरून काढणे हाही एक महत्वाचा उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना पाणीपुरवठा वाढवणे आणि जलसंधारण मजबूत करणे.
- दुष्काळग्रस्त भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे.
- आधुनिक पद्धतीचा वापर करून पाण्याचा संवर्धन करणे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनासाठी लाभार्थी पात्रता:
खाली दिलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे तरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनासाठी पात्रता ग्राह्य धरली जाईल.
१.अर्जदाराच्या नावे मालकी हक्काचा सात/बारा व आठ-अ उतारा असणे अनिवार्य आहे.(७/१२ आणि ८- अ उतारा)
२.अर्जदाराकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे(बँक खातेशी संलग्न असावे०)
३.सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी व त्याची नोंद हि ७/१२ उतारावर असावी.७/१२ उताऱ्यावर सिंचनाची सुविधेबाबत नोंद नसल्यास विहीर ,शेततळे इ बाबत शेतकऱ्याकडून स्वयं घोषणापत्र देण्यात यावे.
४.एखादा अर्जदार हा योजनेच्या पात्रता च्या पूर्तता पूर्ण करत असेल अर्थात तो ह्या योजनेसाठी पात्र आहे पण त्याच्याकडे आधार क्रमांक नाही.तर अश्या लाभधारकांना आंधार क्रमांक प्राप्त होऊ परेंत.त्याच्याकडे असेलेली आधार नोंदणी पावती/मतदार ओळखपत्र/pancard,पासपोर्ट,रेशनकार्ड ,शासकीय कर्मचारी असेल तर त्याचे कामाचे ओळखपत्र किंवा पासबुक ,मनरेगा कार्ड,किसान फोटो यापैकी एकही हि पुरावा सादर केल्यास योजनेचा लाभ देण्यात यावा.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:
१.७/१२ उतारा (मालकी हक्क तपासणीसाठी)
२.८-अ उतारा
३.सामाईक क्षेत्र असेक तर लाभार्थीने अनुदान मागणीसाठी अर्ज केला असेल तर,त्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवण्यासाठी तसेच त्याचे नवे अनुदान वर्ग करण्यास हरकत नसल्याबाबत इतर खातेदारचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक आहे.(ते साध्या कागदावर घेण्यात यावे.)
४.अर्जदार/संस्था यांना शेजामीन भाडेतत्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनेच लाभ घ्यावयाचा असला तर मालकी असलेल्या मालकाशी अर्ज मंजूर झाल्याचा दिनांक पासून सात ते दहा वर्षासाठी शेतमालकासोबत नोंदणीकृत कराराची प्रत.
५.सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे ७/१२ उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबत नोंद नसल्यास,विहीर ,शेततळे इ.बाबत शेतकऱ्याचे सध्या कागदावर स्वयं घोषणापत्र लागेल.
संच खरेदी केल्यानंतर सदर करायची कागदपत्रे;
१.अर्जदाराचे हमीपत्र
२.खरेदी केल्याची मुळ प्रत(Tax Invoice )
३.कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
महा-डीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा!

अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणीकरण अर्ज करण्याची प्रक्रिया:
ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच लाभ घ्यायचा आहे त्या अगोदर महा-डीबीटी संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोदणी करावी लागेल आणि आपला आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.हि प्रोसेस एकदाच करावी.
१.महा-डीबीटी पोर्टलच्या https:/mahadbtmahait.gov.in हे ह्या वेबसाईट ला भेट द्यावी,या ठिकाणी “शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा.नंतर शेतकरीने स्वतः चा मोबाईल किंवा इतर जे साधन असतील त्यावरून अर्ज करता येईल.
२.अर्जदार नोंदणी-अर्जदारांनी प्रथमः वापरकर्त्याचा नाव(user name) व पासवर्ड(Password)तयार करून घ्यावा.व आपले खाते उघडावे(लॉगीन०.नंतर आपलें अकाऊंट पुन्हा लॉगीन करावे.अर्जदारांनी वैयक्तिक माहिती भरावी.अर्जामध्ये मागितलेली आवश्यक गोष्टीची पुरतात करा.
३.आधार क्रमांक प्रमाणीकरण करा.वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तत्याचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रामाणिक करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याचा आधार क्रमाक नसेल त्यांनी [प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी.तुम्हाला नोंदणी पावती मिळाली तर त्यावरील क्रमांक महा-डीबीटी पोर्ताल्म्ध्ये नोंदणी करून अर्ज करता येतो.अश्या अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधारकार्ड क्रमांक नोंदणी करून प्रामाणित करून घ्यावा.त्याशिवाय अनुदानाचे लाभ मिळणार नाही.
४.फॉर्म मध्ये आवश्यक बाबी सर्व अचूक भरावी.
५.अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांना रु २०/- शुल्क व रु ३/-जी.एस.टी मिळून एकूण रु २३.६०/- शुल्क हा ऑनलाईन भरायचा आहे.त्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज हा पुढील प्रक्रीयासाठी पाठवला जाईल.
टीप:अर्ज सादर करण्याचा अंतिम मुदती परेंत शेतकऱ्यांना निवडलेल्या बाबी मध्ये काही बदल करायचे असतील तर तर फॉर्म च्या अंतिम तारखेच आत मध्येच करता येतील याची नोंद घ्यावी.
अर्जदारांना विशेष सूचना:
- अर्जदाराने आर्ज करताना ७/१२ व ८-अ उतारा ,सर्व्हे नाम्नेर,गावाचे नाव इ माहिती हि अचूक भरावी.
- अर्ज भरताना चुकीची माहिती भरल्यास अर्ज हा रद्द होईल,त्यामुळे शेतकरी बांधवानी अर्ज भरताना हा काळजीपूर्वक भरावा.
- ठिबक,मिनी स्प्रिंकलर,मायक्रो स्प्रिंकलर या प्रकारात अर्ज करत असताना पिकाचे अंतराचे परिणाम मीटर देण्यात आले असून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अंतरापैकी अंतर निवडावे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ:
१.शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढवणे.
२.शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करणे.
३.दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाण्याची क्षमता वाढते.
४.ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे लक्ष:
१.कृषी उत्पादनात वाढ करणे ,जमिनीची गुणवत्ता टिकवणे.
२.सिंचनामुळे पिकला योग्य पनू जाते त्यातून उत्पनात वाढ करणे.
३.प्रत्येक थेंबामागे अधिक पिक हे महत्वाच लक्ष्ये आहेत.
४.शेतकऱ्यांना सक्षम बनवणे.
५.शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे .
6.ग्रामीण भागात आधुनिकता आणणे आणि भरभराट आणणे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना कधी सुरु करण्यात आली /
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना २०१५-२०१६ मध्ये सुरु करण्यात आली.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनाचे ब्रीदवाक्य काय आहे ?
हर खेत को पाणी (प्रत्येक शेतापरेंत पाणी)
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनाचे उद्देश काय आहे?
कृषी उत्पनात वाढ करणे.
पाच लाख हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन करणे.
ठिंबक सिंचान्म्ध्ये वाढ करणे.
पाण्याचा योग्य वापर करून व पानायचे नियोजन करणे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनाचे लक्ष्ये?
कृषी उत्पनात वाढ करणे.प्रत्येक पाण्याच्या थेंबमागे अधिक पिक.ठिंबक सुन्चानाची वाढ करून पाण्याची बचत करणे.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनासाठी लागणारे कागदपत्रे ?
१.आधार कार्ड
२.सात बारा उतारा
३.८-अ चा उतारा
४.सामाईक क्षेत्र असेल तर गट धारकांची समिती