अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2024 | Post-Matric Scholarship for SC students असा करा अर्ज !

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन २०२०-२१ ते २०२५-२०२६ कालावधीकारिता जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याबाबात निर्णय हा घेण्यात आलेल्या आहे.
प्रस्तावना
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये.आपले भविष्य आणि आयुष्य उज्वल व्हावे हीच सदिच्छा.आपण नेहमी राज्य सरकार आणि केंद्र सरकार च्या योजना आपण घेवून येत असतो.आमचा प्रामाणिक एकच उद्देश असतो कि सरकारच्या प्रत्येक योजना हि विद्यार्थ्यापरेंत पोहचली पाहिजे. त्या योजनेचा लाभ घेवून स्वतःच शिक्षणात एक वेगळीच उंची गाठावी.आज आपण अश्याच एक महत्वपूर्ण योजेनेपैकी योजना बघणार आहोत ती म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | Post-Matric Scholarship for SC students होय.ह्या योजनेची पात्रता काय? यासाठी कोणते कागदपत्रे लागतील ? अशीच संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेण्याच्या प्रयन्त करणार.चला तर विद्यार्थी मित्रानो,आपण अनुसूचित जातीच विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | Post-Matric Scholarship for SC students योजनेबद्दल जाणून घेऊया.हा लेख शेवटपरेंत वाचवा आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच त्यांचे निराकरण ह्या पोस्टच्या माध्यमातून नक्की होईल.
अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलीना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचा आदर्श घेवून उच्चविद्याविभूषित होणे, हा उउदेश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धसह) विद्यार्थ्याकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | Post-Matric Scholarship for SC students योजना हि सन-१९५९-६० पासून राबवण्यात येत आहे.सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धसह) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो व संबधित शैक्षणिक संस्थेस शिक्षण फी परीक्षा फी अदा केली जाते.या योजनेंतर्गत पालकांचे उत्पन्न मर्यादा हि आता २.०० लाखावरून २.५० लाख करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती |
सुरु केलेला विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देणे |
लाभार्थी | अनुसूचित जाती / नवबौद्ध विद्यार्थी/विद्यार्थिनी |
लाभ | वार्षिक निर्वाह भत्ता देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://scholarships.gov.in/ |
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश
हि शिष्यवृत्ती केवळ भारतातील अभ्यासासाठी उपलब्ध आहे.
१.अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
२.विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे.
३.विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असताना निर्वाह भत्तासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2024 | Post-Matric Scholarship for SC students
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती
१.विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.
२.विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष हजेरीबाबत अट शैक्षणिक वर्ष- २०२३-२४ पासून अवलंबण्यात येत आहे.
३.सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या प्रत्येक शैक्षणिक वर्षाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल राज्य शासनस सादर करेपर्यंत स्थगित ठेवण्यात येतील.
४.विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे देण्यात येणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये वयोमर्यादेची अट ठेवण्यात आलेली नाही.सदर बाब विचारात घेता एक अभ्यासक्रम- एक शिष्यवृत्ती असे धोरण स्वीकारण्यात येणार आहे.
५.अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख व त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य तरच विद्यार्थी सदर योजनेसाठी पात्र असेल.
राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुक्ल शिष्यवृत्तीसाठी येथे क्लिक करा!
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना अभ्याक्रमाचे चार गटात वर्गीकरण केले आहे ते खालीलप्रमाणे.
गट-१ | गट -२ | गट-३ | गट-४ |
औषध, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, नियोजन, आर्किटेक्चर, डिझाइन, फॅशन टेक्नॉलॉजी, कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, व्यवस्थापन, व्यवसाय वित्त/प्रशासन, संगणक विज्ञान/अनुप्रयोग व्यावसायिक पायलट परवाना (हेलिकॉप्टर पायलट आणि मल्टीइंजिनसह) मधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम रेटिंग) को | व्यवस्थापन आणि औषधाच्या विविध शाखांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम C.A/I.C.W.A. /C.S./I.C.F.A. इ. | पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम गट 1 आणि गट 2 B.A / B.Sc अंतर्गत समाविष्ट नाहीत. / B.Com इ. M.A/ M.Sc. / M.Com इ. | व्यवस्थापन आणि खानपान, प्रवास/पर्यटन/आतिथ्य व्यवस्थापन, अंतर्गत सजावट, पोषण आणि आहारशास्त्र, व्यावसायिक कला, आर्थिक सेवा (उदा. बँकिंग, विमा, कर आकारणी इ.). |
निवडीचा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे
- सामाजिक आर्थिक सर्वेक्षण २०११ (SECC-२०११) मधील वंचित घटकातील निर्धारित केलेल्या एकूण ७ निकषांपैकी किमान ३ व त्यापेक्षा अधिक निकषांची पूर्तता करणाऱ्या अनुसुचित जाती प्रवर्गातील कुटुंबातील विद्यार्थी.
- अनुसूचित जाती कुटुंबातील एक किंवा दोन्ही पालक निरक्षर असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी.
- राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त शाळा, नगरपरिषद, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मान्यताप्राप्त शाळामधून इ.१० वी उत्तीर्ण अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी.
- विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेता व याबाबतची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होण्याचा दुर्ष्टीकोनातून जिल्हास्तरावर जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय व सहायक आयुक्त कार्यालय तसेच प्रादेशिक उपायुक्त कार्यलया आणि आयुक्तालय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनेची माहिती देणे व त्याबाबती येणाऱ्या अडचणीचे निराकरण संबधित कार्यालय करेल,आपल्याला अर्जसंबधी काही समस्या येतील त्या आपण संबधी ताधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून निराकरण करू शकता.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाचा निर्वाह भत्याचे सुधारित दर खालीलप्रमाणे
गट | वार्षिक निर्वाह भत्ता(रुपये) (वसतिगृहात राहणारे विद्यार्थी) | वार्षिक निर्वाह भत्ता (रुपये) वसतिगृहात न राहणारे विद्यार्थी) |
गट-१ | १३,५००/- | ७,०००/- |
गट-२ | ९,५००/- | ६,५००/- |
गट-३ | ६,०००/- | ३,०००/- |
गट-४ | ४,०००/- | २,५००/- |
१.दिव्यांग लाभार्थ्याकरिता उपरोक्त निर्वाहभत्यामध्ये १० टक्के अधिक दर देय राहील.
२.C.A/I.C.W.A/C.S/I.C.F.A. या अभ्यासक्रमाना प्रवेशित विद्यार्थ्यांना केवळ वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्याचेच दर लागू राहतील.
३.दूरस्थ / ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही निर्वाह भत्ते लागून होणार नाहीत.
४.सदर योजनेचा लाभ हा डीबीटी(DBT) द्वारेच देण्यात येणार आहे असल्याने लाभार्थ्याने आपले बँक खाते हे आधार कार्ड शी सलग्न ठेवावे.शिष्यवृत्ती हि थेट बँक खात्यामध्ये वितरीत केली जाईल.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2024 | Post-Matric Scholarship for SC students
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची पात्रता
१.लाभार्थी हा भारताचा रहिवासी असला पाहिजे.
२.अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
३.अर्जदार हा मॅट्रिकोत्तर, उच्चमाध्यमिक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार हा पात्र असेल.
३.ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचे सर्व स्रोतद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.२,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२.वार्षिक उत्पन्न(२.५० लाखापेक्षा जास्त नसावे)
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)
५.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स(आधार कार्ड हे बांकी खातेशी लिंक असले पाहिजे)
६.उत्तीर्ण वर्षाचे सर्टिफिकेट(१०वि, १२वि,पदवी आणि पदव्युतर)
७.दिव्यांग प्रमाणपत्र(दिव्यांग असल्यास)
८.२ पासपोर्ट फोटो
९.मोबाईल क्रमांक
हे सर्व कागदपत्रे आपण अधिकृत वेबसाईट किंवा संबधित ऑफिसशी संपर्क साधून आपण अधिक माहिती जाणून घेवू शकतात.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अश्या प्रकारे करा अर्ज
१.सर्वात प्रथम आपण अधिकृत वेबसाईट वर जा.
वेबसाईट URL: येथे क्लिक करा
२.New Registration कॉर्नर वर क्लिक करा.
३.त्या मध्ये सर्व दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर “चेक बॉक्स” वर क्लिक करून पुढे जा.
४.आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर OTP येईल.
नोंदणीकृत अर्जदार
१.अधिकृत NSP वेबसाईट ओपन करा आणि अर्जदार कॉर्नर अंतर्गत फ्रेश application वर क्लिक करा.
२.Application Id आणि Password टाकून लॉग इन करा.
३.शिष्यवृत्ती निवडा.
४.अर्जदाराचा अर्ज भरा.
५.आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.(कागदपत्रे स्वच्छ स्कॅन कॉपी अपलोड कर)
६.आणि सर्व माहिती एकदा चेक करून Submit बटनावर क्लिक करा.
प्रिय वाचक विद्यार्थी मित्रानो, आज आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | Post-Matric Scholarship for SC students ह्या योजनेबद्ल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त केला आहे.तरीही आपले काही प्रश्न किंवा शंका असतील आपण आम्हला Comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही लवकरच आपल्या प्रश्न किंवा शंकेचे निराकरण करू.धन्यवाद
मित्रानो कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण अधिकृत वेबसाईट किंवा संबधी ऑफिसशी संपर्क साधून माहिती पडताळूनच मग निर्णय घ्यावा.आम्ही ह्या योजना आपल्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून घेवून येत असतो.आमचा प्रामणिक उद्देश एकच आहे कि विद्यार्थ्यान परेंत प्रत्येक योजना पोहचली पाहिजे.आणि योजनेचा लाभ घेवून विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती साधावी हाच आमचा हेतू असतो.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना काय आहे?
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना हि एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.जी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाद्वारे अनुसूचित जाती (SC) विद्यार्थ्यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनाचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत ?
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनाचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे अनुसूचित जाती(SC)विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणसाठी प्रोत्साहन देणे.गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करणे.शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन मुले सक्षम होतील असा हेतू आणि उद्देश ह्या योजनेचा आहे.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कोणते फायदे दिले जातात?
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनाअंतर्गत उच्च शिक्षणसाठी अर्थ सहाय्य प्रदान केले जाते.
दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणते फायदे दिले जातात?
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती व्यतिरिक्त दिव्यांग(अपंग)विद्यार्थ्यांना १०% अतिरिक्त भत्ता दिला जातो.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनासाठी पात्र उत्पनाचे निकष काय आहे?
ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचे सर्व स्रोताद्वारे वार्षिक उत्पन्न रु.२,५०,०००/- पेक्षा जास्त नसेल त्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेता येईल.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
१.अर्जदाराने NSP पोर्टलवर त्याची स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.२.त्यानंतर लॉग इन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि submit बटनावर क्लिक करून आपला अर्ज यशस्वी जमा झाल्याचा sms आपल्याला यीएल.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे?
१.आधार कार्ड २.उत्पनाचा दाखला ३.जात प्रमाणपत्र ४.शैक्षणिक प्रमाणपत्र ५.अधिवास प्रमाणपत्र ६.बँक खाते पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स ७.छायाचित्र हे सर्व कागदपत्रे अपलोड करताना स्वच्छ व क्लिअर दिसतील अश्या प्रकारे कागदपत्रे स्कॅन करा.
NSP URL काय आहे?
URL:https://scholarship.gov.in/ आहे.