Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनासाठी सर्व यात्रा मोफत हि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनामधून महाराष्ट्र सरकार हि संधी जेष्ठ नागरिकांना देत आहे

Maharashtra Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाबद्दल जाणून घेणार आहोत.यासाठी पात्रता काय ? अपात्रता काय ? कोणती आवश्यक कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.तरीही आपण आपल्या घरातील जेष्ठ नागरिक किंवा आपल्या नातवाईक किंवा आपले शेजारी जेष्ठ नागरिक असतील त्त्यांचे वय 65 आहे किंवा त्यावरती आहे अश्या नागरिकांना आणि नातेवाईकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाबद्दल माहिती द्या.

प्रस्तावना

भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी राहत असतात. प्रत्येक जण आपला धर्माच आचरण आणि प्रसारण करत असतो.आपल्या महाराष्ट्र हि अगोदर पासून सन्त्क़चि भूमी राहीली आहे.आणि महाराष्ट्राची ओळख हि संताची भूमी म्हणून केली जाते कारण महाराष्ट्रमध्ये अनेक आणि सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होईल गेले आहेत.प्रत्येक संत आणि धर्मगुरू यांचा विचाराचा प्रवाह हा भारताचा सीमा ओलाडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य ,समाजकार्य भक्ती मार्गाने करत असतात. आपले दैनदिन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचे/भगवंताचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांच्या मोठी तीर्थस्थळे आहेत. तिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याच्या खूप सार्या जेष्ठ नागरिकांचे स्वप्न किंवा इच्छा असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्र जाण्याची इच्छा असते. परंतु परीस्थी सर्वसामन्य असते, गोरगरीब, आर्थिक परीस्थिती हि नाजूक असते एवढा पैसा नसतो त्यामुळे अश्या जेष्ठ नागरिकांचे स्वप्न आणि इच्छा हि सुप्तच असते.सोबत कोणी नसल्याने किंवा पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांचे तीर्थ यात्रा करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते.म्हणून महाराष्ट्र सरकारने खूपच महत्वाचा निर्णय घेतला तो जेष्ठ नागरिकांचे राहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण करेल तो निर्णय म्हणेज महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय खरच खूपच कौतुकास्पद आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

चला तर मित्रानो आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाबद्दल जाणून घेवूया |

योजनेचे नावमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
सुरु केलीमहाराष्ट्र शासन
विभागसामाजिक ज्ञाय व विशेष सहाय्य विभाग
दिनांक14 जुलै 2024
लाभार्थीवय वर्ष 60 व त्यावरील जेष्ठ नागरिक
लाभतीर्थ दर्शन
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ —————————-
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

योजनेचा उद्देश

  • महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शण यात्रा मोफत.
  • वय वर्ष 65 त्यावरील जेष्ठ नागरिकासाठी आह.
  • योजनेची व्याप्ती
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि जेष्ठ नागरिकांसाठी आहे.ह्या योजनेमध्ये भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील.या यादी मधील काही स्थळे कमी किंवा वाढू शकतील.ह्या यादीमधील एका तीर्थक्षेत्र स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेककरिता केवळ एकदाच लाभ घेता येईल.तसेच ह्या योजनेंतर्गत प्रवास खर्चाची कमाल कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु.30,000/- असेल.यामध्ये प्रवास, भोजन, निवास इ. खर्च ह्यामध्ये समवेश राहील.
  • योजनेचे लाभार्थी
  • महाराष्ट्रातील 60 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेता येईल.
  • मुख्यमंत्री तीर्थ योजेनेची योजेनेची लाभार्थ्याची पात्रता खालीलप्रमाणे:
  • लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीचे वय 60 वर्ष किंवा त्यावरील जेष्ठ नागरिकच ह्या योजेनेसाठी अर्ज करू शकतात.
  • लाभार्थीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:
  • ऑनलाईन अर्ज
  • आधार कार्ड/रेशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • जन्म दाखला (लाभार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर लाभार्थ्याकडे 15 वर्षापूर्वीचे 1.रेशन कार्ड 2.शाळा सोडल्याचा दाखला 3.मतदार ओळखपत्र 4.जन्म दाखला यापैकी 1 कोणतेही असले तरी लाभार्थी हा योजेनेसाठी पात्र असेल.
  • उत्पन्नाचा दाखला(वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापर्यंत असले पाहिजे)
  • पासपोर्ट फोटो
  • वैदकीय प्रमाणपत्र
  • कुटुंबातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजेनेचे अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

मुख्यमंत्री सौर कृषी योजासाठी येथे क्लिक करा |

लाभार्थ्याची निवड

  • लाभार्थ्याची निवड हि जिल्हा स्तरावर स्थापन समितीद्वारे खालील पद्धतीने केली जाईल.
  • प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानुसार कोटा ठरवला जाईल.
  • अर्जाची संख्या आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार कोटा निश्चित केला जाईल.
  • निश्चित कोटापेक्षा जास्त अर्ज आपले तर (लॉटचे संगनिकीय ड्रॉ ) काढला जाईल.
  • 100 टक्के कोटापेक्षा जास्त अर्ज आल्यास.अतिरिक्त अर्ज हे प्रतीक्षा यादीत तयार केली जाईल.
  • निवडलेला लाभार्थी जर तीर्थ दर्शन यात्रेला जर गेला नाही तर, प्रतीक्षा यादीतील लाभार्थी प्रवासाला तीर्थ दर्शन यात्रेला पाठवले जाईल.
  • ज्या व्यक्तीची निवड झाली आहे तोच व्यक्ती प्रवासाला जावू शकतो, त्यासोबत कोणत्याही व्यक्तीला घेवून जाऊ शकत नाही.
  • जर पत्नी आणि पतीने दोघांनी हि स्वतंत्र अर्ज केले पण  एकाचीच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेला निवड झाली तर आणि दुसऱ्याची जोडीदाराची निवड नाही झाली, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेला पाठवण्याचा निर्णय घेवू शकतील.

अतिरिक्त खर्च:

  • जर प्रवासाला निघाला तर शासनाने ठरवून दिलेल्या सुविधाव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायची असेल तर स्वखर्चाने त्या गोष्टी करायची असेल.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • योजनेचा अर्ज भरण्यासाठी पोर्टल/मोबाईल द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे आपण अर्ज करू शकतात.
  • जे पात्र आहेत त्याच जेष्ठ नागरिकांना ह्या योजनेसाठी अर्ज करता येईल.
  • ज्या अर्जदाराला अर्ज करता येत अन्ही त्यांनी सेतू सुविधा केंद्रावरून हा अर्ज भरून घ्यायचा आहे.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया विना शुल्क असेल.
  • ज्याला अर्ज करायचा आहे तो व्यक्ती स्वतःहून अर्ज करण्याच्या ठिकाणी उपस्थिती राहणे आवश्यक आहे.
  • कारण अर्ज भरताना त्याचा थेट फोटो काढता येईल आणि KYC हि करता येईल.
  • खालीलप्रमाणे आपले ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःह चे आधार कार्ड

Maharashtra Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

अर्ज केल्यानंतर आपली निवड झाली कि नाही ते खालीलप्रमाणे तपासायचे:

  • अर्जाची पूर्ण प्रक्रिया झाल्यावर तात्पुरता स्वरुपाची यादी लावली जाईल.
  • जे अर्जदार पात्र ठरले आहेत त्यांची तात्पुरता यादी पोर्टल वर जाहीर केली जाईल.
  • पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराने नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हि महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला एक कौतुकास्पद योजना आहे.प्रत्येक व्यक्तीचे आयुष हे काम आणि परिवाराचे गरजा पूर्ण करण्यात जाते व शेवटी 60-65 नंतर अगोदर तीर्थ दर्शनाला जावू असे बघितलेले स्वप्न हे स्वप्नच राहते.यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली या योजेनेत ज्यांचे वय 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना राज्यसरकार एकूण 30,000/- रुपये स्वतः खर्च करून जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घडवून आणणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजेंचे लाभार्थी वय वर्ष 60 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना मुख्य्म्नात्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेता येईलो.आणि तीर्थयात्रा दर्शन सदर योजनेच्या माध्यांतून घडून येईल.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज कसा करायचा?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
आपल्याला जरअर्ज भरता येत असेल तर आपण आपल्या मोबाईलद्वारे हि योजनेचा अर्ज करू शकतात किंवा आपल्या जवळच्या सीटू केंद्रावर हि जाऊन आपण मुख्यमंत्री तीर्थ योजनेचा अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतील:
१.आधार कार्ड २.रेशन कार्ड ३.वयाचा पुरावासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ४. उत्पनाचा दाखला ५.हमीपत्र ६.कुटुंबातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक संपर्क साठी आणि वैदकीय प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा उद्देश काय?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा उद्देश असा कि सर्व धर्मियाची धर्मस्थळे असतील/तीर्थ क्षेत्र असतील तर अश्या ठिकाणी जाण्याची इच्छा असते.पण आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे त्यांची तीर्थ दर्शनला जाण्याची इच्छा पूर्ण होत नाही.त्यासाठी राज्य सरकारने खूपच कौतुकास्पद योजना राबवण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ह्या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घेता येईल यासाठी राज्य सरकार रु.30,000/- प्रती व्यक्ती असा प्रवास खर्च करणार आहे आणि जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनाची संधी उपलब्ध करून देणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी?

योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्रातील 60 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेता येईल.
मुख्यमंत्री तीर्थ योजेनेची योजेनेची लाभार्थ्याची पात्रता खालीलप्रमाणे:
लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
लाभार्थीचे वय 60 वर्ष किंवा त्यावरील जेष्ठ नागरिकच ह्या योजेनेसाठी अर्ज करू शकतात.
लाभार्थीचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment