सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf
Table of Contents
प्रस्तावना:
नमस्कार शेतकरी मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.आम्ही आपल्या परेंत नव-नवीन योजना घेवून येत असतो.त्यातली आज महत्वाची योजना म्हणजे सलोखा योजना होय.सलोखा म्हणजे आप-आपसात असलेले मतभेद आणि वाद-विवाद मिटवणे होय.आपण जे बघितले समाजात वावरत असताना.भाऊ-भाऊ असतील,बाप-लेक असतील,शेजारी शेतजमीन वाले असतील तर यांच्या मध्ये वाटणी, बांदावरून असेल किंवा येणा-जाण्याच्या रस्त्यावरून असेल.शुल्लक कारणावरून भांडण होऊन.हा वाद कोर्ट-कचोरी परेंत जातो.कधी-कधी अश्या हि बातम्या आपण वाचतो कि जमिनीच्या वादावरून खून झाला !किंवा हाणामारी झाली ह्या साठी शेतजमिनीच्या ताब्यावरून असणारे वाद मिटवण्याच्या उद्देशाने दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सलोखा योजनेस सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf मान्यता मिळाली.यामध्ये शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांच्या मधील आप-आपसात असलेला वाद मिटवणे आणि व समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करणे हा मुख्य उद्देश सलोखा योजनेचा आहे.प्रिय वाचक मित्रांनो आज आपण सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf योजनेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांनी दि.३ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय व त्यामध्ये आवश्यक ते बदल करून सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ करण्याचे आदेश पारित केले आहे.सलोखा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा आपला देशामध्ये जमिनीचा वाद हा नवा नाही.ह्या जमिनीच्या वादाबाबत कोट्यवधी प्रकरणे हे जिल्हा न्यायालय,तालुका न्यायलय असेल अश्या अनेक न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रकरणे हि पडलेले आहेत अजून हि त्यांचा निकाल लागत नाही.यामध्ये जर आपण बघितले तर मुख्यत:मालकी हक्कावरून वाद असतील,रस्त्याचे वाद असतील,बांदावरून होणारे वाद असतील, शेतजमीन मोजण्यावरून होणारे वाद असतील ,अधिकारी अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद असतील किंवा शेतीवरील अतिक्रमनावरून होणारे वाद असतील,भावा-भावाच्या वाटनीचे वाद आणि शेती वहीवाटीचे वाद ह्या सर्व कारणामुळे शेतजमीन वाद हे आपण समाजामध्ये होताना बघितले आहे.शेतजमीन हा प्रत्येकाचा जीव्हाळाचा विषय राहिला आहे पण यामुळे कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल रोष आणि असंतोष आणि दुरावा होताना आपण बघतो अश्या अनेक वादामुळे अनेक जनाचे नुकसान झालाय ह्या वादामुळे खर्च आणि वेळ हि वाया जातो.अशे वाद संपून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा एकमेकांविषयी भावना आणि आदर निर्माण व्हावा शांतता वाढीस लागावी.यासाठी शासनाने,एका शेतकरीचे नावावरील शेतजमीन ताबा दुसऱ्या शेतकऱ्याच्या व दुसऱ्या शेतकऱ्याचे नावावरील शेतजमीनचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाच्या अदलाबदल दास्तांसाठी नोदणी फी व मुद्रांक शुल्कासाठी सवलत देण्याची सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf योजना अमलात आणली आहे,अर्थात या योजनेनुसार गावातील अनेक प्रकरणे मार्गी लागून सामाजिक सौख्य,सलोखा व आदर निश्चित वाढणार आहे.आणि वाद-विवाद थांबतील हा हेतू आहे.
सलोखा योजनेंतर्गत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांची अदलाबदल द्स्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु १००० व नोदणी फी नामपत्र रु १००० रुपये इतकी आकरण्यात येईल.
योजनेचे नाव | सलोखा योजना महाराष्ट्र |
विभाग | महसूल व वन विभाग |
उद्देश | शेतकऱ्याचे जमिनीचे वाद मिटवणे व नात्यामध्ये आलेला दुरावा दूर करणे. |
लाभ | जमीन पडीक राहणे कमी होईल तर उत्पनात वाढ होईल,शेतकऱ्याचे जमिनीचे असलेले वाद मिटतील आणि नात्यामध्ये चांगले संबध प्रस्थापित होतील. |
अर्ज करण्याची पद्धत | झेरोक्स कॉपी घेऊन,त्यातली आवश्यक माहिती भरा आणि संबधित कागदपत्रे जोडा. |
सलोखा योजनेंच्या अटी व शर्ती बघा .
सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf
- सलोखा योजनेचा कालावधी,दस्तासाठी नोंदणी अदलाबदली फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा कालावधी हा राज्यशासनच्या राजपत्रात प्रसिद्ध केल्यापासून २ वर्षाचा कालावधी.
- सलोखा योजनेंतर्गत पहिल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा ताबा दुसर्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापसून असला पाहिजे,
- एकाच गावात जमीन धारक करणाऱ्या शेतकऱ्यांचा परस्पराडे मालकी ताबा असलेबाबतचा पंचनामा,मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे.
- सदर पंचनामा नोंदवही =वरून तलाठी यांनी जावक क्रमांक च प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे.
- अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे.
- सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकारी अभिलेखात सर्वसमावेशक शेरे,क्षेत्र भोगवटदार वर्ग,सत्ताप्रकार,पुनर्वसन,आदिवासी,किल इ सर्व बाबी विचारात घेवून दोन्ही पक्षकारांनी सर्वसमंतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे,अश्या प्रकारची आत दस्तामध्ये करणे आवश्यक राहील.
- सलोखा योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीचा दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.
- अकृषिक,रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराचा जमिनीस सदर योजना लागू असणार नाही.
- सलोखा योजना अमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीच्या अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोदणी फी भरली असेल तर तती फी परत मिळणार नाही.
- सलोखा योजनेंतर्गत दोन्ही पक्षकाराची जमीन हि यापूर्वी-तुकडा घोषित केली असेल तर त्याबाबत प्रमाणित करण्यात गटबुकची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याचप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितुनुसार फेरफार नोंदवता येईल.
- पहिल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबत प्रकरणाचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोदणी फी सवलतीस पात्र राहणार नाहीत.
मागेल त्याला शेततळे योजनेबद्दल माहिती हवी असेल तर इथे क्लिक करा
सलोखा योजनेमुळे होणारे फायदे
- आप-आपसातील वैर व वादविवाद संपून चांगले नाते बनेल.
- शेतजमिनीची सुधारणा व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पनात वाढ होईल.शेतकऱ्यांचे व्यक्तिगत व पर्याने राष्टीय उत्पनात वाढ होईल.
- शेतकऱ्याच्या वैयक्तिक व आप-आपसातील वादामुळे किवा रस्त्याच्या समस्यामुळे अनेक वर्ष शेतजमीन हि पडीक असणे.सलोखा योजनामुळे अश्या शेतजमीन ह्या परत वाहिवाटीखाली येतील.
- शेतकऱ्यांचा आप-आपसातील वाद मिटला तर शेती च उत्पन अजून वाढेल.
- शेतीच्या वाटा-हिस्सामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता.तो दूर होईल आणि भावा-भावामधील वाद मिटतील.
- सलोखा हि योजना ऐच्छिक आहे शेतकऱ्यांना जबरदस्ती करण्याचा प्रयन्त येत नाही.
- यापुर्वू झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय व दिलासा मिळणार आहे.
- सलोखा योजनामुळे होणारा वाद हा न्यायालयपरेंत पोहचत होता.वाद-विवाद झाल्यानतर न्यायालयच्या चकरा मारण्यासाठी व वकील लावण्यासाठी लागणारा खर्च व वाया जाणार हि वेळ हि आता वाचेल.
- शेतकऱ्यांचे अनेक आप –आपसातील वादामुळे जमिनी ह्या खूप अधिक प्रमाणत पडीत राहत होत्या.शेतकऱ्याकडे जमीन असूनही त्याची करण्याची मानसिकता नाही राहत.अश्या वेळी उत्पनाचा साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारच कर्ज घेवून घर खर्च चालावे लागते.कर्जाची परत फेड होत नाही त्यामुळे शेतकरी हा तणावात जाऊन आत्महत्या करतो अश्या गोष्टी हि सलोखा योजनेमुळे थांबतील.
- सलोखा योजना हि जर यशस्वी झाली तर जमिनीचे वाद मिटतील,त्यामुळे खरेदी-विक्री-ताबा इ बाबीचा प्रश्न राहणार नाही.
वाचकांना काही पडणारे प्रश्न
सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf
प्रश्न:सलोखा योजनेंतर्गत अकृषित जमीन,प्लॉट,घर किंवा दुकान यांचे अदलाबदल दस्त करता येईल का?
नाही,सलोखा हि योजना फक्त शेतजमिनीसाठी लागू आहे.
प्रश्न:-सलोखा योजनेमध्ये जमिनीवर १२ वर्षापेक्षा कमी कालावधीकरिता एकमेकांना ताबा असल्यास त्यांचे अदलाबदल दस्तास मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ असेल का?
नाही.
प्रश्न:सलोखा योजनेसाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यापैकी पंचनाम्यासाठी कोणाकडे अर्ज सादर करावा लागेल?
सलोखा योजनेसाठी गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज साधार करावा लागेल.
प्रश्न:पंचनाम्यावेली तलाठी व मंडळ अधिकारी प्रत्यक्ष शेतात हजार असणे आवश्यक आहे का?
होय.
प्रश्न:-सलोखा योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी किती दिवसात पंचनामा हा केला पाहिजे?
सलोखा योजनेसाठी शेतकऱ्याने अर्ज केल्यापासून १५ दिवसामध्ये पंचनामा होणे आवश्यक आहे.
प्रश्न:जर सलोखा योजनेसाठी अर्ज केला आणि तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जर दाद दिली नाही तर कोणाकडे दाद मागायची?
तहसीलदार,जर तहसीलदाराने दाद न दिल्यास तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागावी.
प्रश्न:सलोखा योजनेमध्ये पंचनामा प्रमाणपत्रसती तलाठी कडे अर्ज सादर करण्यासाठी कोणते कागदपत्रे जोडावी?
एक अर्ज झेरोक्स हार्ड कॉपी व त्या मध्ये दोन्ही सर्वे/गट नंबरचा व चतुःसीमा सर्व्हे/गट नंबरचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
प्रश्न:अर्जावर अदलाबदल दस्त करू इच्छिणाऱ्या दोन्ही खातेदारापैकी कमीत-कमी किती जनाची स्वाक्षरी आवश्यक आहे?
कोणत्याही एका सज्ञान खातेदाराची स्वाक्षरी आवश्यक आहे.
प्रश्न:सलोखा योजनेंतर्गत दस्त नोदानिकृत करताना एखाद्या खातेदाराने संमती नसेल तर दस्त नोदणी करता येईल का?
नाही.दोन्ही सर्व्हे नंबर आणि गटातील सर्व सहधारक याची दस्त नोंदणीस संमती असल्याशिवाय अशी अदलाबदल नोदणीनिकृत होणार नाही.
प्रश्न:सलोखा योजनेंतर्गत दस्ताची नोंदणी झाल्यानंतर दोन्हीही पक्षकाराची नंतर सदर काही वादामुळे दस्त रद्द करायचं असेल तर त्यांना सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा मिळेल किंवा कसा?
नाही.त्यांना कायदानुसार दस्त रद्द करण्याबाबत कायदेशीर पध्दतीनुसार सर्वसंमती असेल तरच आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरून दस्त रद्द करता येईल.
निष्कर्ष:नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आपण नेहमीप्रमाणे नव-नवीन योजना ह्या आपल्या मराठी वाचकांसाठी आपण घेऊन येत असतो.आमचा वेबसाईट चा एकच उद्देश आहे,तो म्हणजे प्रत्येकाला आपला हक्क मिळाला पाहिजे.ज्या योजनेसाठी संबधी व्यक्ती पात्र असेल तर तो त्याच्या लाभापासून वंचित राहू नये हाच आमचा पर्यंत असतो.तुम्हाला जर अश्याच नव-नवीन योजनेची माहिती हवी असेल ती पण फ्री मध्ये!तर आपला ओजस्वी सरकारी योजना हा whatsaap ग्रुप जॉईन करा.तर आपण आज सलोखा हि योजना सविस्तर बघितली.त्यासाठी पात्रता आणि आणि कोणत्या शेतकऱ्यांना सलोखा ह्या योजनेचा लाभ घेता येईल.सलोखा योजनेचे सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf फायदे व तोटे आणि वाचकांना पडणारे प्रश्न हे आपण जाणून घेतले आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदीच्छा.
महाराष्ट्र डी.बी.टी पोर्टल ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
सलोखा योजना महाराष्ट्र मराठी| salokha yojana maharashtra 2023-2024|salokha yojana Gr pdf