
Pradhanmantri Pik Vima yojana 2024-प्रधानमंत्री पिक विमा योजना(PMFBY)
Table of Contents
प्रस्तावना
नमस्कार प्रिय वाचक शेतकरी मित्रानो,आपला दिवस सुखाचो जावो.आपल्या आयुष्यात सुख ,समृद्धी आणि आपल्या कष्टाला फळ मिळो हीच सदिच्छा.केंद्रसरकार आणि राज्यसरकार विविध योजना राबवत असत.त्यातिल महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री योजना होय .तर आज आपण मागील आठ वर्षापासून बघतोय लाभधारकांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे,यासाठी कारण कि विवध प्रकारची नेसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.शेतकरी पूर्णपणे हतबल होतो.त्यावर उपाय म्हणून राज्यसरकार व केंद्रसरकारनि राबवलेली योजना हि शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे संजीवनी ठरली आहे.ह्या योजनेतून सरकारने २३ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात १.५५ लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.पिक विम्याच्या हफ्ता भरून त्यांना नैसर्गिक आपत्तीमुले झालेले नुकसानीच्या बदल्यात हि रक्कम देण्यात आली आहे.Pradhanmantri Pik Vima Yojana एक प्रकारचा शेतकऱ्यांना दिलासा आणि संरक्षण मिळाले आहे.

आपले आपली मराठी वेबसाईट वर सहर्ष स्वागत आहे.आपण शेतकरी पुत्र असाल तर,आपण आपल्या शेतकरी बापाची व्यथा जाणून असलाच.शेतकरी हा आपला जगाचा पोशिंदा आहे.आपल्या देशातील बहुतांश वर्ग हा पारंपारिक व्यवसाय म्हणून शेतीकडे बघतो.भारत देशात ८०% शेती केली जाते म्हणून आपल्या देशाची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे.पारंपारिक व्यवसाय केला जातो त्यामुळे बरेच कुटुंब अजून गरीब आहेत आणि दारिद्र्य रेषेखाली आहेत.शेतीकडे एक जगण्याचा पर्याय म्हणून बघितले जाते.शेती करत असताना पैसा खूप लागतो.शेती म्हणजे मातीत पैसे टाकणे सारखे आहे तरी सुद्धा शेतकरी राजा हा पत्नीचे दागिने,सावकाराचे कर्ज, बचत घट असेल किंवा बँकेच्या चकरा मारून भेटेल त्या व्याज दराने कर्ज घेत असतो. आणि शेती हा व्यवसाय करत असतो पण ज्यावेळेस निसर्ग कोपतो विविध प्रकारची आपत्ती येत असते जशी कि गारपीट,अतिवृष्टी ,दुष्काळ ,चक्रीवादळ ,अवकाळी पाऊस आणि रोगराई यामुळे पिकाचे नुकसान होते व पूर्ण केलेली मेहनत ,दिवसरात्र केलेलं काबाड कष्ट करून आपले रान हे आपल्या घामाने फुलवतो आणि हिरवेगार करत असतो पण अश्यावेळी अचानक ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडाशी आलेला घास हि आपत्ती हिसकावून घेते यामध्ये उरते फक्त आणि फक्त निराशा आणि केलेलं कर्ज.अश्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खचून जाऊ नये त्याला आर्थिक हातभार लावण्यासाठी व त्याचे पिक आणि मेहनत सुरक्षित करण्यासाठी Pradhanmantri Pik Vima Yojana २०२४ हि राबवण्याचा निर्णय केंद्रसरकार व कृषिमंत्री आणि कृषी विभाग यांनी घेतला .यामुळे शेतकरीला दिलासा आणि आर्थिक सहाय्य होईल व त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि झालेले कर्जातून तो मुक्त होऊ शकेल ह्यासाठी विविध योजना सरकार हे राबवत असते व आम्ही ह्या योजना आपल्यापरेंत पोहचवण्याच काम करत असतो कारण आपला शेतकरी व दुर्बल घटक आपल्या हक्कापासून वंचित राहू नये.चला तर आपण प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पात्रता,उद्देश आणि कागदपत्रे काय आहेत ते जाणून घेवूयात.
प्रधानमंत्री पिक विमा योजनाची सुरुवात हि १३ जानेवारी २०१६ खरीप हंगामापासून सुरु करण्यात आली.प्रधानमंत्री योजनेचे घोषवाक्य ‘एक हंगाम एक दर’ आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना उद्दिष्टे
Pradhanmantri Pik Vima yojana 2024-प्रधानमंत्री पिक विमा योजना(PMFBY)|Pradhanmantri Pik Vima yojana (PMFBY)
- विविध येणारे रोग,किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई भरून आधार देणे.
- कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात सातत्य राखणे
- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे.\
- पिकांच्या नुकसानामुळे शेतकऱ्याचे अत्यंत कठीण परीस्थीमध्ये शेतकऱ्याचे स्थेर्य अबाधित ठेवणे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्ज झाले म्हणून आत्महत्या करतो त्यापासून त्याचा बचाव करणे
- शेतकरीचे आर्थिक नुकसान भरपाई भरून काढणे
- शेतकरीना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान सुधारणे हाही मुख्य उद्देश आहे.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनातून शेतकऱ्यांना सुरक्षा कवच प्रधान करणे
- शेतकऱ्यांच्या उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांना संरक्षणाबरोबर अन्नसुरक्षा आणि पिकाचे विविधकरण करणे.
- कृषी क्षेत्राला गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ करणे हा हेतू सद्य होण्यासाठी मदत होईल.
- शेतकऱ्यांचे गारपीट,अतिवृष्टी कोरडा दुष्काळ आणि चक्रीवादळ अश्या विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असताना शेतीतील रुची टिकून राहावी यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्याचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची पात्रता
- प्रधानमंत्री योजना हि आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्याला बंधनकारक असेल आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
- विमा रक्कमेवर कोणतेही कॅपिंग नसेल तर विमाव्र कपात होणार नाही.
- प्रधानमंत्री पिक विमा मृत शेतकऱ्याच्या नावी काढला असेल तर रद्द करण्यात येईल.
- पिक पेरणीच्या काढनिपारेंत कोणतेही नैसर्गिक आपत्ती आली जसे कि आग,वीज कोसळणे,गारपीट होणे,चक्रीवादळ,वादळ,भूस्खलन ,दुष्काळ आणि पूर अश्या इत्यादी उत्पनात येणारी घट.
- स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.
- पिक कापणीनंतर १४ दिवसात अवकाळी पाऊस, चक्रीवादळ ,गारपीट आणि वादळ यांच्यामुळे झालेले नुकसानीचा समावेश असेल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजेनेत मानवनिर्मित आपत्तीचा समावेश करण्यात आला नाही.
- हि योजना १२ जिल्हाच्या समूहासाठी निवास झालेली आहे.विमा कंपनी मार्फत तीन वर्षाकरता राबवण्यात येईल.
- भाडेतत्त्वावर शेती करणारा शेतकरी नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
- शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ १/ रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोदणी करायची आहे.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५-२०२६ या तीन वर्षाकरता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर ७०% असा निश्चित करण्यात आलाय.
योजनेत समाविष्ठ पिके व शेतकरी
प्रधानमंत्री योजनेंतर्गत अन्नधान्य पिके,गळीत धान्य पिके व नकदी पिकांना विमा संरक्षण मिळेल.सदर योजना राज्यात शासनाने खरीप रब्बी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ?मंडळ गट किंवा तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल,
पिक वर्गवारी | खरीप हंगाम | रब्बी हंगाम |
तृणधान्य व कडधान्य पिके | भात,खरीप ज्वारी,बाजरी ,नाचणी ,मुंग उडीद ,तूर आणि मक्का | गहू(बागायत),रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत)हरबरा आणि उन्हाळी भात |
गळीत धान्य पिके | भुईमुंग,कारळे,तीळ,सुर्यफुल ,सोयाबीन | उन्हाळी भुईमुंग |
नाक्डी पिके | कापूस,खरीप कांदा | रब्बी कांदा |
- दिव्यांगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | Divyang Yojana In Marathi 2024 | असा करा अर्ज
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना |Ahilyabai Holkar Scheme In Marathi 2025
- अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension Yojana In Marathi
- PM Mudra Yojana Online Application | प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी
- IDBI बँकमध्ये 600 जागांसाठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु |IDBI Bank Bharti 2024
प्रधानमंत्री हप्ता रक्कम:-
- खरीप पिके – विमा रक्कमेचा २ टक्के
- रब्बी पिके – विमा रक्कमेचा १.५ टक्के
- फळे,नकदी पिके – विमा रक्कमेच्या ५ टक्के
विमा संरक्षण महत्वाच्या बाबी
- हंगामात अपुरा पाणी व इतर हवामानातील घटकांच्या परिस्थिमुळे पेरणी व लावणी नाही झालेले असे क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के जास्त विमा संरक्षण देय राहील.
- पिक काढणीच्या १५ आधीपरेंत पूर,पावसाचे आतमध्ये येणे जाणे किंवा खंड पडला इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्याचे उत्पनात मागील लगतच्या ७ वर्षाचा सरासरी उत्पादनामध्ये ५० टक्के पेक्षा घात झाली तर त्यांना हा विमा लागू किंवा देय राहील.
- स्थानिक आपत्ती जसे कि नदीला पूर येणे,गारपीट,डोंगर सारखा भाग ढासाळणे,आग,वीज अथवा ढगफुटी अश्या आपत्तीमुले होणारे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पिकाचे पंचनामे करून विमा देय राहील.
- पिक काढणी झाली आणि शेतात पसरवून पडून आहे अथवा पेंढ्या बांधून सुकवायला टाकणे आवश्यक असते पण अश्या वेळी दोन आठवड्याच्या आतमध्ये म्हणजेच १४ दिवस गारपीट,अतिवृष्टी,चक्रीवादलामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषावर आधारित भरपाई निश्चित केली जाईल.


प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- पीकपेरा स्वयं घोषणापत्र(स्वतःच्या स्वाक्षरीने किंवा अंगुठा)
- आधार कार्ड
- बँक पासबुक(राष्ट्रीयकृत बँक किंवा स्थानिक बँक)
- सातबारा उतारा(८ अ नमुना उतारा)
- बँक बचत खाते आधार कार्ड शी जोडलेले असावे(आधार लिंक)
- सामाईक क्षेत्र असेल तर दोघांची संमतीपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो (छायाचित्रे)
- पिक पेरा स्वयं घोषणा पत्र फॉर्म
मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेसाठी येथे क्लिक करा !
Pradhanmantri Pik Vima yojana 2024-प्रधानमंत्री पिक विमा योजना(PMFBY)|Pradhanmantri Pik Vima yojana (PMFBY)
पिक पेरा स्वयं घोषणा पत्रामध्ये भरायची आवश्यक माहिती अश्याप्रकारे भरा.
- अर्जदाराचे संपूर्ण नाव
- अर्जदाराच्या गावाचे नाव,तालुका आणि लिहा संपूर्ण पत्ता टाकावा.
- शेतीचा गट नंबर किंवा सर्व्हे नंबर टाका(अचूक भरावे)
- अर्जदाराची शेती कोणत्या शिवारात (गावात)आहे.त्या गावाचे नाव टाका.
- पेरलेल्या पिकांची माहिती भरावी(किती क्षेत्रामध्ये लागवड)
- पेरणी केलेल्या किती क्षेत्र आहे हेक्टर व आर मध्ये टाकावी.
- पेरणी केलेल्या दिवसाची दिनक टाकणे बंधनकारक आहे.
- फॉर्म भरताना चुका होऊ देऊ नका.अक्षर समजेल अश्या अक्षरात फॉर्म भरावा.अचूक माहिती टाकावी.
Pradhanmantri Pik Vima yojana 2024-प्रधानमंत्री पिक विमा योजना(PMFBY)|Pradhanmantri Pik Vima yojana (PMFBY)
प्रधानमंत्री पिक विमा योजना कधी सुरु झाली ?
प्रधानमंत्री पिक विमा योजना १३ जानेवारी २०१६ खरीप हंगामापासून सुरुवात झाली.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश नेमका काय आहे?
अचानक पणे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते जसे कि गारपीट,अतिवृष्टी,दुष्काळ ,पूर ढगफुटी,चक्रीवादळ अश्या अनेक आपत्ती मुले शेतकऱ्याचे नुकसान होते ते भरून काढण्यासाठी सरकार नुकसान भरपाई देऊन अर्थ सहाय्य करते हा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे घोषवाक्य काय आहे?
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे घोषंवाक्य ‘एक हंगाम एक दर हे आहे.
प्रधानमंत्री हफ्ता रक्कम काय आहे?
१)खरीप पिके -विमा रक्कमेचा २ टक्के २)रब्बी पिके – विमा रक्कमेचा १.५ टक्के ३)फळे,नकदी पिके -विमा रक्कमेच्या ५ टक्के हफ्ता आहे.
कोणत्या आपत्तीचा या मध्ये समावेश नाही?
मानवनिर्मित आपत्तीचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये समावेश नाही.
पिक विमा म्हणजे काय ?
नैसर्गिक आपत्ती आल्यावर स्थानिक स्तरावर पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा रक्कम प्रधान करणे.यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि त्याची शेती करण्याची रुची कायम राहील.
पीएम फसल योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
पीएम फासल योजनेसाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असली पाहिजे.जमीन भाडेतत्वावर केलेली असेल तर मालकी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.शेतकऱ्याने विमा संरक्षणासाठी अर्ज केलेला असावा.
मी प्रधानमंत्री योजनेसाठी नोदणी कशी करू?
PMFBY पोर्टल ला भेट द्या आणि https:/pmfby.gov.in लॉग इन करा.नोदणी केलेली नसणार तर नोदणी करून घ्या.अर्जामध्ये सांगितलेली आवश्यक माहिती भरा.
निष्कर्ष:-नमस्कार माझे प्रिय वाचक मित्रानो ,आम्ही तुम्हाला प्रामाणिक व खरी माहिती प्रदान करण्याचा प्रयन्त करतो.कारण आपल्या शेतकरी मित्रांना कामाच्या ओघात.काही योजना माहित होत नाही.शेतकरी हा आपल्या हक्कापासून वंचित राहू नये.व त्याला प्रत्येक योजना माहिती व्हावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे.तरीही तुम्ही सरकारी पोर्टल जाऊन एकदा खात्री करून घ्यावी हीच विनती.आपला दिवस सुखाचा जावो हीच निसर्गाला विनती.
आपण जर आमच्या वेबसाईट वर नवीन असाल आणि आपल्याल्या अश्याच नव-नवीन प्रकारे योजनेची माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा हि विनती.
Maharashtra sarkari yojana 2004
-
दिव्यांगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | Divyang Yojana In Marathi 2024 | असा करा अर्ज
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now दिव्यांगाना व अपंगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | … Read more
-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना |Ahilyabai Holkar Scheme In Marathi 2025
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना |Ahilyabai Holkar … Read more
-
अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension Yojana In Marathi
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension Yojana … Read more