मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना| majhi ladaki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना| majhi ladaki bahin yojana
प्रस्तावना:
मित्रानो आपल्याला माहिती आहे कि, २८ जून महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होते.त्या पावसाळी अधिवेशनमध्ये राज्याचे उप-मुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प माडतात अनेक योजनाची घोषना केली.पण सर्वात लक्ष वेधून घेणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ठरली.तर ह्या योजनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.असे एकूण ७ बदल आहेत.काही अटी आणि शर्ती व पात्रता यामध्ये बदल करण्यात आला आहे.ते आपण या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.
राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचा आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णयक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण “योजना सुरु करण्याबाबत महला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि:२८.०६.२०२४ रोजी मान्यता देण्यात आली.त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला पण त्यामध्ये काही बदल करण्यासाठी सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्यासाठी बाब विचाराधीन होती.त्याअनुषगाने मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेमध्येबाबत चर्चा करण्यासाठी दि.०२.०७.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठीकीमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण “ या योजनेच्या दि.२८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली त्याबद्दल आपन्न ह्या लेख मधून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त कार्नास्र आहोत.तरीही आपण हा लेख पूर्ण वाचवा जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच त्या प्रश्नाचे निराकरण ह्या लेखद्वारे नक्की होईल.
नवीन GR | बघण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Application लिंक | येथे क्लिक करा |
माझी लाडकी बहिण योजना जुना GR | बघण्यासाठी येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी करा असा अर्ज
१.सर्वात प्रथम मोबाईल Application वर जा.
२.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” या पर्यायावर क्लिक करा.
३.अर्ज करा बटणावर क्लिक करा.
४.आवश्यक असलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून भरा.
५.योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
६.अर्ज हा पूर्ण व्यवस्थित वाचून आवश्यक ती माहिती योग्यरीत्या भरा.
७.त्त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
८.तुमचा अर्ज क्रमांक हा तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर SMS ने पाठवला जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना| majhi ladaki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
१.योजनेचा अर्ज
२.अर्जदाराचे आधार कार्ड
३.१.अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)२.रेशन कार्ड ३.मतदान ओळख पत्र
४.शाळा सोडल्याचा दाखला ५.जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक
ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.
४.सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला वार्षिक उत्पनाचा दाखला नसेल तर पिवळे रेशनकार्ड व केशरी रेशन कार्ड हि चालेल.(पण ज्यांच्या कडे पिवळे व केसरी रेशनकार्ड नसेल तर उत्पनाचा दाखला अनिवार्य आहे(वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख)
५.बँक खाते पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स(बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे.
६.पासपोर्ट फोटो(रंगीत)
७.मोबाईल क्रमांक
टीप:-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चे अर्ज करण्याची अंतिम तारीख;३१ ऑगस्ट , २०२४ करण्यात आली आहे.
महत्वाची बाब:दि.३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना दि. १ जुलै २०२४ पासून दरमहा रु१.५००/- लाभ हा थेट महिला लाभार्थ्याचा बँक खात्यामध्ये वितरीत केला जाईल.
शासन निर्णय खालीलप्रमाणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना| majhi ladaki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आला आहे.
अ)योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे
अ.क्र | अगोदरच शासन निर्णय | शासन निर्णयमध्ये बदल |
१ | ३.योजनेचे लाभार्थी:- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला. | ३.योजनेचे लाभार्थी:-महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. |
२ | ४.योजनेच्या लाभार्थी पात्रता:-अ.क्र (२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार | योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता:- अ.क्र (२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. |
३ | ४.योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता: अ.क्र. (३) किमान वयाची २१ वर्ष पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपरेंत | ४.योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता:- अ.क्र.(३)किमान वाय्ताची २१ वर्ष पूर्ण व कमाल वायची ६५ वर्ष होईपरेंत |
४. | ५.अपात्रता:- अ.क्र(३) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी/कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृतत्तीनंतर निव्रुतीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. | ५.अपात्रत:- अ.क्र.(३) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी/कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृतत्तीनंतर निव्रुतीवेतन घेत आहेत.तथापि,रु.२.५० लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. |
५. | ५.अपात्रता:- अ.क्र. (४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्याइतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु-१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. | ५.अपात्रता:- अ.क्र. (४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु.१,५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा लाभ घेत असेल. |
६ | अपात्रता:- अ.क्र.(७) ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. | ५.अपात्रता:- अ.क्र. (७)५ एकर शेतीची अत आता वगळण्यात आली आहे. |
७ | ६.सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत: अ.क्र. (३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सादर करायचा होतो. | ६.यामध्ये बदल करण्यात आलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे:- अ.क्र. (३) महाराष्ट्र राजायचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या महिलेने १५ वर्षापूर्वीचे (१) रेशनकार्ड (२)मतदार ओळखपत्र, (३)शाळा सोडल्याचा दाखला (४) जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.) (परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अश्या बाबतीत त्यांच्या पतीचे (१)जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. |
८ | ६.सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते:- अ.क्र.(४)सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पनाचा दाखला त्यामध्ये वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखांपर्यंत अने अनिवार्य होते. | ६.यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. अ.क्र. (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पनाचा दाखला(वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे.(पण ज्यांच्या कडे पिवळे व केशरी कार्ड आहे अश्या धारकांना उत्पनाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुत देण्यात आली आहे. |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज PDF
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासंबधी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा|
असा भरा माझी लाडकी बहिण योजना अर्ज
१.महिलेचे संपूर्ण नाव(अर्जदाराचे संपूर्ण नाव)
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
महिलेचे लग्नानंतरचे नाव
२.अर्जदाराची जन्मतारीख टाका DD/MM/YYYY
३.अर्जदाराचा संपूर्ण पत्ता (तुम्ही सद्या वास्तव्यास आहे तो संपूर्ण पत्ता पिन कोड सहित टाका)
४.जन्माचे ठिकाण
जिल्हा
गाव/शहर (आपण गावाच्या भागात राहत असाल तर गाव नाहीतर शहर)
ग्रामपंचायत/नगर पंचायत/नगरपालिका
पिन कोड
५.मोबाईल क्रमांक टाका (१० अंकी)
६.आधार कार्ड क्रमांक टाका(१२ अंकी)
७.आपण शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थीक योजनेचा लाभ घेत असाल तर ह होय म्हणा. कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही म्हणा.
होय/ नाही
घेत असल्यास दरमहा .रु.—————/- किती घेतात ते ह्या जागेत भरावे
८.वैवाहित स्थिती- —————
१.विवाहित २.घटस्फोटीत ३. विधवा ४. पारीत्तक्त्या ५.निराधार
वरील पैकी जे असेल ते एक निवडा
९.अर्जदाराची बँक खाते ची संपूर्ण माहिती भरा
१.बँकेचे नाव
२.बँक खाते धारकाचे नाव
३.बँक अकाऊंट नंबर टाका
४. बँकेचे IFSC कोड टाका
१०.आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय?
असेल तर होय वर टीक करा!
नसेल तर नाही वर टिक करा !
११.खालील सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
१.आधार कार्ड
२.अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मप्रमाणपत्र
३.उत्पन्न दाखला
४.अर्जदाराचे हमीपत्र
५.बँक पासबुक
६.अर्जदाराचा फोटो
टीप:अर्जदाराने आपला संपूर्ण अर्ज भरला नंतर संबधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावा.
नमस्कार मित्रानो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईट मध्ये.आपण सर्वांनी लवकरात-लवकर अर्ज भरा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्या.मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज दिला आहे.आपल्यला अजून काही प्रश्न असतील तर आपण आम्हला Comment च्या माध्यमातून विचारू शकतात.हि पोस्ट शेअर करायला विसरू नका तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा फायदा होईल.धन्यवाद……
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.३१ ऑगस्ट २०२४ आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे काय ?
१.योजनेचा अर्ज
२.अर्जदाराचे आधार कार्ड
३.१.अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)२.रेशन कार्ड ३.मतदान ओळख पत्र
४.शाळा सोडल्याचा दाखला ५.जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक
ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.
४.सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला वार्षिक उत्पनाचा दाखला नसेल तर पिवळे रेशनकार्ड व केशरी रेशन कार्ड हि चालेल.(पण ज्यांच्या कडे पिवळे व केसरी रेशनकार्ड नसेल तर उत्पनाचा दाखला अनिवार्य आहे(वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख)
५.बँक खाते पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स(बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे.
६.पासपोर्ट फोटो(रंगीत)
७.मोबाईल क्रमांक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कसा करावा?
असा करा अर्ज:
१.सर्वात प्रथम मोबाईल Application वर जा.
२.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” या पर्यायावर क्लिक करा.
३.अर्ज करा बटणावर क्लिक करा.
४.आवश्यक असलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून भरा.
५.योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
६.अर्ज हा पूर्ण व्यवस्थित वाचून आवश्यक ती माहिती योग्यरीत्या भरा.
७.त्त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
८.तुमचा अर्ज क्रमांक हा तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर SMS ने पाठवला जाईल.