सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र 24-25 |Savitribai Phule Scholarship for Scheduled Caste girl’s students studying in 5th to 7th STD
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपल्यासाठी नव-नवीन योजना घेवून येणे हा आमचा उद्देश आहे. आपल्याला माहिती झालेल्या योजनेची माहिती इतर घटकांना पाठवणे हेही आपले कर्तव्य आहे. कारण आपल्यामुळे एखाद्या गरजू लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल. व त्या योजनेचा लाभ घेवून त्या लाभार्थीचे जीवन हे समृद्धी किंवा त्याला आर्थिक सहाय्य होईल. “एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” म्हणजेच आपण जर एकमेकांना मदत केली तर दोघांचाई उत्कर्ष होईल. ह्या वाक्य प्रमाणे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी नव-नवीन योजना असतील ह्या घेवून येत असतो. आज आपण महाराष्ट्र सरकार च्या शैक्षणिक योजनापैकी एक महत्वाची योजना बघणार आहोत. ती म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र 2024-2025 |Savitribai Phule Scholarship for Scheduled Caste girl’s students studying in 5th to 7th STD होय.
प्रस्तावना
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सुरु केलेली योजना आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश मुलीना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. प्रत्येक मुलगी शिक्षण घेवून उच्च पदावर गेली पाहिजे, प्रत्येक मुलीला प्राथमिक शिक्षण घेता आले पाहिजे व मुलीचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी हि योजना राबवण्यात येते. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि फक्त मुलींसाठी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनी जी 5 वी ते 7 वी च्या वर्गात प्रवेशित आहे. व नियमित शाळेत येते अश्या विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा मिळत असतो. प्रिय वाचक मित्रानो, हा लेख शेवट पर्यंत वाचवा हि विनंती..
योजनेचे नाव | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |
सुरु | महाराष्ट्र शासन |
उद्देश | मुलीचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे |
लाभार्थी | अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनी |
लाभ | 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीना शिष्यवृत्ती मिळणार |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ————— |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना उद्देश
- विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
- विद्यार्थिनीचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी.
- विद्यार्थिनी रोज शाळेत आले पाहिजेत व त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे.
- शिक्षणामध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. विशेषतः, ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आहे, जेणेकरून त्यांना शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये आणि ते उच्च शिक्षण घेऊ शकतील. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते, शिक्षणात प्रगती होते, आणि सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. हाच मुख्य उद्देश आहे.
Savitribai Phule Scholarship Eligibility
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना पात्रता
- विद्यार्थिनी मुलगी असावी आणि ती अनुसूचित जाती प्रवर्गातील असावी
- उत्पन्न मर्यादा नाही
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- स्वयं-अर्थसहाय्यित विद्यार्थी शाळा वगळता सर्व बोर्डाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत
- विद्यार्थ्याने सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतलेले असावे.
- विद्यार्थिनी वर्षभरात अनुत्तीर्ण झाल्यास ती वर्ग उत्तीर्ण होईपर्यंत पात्र नाही
- दुसऱ्या हप्त्यासाठी, चालू शैक्षणिक वर्षासाठी उपस्थिती 60% अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी येथे क्लिक करा !
Savitribai Phule Scholarship Benefits
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फायदे
- लाभार्थी विद्यार्थिनी हि 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेत असेल तर, दरमहा- रु-60 असे 10 महिन्याचे रु.600 शिष्यवृत्ती म्हणून विद्यार्थिनीला दिली प्रदान केली जाईल.
- इयत्ता 8 ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीना दरमहा रु.100, 10 महिन्याचे रु.1000 शिष्यवृत्ती दिली जाईल.
- टीप: 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणतेही अतिरिक्त लाभ नाहीत. 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी, लाभार्थ्याला फक्त क्र. प्रवेशाच्या तारखेपासून किती महिने तो शाळेत गेला यावरून त्यांना शिष्यवृत्ती देय राहील.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
- महाराष्ट्चे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- बँकेचे पासबुक (बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
- मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र(मार्कशीट)
- प्रवेश पावती
- 2 पासपोर्ट फोटो
- हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत पण ह्या कागदपतत्रामध्ये बदल हि होऊ शकतो, आपण संधीत कार्यलय किंवा online फॉर्म भरण्याचा अगोदर जाणून घ्या.
Savitribai Phule Scholarship Online Application Process
बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती ! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाचा असा करा अर्ज !
- सर्वात प्रथम आपल्याला अधिकृत वेबसाईट वर जा
- https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा!
- आपल्या समोर नवीन पेज उघडेल
- “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा. एक वापरकर्तानाव आणि पासवर्ड तयार करा. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी OTP द्वारे सत्यापित केला जाईल.
- टीप: वापरकर्तानावामध्ये फक्त अक्षरे आणि संख्या असाव्यात. वापरकर्तानाव 4 वर्णांपेक्षा मोठे आणि 15 वर्णांपेक्षा कमी असावे.
- टीप: पासवर्डची लांबी किमान 8 वर्ण आणि कमाल 20 वर्णांची असावी. पासवर्डमध्ये किमान 1 अप्परकेस वर्णमाला, 1 लोअरकेस वर्णमाला, 1 संख्या आणि 1 विशेष वर्ण असणे आवश्यक आहे.
- आता लॉगिन पेजला भेट द्या आणि तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- तुम्हाला मुख्यपृष्ठावर निर्देशित केले जाईल. डाव्याबाजूस , तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करण्यासाठी “आधार बँक लिंक” वर क्लिक करा.
- “प्रोफाइल” वर क्लिक करा. सर्व अनिवार्य तपशील भरा आणि अनिवार्य कागदपत्रे अपलोड करा (वैयक्तिक तपशील, पत्त्याची माहिती, इतर माहिती, चालू अभ्यासक्रम, मागील पात्रता आणि वसतिगृह तपशील). “जतन करा” वर क्लिक करा.
- “सर्व योजना” वर क्लिक करा. योजनांची यादी दिसेल. “सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती” वर क्लिक करा.
- सर्व अतिरिक्त माहिती भरा आणि अनिवार्य कागदपत्रे अपलोड करा. तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी “सबमिट बटनावर” वर क्लिक करा. तुमचा ऍप्लिकेशन आयडी प्रदर्शित करून एक पॉप-अप दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी अनुप्रयोग आयडी जतन करा. “ओके” क्लिक करा.
- आपला अर्ज यशस्वी झाला असा sms आपल्याला येईल.
- अर्ज भरत असताना आपण आवश्यक माहिती/अनिवार्य माहिती हि काळजीपूर्वक भरा. माहिती भरत असताना आवश्यक कागदपत्रे हि समोर ठेवा जेणेकरून अचूक माहिती हि भरता येईल. अश्या पद्धतीने आपण स्टेप बाय-स्टेप बाय आपला अर्ज आपण भरू शकतात. आपल्याला अर्ज भरत असताना काही समस्या किंवा शंका असतील तर आपण संबधित कार्यलय किंवा योजनाचा संपर्क क्रमांक वर फोन करून विचारू शकता किंवा आपण ई-मेल सुद्धा करू शकतात.
- नमस्कार विद्यार्थी मित्रानो , आज आपण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र 24-25 |Savitribai Phule Scholarship for Scheduled Caste girl’s students studying in 5th to 7th STD बद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. ह्या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि मागासवर्गीय मुलींसाठी महाराष्ट्र सरकार कडून राबवण्यात येणारी योजना आहे. मुलीनी चांगले शिक्षण घेवून उच्च पदावर जावे, शिक्षणाच्या आड परिस्थिती आड येऊ नये. मुलीनी रोज शाळेत जावे आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे. प्रिय वाचक मित्रानो हि माहिती अपूर्ण हि असू शकते, आपण संबधित कार्यलय किंवा शाळेची संपर्क साधून अधिकची माहिती मिळवू शकतात. हि माहिती आपल्या इतर मित्रांना व नातेवाईक यांना शेअर करा, आपला एक शेअर एका गरु लाभार्थ्याला योजनेच्या लाभ मिळू शकतो. आपल्याला योजनासंबधी काही समस्या किंवा शंका असतील तर आम्हाला Comment च्या माध्यमाने विचारू शकतात. आम्ही लवकरच आपले शंका आणि प्रश्नाचे निराकरण करण्याचा नक्की प्रयन्त.धन्यवाद……
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती येथे क्लिक करा !
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे ?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि मागासवर्गीय विद्यार्थिनीसाठी आहे. विमुक्त जाती , भटक्या जमाती(VJNT), विशेष मागासवर्गीय (SBC) अनुसूचित जाती(SC) ह्या प्रवर्गासाठी सावित्रीबाई फुले योजना आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय आहे ?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. विशेषतः, ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आहे, जेणेकरून त्यांना शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये आणि ते उच्च शिक्षण घेऊ शकतील. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते, शिक्षणात प्रगती होते, आणि सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. हाच मुख्य उद्देश आहे.
सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करायचा ?
सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा अधिकृत संकेस्थळला भेट देऊन त्या ठिकाणावरून आपल्याला अर्ज करता येईल. अर्जदार हि विद्यार्थिनी असली पाहिजे व ती 5 वी ते 10 मध्ये नियमित शाळेत जाणरी असली पाहिजे. अश्या मुली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची पात्रता काय?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या पात्रता खालीलप्रमाणे
१.विद्यार्थिनी मुलगी असावी आणि ती अनुसूचित जाती प्रवर्गातील असावी २.उत्पन्न मर्यादा नाही ३.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे ४.
स्वयं-अर्थसहाय्यित विद्यार्थी शाळा वगळता सर्व बोर्डाचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत ५.विद्यार्थ्याने सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतलेले असावे. ६.विद्यार्थिनी वर्षभरात अनुत्तीर्ण झाल्यास ती वर्ग उत्तीर्ण होईपर्यंत पात्र नाही ७.दुसऱ्या हप्त्यासाठी, चालू शैक्षणिक वर्षासाठी उपस्थिती 60% अनिवार्य आहे. हे सर्व साधारणपणे पात्रता व अटी आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ व फायदा काय आहेत?
१.लाभार्थी विद्यार्थिनी हि 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेत असेल तर, दरमहा- रु-60 असे 10 महिन्याचे रु.600 शिष्यवृत्ती म्हणून विद्यार्थिनीला दिली प्रदान केली जाईल. २.इयत्ता 8 ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीना दरमहा रु.100, 10 महिन्याचे रु.1000 शिष्यवृत्ती दिली जाईल. ३.टीप: 10 महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणतेही अतिरिक्त लाभ नाहीत. 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी, लाभार्थ्याला फक्त क्र. प्रवेशाच्या तारखेपासून किती महिने तो शाळेत गेला यावरून त्यांना शिष्यवृत्ती देय राहील. हे सर्व लाभ देय राहतील.