पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये, आपला दिवस सुखाचा जाओ हीच सदिच्छा! आपण जर बघितले तर आपण नेहमी आपल्या वेबसाईटवर विविध योजनेची माहिती आपण देत असतो. आम्ही चंग बांधलाय कि शैक्षणिक योजना असो, कृषी योजना, महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना ह्या सर्व योजनाची माहिती आमच्या प्रत्येक शेतकरी बांधव असेल, विद्यार्थी मित्र व आमच्या माता-बहिणी असतील याच्या पर्यंत प्रत्येक योजना हि पोचली पाहिजे. प्रत्येक योजनाचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचवावे किंवा आर्थिक सहाय्य होऊन हातभर लागावा हाच आमचा प्रामाणिक प्रयन्त असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे विविध योजना राबवत असते. पण ह्या योजना ज्यांना गरज आहे. अश्या लाभार्थ्या पर्यंत पोहचत नाही. तोच आमचा प्रयन्त आहे. चला तर मित्रानो, अश्याच महत्वपूर्ण योजेनेपैकी एक महत्वाची योजना बघणार आहोत. ती म्हणजे पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra होय.
प्रस्तावना
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे व शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. उच्च शिक्षण घेण्याची प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. आपण उच्च शिक्षण घ्यावे चांगल्या नोकरीला लागावे. पण आड येते घरची आर्थिक परिस्थिती,वडील कुठे मजुरी करतात , तर काहींचे वडील शेती करतात. परिवाराचे उधारनिर्वाव होत नाही. तर मुलाच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला पडलेला असतो. सद्या शेतीची स्थिती बघितली तर अचानकपणे येणारे संकटामुळे क्षणात सर्व पिक उध्वस्त होते. प्रत्येक मुलगा शिकावा व उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार हे विविध शैक्षणिक योजना ह्या घेउन येत असते. त्यापैकी आपण आज महाराष्ट्र सरकारने द्वारे “VJNT विद्यार्थ्यांना पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती” नावाची योजना सुरू केली. ही योजना विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (VJNT) च्या विद्यार्थ्याला मॅट्रिकोत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने सुरू केली होती.
चला तर विद्यार्थी मित्रानो, आज आपण पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra योजनाबद्दल जाणून घेवूया!
योजनेचे नाव | पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना |
सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
उद्देश | शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे. |
लाभ | शिष्यवृत्ती व शिक्षणासाठी अर्थसहाय्य |
लाभार्थी | VJNT विद्यार्थी |
ई-मेल | ——— |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनाचे उद्दिष्टे
- व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहित करणे.
- शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे.
- पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ट्यूशन फी, परीक्षा फी आणि मेंटेनन्स अलाऊन्सचे फायदे फक्त व्हीजेएनटी श्रेणीतील विद्यार्थ्यांना दिले जातात. सर्व पात्र VJNT विद्यार्थ्यांना वसतिगृहांसाठी दरमहा ₹ 90 ते ₹ 190 आणि डे स्कॉलर विद्यार्थ्यांना ₹ 150 ते ₹ 425 प्रति महिना देखभाल भत्ता दिला जातो.
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनाची पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- विद्यार्थी हा VJNT प्रवर्गातील असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1.50 लाख पेक्षा कमी किंवा समान असावे.
- अर्जदारांनी मॅट्रिकनंतरच्या वर्गातून सरकारने मंजूर केलेला शिक्षण अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला चालू शैक्षणिक वर्षात पास झाला तर देखभाल भत्ता आणि परीक्षा शुल्क अर्जदाराला दिले जाते.
- जर अर्जदार एखाद्या विशिष्ट वर्षात नापास झाला तर त्याला त्या विशिष्ट शैक्षणिक वर्षाचे ट्यूशन फी, परीक्षा फी आणि देखभाल भत्ता मिळेल परंतु त्याला/तिला पुढील उच्च वर्गात पदोन्नती मिळेपर्यंत त्याचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराने केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कॅप फेरीतून यावे.
- पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनाचा लाभ फक्त कुटुंबातील 2 मुलांना देय राहील/घेता येईल.
- विद्यार्थीची 75% उपस्थिती अनिवार्य राहील.
- अर्जदाराने नॉन-प्रोफेशनल ते प्रोफेशनल अभ्यासक्रम बदलल्यास तो शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल, परंतु त्याने/तिने अभ्यासक्रम बदलून व्यावसायिक ते गैर-व्यावसायिक असा अभ्यासक्रम बदलल्यास तो पात्र होणार नाही.
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate)
- आधार कार्ड
- बँक पासबुक (बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
- उत्पनाचा दाखला(मर्यादा 1.50 लाख पर्यंत)
- जात वैधता प्रमाणपत्र (Cast validity certificate)
- 10 वी मार्कशीट (SSC)
- 12 वी मार्कशीट (HSC)
- Gap Cartificate (शिक्षणात अंतर पडले असेल तर)
- रेशनकार्ड
- शाळेचा दाखला/TC
- मुलांच्या लाभार्थ्यांच्या संख्येबद्दल पालक/पालकांचे घोषणापत्र.
- दोन पासपोर्ट फोटो
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनासाठी असा करा अर्ज !
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनासाठी असा करा अर्ज !
- पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खालील प्रोसेस करा !
- सर्वात प्रथम आपण अधिकृत वेबसाईटला भेट द्या !
- https://mahadbt.maharashtra.gov.in /RegistrationLogin/RegistrationLogin
- नोंदणी: “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करून स्वतःची नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- सर्व अनिवार्य तपशील भरा (अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, पासवर्ड, ईमेल आणि मोबाइल क्रमांक):
- लॉगिन: आता, तुम्ही लॉगिन तपशील भरून लॉग इन करू शकता: https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login
- प्रोफाइल तयार करा: पत्ता, पात्रता इ. तुमचे सर्व अपडेट केलेले वैयक्तिक तपशील भरून तुमचे प्रोफाइल तयार करा.
- विचारलेली संपूर्ण माहिती खात्री करून भरा !
- विद्यार्थी मित्रानो अर्ज करण्याची माहिती हि सर्वसाधारण आहे. किंवा हि माहिती अपूर्ण हि असू शकते. हि माहिती फक्त आपल्याला समजण्यासाठी दिली आहे आपण अर्ज करत असताना काळजीपूर्वक वाचून अर्ज करा. नाहीतर आपल्या जवळच्या सायबर कॅफे ला भेट देऊन आपण अर्ज करू शकता!
नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो, आज आपण पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra योजनाबद्दल जाणून घेतले. या लेखामध्ये आपण योजनेची उद्दिष्टे, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय याची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखमधून जाणून घेतली. योजना कशी वाटली व ह्या योजनाचा लाभ आपल्याला मिळाला तर आपला अभिप्राय नक्की कळवा, कारण आपण दिलेल्या अभिप्राय आम्हला एक प्रकारची उर्जा देतो. आम्ही अश्याच नव-नवीन योजना आपल्यासाठी घेवून येत राहू. अर्ज करत असताना आपण संबधित वेबसाईट किंवा शाळेत संपर्क साधून अधिकची माहिती जाणून मगच अर्ज करावा ! पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra ह्या योजेनेची माहिती इतरांना हि शेअर करा..धन्यवाद…
खालील शैक्षणिक योजनेचा लाभ आपण घेतलाय का ?
VJNT विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते ?
व्हीजेएनटी प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहांसाठी दरमहा ₹ 90 ते ₹ 190 आणि डे स्कॉलर विद्यार्थ्यांना ₹ 150 ते ₹ 425 प्रति महिना देखभाल भत्ता दिला जातो.
देखभाल भत्त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इतर कोणते लाभ दिले जातात?
देखभाल भत्त्याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी संस्थांना अनिवार्यपणे देय असलेली सर्व फी देखील सरकार या योजनेअंतर्गत भरत आहे.
एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळाल्यास तो शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल का?
होय, जर अर्जदाराला सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळाला तर तो वसतिगृहाच्या फक्त 1/3 रकमेसाठी पात्र असेल.
बीएड आणि डी.एड अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणते फायदे दिले जातात?
B.Ed आणि D.Ed अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला या योजनेंतर्गत ट्यूशन फी, परीक्षा फी आणि देखभाल भत्ता 100% लाभ लागू आहे.
डी.एड, आणि बी.एड अभ्यासक्रमांसाठी अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी संरचना काय आहे?
अनुदानित, विनाअनुदानित D.Ed आणि B.Ed अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच अभ्यासक्रमासाठी सरकारी दरांनुसार शुल्क रचना लागू आहे.
योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?
VJNT श्रेणीतील आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला अर्जदार या योजनेसाठी पात्र आहे.
ही योजना फक्त व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच आहे का जे सरकार मान्यताप्राप्त शैक्षणिक अभ्यासक्रम घेत आहेत?
होय, अर्जदाराने पोस्ट-मॅट्रिकच्या वर्गातून सरकारने मंजूर केलेला शैक्षणिक अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पालकांचे/पालकांचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
पालकांचे/पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1.50 लाख पेक्षा कमी किंवा समान असावे
एखाद्या विशिष्ट शैक्षणिक वर्षात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती सुरू ठेवली जाईल का?
नाही, VJNT च्या बाबतीत, जर अर्जदार एका वर्षासाठी नापास झाला तर अर्जदाराला त्या विशिष्ट वर्षासाठी कोणतीही प्रतिपूर्ती दिली जात नाही.
शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याची कटी टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे ?
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी हा 75% उपस्थिती असणे अनिवार्य आहे.
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे?
१.जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate) २.आधार कार्ड ३.बँक पासबुक (बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे) ४.उत्पनाचा दाखला(मर्यादा 1.50 लाख पर्यंत) ५.जात वैधता प्रमाणपत्र (Cast validity certificate) ६.10 वी मार्कशीट (SSC) ७.12 वी मार्कशीट (HSC) ८.Gap Cartificate (शिक्षणात अंतर पडले असेल तर) ९.रेशनकार्ड १०.शाळेचा दाखला/TC ११.मुलांच्या लाभार्थ्यांच्या संख्येबद्दल पालक/पालकांचे घोषणापत्र. १२.दोन पासपोर्ट फोटो हे सर्व कागपत्रे आवश्यक आहेत.