सुकन्या समृद्धी योजना:Sukanya samrudhi yojana in marathi 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुकन्या समृद्धी योजना:Sukanya samrudhi yojana 2024

योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना
सुरुवात केंद्र सरकार
उद्देश मुलीना शिक्षणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे
लाभार्थी हि योजना फक्त मुलीना लागू आहे
घोषणा पानिपत (हरियाना)
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
संपर्क क्र ———-
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
sukanya samrudhi yojana in marathi 2024

नमस्कार मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईट ओजस्वी सरकारी योजना वर आपण नेहमी राज्य सरकार व केंद्र सरकार द्यारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आपण आपल्या वेबसाईट वर त्याची माहित आपण देत असतो.कारण कि योजना,महत्व,पात्रता आणि कागदपत्रे काय-काय लागतील याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयन्त करत असतो.

प्रिय वाचक मित्रानो,ह्या लेखामध्ये आम्ही सुकन्या समृद्धी योजेनेबद्दल

पात्रता/कागदपत्रे /खाते कसे उघडायचे यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे.जर आपले अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही comment च्या साह्याने विचारू शकतात.धन्यवाद

प्रस्तावना

आपण जर बघितले तर प्रत्येक परिवारात पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असतो तसेच आरोग्य शिक्षण हे याची जास्त प्रमाणत काळजी असते.मुल लहान असताना प्रत्येक जन विवध योजनेचा शोधात असतो.कारण त्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षण घेऊन त्यांनी आपल भविष्य उज्वल करावे.आणि आपल्या स्वताच्या पायावर उभे राहावे यासाठी सर्व पालक अतोनात प्रयन्त करत असतात.प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी प्रयन्त करत असतो.आपला मुलगा शिकावा त्याने चांगले शिक्षण घ्यावे व चांगल्या नौकरी ला लागावे यासाठी पालकांना चिंता असते.या सर्व गोष्टींचा विचार करून केद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ २०१५ मध्ये केला.या योजनेचा उद्देश म्हणजे आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करणे,ह्या योजनेचा शुभारंभ बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानांतर्गत करण्यात आला आहे.सुकन्या समृद्धी योजना  हि एक छोटी ठेव योजना आहे.या ठेवीमुळे मुलीचे पुढील शिक्षण असेल,आरोग्य आणि लग्नाचा खर्च भागण्यासाठी हि योजना महत्वपूर्ण आहे.ह्या योजनेमुळे आपल्या मुलीचे भविष्यातील शिक्षण असेल व लग्नाचा खर्च असेल मुलगी २० वर्षाची होऊपरेंत ह्या योजनेचा हफ्ता आपण भरू शकतो आणि त्यानंतर आपण काढू शकतो.सुकन्या समृद्धी योजना साठी खात उघडण्यासाठी किंवा योजनेचा लाभ घेन्यासाठी वय १० वर्ष खाली असले पाहिजे.मुलीचा जन्म आणि ती १० वर्षाची होईपरेंत पालक हे १० वर्षाचा आतमध्ये कधीही बचत खाते उघडू शकतात.सुकन्या समृद्धी हि योजना फक्त मुलीसाठी आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे :

  • कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
  • वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
  • या योजनेचा मुदतीचा कालावधी कालावधी २१ वर्षे आहेत.
  • सुकन्या समृद्धी योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचे आहे. (७.६% इतके)
  • सुकन्या समृद्धी योजनेचे खाते TRANSFER करता येते बँक किवा पोस्ट्स OFFICE मध्ये.
  • मुदत झाल्यानंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
  • मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तर शिक्षणासाठी ५०% रक्कमकाढता येईल,
  •  सुकन्या समृद्धी योजनेची हफ्ते १५ वर्ष भरायचे असतात.

बालिका समृद्धी योजनेसाठी येथे क्लिक करा !

सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्टे

  • १० वर्षाच्या आतील मुलीच्या नावे पोस्टामध्ये किंवा अधिकृत व्यापारी बँकेत मुलीच्या पालकांना ‘सुकन्या समृध्दी खाते’ काढता येईल. एका मुलीसाठी एक खाते याप्रमाणे दोनच मुलींसाठी खाते काढता येईल.
  • दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावे खाते काढण्याची सुविधा २०१७ पासुन देण्यात आली आहे.
  • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत करण्यात येणारी गुंतवणुक ‘प्राप्तिकर कायदा १९६१’ कलम ८०८ नुसार करमुक्त असेल.
  • वर्षभरात किमान रक्कम खात्यामध्ये भरली न गेल्यास ५० रू इतका दंड आकारण्यात येतो.
  • खाते उघडते वेळी २५० रु. अनामत रक्कम भरणे आवश्यक असून त्यानंतर प्रत्येक वर्षी कमीत कमी २५०रु. ते जास्तीत जास्त १,५०,००० रु. इतकी रक्कम खात्यामध्ये भरता येते.
  • मुलगी १० वी पास झाल्यानंतर खात्यामधील काही रक्कम शिक्षणासाठी काढता येऊ शकते. तर मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १०० टक्के रक्कम काढता येऊ शकते.
  • वर्ष २०१७-१८ साठी या खात्यातील रकमेवर ७.८ टक्के इतका व्याजदर देण्यात येणार आहे. २०१६-१७ साठी तो ८.६ टक्के इतका होता. (Q.1- 2021 साठी ७.६%).
  • या खात्यामध्ये १४ वर्ष रक्कम गुंतविणे आवश्यक आहे.
  • मुलीच्या २१ व्या वर्षी खात्याची मुदतपुर्ती होईल.
  • खाते भारतातील कोणत्याही गावामध्ये हस्तांतरित करता येऊ शकते.
  • वरील प्रमाणे संपूर्ण वैशिष्टे व उद्देश आहेत. आपण एकदा सविस्तर माहिती ह्या योजनेविषयी जाणून घ्या.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता आणि अटी

  • मुलीचे वय दहा वर्षांच्या आत मध्ये असावे म्हणजे जन्मापासून ते १० वर्षाची होईपरेंत पालक केव्हा हि खात उघडू शकतात.
  • मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
  • एका कुटुंबात फक्त २ मुलींना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो.त्यामुळे २ मुलीचे खाते आपण उघडू शकतो.समजा १ मुलीनंतर जर २ जुळ्या मुली झाल्या तर तर अश्या वेळीस ३घः मुलीचे आपण खात उघडू शकतो.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

  • सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्याही सहभागी बँक अथवा पोस्ट ऑफिस शाखेमध्ये उघडले जाऊ शकते.
  • तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी जा.
  • तिथून सुकन्या समृद्धी योजना चा फॉर्म घ्या आणि आवश्यक माहिती सह फॉर्म भरा आणि सोबत लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा.
  • कमीत कमी २६० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पण पण दीड लाखाच्या आत, इतके रक्कम तुम्ही भरणार असाल ती फॉर्म मध्ये आणि स्लिप वर लिहा.
  • तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती दिली जाईल व तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू केले जाईल.
  • या खात्यासाठी तुम्हाला एक पासबुक सुद्धा दिले जाईल

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

टीप:- सुकन्या समृद्धी योजनेचा फार्म हा न चुकता भरावा.मुलीचे नाव बरोबर आहे का.पत्ता बरोबर आहे का याची खात्री करा.

  • वडिलांचे प्रतिज्ञापत्र
  • आधार कार्ड
  • मुलीचा जन्म दाखला
  • पालकांचा फोटो असलेले ओळखपत्र उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी
  • पत्याच्या पुरावा म्हणून लाईट बिल किंवा रेशन कार्ड.

ह्या सर्व कागदपत्रे सुकन्या फॉर्म ला प्रत्येकी एक झेरॉक्स लावयाची आहे.आणि फॉर्म हा सादर करायचा आहे.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण सुकन्या समृद्धी योजनाबदल सविस्तर माहिती जाणून प्रयन्त केला. या लेख मध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना साठी लागण्रे आवश्यक कागदपत्रे, पात्रता, उद्दिष्टे आणि अर्ज कसा करायचा हि संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. पण हि माहिती अपूर्ण हि असू शकते त्यामुळे आपण संबधित बँक खाते किंवा पोस्ट खात्यामध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनाविषयी अधिक माहिती जाणून घ्या. आपल्याला सुकन्या समृद्धी योजनाविषयी काही समस्या किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला comment च्या माध्यमाने विचारू शकता. आम्ही लवकरच आपल्या प्रश्न किंवा समस्याचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू, आपल्याला जर आमचे योजनाविषयी लेख आवडत असेल किंवा एखाद्या योजनेचा आपल्याला लाभ मिळाला असेल तर आम्हाला comment च्या माध्यमाने आपला अभिप्राय नक्की कळवा. आपया अभिप्रायमुळे आम्हला अश्याच नव-नवीन योजना घेवून येण्यासाठी उर्जा मिळते. सुकन्या समृद्धी योजना आपल्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना हि श्वर करा खूप छान अशी योजना आहे. आपल्या एका शेअर ने एखाद्या लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळू शकता. धन्यवाद मित्रानो….

सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश काय होता ?

सुकन्या समृद्धी योजनेचा, मुलींच्या भविष्यातील शिक्षणविषयक आणि लग्नविषयक गरजा भागवणे. मुलीना शिक्षणसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि लग्नासाठी हि हाच उद्देश सुकन्या समृद्धी आहे.

सुकन्या समृद्धी योजनेची घोषणा कोणत्या ठिकाणावरून करण्यात आली ?

‘बेटी बचाओ, बेटी पाढाओ या योजनेअंतर्गत २२ जानेवारी २०१५ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी याज्नेची घोषणा पानिपत हरियाना येथे केली होती.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते ?

१.वडिलांचे प्रतिज्ञापत्र २.आधार कार्ड ३.मुलीचा जन्म दाखला ४.पालकांचा फोटो असलेले ओळखपत्र उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ५.पत्याच्या पुरावा म्हणून लाईट बिल किंवा रेशन कार्ड६. मोबाईल क्रमांक आणि भरलेला अर्ज असे सर्व कागदपत्रे हे जमा करायचे आहेत. आपला अर्ज हा यशस्वीरित्या जमा झाला याची करा व पोच पावती घ्या!

सुकन्या समृद्धी योजनेच्या पात्रता आणि अति काय आहेत ?

मुलीचे वय दहा वर्षांच्या आत मध्ये असावे म्हणजे जन्मापासून ते १० वर्षाची होईपरेंत पालक केव्हा हि खात उघडू शकतात.
मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
एका कुटुंबात फक्त २ मुलींना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो.त्यामुळे २ मुलीचे खाते आपण उघडू शकतो.समजा १ मुलीनंतर जर २ जुळ्या मुली झाल्या तर तर अश्या वेळीस ३ घी मुलीचे आपण खात उघडू शकतो. अश्या प्रकारे अति व पात्रता व शर्ती आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment