Ration card e-KYC in Marathi 2024  | रेशन कार्ड ई-केवाईसी मराठी |रेशन कार्ड धारकानो आपण जर Ration Card e-KYC जर केली नसणार तर आपल्याला मिळणारे अन्नधान्य हे बंद होईल आताच करा अशी प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ration card e-KYC in Marathi 2024  | रेशन कार्ड ई-केवाईसी मराठी |

रेशन कार्ड धारकानो आपण जर Ration Card e-KYC जर केली नसणार तर आपल्याला मिळणारे अन्नधान्य हे बंद होईल आताच करा अशी प्रोसेस.

Reshan Card e -KYC

प्रस्तावना

नमस्कार मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपण आज Ration Card e-KYC बदल जाणून घेणार आहोत.नेमकी हि प्रोसेस काय आहे?याचा फायदा काय?तोटा काय?याबद्दल आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड ला आपण शिधापत्रिका असे हि म्हणतो.तर आपण Ration Card e-KYC म्हणजे काय ते समजून घेऊया.आपण आज हि राशन दुकानात गेलो.तर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणत काळे धंदे सुरु असतात.ग्राहकांना लाभ हवा त्याच अन्नधान्य हे कोणालाच दिल जात.काही व्यक्ती हे राशन दुकानातून पोते-पोते धान्य घेवून जातात.यामुळे ज्याला याची आवश्यकता आहे त्याला त्याचा लाभ म्हणजेच सरकार कडून मिळणारे अनुदानापासून तो व्यक्ती वंचित असतो.अश्या गोष्टीना रोख किंवा थांबवण्यासाठी ration Card e-KYC हि फायदेशीर ठरू शकेल आणि प्रत्येक कुटुबांतील सदस्याची ओळख करूनच ते अन्नधान्य दिल जाईल. ration Card e-KYC म्हणजे तुमच्या रेशनकार्ड वर असलेल्या सदस्याची ओळख सत्यापित करण्यासाठी.रेशन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असेल.जेव्हा कुटुंबातील सदस्य हा रेशन घेण्यासाठी दुकानात जाईल तेव्हा त्याची ओळख सत्यापित करण्यासाठी Bio matric पद्धतीने म्हणजे आपला बोटाचा ठसा ठेवून ओळख सत्यापित केली कि मगच त्याला रेशन दुकानदार हा सरकार कडून आलेले सबसिडीयुक्त अन्नधान्य देण्यात येईल.ज्याचा लाभ हा त्यालाच मिळेल.

Ration Card e-KYC चा फायदा:

  • रेशनकार्ड Ration Card e-KYC मुळे जे गैरव्यवहार किंवा होणारा गैरवापर थांबेल.
  • काही ग्राहक हे बनावट रेशन कार्ड बनवून फायदा घेतात,तर अश्या बनावट रेशन कार्ड रोखण्यास मदत होईल.
  • ई-केवाईसी मुळे प्रत्येक रेशन धारकाला त्याचा लाभ त्यालाच मिळेल.
  • Ration Card e-KYC हि आपली ओळख सत्यापित करते.
  • आपल्याला सरकार कडून आलेली सबसिडीयुक्त अन्यधान्य याची माहिती आपल्या ई-केवाईसीमुळे कळते.

ई-केवाईसी कशी करावी:

Reshan Card e -KYC

रेशन कार्ड e-KYC ऑनलाईन करण्यासाठी येथे क्लिक करा !

ऑनलाईन पद्धत:

  • आपण खाली दिलेल्या पद्धतीने प्रोसेस ने करावी.
  • सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
  • त्यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र नागरी पुरवठा विभगाचे पेज उघडेल.
  • तिथे तुम्हाला “ई-केवाईसी” हा पर्याय निवडायचा आहे.
  • ई-केवाईसी हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला त्याठिकाणी काही आवश्यक माहिती विचारली जाईल.जसे कि तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर.
  • OTP मिळवा बटनावर क्लिक करा,क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर otp मिळेल.
  • OTP टाका आणि पुढे बटनावर क्लीक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याची माहिती अपडेट किंवा त्यात बदल करून त्याला अपडेट करा.आणि “पुष्टी” या बटनावर क्लिक करा.
  • तुमचे आधार-सक्षम बँक खाते निवडा आणि “लिंक करा”ह्या बटनावर क्लिक करा.
  • तुमची बँक खाती माहिती व्यवस्थित भरा आणि “पुष्टी“ बटनावर क्लिक करा.
  • सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला e-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.याची पुष्टी करणारा संदेश हा तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वर येईल.

रेशन कार्ड ई-केवाईसी साठी लागणारे कागदपत्रे :

१.रेशन कार्ड

२.आधार कार्ड (बँक खातेशी लिंक असावे)

३.बँक पासबुक

४.रेशन कार्ड ई-केवाईसी फॉर्म

प्रधानमंत्री आवास योजनेविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

Reshan Card e-KYC

ऑफलाईन पद्धत:

ऑफलाईन हि पद्धत तुम्हाला तुमच्या गावातील रेशन कार्ड दुकानावर जाऊन करावी लागेल.

  1. आपल्या गावातील रेशन दुकानाला भेट द्या.
  2. रेशन दुकानदाराला ई-केवाईसी बद्दल संपूर्ण माहिती विचारा.
  3. त्यानंतर रेशनकार्ड दुकानदाराकडून ई-केवाईसी फॉर्म घ्या.
  4. ई-केवाईसी हा फॉर्म मध्ये आवश्यक सर्व माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा.त्यामध्ये तुमचे रेशनकार्ड ,आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक ची प्रत्येक एक-एक कॉपी झेरोक्स लावा.
  6. फॉर्म आणि कागदपत्रे हे रेशन कार्ड दुकानदाराकडे द्या.
  7. दुकानदार हा तुमची रेशन कार्ड ई-केवाईसी हि प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करुन घेईल.
reshan card e-KYC

रेशन कार्ड e-KYC करणे बंधनकारक अआहे का ?

रेशन कार्ड e-KYC करणे बंधनकारक आहे.

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?

उत्पनाचा दाखला,रहिवासी पुरावा
(सातबारा उतारा,लाईट बिल )
आधार कार्ड नवीन शिधापत्रिका सर्व कागदपत्रे स्वतच्या स्वाक्षरीने जमा करावी , प्रतिज्ञा पत्र चलन आणि स्टंप पेपर
अजून आवश्यक कागदपत्रे अधिकृत वेबसाईट वर जावून बघावे.

रेशन कार्ड ऑनलाईन कसे बघावे ?

तुम्हाला जर ऑनलाईन रेशन कार्ड बघायचे आहे तर सर्वात प्रथम महाराष्ट्र नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईट ला भेट द्या.वेबसाईट ओपन झाल्यावर त्या ठिकाणी आपला रेशन कार्ड क्रमांक टाका.

रेशन कार्ड e-KYC करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील?

१.रेशन कार्ड
२.आधार कार्ड
३.बँक पासबुक
४.रेशन कार्ड e-KYC फॉर्म त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून स्वतःची स्वाक्षरी करा आणि फॉर्म रेशन विक्रेता कडे द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment