मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2024 | Magel Tyala Shettale Yojana
Table of Contents
मागेल त्याला शेततळे योजना 2024 मराठी | Magel Tyala Shettale Yojana
Magel Tyala Shettale योजना| मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2024 | | Magel Tyala Shettale Online Apply | Maharashtra Sarkari Yojana 2024 | शेततळे अनुदान योजना | shetale yojana
प्रस्तावना
महाराष्ट्रमध्ये ८०% शेती हि पावसावर अवलंबून आहे.त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना पाण्यावर अवलंबून राहावे लागते.महाराष्ट्र मध्ये मागील काही वर्षापासून पाण्याची अनिश्चिती यामुळे कोरडवाहू शेतीवर परिणाम होतो. Magel Tyala Shettale Yojana हि योजना जाहीर केली.कारण शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होऊन शेतकरांचे जीवनमान उंचवण्यास झाली.शेततले हि योजना शेतकऱ्यांसाठी प्रकारची संजीवनी ठरली आहे,
नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो,आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा,Maharashtra Sarkari Yojana 2024आपण जर बघितले मागील काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झालय.ओला दुष्काळ ,कोरडा दुष्काळ,अवकाळी पाऊस आणि गारपीट असे अनेक संकटे हे येत असतात.पण असे काही संकटे आहेत कि त्यातून मार्ग निघतच नाही.उदा:-गारपीट झाली तर संपूर्ण पिकाची नासाडी आणि नुकसान हे होत असत.यामध्ये शेतकरीने केलेलं कष्ट आणि मेहनत हि पूर्णपणे वाया जाते.अश्या काळात शेतकरी हा पूर्णपणे हतबल होतो आणि त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो,अश्या वेळी पूर्णपणे अंगावर कर्जाचा बोझा आणि पूर्ण परिवाराची जबाबदारी यातून मार्ग काढण मुश्कील होऊन जाते.ह्या साठी केंद्रसरकार आणि राज्य सरकार आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मदतीचा हात म्हणून किंवा शेतकरी बांधवांचे जीवनमान सुधरवण्यासाठी व सुरक्षित करण्यासाठी विमा आणि विविध अनुदानाच्या योजना महाराष्ट्र सरकार राबवत असते.अशीच आज आपण मागेल त्याला शेततळे योजना 2024 मराठी | Magel Tyala Shettale Yojana राबवत आहे.आज आपण ह्या योजनेविषयी जाणून घेणात आहोत.ह्यासाठी पात्रता काय ?कागदपत्रे कोणती लागतील?लाभार्थ्याची निवड निकष. असे आपण बघणार आहोत.Magel Tyala Shettale Online Apply
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाची जळ आपल्याला दिसून येताना दिसते.निसर्ग अनेक वेळा कोपित होतो.त्यामध्ये कोरडा दुष्काळ हि खूप मोठी समस्या आहे.पिण्यासाठी पाणी हि खूप लांबून आणावे लागते. शेतीसाठी लागणारे पाणी नाही मिळणार तर पिक कुठून येणार?शेतकरी संपूर्ण शेतीचे मशागत मन लावून करतो.पेरणी होते पिक थोडे मोठे झाले कि पाणीच येत नाही अश्या वेळी शेतकरीचे कष्ट आणि मेहनत दोघही वाया जातात,ह्या मध्ये कोरडवाहू क्षेत्र हे पूर्णपणे पावसावर अवलंबून असते.पाऊस आला नाही तर उत्पनावर देखील परिणाम होतो.अश्या वेळी शेतकरी पूर्णपणे हतबल होतो.राज्य सरकारने यावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मा.मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी दौरा केला.पावसात पडलेला खंड आणि पाण्याची टंचाई यामुळे पिकाची नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली.शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दरवषी येणारा दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयोगी पडेल. कारण राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सर्व परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात मागेल त्याला शेततळे योजना 2024 मराठी | Magel Tyala Shettale Yojana हि योजना जाहीर केली.कारण शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होऊन शेतकरांचे जीवनमान उंचवण्यास झाली.शेततले हि योजना शेतकऱ्यांसाठी प्रकारची संजीवनी ठरली आहे,
Magel Tyala Shettale Scheme 2024 Online Application | मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2024 ह्या योजनेची सुरुवात दि.१७ फेब्रूवारी २०१६ ला शासनच्या अंमलबजावणी नंतर मागेल त्याला शेततळे योजेचा प्रारंभ झाला
मागेल त्याला शेततळ्याचे उदिष्टे:-
Magel Tyala Shettale Online Apply
- सरकारने २०१६-२०१७ ते २०१७-२०१८ साठी एकूण १,११,१११ शेततळे निर्माण करण्याचा संकल्प केला.
- मागेल त्याला शेततळे योजनासाठी साल २०१७-१८ साठी ८० कोटीची तरतूद केली.
- महाराष्ट्र राज्यमध्ये ३७,५०० विहिरी व ९०,००० विद्युत पंप जोडणी करण्याचे उदिष्टे राज्य सरकार चे आहे.
लाभार्थी निवडीचे पात्रता:
- शेतकऱ्याकडे शेतजमीन किमान कमीत-कमी ०.६० हे जमीन असणे आवश्यक आहे.(यात कमाल मर्यादा नाही)
- लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी कारण पावसाचे पाणी शेततळ्या मध्ये भरू शकेल अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
- लाभार्थ्याने यापूर्वी सामुदाईक शेततळे ,शेततळे अथवा भात सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
- दारिद्र्य रेषेखालील(बिपीएल म्हणजेच Below poverty Line)शेतकरी व ज्या कुटुंबातील शेतकऱ्याने आत्महत्या केलेली असेल अश्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल.
- इतर सर्व प्रवर्गातील शेततळ्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची जेष्ठता यादीनुसार (प्रथम अर्ज सादर करणाऱ्यांना प्राधन्य राहील सदर योजनेंतर्गत निवड करण्यात येईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी येथे क्लिक करा !
शेततळे अनुदान योजना
मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे
- जमिनीचा ७/१२ उतारा
- ८ अ चा नमुना उतारा
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- दारिद्र्य रेषेखालील असेल बीपीएल कार्ड किवा दाखला (रेशन कार्ड)
- प्रतिज्ञा पत्र(स्वतःच्या सहीने सादर करणे.
- आत्मग्रस्त कुटुंबाचा वारस दाखला (आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंबासाठी)
- बँकपासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- मित्रानो ह्या कागदपत्रामध्ये बद्दलहि होऊ शकतो, त्यामुळे आपण संधीत योजनेचे ऑफिस किंवा अधिकाऱ्याकडून अधिक माहिती जाणून घ्या.
लाभार्थ्याची जबाबदारी
- कृषी विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी शेततलळे घेण अनिवार्य राहील.
- शेततळे मंजूर झाल्यापासून तारखेच्या शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- लाभार्थ्याने आपले बँक बचत खाते हे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स कृषी सहायक/कृषी सेवक यांच्याकडे सादर करावे.
- शेततळ्याचे बांधावर व पाण्याच्या प्रहावाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीचे झाडे लावावी.
- कामासाठी अगोदर कोणतेही रक्कम मिळणार नाही.
- शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबधित लाभधारकाची असेल.
- पावसाच्या पाण्याचा केर कचरा किंवा मातीचा गाळ वाहून येणार नाही याची काळजी व व्यवस्था शेतकऱ्याने करावी.
- शेततळ्याची नोदणी ७/१२ वर करणे बंधनकारक राहील.
- शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वताच्या खर्च करून लावणे .
- ज्या आकाराचे शेततळे मंजूर होईल त्या आकाराचे बांधणे बंधनकारक राहील.
- नेसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर भरपाई मिळणार नाही.
या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका शेततळ्याची मागणी करता येईल.यामध्ये जास्तीत-जास्त 30x30x3 मीटर या आकारमानाने व कमीत-कमी इनलेट आउटलेटसह प्रकारामध्ये किमान 15x15x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. इनलेट आउटलेट विरहीत 20x15x3 मीटर आकारमानाचे शेततळे घेता येईल.पाणी भरण्याची कारवाही पावसाळ्याचे अतिरिक्त वाहून जाणारे पाण्यातून करावे.अश्या प्रकारे लाभार्थ्याला प्रकीर्या पूर्ण करावी लागेल.
टिप:-शेततळ्याची आकारमानानुसार देय असणारी रक्कम ५०.००० हजार असेल इतकी रक्कम देय राहील,५०,००० पेक्षा जास्त खर्च लागला तर तो लाभार्थ्याला करायचा आहे.
नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो, आज आपण मागेल त्याला शेततळे योजनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. यामध्ये आपण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, योजनेची पात्रता यासर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. अर्ज करण्यापूर्वी संबधित योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाणून घेवू शकता. हि माहिती अपूर्ण हि असू शकते.
शेततळे म्हणजे काय ?
पावसाचे पाणी शेतजमिनीच्या वरील बाजूस वाहून जाणारे पाणी,जेव्हा पाण्याची पातळी खोल जाते.विहीर हि आटते अश्यावेळी पिकांना पाणी मिळत नाही.आपत्कालीन वेळी पिकास पाणी उपलब्ध होण्यासाठी खोदलेला तळ्यास शेततळे म्हणतात.
“मागेल त्याला शेततळे योजना” हि योजना कधी सुरु करण्यात आली?
“मागेल त्याला शेततळे अनुदान योजना” ह्या योजनेची सुरुवात दि.१७ फेब्रूवारी २०१६ ला शासनच्या अंमलबजावणी नंतर “मागेल त्याला शेततळे योजेनेचा” प्रारंभ झाला.
शेततळे कोणत्या जागेवर करावे ती जागा कशी असली पाहिजे?
ठिकाणी आपल्याला शेततळे करायचे आहे.अश्या ठिकाणची जमीन सपाट असेल आणि पडीत असेल तर खूपच चांगले असेल. सरकारने अनुदानाच्या आकारमानानुसार ठरवून दिलेल्या आकारात शेततळे खोदावे आणि आपण ज्या ठिकाणी शेततळे करत आहोत अश्या ठिकाणी वाहून येणारा गाळ येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि पाणी साठवले पाहिजे.
“मागेल त्याला शेततळे योजनेचा उद्देश काय आहे?
वेळो-वेळी पडणारा दुष्काळ याचा फटका हा जास्तकरून कोरडवाहू शेतीला पडताना दिसतो.अश्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये.शेतकऱ्याचे उत्पादन वाढावे व त्याचे जीवनमान सुधारावे हा मुख्य उद्देश आहे.
शेततळ्याचे किती प्रकार आहेत व कोणते आहेत?
शेततळ्याचे प्रामुख्याने २ प्रकार पडतात.१)सामुदायिक शेततळे २)वैयक्तिक शेततळे असे आहेत.
शेततळ्याचे लांबी आणि रुंदी किती असते योजनेनुसार?
शेततळ्याची लांबी आणि रुंदी किती असते योजनेनुसार खालीलप्रमाणे आहे. १) १५ x १५ मीटर्स २) १५ x २० मीटर ३) २० x २० मीटर ४) २० x २५ मीटर ५) २५ x २५ मीटर ६) २५ x ३० मीटर ७) ३० x ३० मीटर हे आहेत.
शेततळ्याचे बांधकाम किती असावे व सरकार किती अनुदान देईल?Maharashtra Sarkari Yojana 2024
शेततळे बांधकाम आकारमान १.30x30x3 २.15x15x3 ३.20x15x3 अश्या मीटरमध्ये असावे.व सरकारकडून ५०,००० हजार अनुदान देण्यात येईल.यावर जर खर्च लागला तर तो स्वतः लाभार्थ्याला करावे लागेल असे GR मध्ये सांगितले नमूद केले आहे.