मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024 | Majhi Ladaki Bahin Yojana Online Apply | आज पासून अर्ज प्रक्रिया सुरु !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024 | Majhi Ladaki Bahin Yojana Online Apply | आज पासून अर्ज प्रक्रिया सुरु !

Mukhyamantri majhi Ladaki Bahin Yojana २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यसाठी, महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णयक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण “ योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

प्रस्तावना

नमस्कार माता-भगिनीनो, आपले आपल्या मराठी वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे.आम्ही आपल्या ह्या वेबसाईट वर विविध केंद्रसरकार आणि राज्यसरकार च्या योजना घेवून येत असतो.महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनांपैकी महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024 Majhi Ladaki Bahin Yojana Online Applay होय.महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशन मध्ये विविध योजनाची घोषणा करण्यात आली.शेतकऱ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यासाठी आणि महिला/मुलींसाठी योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने घेतला दि-२८/०६/२०२४ च्या पावसाळी अधिवेशन मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा,अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प(Budget) मांडताना.महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर , राज्यातील महिलांना व मुलीना सशक्तीकरनास चालना देण्यासाठी आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करण्यासाठी अर्थ संकल्पनेत महिलांच्या हितासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024 Majhi Ladaki Bahin Yojana Online Apply “हि योजना सुरु करण्याचा घोषणा केली.राज्यातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार  ह्या महिलासाठी हि योजना एक संजीवनी म्हणून काम करेल. माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत महिलांना प्रतिमाह रु.१५००/- अर्थ सहाय्य दिले जाणार आहे

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या रोजच्या दैनदिन जीवनात ज्या काही आर्थिक समस्या निर्माण होतात.अश्या समस्यांना महिला स्वतः त्या समस्यांच्या निवारण करू शकतील,दुसरे कोणावर अवलंबून राहता.जसे आरोग्य किंवा आहारासाठी खर्च यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024 Majhi Ladaki Bahin Yojana Online Applay चा थोडाफार का होईना राज्यातील माता-भगिनींना मदत होईल यासाठी महाराष्ट्र सरकार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण”योजनांतर्गत महिलांना दरमहा रु.१५००/- आर्थिक मदत केली जाईल.आपण जर आज हि बघितले भारतात गरिबी हि मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसते.यांचे मुख्य कारण म्हणजे पाहिजे तसा रोजगार उपलब्ध होत नाही.त्यामुळे लोकांना दोन वेळेचे जेवणाचा सुद्धा प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतो.आपण जर बघितले तर महिलांच्या श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे.त्यामुळे महारष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत असतात त्यापैकी महत्वाची योजना म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना होय.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024 Majhi Ladaki Bahin Yojana बदल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय?कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण घेणात आहोत.आपल्याला एक छोटी विनंती आहे कि हा लेक संपूर्ण वाचवा जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर त्यांचे निराकरण नक्की होईल.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-2024
सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशमहिलांना आर्थिक सहाय्य करून आत्मनिर्भर बनवणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील महिला/मुली
अट२१ ते ६० वयोगटातील असणे आवश्यक आहे
लाभप्रतिमहा रु.१,५००/- अर्थसहाय्य
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख१ जुलै २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ जुलै २०२४
Majhi Ladaki Bahin Yojana 2024

आपण जर बघितले महाराष्ट्र राज्यातील महिलामध्ये अनिमियाचे प्रमाण हे ५० टक्के पेक्षा हि जास्त आहे.त्यात विविध समस्या.तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्रियांची टक्केवारी २८.७० टक्के एवढी आहे.हि सर्व परिस्थिती लक्षात घेता.महिलांना आर्थिक,आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

Majhi Ladaki Bahin Yojana Online Apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा उद्देश:

१.महिलांना आणि मुलीना आवश्यक अश्या सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे व प्रोत्साहन देणे.

२.महिलांना आर्थिक सहाय्य करून स्वावलंबी बनवणे.

३.राज्यातील महिला आणी मुलीना आत्मनिर्भर बनवणे.

४.महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचे पुनर्वसन करणे.

५.महिलांना आणि मुलीना सशक्तीकरणास चालना देणे.

६.महिला आणी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आणि पोषण आहाराच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे.

७.महिलांचे जीवनमान सुधारून त्यांना प्रोत्साहन देणे.

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे स्वरूप

मुख्यमंत्री माझी लाडकी महीन योजना अर्ज निवडीच्या नंतर योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या स्वतःच आधार लिंक असलेल्या बचत खात्यामध्ये योजनेचा लाभ हा थेट वितरीत (Direct Benefit Transfer) केला जाईल.हा लाभ रु.१५००/- एवढी रक्कम दिली जाईल.तसेच केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु.१५००/- पेक्षा कमी लाभ घेत असतील तर फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिल्यांच्या खात्यामध्ये वितरीत केला जाईल.

Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या महिला ज्याचे वय २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा,घटस्फोटीत, परित्यक्त्या ,निराधार आणि निराश्रित महिला ह्या योजेसाठी पात्र असतील याची नोंद घ्यावी.

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana Patrata

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता

आपल्याला माहित आहे कि मध्यप्रदेश राज्याने काही दिवसापूर्वी “मेरी लाडली बहिण” योजना घोषित केली त्याच धर्तीवर त्याच योजनासारखी योजना महाराष्ट्र सरकार ने घोषित केले ती म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” होय.ह्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी(सुरुवात) १ जुलै २०२४ पासून सुरुवात होणार आहे.ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे असले पाहिजे नसतील तर लवकर काढून घ्या!१ जुलैपासून आपण “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  • ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • महिलांचे वय किमान(कमीत-कमी) २१ वर्ष आणि कमाल(जास्तीत-जास्त) ६० वर्ष असणे आवश्यक आहे.तरच आपण ह्या योजनेसाठी अर्ज किंवा पात्र आहात.
  • ह्या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्त्या आणि निराधार/निराश्रित महिला माझीलाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत.
  • लाभ घेणाऱ्या किंवा अर्ज करणाऱ्या महिल्याचा कुटुंबातील सदस्य सरकारी नौकरी ला नसावा.
  • महिला दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवारातील असली पाहिजे.
  • लाभार्थी महिल्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • महिलांचे बँक खाते असले पाहिजे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हा थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वितरीत केला जाणार आहे.
  • लाभार्थी महिला कुटुंबांचे सर्व स्रोताद्वारे येणारे वार्षिक उत्पन्न हे रु.२.५० लाखापेक्षा अधिक नसावे.नाहीतर सदर योजनेसाठी आपण अपात्र होणार .mukhymantri majhi ladaki yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्रता

१.लाभार्थी महिलांच्या एकत्रित वार्षिक उत्पन्न हे रु.२.५० लाखापेक्षा जास्त असेल.

२.महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर(income tax) भरत असतील.

३.अर्जदार महिला अगोदर राज्य सरकार किंवा केंद्रसरकार यांनी राबवलेली आर्थिक योजनाद्वारे रु.१५००/- पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल अश्या महिला ह्या योजनेसाठी अपात्र असतील.

५.लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्याची पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.

६.अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार/आमदार असतील.

७.ज्यांच्याकडे चारचाकी वाहने(ट्रक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

८.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीवेतन फ्घेत आहेत.परंतु बाह्य यंत्रनाद्वारे कार्यरत असलेली किंवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र असतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनाबदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा|

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन त्यामध्ये काही नवीन नियम करण्याची गरज असेल तर ते करेल.

majhi ladaki bahin yojana Document in marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रिय भगिनीनो आपल्याला माहित असेलच कि महाराष्ट्र राज्याने पावसाळी अधिवेशन मध्ये आपल्या राज्याचे उप-मुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना अनेक महत्वपूर्ण योजना घोषित केल्या त्यापैकी सर्वात महत्वाची योजना व महिलांना दरमहा रु.१५००/- आर्थिक मदत करून महिलांना सक्षम बनवणे.तर अर्ज उद्यापासून(१ जुलै)पासून सुरु होत आहेत तर आपल्याकडे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” चा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे असली पाहिजे.

१.आधार कार्ड

२.महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)

३.किंवा महाराष्ट्र राज्यतील जन्म दाखला असणे अनिवार्य आहे.

४.उत्पनाचा दाखला(वार्षिक रु.२.५० लाखापरेंत असणे आवश्यक आहे)

५.राष्ट्रीयकृत बँकेचे खाते(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)

६.रेशन कार्ड

७.पासपोर्ट आकाराचा फोटो

८.योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज

९.सदर योजनेच्या अति शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची लाभार्थी निवड

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुखय्सेविका/सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रामाणिक केल्यानंतर लाभार्थी महिलांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा करतील.

Majhi Ladaki Bahin Yojana 2025

आपल्याला अर्ज भरण्यासाठी कुठे जावे लागेल व कोणत्या अधिकाराच्या कोणत्या जबाबदारी आहेत हे खालील प्रमाणे .

अ.क्रकार्यक्षेत्रलाभार्थ्याची अर्ज स्वीकृती/तपासणी/पोर्टलवर अपलोड करणेअर्ज पडताळून करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादरअंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी
1ग्रामीण भागअंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/ सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवकसंबधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारीसंबधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती
नागरी भागअंगणवाडी सेविका/ मुख्यसेविका /वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र  
mukhymantri majhi ladaki bahin arj prakriya marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया

ज्या महिलांना मोबाईल वापरता येत असेल अश्या महिलांना पोर्टल/ मोबईल च्या App मधून किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जातील हि अर्ज करू शकतात.

ज्यांना स्वतः अर्ज भरता येत नाही अश्या महिलांनि आपले अर्ज भरण्यासाठी सुविधा हि अंगणवाडी, केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये(नागरी/ग्रामीण/आदिवास) ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

खालीलप्रमाणे प्रमाणे प्रोसेस करावी.

१.पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येईल.

२.ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही.त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे,

अश्या महिलांनी गावातील अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे जावे.

(नागरी/ग्रामीण/आदिवासी) ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येते उपलब्ध असतील.

३.भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये जसे

(नागरी/ग्रामीण/आदिवासी/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन अर्ज प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरीत्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती घ्या कारण तुमच्याकडे अर्ज भरण्याचा प्रूप राहील.

४.अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामुल्य असेल यासाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाही अशे Gr मध्ये नमूद केले आहे,

५.महिलांनी अर्ज भरताना स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.कारण अर्ज भरतात अनेक प्रोसेस करावे लागतील जसे कि अर्जदाराचा थेट फोटो काढला जाईल आणि त्याठिकाणी E-KYC करता येईल.

अर्ज भरायला जाताना महिलांना काही आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहेत ते खालीलप्रमाणे

१.कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)

२.स्वतः चे आधार कार्ड

३.उत्पनाचा दाखला(आवश्यक असला तर)

४.बँक पासबुक

५.स्वतः चे छायाचित्र

बाकी वरती दिलेली सर्व कागदपत्रे ह्या योजनेसाठी आवश्यक आहे.

Majhi Ladaki Bahin Yojana Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अमलबजावणीसाठी च्या काही महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे

अ.क्रउपक्रम   वेळेची मर्यादा
1अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात  1 जुलै, 2024
2अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख  15 जुलै, 2024
3तात्पुरती यादी प्रकाशन  16 जुलै, 2024
4तात्पुरती यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा कालावधी  16 जुलै, 2024 ते    20 जुलै, 2024
5तक्रार/हरकतीचे निराकर करण्याचा कालावधी   21 जुलै, 2024 ते    30 जुलै, 2024
6अंतिम यादी प्रकाशन दिनांक   01 ऑगस्त, 2024
7लाभार्थ्याची बँकेमध्ये E-KYC करणे   10 ऑगस्त. 2024
8लाभार्थी निधी हस्तांतर   14 ऑगस्त 2024
9त्यानंतरचा महिन्यात देय दिनांकप्रत्येक महिन्याच्या तारखेपरेंत
majhi ladaki bahin yojana marathi 2024

Dbt पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा !

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आज आपण मुख्यमंत्री माझी बहिण योजनाबदल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त केला.लेख आपल्याला कसा वाचला याबद्दल आम्हला नक्की अभिप्राय द्या,आम्ही अजून आपल्यासाठी योजना घेवून येऊ.आपले जर माझी लाडकी बहिण योजनेबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आम्हला comment च्या माध्यामतून विचारू शकता,आम्ही आपल्या प्रश्नाचे किंवा शंकेचे लवकरात-लवकर निराकरण करण्याचा प्रयन्त करू धन्यवाद मित्रानो.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरु केली?

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना महाराष्ट्र सरकार ने चालू केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनासाठी प्रतिमहा किती अर्थ सहाय्य मिळणार आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना हि महिलासाठी आहे.२१ ते ६० वयोगटातील महिलांना राज्य सरकार प्रतिमाह रु.१५००/- अर्थसहाय्य मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनासाठी पात्रता काय आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अनिवार्य आहे.
महिलांचे वय किमान(कमीत-कमी) २१ वर्ष आणि कमाल(जास्तीत-जास्त) ६० वर्ष असणे आवश्यक आहे.तरच आपण ह्या योजनेसाठी अर्ज किंवा पात्र आहात.
ह्या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्त्या आणि निराधार/निराश्रित महिला माझीलाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत.
लाभ घेणाऱ्या किंवा अर्ज करणाऱ्या महिल्याचा कुटुंबातील सदस्य सरकारी नौकरी ला नसावा.
महिला दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवारातील असली पाहिजे.
लाभार्थी महिल्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
महिलांचे बँक खाते असले पाहिजे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हा थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वितरीत केला जाणार आहे.
लाभार्थी महिला कुटुंबांचे सर्व स्रोताद्वारे येणारे वार्षिक उत्पन्न हे रु.२.५० लाखापेक्षा अधिक नसावे.नाहीतर सदर योजनेसाठी आपण अपात्र होणार .mukhymantri majhi ladaki yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ?

१.आधार कार्ड
२.महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)
३.किंवा महाराष्ट्र राज्यतील जन्म दाखला असणे अनिवार्य आहे.
४.उत्पनाचा दाखला(वार्षिक रु.२.५० लाखापरेंत असणे आवश्यक आहे)
५.राष्ट्रीयकृत बँकेचे खाते(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
६.रेशन कार्ड
७.पासपोर्ट आकाराचा फोटो
८.योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
९.सदर योजनेच्या अति शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज कधी सुरु होणार आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज २ जुलै २०२४ पासून सरू होणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनाची अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे.तरीही आपण लवकरात-लवकर अर्ज भरावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनाचा अर्ज कुठे भरावा लागेल?

अर्ज भरता येत नाही अश्या महिलांनि आपले अर्ज भरण्यासाठी सुविधा हि अंगणवाडी, केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये(नागरी/ग्रामीण/आदिवास) ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.अश्या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात आणि अर्ज भरल्यानंतर पोच पावती घ्यायला विसरू नका.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कोण ?

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या महिला ज्याचे वय २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा,घटस्फोटीत, परित्यक्त्या ,निराधार आणि निराश्रित महिला ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असतील पात्र असतील याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment