प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 | Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi जाणून घ्या संपूर्ण माहिती !

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपल्या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 | Matru Vandana Yojana Marathi संपूर्ण माहिती म्हणजेच अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, योजनाची पात्रता काय, लाभार्थ्याला लाभ किती मिळेल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामधून जाणून घेणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचव जेणेंकरून आपले योजनासंबधी काही प्रश्न असतील तर नक्कीच त्याचे निराकरण होईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ग्रामीण भाग
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज कसा भरावा
मातृ वंदना योजना पैसे कधी मिळतात
पीएम मातृ वंदना योजना फायदे
मातृ वंदना योजना पात्रता नियम
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र
मातृ वंदना योजना साठी कागदपत्रे
पीएम मातृ वंदना योजना स्टेटस कसा पाहावा
मातृ वंदना योजना साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
मातृ वंदना योजना अपडेट 2025
चला आता आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 | Matru Vandana Yojana Marathi संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
प्रस्तावना:
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 | Matru Vandana Yojana Marathi योजना म्हणजे काय हे अगोदर समजून घेवू ! आपल्या भारतात दारिद्र्य रेषेखाली अजून हि खूप कुटुंब आहेत. दारिद्रय रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील महिलांना गरोदरपानच्या शेवटच्या टप्प्यावर शरीरिक क्षमता नसते, पण परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना मजुरी काम करावे लागते. यामुळे देशातील गर्भवती माता व बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालमृत्यू दारात वाढ झाल्याने नियंत्रित करण्यासाठी दि. 01 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ योजना सुरु करण्याचा निर्णय घेणात आला. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अमलबजावणी राज्यात दिनांक 08 डिसेंबर 2017 पासून आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
सुरुवात | 08 डिसेम्बर 2017 |
विभाग | सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन |
योजनेचा उद्देश | माता व बालकाचे आरोग्य सुधारणे |
लाभार्थी | गर्भवती महिला |
लाभ | पहिल्या अपत्यासाठी रु.5000/- दुसऱ्या अपत्यासाठी रु. 6000\- |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
- माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
- जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.
- सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.
- लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे.
- नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 कागदपत्रे
Matru Vandana Yojana Marathi Document in marathi
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक (किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक) आहे.
- ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.८ लाख पेक्षा कमी आहे.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.
- ४०% व अधिक अपंगत्व असणा-या (दिव्यांग जन) महिला.
- बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला.
- आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.
- ई-श्रम कार्ड धारक महिला.
- किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
- मनरेगा जॉब कार्ड धारक महिला.
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/ अंगणवाडी मदतनीस (AWHs)/आशा कार्यकर्ती (ASHAS).
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार “शिक्षण कर्ज योजना अधिक माहितीसाठी येथे क्व्लिक करा !
- वरील नमूद किमान एका कागदपत्रासोबत खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक आहे.
- लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र त्यासोबत विहित केलेले कागदपत्र.
- परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
- लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत
- बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्राची प्रत
- माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.
- गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.
- लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटूंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक,
- वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र.
- लाभार्थीकडे आधारकार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रांसोबत आधार नोंदणी (EID) कागदपत्रासोबत खालीलपैकी कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक राहीलः
- बैंक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुक
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
- किसान फोटो पासबुक
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पॅन कार्ड
- MGNREGS जॉब कार्ड
- सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेले तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र.
- राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने जारी केलेले इतर कोणतेही फोटो ओळखपत्र.
- अधिकृत लेटरहेडवर राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेल्या छायाचित्रासह ओळखीचे प्रमाणपत्र.
- प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) किंवा सरकारी रुग्णालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य कार्ड; राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे निर्दिष्ट केलेले इतर कोणतेही दस्तऐवज आधारकार्डला पर्यायी कागदपत्र केवळ लाभार्थ्यांची योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी असुन लाभार्थ्यांना EID च्या साहाय्याने आधार कार्ड प्राप्त करुन घेऊन संबंधित आरोग्य केंद्रात सादर केल्यानंतरच लाभ रक्कम जमा होणार आहे.
योजने अंतर्गत विविध जबाबदा-या व कार्यपध्दती खालीलप्रमाणे राहील.
फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे
- नवीन पोर्टल वर ऑनलाईन पध्दतीने आशा तथा फिल्ड फंक्शनरी (ज्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविका नाही तेथे आंगणवाडी सेविका), आरोग्य सेविका तथा सुपरवायजर आणि स्वतः लाभार्थी यांना फॉर्म भरता येईल.
आरोग्यसेविका (Supervisor/Verifier)
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही आरोग्य सेविका तथा सुपरवायजर तथा Verifier यांची आहे. आरोग्य सेविकांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करुन ऑनलाईन सत्यापित (Verification) केल्यानंतरच लाभार्थी फॉर्म हा मंजूरी अधिकारी यांच्याकडे जाईल. संबंधित मंजूरी अधिकारी यांचे कामकाजावर नियंत्रण असेल. आरोग्य सेविकांच्या जबाबदा-या आवश्यकतेनुसार निश्चित करण्याचे अधिकार योजनेच्या जिल्हा कक्षास असतील.
मंजूरी अधिकारी
- लाभार्थीने भरलेले फॉर्म संबंधित आशा यांच्याकडे ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करावेत. आरोग्य सेविका यांनी सत्यापित केलेल्या पात्र लाभार्थीची खातरजमा करुन तसेच अंतिम पडताळणी करणे व मंजूरी देण्याची जबाबदारी ही मंजूरी अधिकारी यांची आहे. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म पडताळणी करुन मंजूरीनंतर दिल्यानंतर लाभार्थीचे Payment Generation देखील मंजूरी अधिकारी यांनीच करायचे आहे. तसेच लाभार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मला लाभार्थी कार्यक्षेत्रानुसार आशा किंवा जेथे आशा नसेल तेथे अंगणवाडी सेविका जोडण्याची जबाबदारी मंजूरी अधिकारी यांची राहील. त्यासह योजनेमधील
मंजूरी अधिकारी यांनी फॉर्म जतन करणे व नष्ट करण्याबाबत
- लाभार्थी फॉर्म सोबत त्यांची वैयक्तिक माहिती तपशील व कागदपत्र असल्यामुळे त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. हे फॉर्म यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांनीच हताळावेत. फॉर्मचे जतन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित मंजूरी अधिकरी यांचीच असेल. मंजूरी अधिकारी यांनी पदभार देताना व घेताना फॉर्मच्या हस्तांतरण प्रक्रिया लेखी पध्दतीने करावी. लाभार्थीचे मागणी फॉर्म हे संग्रहित केल्यापासून ३ वर्षापर्यंत जतन करून ठेवायचे आहेत. तर PMMVY Register म्हणजे फॉर्म क्र.४ हे ५ वर्षापर्यंत जतन करुन ठेवायचे आहेत. विहित मर्यादेनंतर फॉर्म नष्ट करायचे आहेत.
गाव पातळीवरील ग्राम सभा व महिला सभा घेण्याबाबत
- ग्राम सभेच्या विषय सूचीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश करुन त्या अंतर्गत लाभार्थी व त्यांना मिळणारे लाभ या विषयी चर्चा करण्यात यावी. तसेच लाभ मिळालेले लाभार्थी यांची माहिती ग्रामसभेत आशा कार्यकर्ती यांनी द्यावी. तसेच जेव्हा शक्य असेल त्यावेळी महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनी शक्य असेल तेव्हा विशेष महिला सभांचे आयोजन करावे. या बैठकांमध्ये बचत गटांचे सदस्य, बैंक, पोस्ट आणि जिल्हा प्रधानमंत्री मातृ वंदना कक्षास निमंत्रित केले जावे. तसेच महिला बैठकांचे आयोजन वर्षातून किमान दोन वेळा करावे.
निष्कर्ष:
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 | Matru Vandana Yojana Marathi संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला ! मातृ वंदना योजना ही मातृत्वाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने राबवलेली एक महत्वाकांक्षी आणि स्तुत्य योजना आहे. या योजनेमुळे गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे पोषण, आरोग्य तपासण्या आणि प्रसूतीपूर्व देखभाल सुनिश्चित होते. मातांचा सन्मान, सुरक्षित गर्भधारणा आणि नवजात बाळाचे आरोग्य या त्रिसूत्रीला बळकटी देणारी ही योजना ग्रामीण व शहरी भागांतील महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. योग्य अंमलबजावणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, हीच अपेक्षा. मित्रानो प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 | Matru Vandana Yojana Marathi 2025 हि माहिती सर्वाना शेअर करा जेणेकरून एखाद्या गरीब लाभार्थी महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल. योजनाचा अर्ज करण्यापूर्वी आपण संबधित कार्यलय किंवा अधिकाऱ्याची भेट घेवून आपण अधिक माहिती जाणून घेवू शकta. योजनेचा अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत pdf वाचावी मगच अर्ज करावा, कारण आम्ही फक्त योजनेची माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयन्त करतो.जेणेकरून प्रत्येक लाभार्थी पर्यंत योजना हि पोहचली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आजच आपला whatsaap व व teligram ग्रुप जॉईन करा, रोजच नवीन अपडेट मिळवा आपल्या मोबाईलवर….
Matru Vandana Yojana pdf Marathi
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025 pdf Matru Vandana Yojana pdf Marathi | क्लिक करा |
प्रधानमंत्री मातृ वंदना Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जी पहिल्यांदा गरोदर राहिलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य देते, जेणेकरून त्यांच्या पोषणात सुधारणा होईल.
मातृ वंदना योजनेत Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi त्रुटी असल्यास तक्रार कुठे करावी?
जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ICDS कार्यालयात संपर्क साधावा.
मातृ वंदना योजना Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi केव्हा लागू झाली?
मातृ वंदना हि योजना 1 जानेवारी 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, बँक खाते तपशील, गरोदरपणाची नोंदणी प्रमाणपत्र, आणि लग्नाचा दाखला यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतात. या कागदपत्रामध्ये बद्दल हि होऊ शकतो. त्यामुलेव आपण संबधित कार्यलय किंवा अधिकाऱ्याशी संपर्क साधून अधिकची माहिती जाणून घेवून मगच अर्ज करा जेणेकरून आपला अर्ज बाद होणार नाही.
मातृ वंदना योजनेचा Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi स्टेटस ऑनलाइन कसा पाहावा?
pmvy-cas.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाच्या आधारे स्टेटस तपासता येते.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi अर्ज कसा करायचा?
अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन भरता येतो. काही राज्यांत ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत Pradhanmantri Matru Vandana Yojana Marathi किती पैसे मिळतात?
या योजनेत एकूण 5,000 रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात — गरोदरपणाच्या नोंदणी, पहिल्या आरोग्य तपासणी आणि बाळाच्या जन्मानंतरच्या लसीकरणाच्या टप्प्यांवर.