पंतप्रधान विश्वकर्मा योजना २०२४ मराठी|PM Vishwakarm Yojana २०२३-२०२४|पीएम विश्वकर्मा योजना|

पीएम विश्वकर्मा योजना माहिती

प्रस्तावना
नमस्कार मित्रानो आपले मराठी वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जो हीच सदीच्छा.आम्ही आपल्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांच्या योजना आपल्यापरेंत पोहचवण्याच काम करत असतो.आमचा उद्देश एकच आहे कि आपल्या बांधवाना प्रत्येक योजनाचा लाभ मिळाला पाहिजे.कोणीही आपल्या हक्कपासून वंचित राहू नये.विविध योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान नक्कीच सुधारेल व आपल्याला आर्थिक मद्दत हि मिळेल.आपल्या व्यवसायात हातभार हि लागेल.अशीच आम्ही आज पंतप्रधान विश्वकर्मा योजना आपल्यासाठी घेऊन आलोत.विश्वकर्मा योजनेसाठी कागदपत्रे कोणते लागतील?आणि पात्रता काय हे आपण सविस्तर ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत.
तर चला मग मित्रानो आज आपण केंद्रसरकार ची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसंबधित संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत,तरी हि पोस्ट शेवटपरेंत वाचावी कारण आपले जे काही प्रश्न असतील किंवा समस्या त्याचे नक्की निराकरण होईल.त्यामुळे लेख हा शेवटपरेंत वाचवा हि विनंती.
मित्रानो आपण जर बघितले तर आपला भारत देशामध्ये पारंपारिक व्यवसाय जास्त केले जातात.जसे शेती किंवा वडिलोपार्जित व्यवसाय असेल.केंद्रसरकार योजनचे सूक्ष्म,लघु आणि मध्य ह्या खात्यांनी हि योजना सुरु केली.हि योजना सुरु करण्याचा उद्देश कि कारागीर आणि कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना आधुनिक उपकरणे,तंत्रज्ञान आणि डीजीटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करणे.सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर बेरोजगारीचे प्रमाण हि मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय.तरुणांना हाताला काम मिळत नाही.घरची परस्थिती हलाकीची असली तर आपला वडिलोपार्जित व्यवसाय करायचा.त्यामध्ये जर पूर्ण प्रशिक्षण नसल तर फारसा यश मिळत नाही.त्यामुळे पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण देऊन.सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करणे.सर्टिफिकेट सोबत आवश्यक असलेले साहित्य हि दिले जाईल .यामुळे कारागीर व कामगारांना एक जगण्याच साधन आणि त्याचं जीवनमान उंचवण्याच काम विश्वकर्मा योजना करत आहे.
योजनेची माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना |
सुरु केली | केंद्र सरकार |
योजनेचा उद्देश | व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://pmvishwakarma.gov.in |
पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार?
पीएम.विश्वकर्मा ह्या योजनेमध्ये विविध १८ प्रकारच्या व्यवसाय यामध्ये समावेश करण्यात आले आहेत.यामध्ये ह्या १८ सेक्टर मधल्या कामगारांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.खाली दिलेल्या यादीनुसार.
- सुतार
- न्हावी
- मिस्त्री
- सोनार
- धोबी
- मच्छिमार
- हार बनवणारे
- कुलपांचे कारागीर
- कुंभार
- लोहार
- मूर्तिकार
- मोची
- टेलर
- हातोडी इ किट बनवणारे
- चटई,झाडू बनविणारे कारागीर
- लहान मुलाची खेळणी बनविणारे कारागीर
- बोट किंवा नाव बनवणारे कारागीर
- शिल्पकार इ कारागीरांसाठी हि योजना आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे
१.आधार कार्ड(बँक खातेशी लिंक असावे)
२.Pancard
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.उत्पनाचा दाखला(Income Certificate)
५.बँक पासबुक
६.आपण राहत असलेला निवासी पत्ता
७. २ पासपोर्ट आकाराचा छायाचित्र
८.आपण जे एखादा कोर्स केलेय असेल तर त्याच सर्टिफिकेट जोडा
९.भ्रमणध्वनी क्रमाक(आपला मोबाईल नंबर अचूक द्या)

पीएम विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे
पीएम विश्वकर्मा हि एक सर्वसमावेशक योजना आहे.
१.कारागीर आणि कामगारांना सक्षम बनवणे.
२.विश्वकर्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि साहित्य देणे.
३.कारागीर आणि कामगारांना योग्य प्रशिक्षण देऊन त्याची कौशल्य सुधारन्यासाठी कौशल्य प्रधान करणे.
४.चांगल्या आधुनिक आणि तंत्रज्ञान पुरवून कामगार आणि कारगीर यांचे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवणे.
५.डीजीटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करणे.
६.स्वतःच्या ब्रंड promotion आणि मार्केटिंग साठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण स्टायपेंड
- प्रत्येक लाभार्थी प्रशिक्षण घेण्यास पात्र असेल तर त्याला स्टायपेंड रु.५०० दररोज बेसिक चालू असताना आणि प्रशिक्षण हि दिले जाईल.
- प्रशिक्षण स्टायपेंड हि लाभार्थ्याला त्याच्या खात्यात जमा केले जाईल.प्रशिक्षणानंतर डीबीटी मोड्वारे दिले जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहे आणि अटी काय ?
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहे आणि अटी काय ?
- अर्जदार हा भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे
- अर्जदाराचे वय हे १८ पेक्षा जास्त आणि ५० वर्षापेक्षा कमी असेले पाहिजे
- आपला पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- पीएम विश्वकर्मा योजनेसाठी एका कुटुंबातील एकच व्यकी लाभ घेऊ शकतो
- आपण जर एखादा कोर्से किंवा ट्रेनिंग घेतली असेल तर त्यांना प्राधान्य असेल
- अर्जदार हा कुठल्या हि शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कामावर असेल तर तो आणि त्याच कुटुंब ह्या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
- अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक खातेशी लिंक केलेलं असावे
- पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या १४० जातीपैकी एक असणे आवश्यक आहे.
पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी येथे क्लिक करा!
पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये काय लाभ मिळतील?
या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसाय तरुण कारागिरांना १८ व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल.प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन ५०० रुपये भत्ता दिला जाईल.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टूल कीट खरेदी करण्यासाठी २०,००० रुपये दिले जातील .
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
पंतप्रधान विश्वकर्मा हि योजना स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटीत क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि वरीलपैकी एक कुटुंब आधारित पारंपारिक व्यवसायात गुंतलेला कारागीर आणि कामगार हे पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असतील.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी वयाची आत आहे का?
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी १८ वर्षाच्या पुढील व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र असेल.
पीएम विश्वकर्मा योजनेत ई व्हाउचर म्हणजे काय?
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र उमेदवारांना आधुनिक टूल किट खरेदी करण्यासाठी रु.१५,००० किमतीचे ई व्हाउचर दिले जातात.
पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
आपली ऑनलाईन नोदणी प्रक्रिया पूर्ण झाली.कि तुम्ही पीएम विश्वकर्मा च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन pmvishwakarma.gov.in वरून आपण विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र डाउनलोड करू शकता.
पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय?
१.कारागीर आणि कामगारांना सक्षम बनवने.२.प्रत्येकाला टूल कीट देणे.३.प्रशिक्षण देऊन आधुनिक आणि तंत्रज्ञान ची माहिती देणे.४.पशिक्षण देऊन प्रत्येकाला सर्टिफिकेट देणे.
पीएम विश्वकर्मा योजना कोणी सुरु केली?
पीएम विश्वकर्मा योजना केंद्र सरकारच्या लघु,सूक्ष्म आणि मध्यम खात्यांनी सुरु केली.
पीएम विश्वकर्मा मध्ये लॉग इन कसे करावे?
सर्वात प्रथम गुगल वर जा तिथे पीएम विश्वकर्मा वेबसाईट उघडा आणि लॉगीन ड्राप डाऊन वर क्लिक करा.ड्रोपडाऊन CSC लॉगीन निवडा आणि CSC-E_Sram Data पहा निवडा तुमच्या CSC वापरकर्ता नाव आणि पासवर्ड लॉग इन करा.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ?
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे
१.आधार कार्ड(बँक खातेशी लिंक असावे)
२.Pancard
३.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४.उत्पनाचा दाखला(Income Certificate)
५.बँक पासबुक
६.आपण राहत असलेला निवासी पत्ता
७. २ पासपोर्ट आकाराचा छायाचित्र
८.आपण जे एखादा कोर्स केलेय असेल तर त्याच सर्टिफिकेट जोडा
९.भ्रमणध्वनी क्रमाक(आपला मोबाईल नंबर अचूक द्या)
नमस्कार मित्रानो तर आज आपण पीएम विश्वकर्मा योजनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली.जर आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही comment द्वारे विचारू शकतात.अजून आपल्या शैक्षणिक योजना,कृषी योजना आणि सरकारी योजना बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला सुचवा आम्ही नक्कीच तुम्हाला ती माहिती प्रधान करू.आमचा एकच उद्देश असतो कि आपल्या बांधवाना प्रामाणिक माहिती मिळाली पाहिजे कोणही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नाही.प्रत्येकाला आपला हक्क हा मिळाला पाहिजे ह्यासाठी आमचा प्रयत्न असतो.आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो कि आम्ही दिलेली माहिती हि विविध स्रोत द्वारे जमा करून आपल्याला देत असतो.आपण कोणताही योजनेविषयी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा संबधित वेबसाईट बघूनच निर्णय घ्यावा हि आपल्याला विनती.